Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कैवल्य म्हणतो ६ चे ५ झाले
कैवल्य म्हणतो ६ चे ५ झाले असते ना?
>>>
मला कालचा सो सोच
मला कालचा सो सोच वाटला.
रच्याकने ह्या शिरेलीला ३ अवार्ड्स मिळाली झी गौरवमध्ये.
Kaal che lai bhari
Kaal che lai bhari hote!
Meennal Uvach:
Utha Murari,
Ghya bharari,
Lady Prem Chopra,
Zali Farari....!
कालचा आवडला. राकेश पण बरं काम
कालचा आवडला. राकेश पण बरं काम करतो.
आपल्यासाठी `चुकवू नये असं
आपल्यासाठी `चुकवू नये असं काही...` सदरातली मालिका. पण अलीकडं काही काही भाग (दाण्णकनं) पडायलेत. आजच्या दसऱ्याचा भाग त्यातलाच एक. थोडी चेष्टा, थोडी टिंगल, थोडा विनोद, थोडा तंटा-बखेडा, थोडं तत्त्वज्ञान... असं सगळं मिळून भरपूर चांगली मालिका नाही होत.
दसऱ्याचं तत्त्वज्ञान केकेला माहीत नव्हतं म्हणजे आश्चर्यच. आणि स्कॉलर अॉफिसला जाऊन येतो तेवढ्या आठ-दहा तासांमध्ये थोडंसंच घडतं. (तेवढ्या काळात रेश्माच्या अंगावरची साडी आणि आशूचा झब्बा तोच) निकम आजी `देवी`चं अनेकवचन `देव्या`-`देव्या` असं करंत होत्या, तेव्हा वाटलं हे लिहिणाऱ्याला शिव्या द्याव्या! आणि शेवटी अॅना एकदम कुठे गायब होते?
त्या निकमआजी नेहेमी डोक्यातच
त्या निकमआजी नेहेमी डोक्यातच जातात आणि त्या देव्या देव्या मलाही नाही आवडलं, ऐकायला पण किती विचित्र वाटत होतं.
त्या निकमआजी नेहेमी डोक्यातच
त्या निकमआजी नेहेमी डोक्यातच जातात >>> +१
संपूरणसिंग कालरा कोण आहे माहिती आहे? असं विचारलं तेव्हा विशेष डोक्यात गेल्या होत्या
त्या निकमआजींच्या सुनेला
त्या निकमआजींच्या सुनेला महिषासुराचं नाव नाही आठवलं. नुसतं दानव दानव करत होती.
त्या निकमआजी नेहेमी डोक्यातच
त्या निकमआजी नेहेमी डोक्यातच जातात >>> +१००
आजच्या
आजच्या भागाबद्दल...
SORRY!
बाकीचे कुठे हरवले होते? रेश्मा, किंजल आणि आज स्कॉलरसुद्धा बोअर. तुलनेने राकेश बरा.
सध्या काय चालुये मालिकेत?
सध्या काय चालुये मालिकेत?
छान चाललेत हल्लीचे
छान चाललेत हल्लीचे एपिसोड्स.
काल-परवा कैवल्य आणि पियुची अॅक्टिंग आवडली. आजच्या भागात कैवल्य सुजय ला स्पष्टच सांगणार असं दिसतंय.
आजचा एपिसोड सुंदर होता.
आजचा एपिसोड सुंदर होता. विशेषतः सुजय आणि कैवल्य संवाद छान हाताळले. दोघांनी चागलं काम केलं पण सुजयने जास्त छान केलं. एक्स्प्रेशन्स सुजयचे एक्सलंट होते.
हो मी दोन्ही एपिज आवर्जुन
हो मी दोन्ही एपिज आवर्जुन पाहिले, फक्त मला एक प्रश्न पडलाय मागच्या वेळी जेव्हा पियु कैवल्यला सांगते की तिला तो आवडतो तेव्हा तो म्हणतो की मी तुझ्या भावाचा मित्र आहे हे लक्षात ठेव वै वै, पण मग यावेळेस पियु समोर आल्यावर तो इतका अवघडलेला का दाखवलाय? स्पेशली तो आणि पियु मुलींच्या रुममध्ये एकटेच असताना.
