गोत्र माझे भागवत

Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2015 - 07:05

गोत्र माझे भागवत

आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला

दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास

भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश

तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून

विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात

वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली !

छान

सायली, दिनेशदा, अदीजो (अश्विनी), विशाल, सोन्याबापू, सई, मंजूताई, एक मायबोलीकर, रावी, मनीमोहोर, मुक्तेश्वर कुलकर्णी, पद्मावती - सर्वांचे मनापासून आभार ........

जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल .....

ज्ञानोबा माऊली तुकाराम ....

अति सुंदर!अप्रतिम!!
-ह्रदयातुन आलेली.

सर्वांचे मनापासून आभार ........

जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल .....

ज्ञानोबा माऊली तुकाराम ....

पुन्हा एकदा,
लय भारी............
जय जय विठ्ठल्,जय हरी विठ्ठल!!!!!!!!