दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हा सफाईवाला फक्त आशूच्या मागे मागे २४ तास फिरत असावा..
म्हणजे वरच्या मजल्यावरून टाकलेला कचरा आशूनेच टाकलाय हे त्याला आधी माहित असते.
पण तो झाडूवाला रोज पान खाऊन थू़ंकतो ते त्याला कळत नसावं Happy

अगदी अगदी गोगाजी. मला तेच वाटते संपूर्ण ward सोडून तो फक्त आशुवर लक्ष ठेवतो, Lol .

आणि तो आशुही बिलकुल सुधारत नाही.

अरे, सुजय कुठं आहे? त्याच्याशिवाय बोअर होतंय. काल precap मधे दाखवलेला सुजयच होता ना?
काल्च्या एपी मधे रेश्मा छान दिसत होती.

आला बाबा सुजू एकदाचा पण तो बुझा बुझासा कायको?

शेवटची १० मिनिटे धमाल. ती प्रगल्भा परत कैवूकडे attract होते तेव्हा सुजयच्या चेहेऱ्यावरचे सुटकेचे भाव आणि कैवल्यचे अडकल्याचे भाव अप्रतिम. Lol

शेवटची १० मिनिटे धमाल. ती प्रगल्भा परत कैवूकडे attract होते तेव्हा सुजयच्या चेहेऱ्यावरचे सुटकेचे भाव आणि कैवल्यचे अडकल्याचे भाव अप्रतिम...+१ Lol

आजचा भाग अंमळ गंडल्यासारखा वाटला. बाकी सगळं जाऊदे पण मागे कधीतरी घडलेल्या गोष्टी दाखवताना पण सुजयची दाढी तशीच ठेवली होती. Whereas सुजय आधी कायम क्लीन शेव्ह वाला दाखवला आहे.
असो.

आजचा भाग अंमळ गंडल्यासारखा वाटला. बाकी सगळं जाऊदे पण मागे कधीतरी घडलेल्या गोष्टी दाखवताना पण सुजयची दाढी तशीच ठेवली होती. Whereas सुजय आधी कायम क्लीन शेव्ह वाला दाखवला आहे.
असो.

>>>>सुजयची दाढी तशीच ठेवली होती. Whereas सुजय आधी कायम क्लीन शेव्ह वाला दाखवला आहे.
मुद्दम तसं दाखवलं आहे कारण अ‍ॅना थाप मारत असते आणि जात्याच मठ्ठ असल्याने सुजयला तसंच स्टोरी मध्ये आणते... Proud

मग ती अतिशय रडकं तोंड घेवुन असणारी कोण आहे म्हणे ?>>>रेश्मा आहे ती. मोहन गोखले आणी शुभान्गी सन्गवई-गोखलेची कन्या. आईच्या मानाने लेक जरा सोसोच आहे. काही वेळा आवडते आणी काही वेळा अक्षरशः डोक्यात जाते. कायम अनुनासिक बोलते.

काल नवरा तेच म्हणला की याची दाढी तशीच आहे, डायरेक्टर विसरला का?

मोहन गोखलेला मी अगदी जवळुन बघीतले होते. कर्वे रोडला माझ्या नातेवाईकान्कडे जाताना तो रस्त्याच्या आतल्या गल्लीत उभा होता. एकदम बारीक अन्गकाठी, घारे डोळे आणी एखाद्या इन्ग्रजाला तोन्डात मारेल असा लालबुन्द गोरा रन्ग. प्रवासाने मी जाम थकले होते, हातात बॅग होती. आणी अनपेक्षीत समोर दिसल्याने काही बोलावे, सही मागावे हे पण डोक्यात नाही आले तेव्हा. जब्बार पटेल यान्च्या नन्तर इतके जवळुन बघीतलेला हा एकमेव फिल्मी माणुस. जब्बार पटेलान्शी रेल्वेत बोलणे झाले होते. तेव्हा मला सिनेमाची जाम क्रेझ होती, आता नाही.

तो एक आशू झोपतो वगैरे भाग होता तोच का? नीट समजला नाही.

मधे पुन्हा दोन तीन भाग बघायचे प्रयत्न केले. पकाऊ वाटले. संवाद भयानक हळुहळू पुढे सरकतात.

त्यात आजकाल हवा येउ द्या मधले ते भाऊ कदम वगैरे सापडल्याने तेच जास्त बघितले जाते Happy

साहिर आणि वा रा कान्त ह्यांच्यावरच्या एपिसोडस् चे अपडेट कोणी देईल का. मी मिस केलेत ते.

Pages