Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2015 - 07:05
गोत्र माझे भागवत
आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला
दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास
भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश
तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून
विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात
वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है! अप्रतिम.. खुपच
क्या बात है! अप्रतिम..
खुपच सुरेख जमलीये कविता, नव्हे अभंगच म्हणा की...
Sundarach jamaleey
Sundarach jamaleey
फारच छान!
फारच छान!
सुरेख ...
सुरेख ...
आवडली !
आवडली !
आवडली!
आवडली!
वा, किती खरीखुरी रचना आहे.
वा, किती खरीखुरी रचना आहे. खुप सुलभ आणि रसाळसुद्धा..
ज्ञानोबा माऊली तुकाराम !
निव्वळ अप्रतिम!!! निव्वळ
निव्वळ अप्रतिम!!! निव्वळ अप्रतिम!!!
सुरेख अभंग. फारच आवडला.
सुरेख अभंग. फारच आवडला.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
खूप आवडली...
खूप आवडली...
छान
छान
सायली, दिनेशदा, अदीजो
सायली, दिनेशदा, अदीजो (अश्विनी), विशाल, सोन्याबापू, सई, मंजूताई, एक मायबोलीकर, रावी, मनीमोहोर, मुक्तेश्वर कुलकर्णी, पद्मावती - सर्वांचे मनापासून आभार ........
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल .....
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....
भक्तिरस ओतप्रोत भरून
भक्तिरस ओतप्रोत भरून वाहतोय.... निव्वळ अप्रतिम रचना... खूप आवडली...
खूप आवडला अभंग!
खूप आवडला अभंग!
अप्रतिम रचना.....
अप्रतिम रचना.....
अप्रतिम रचना... खूपच आवडली...
अप्रतिम रचना... खूपच आवडली...
खुपच सुंदर अभंग !!!
खुपच सुंदर अभंग !!!
सुरेख.
सुरेख.
खुपच छान..
खुपच छान..
अति
अति सुंदर!अप्रतिम!!
-ह्रदयातुन आलेली.
सुरेख.
सुरेख.
खूप सहज-प्रवाही !
खूप सहज-प्रवाही !
क्या बात है
क्या बात है शशांकजी!!!
मस्तच!!
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार ........
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल .....
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....
पुन्हा एकदा, लय
पुन्हा एकदा,
लय भारी............
जय जय विठ्ठल्,जय हरी विठ्ठल!!!!!!!!
पुन्हा वाचिली नव्याने मन
पुन्हा वाचिली नव्याने
मन भारिले काव्याने
जनू विठू माय उभी
रखुमाईच्या साथिने..._/\_