Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाड दिसल्यावर कसा
हाड दिसल्यावर कसा कुत्र्याच्या तोंडातून लाळेची धार वाहेल तसं
>>>>>
दक्षिणा
रश्मी, अगदी रजनी जुईशी
रश्मी,
अगदी रजनी जुईशी बोलते त्या टोनमध्ये वाचलं.
झाडाखाली बसायची जागा मात्र
झाडाखाली बसायची जागा मात्र मस्त आहे.. आता सलमान खान तिकडे गाडी घेऊन येईल की नाही ते सांगता येत नाही..
खरच भीक लागलीये. जेवण म्हणजे
खरच भीक लागलीये. जेवण म्हणजे भजी पाव, रहायला झाडाखालचा पार
मुंबईत एखादा स्वस्त लॉज वगेरे नाही का? अगदी काही नाही तर बस, रेलवे ह्यांचे स्टँड्स पण सुचले नाहीत. सगळाच फालतूपणा आहे
अदितीच्या पपांची अपेक्षा फारच होती - हवापालटाला चाललेत चप्पल घ्यायला पैसे नाहीत, जेवायला पैसे नाहीत तर फिरायला कसे पैसे असतील त्यांच्याकडे
आता हे विरार ला झोपडपट्टीत
आता हे विरार ला झोपडपट्टीत एकत्र राहून डबे बनौन डिलिवरी करतील का? जेवण तरी मिळेल.
नशिब समजा सिग्नलला गाड्या
नशिब समजा सिग्नलला गाड्या पुसताना दाखवत नाहीयेत.
जय साठी प्रॉस्पेक्टीव्ह
जय साठी प्रॉस्पेक्टीव्ह बिझनेस ऑप्शन्स -
बूट पॉलिश
चंपीSS तेल मालिश
रस्त्याच्या कडेला कान कोरणारे
डुप्लिकेट किल्ली बनवणारे
चप्पल दुरुस्त करणारे
आदितीसाठी ऑप्शन्स -
भाजीवाली
धुणी-भांडी करणारी
पोळी-भाजी केंद्रवाली
देवळाबाहेर फुलं विकणारी.
(यातील कोणत्याही व्यवसायाला किंवा तो करणार्या कोणत्याही व्यक्तीला हलके लेखण्याचा उद्देश नाही).
तो तिचा बाप एवढ सुनवत होता ,
तो तिचा बाप एवढ सुनवत होता , वर ती बापाला सुन्वत होती
आणि हा डोळ्यात पाणी असलेला एकच रडका थोबडा घेऊन उभा
आधी ठीके पण आता सीरिअल ला इतके महिने झाल्यावर पण याच्या अभिनयात सुधारणा नाहीये, एक्स्प्रेशन्स मध्ये मार खातोय जाम. तो ललित प्रभाकर खूपच बरा आहे . संपल आहे करिअर टिळक साहेबांचे
मलाही हेच कळत नाही की हा
मलाही हेच कळत नाही की हा बाबाजी ( जय ) अभिनयात कधी सुधारणा दाखवणार? जेव्हा पहावे तेव्हा खेटरे खाल्ल्यागत चेहेरा. अरे काय हे, त्याचा तो शेळपट भाऊ पण तसलाच. आता शोभडीचे फावेल जर अदिती तिथे राहिली तर. कारण आजच्या भागात ते तिथे गेलेले दाखवलेत.
एक प्रश्न .. यांच्या एअरबॅग
एक प्रश्न ..
यांच्या एअरबॅग हे लोक्स सोबत घेऊन फिरतात का मग ?
मग प्रातःविधी कुठ करतात ? दोन तीन दिवस झाले एकच कपडे घालुन फिरतात का ?
त्या जय आदितीचं लिपस्टिक पावडर आयलायनर अजुनही टिकुनचं आहे का ?
कुणाचीहि खेचण्याची इच्छा नै सो मनाला लावुन घेऊ नये प्लीज ..
जय-अदितिसाठी ही प्रोफेशन्स
जय-अदितिसाठी ही प्रोफेशन्स योग्य आहेत-
जयसाठी: 'कान होणे'- हा माणूस कोणत्याही वयाच्या माणसांचे प्रेमाचे, उद्धटपणाचे, समजावण्याचे, अपमानाचे अशा सर्व भावछटांचे बोलणे निर्विकारपणे ऐकून घेऊ शकतो. हा कधीही उलटून बोलत नाही वा मनातल्या भावना बोलून दाखवत नाही. तस्मात हा एक उत्तम श्रोता आहे. कोणीही या, मनातलं फाडफाड याच्या तोंडावर बोलून जा. प्रती मिनिट चार्जेस रू. दहा फक्त.
अदितीसाठी: ही स्त्री वरील पात्राच्या बरोब्बर उलट आहे. ही कोणत्याही विषयावर उत्तम प्रवचन देऊ शकते. तुमची इच्छा असो वा नसो. कुटुंब, प्रेम, एकत्र कुटुंब, सहृदयता, भावनाशीलता, अगत्य, अपमान पचवून हसरा चेहरा ठेवणे, आपल्याला झेपत नसतानाही दुस-यांना धावून धावून मदत करण्याची वृत्ती, आजच्या जगातलं हरवलेलं प्रेम आदी मानवी भावनांशी निगडित प्रवचनं ती उत्तमरितीने देते. फक्त तिचं ऐकायची तयारी हवी. अर्ध्या तासाच्या एका भाषणासाठी चार्जेस रु. ५० फक्त.