अजुन एक प्र. सुजय दाढी कधी काढणार? रोगट दिसतो तो त्यात..
अन्जू +११११११११ मुग्धा असं
अन्जू +११११११११
मुग्धा असं असेल की आता त्याला कळलंय ना की तिच्या मनात काय आहे त्याच्याबद्दल म्हणून असेल.
पियु समोर आल्यावर तो इतका
पियु समोर आल्यावर तो इतका अवघडलेला का दाखवलाय?> कारण त्याला पियुच्या वागण्यात फारसा काही फरक नाही जाणवत. ती कैवल्य सोडून बाकी सगळ्यां ना दादा-ताई म्हणते अवघडलेला असून ही तो काहीतरी विषय काढून वातावरण हलकं करायचा प्रयत्न करतो.
बाकी अन्जू +१
अंजली, मित.. हम्म असेल
अंजली, मित.. हम्म असेल बहुदा..
अन्जुच्या पोस्टिला अनुमोदक. .
सुजय दाढी कधी काढणार>>>>>
सुजय दाढी कधी काढणार>>>>> अजिबात हा लुक आवडला नाही.
हो ना ग अंके, आजारातुन
हो ना ग अंके, आजारातुन उठल्यासारखा वाटतो
काय झालं ह्या भागात ? सुजय
काय झालं ह्या भागात ? सुजय काय म्हणतो कैवल्यने सांगितल्यावर की पियुला तो आवडतो ? नुसत्या प्रोमोवरून वाटलं की कैवल्य सांगतो - तसं नसेल तर जे झालं ते सांगा
कालचा भाग आवडला. अतिशय संयत
कालचा भाग आवडला. अतिशय संयत हाताळणी आणि नेमके संवाद. सुजयचा अभिनय आवडला.
प्राजक्ता हो कैवल्य सांगतो
प्राजक्ता हो कैवल्य सांगतो सुजयला पियूला तो आवडतो ते. खूप भारी काम केलेय सुजयने कालच्या भागात. उगीच आकांडतांडव नाही, इमोशनल ड्रामे नाहीत. एक टिपीकल मोठ्या भावाचा रोल खूप मस्त करतोय सुजय. भेळेचा सीन पण क्यूट. छान बाँडिंग आहे भावा बहिणीतले.
मस्त होता कालचा भाग
मस्त होता कालचा भाग
आजचा पण मस्त झाला.
आजचा पण मस्त झाला.
कालचा पण छान. कैवल्य-मीनल
कालचा पण छान. कैवल्य-मीनल संवाद छान. कैवल्य- सुजय सीन छान. आजपण सुजय भारी वाटला मला. मित्राशी कसं बोलू, काय बोलू. ते सर्व अवघडलेपण त्याने सुंदर सादर केलं. तो NSD तून शिकून आलाय, हे जाणवतं अधुनमधुन.
हो मस्त आजचा भाग पण. फक्त
हो मस्त आजचा भाग पण.
फक्त एका ठिकाणी कैवल्य म्हणतो मला सुजयला हरवायचं नाहीये ते खटकलं कानाला इंग्लिशचं शब्दशः भाषांतर. गमवायचं नाही असं हवं होतं.
अंजली छान निरीक्षण. माझ्या
अंजली छान निरीक्षण. माझ्या एवढं लक्षात आलं नाही. रिपीट बघेन जमलं तर.
आज तुनळीवर भाग बघेन मिसलेले.
आज तुनळीवर भाग बघेन मिसलेले.
आजचा भाग कस्ला स्वीट होता!
आजचा भाग कस्ला स्वीट होता! सुजय फार्फार आवडला. ते दोन छोटे बो बांधून लै च क्यूट दिसत होता. किती छान समजून घेतलं आणि समजावलं त्याने पियूला! शेवटची ५-१० मिनीटं अमेझिंग!!
rmd+1 मधेच आशु येऊन सिक्सर
rmd+1 मधेच आशु येऊन सिक्सर मारुन गेला
Pages