टीपः दोन वेळा चहा, दोन वेळा भजीपाव आणि रात्री डोकं टेकायला दगड इतक्याच या व्यक्तींच्या गरजा असल्याने हे मानवतेचे सागर आपल्या कौशल्यांसाठी अतिशय वाजवी किंमत आकारतात. तुम्हाला इतके पैसेही देणं शक्य नसेल तर तुमच्यासाठी या सेवा फुकटही देण्यात येतील, काळजी नसावी.
(No subject)
पूनम, एक नंबर
पूनम, एक नंबर
पूनम
पूनम
एकदम बरोब्बर पूनम आदिती
एकदम बरोब्बर पूनम आदिती घरोघरी जाऊन स्वयंपाकही करू शकते, तुमच्या आईला.. घ्यायची साडीही निवडू शकते, भर रस्त्यात बसून चप्पल दुरूस्त करू शकते.
तसंच हे दोघं जॉईंटली कॉम्प्युटर बेसिक कोर्सेस शिकवतात. आता लवकरच MH CET चाही अभ्यास घेतील. सगळ्यात मोठं की स्किल म्हणजे "आमच्या येथे क्लाएंट प्रेझेंटेशन्स बनवून मिळतील. सर्व मिटींग्ज सक्सेसफुल!"
(No subject)
(No subject)
पूनम लय भारी.
पूनम लय भारी.
उत्तम प्रवचन देऊ शकते. तुमची
उत्तम प्रवचन देऊ शकते. तुमची इच्छा असो वा नसो.>
प्रवचन देण्याच्या बाबतीत
प्रवचन देण्याच्या बाबतीत देसाई फ्यामिलीला तोड नाही पण
दिसला कि धरपकड आण देसाई वाडीत आणि लाव त्याच आयुष्य मार्गाला
. गोन्धळ झाला..
. गोन्धळ झाला.:फिदी:.
अगदी अगदी तिकडे देसाई वाडीत
अगदी अगदी तिकडे देसाई वाडीत नाना-माई ,गोकुळात श्रीबाळ ,हिथे झाडाच्या पाराखाली आदिती सगळे मिळून अस काही प्रवचन देतात कि बसSS...एकत्र कुटुंब,नातेसंबंध,शेजारधर्म,वडाच झाड अगदी कुठलाही विषय घेवून दिवस नाही बघत रात्र नाही बघत कधी हि सुरु होतात ...जणू काही समाजप्रबोधनाचा वसाच घेतला आहे झी ने
त्या रेशिमगाठीत तर या
त्या रेशिमगाठीत तर या देसायांना इतरांचीच पडलेली असते.
ती मेघना नवर्याला म्हणते मला बोलायचं आहे तुझ्याशी, तो म्हणतो रात्री बोलू, ती म्हणते अंजली विषयी बोलायचं आहे.
काल सुद्धा त्या अंजलीला घेऊन उगिच उदासवाणी होऊन बसली होती मेदे कॉलेजच्या स्टाफरूमात.
लेडी रामदास स्वामी, चिंता करते विश्वाची आणि चिता करते स्वतःच्या आयुष्याची.
लेडी रामदास स्वामी मेलो मेलो
लेडी रामदास स्वामी
मेलो मेलो , वाच्वा =))
अरे पण आपल्या घरातल्या साबा
अरे पण आपल्या घरातल्या साबा अन साबु लोक अगदि भक्तिभावाने बघत असतात या सगळ्या मालिका.
काल मी इथलं वाचुन नवर्याला म्हण्टलं की जय आदिति म्हणे भजी पाव वर राहिलेले दाखवले. घर गेलय नोकरी नाही. तर माझ्या साबा अश्या चवताळुन मला स्पष्टीकरण द्यायल्या लागल्या कि त्यन घरातुन काढल म्हनुन त्यानां वाईट वाटल वगरे. जस काहि ती बेडकी याचीं मुलगी अन मीच तिला बाहेर काढलय.
खर म्हणजे घरातले असल्या बिनडोक मालिका पाहतान अन आपल्या कडुन अश्याच अपेक्षा करतात.
अडे किती दिवसात का डे दुडावा
अडे किती दिवसात का डे दुडावा वड पोस्ट का बडे नाही आल्या? पहात नाही का कोणी? ऑ?
कालचा भाग पाहिला नाही. परवाचा
कालचा भाग पाहिला नाही. परवाचा काल बघितला.
काहीवेळा जय त्या कदम काकांशी कीती तुसड्यासारखा वागतो अरे तुम्ही रात्री त्यांना फोन करता पोलिसांनी पकडले म्हणून. मग ते बाकी चोकशी करतात तर सरळ नंतर सांगतो असे म्हणतो आणि वैतागून म्हणतो बायकोला की आता उद्या त्यांना हापीसात सांगायला laaगेल म्हणून. त्यांनी काही गोंधळ नाही घतला म्हणजे मिळवले
तुम्ही सगळी लपवाछपवी करता मग त्यांच्यावर कशाला चिडता
दोघेही नवराबायको शुंभ आहेत.
दोघेही नवराबायको शुंभ आहेत. सारख्याला वारखे मिळालेत.
हो, जोडा शोभतो. ३६ नाही अगदी
हो, जोडा शोभतो. ३६ नाही अगदी ७२ गुण जमलेत.:खोखो:
लेडी रामदास स्वामी >>>>
लेडी रामदास स्वामी >>>>
दक्षे
Pages