ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< चेतन सुभाष गुगळे तुम्ही drugs घेउन आजीबात योग्य नसलेली धोकादायक गाडी विकृत पणे चालवली तर ते साहस ... तुम्हाला इकडे बोलायचा की नैतिक अधिकार आहे ? >>

हेमन्त वाघे,
तुम्हाला drugs या शब्दांतून नेमके काय अपेक्षित आहे? मी अमली पदार्थ घेतले होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? प्रत्यक्षात मी औषधाच्या दुकानातून गोळ्या घेतल्या होत्या. त्यांचे सेवन करून वाहन चालविणे भारतात तरी बेकायदेशीर नाही. माझ्या नैतिक अधिकाराविषयी तुम्ही बोलु नये हे उत्तम.

माझ्या वाटेला न जाल तर माझ्या इतके सहकार्य करणारा दुसरा माणूस तुम्हाला सापडणे अशक्य पण तेच जर तुम्ही माझी विनाकारण खोडी काढाल तर नाईलाजास्तव मलाही असा पलटवार करावा लागेल की तो तुम्हाला झेलता येणे अशक्य. असो. हा तुमच्याशी संवादाचा पहिलाच प्रसंग असल्याने सौम्य शब्दांत ताकीद देत आहे. यापेक्षा अधिक अवघड वेळ तुम्ही माझ्यावर न आणाल अशी आशा आहे.

हेमन्त वाघे आणि इतर अनेक सदस्य ज्यांना मी वाहन विरुद्ध दिशेने चालविल्याबद्दल प्रचंड आक्षेप आहे त्यांच्याकरिता हे शेवटचे स्पष्टीकरण.

  1. प्रत्यक्षात मी वाहन विरुद्ध दिशेने चालविले ही बाब माझ्याच लेखातून सर्वांना समजली आहे. तिसर्‍या कोणाकडून ही बातमी प्रसारित झालेली नाही.
  2. ज्या बातमीची इथे चर्चा आहे त्यात अ‍ॅडव्होकेट जाह्नवी गडकर यांनी त्यांचे ऑडी हे वाहन चूकीच्या दिशेने चालविल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ दुसरेही एक वाहन चूकीच्या दिशेने गेल्याचा उल्लेख आहे. या दुसर्‍या वाहनचालकाने ऑडीच्या पाठोपाठ स्वतःचे वाहन चूकीच्या दिशेने चालविणे हा अपराध नाही. त्याचप्रमाणे माझ्या मूळ लेखात आधी एक झायलो वाहन चूकीच्या मार्गिकेतून गेल्यावर त्या वाहनाच्या पाठोपाठ माझे वाहन मी नेल्याचा उल्लेख आहे. मी जर कायदा तोडण्याचा अपराध केला होता तर अनेक पोलिसांच्या समोरून आमची ही दोन वाहने प्रवास करीत गेली होती तर आम्हा दोन्ही वाहनचालकांना पोलिसांनी हटकले नाही किंवा दंड ही का केला नाही?
  3. या स्पष्टीकरणानंतरही कुणाला मी अपराधी आहे असे वाटत असेल त्यांनी खुशाल माझी पोलिसांत तक्रार करावी / न्यायालयात खटला दाखल करावा अथवा इतर कायदेशीर पाऊल उचलावे. इथे नैतिक अधिकारांची चर्चा करू नये.

तो मार्ग कसा आहे हे माहिती नाही पण दुसरा चालक ऑडीमागे चुकीच्या मार्गाने गेला नाही असे वाटते. बातमीत तो freeway मधुन बाहेर पडला व मग यु टर्न घेउन ऑडीमागे गेला असे लिहिले आहे. कदाचीत तो freeway च्या उलट्या बाजुने ऑडीचा पाठलाग करत असेल.

बस या बाईचा सलमान होऊ नये Angry

पण जर कोण्या बार ओनर्स नि ठरवलं कि कोण एकटा/ टी दारू घ्यायला आलाय आणि परत घरी जायला कोण सोबर ड्रायव्हर नसेल, तर त्याला आत घ्यायचेच नाही तर?

<< पण दुसरा चालक ऑडीमागे चुकीच्या मार्गाने गेला नाही असे वाटते >>

  1. पुण्यात काही काळापूर्वी संतोष माने या एसटीचालकाने उलट दिशेने एसटी चालवून अनेक वाहनांना धडक दिली होती तेव्हा त्याच्या एसटी मागे अजुन काही वाहने त्याच पद्धतीने गेली होती.
  2. लोणावळ्याच्या राजमाची बागेत गेल्यावर पुन्हा पुण्याच्या दिशेने वाहन नेण्यास परवानगी नाही. थेट खोपोलीपर्यंत येऊन यूटर्न घेऊन यावे लागते. इतके प्रचंड अंतर नाहक इंधन वाया घालविण्यास कोणीच तयार नसते. सर्व वाहनचालक सर्रास चूकीच्या दिशेने वाहन दामटत पुण्याच्या दिशेने प्रवास करतात. राजमाची बागेच्या शेजारीच पोलिसांची चौकी आहे. त्यांना मी याचे स्पष्टीकरण विचारले असता. त्यांचे उत्तर होते, "कोणाही वाहनचालकाला विनाकारण लांबचा वळसा घालायला लावून त्रास देण्याची आमची प्रवृत्ती नाही. आम्ही विरुद्ध दिशेने वाहन जाऊ देतो जरी ते कायद्याने प्रतिबंधित असले तरीही. फक्त त्या वाहनचालकाने आपण वाहन विरुद्ध दिशेने चालवित आहोत ही जाणीव ठेवून समोरून येणार्‍या वाहनांना धडक बसणार याची काळजी घ्यावी. जर अपघात झालाच तर आम्ही चूकीच्या दिशेने वाहन चालविणार्‍या वाहन चालकावरच गुन्हा दाखल करणार". यावर मी काय करावे असा सल्ला त्यांना मागितला असता, "तुमची गाडी (अर्थात ओम्नी) लहान असल्याने काळजी नाही तरी तुम्ही पुढे एखादे मोठे वाहन जाताना दिसल्यास त्याच्या मागोमाग काळजीपूर्वक तुमची गाडी जाऊ द्या. आम्ही तुम्हाला कुठलाही दंड करणार नाही." त्यानुसार एक सफारी व एक तवेरा पुण्याच्या दिशेने निघाल्यावर लगेच त्यांच्यामागोमाग मी ओम्नी चालवित निघालो आणि शब्द दिल्याप्रमाणे मला पोलिसांनी कुठलाही त्रास न देता जाऊ दिले.

<< बारवाले पैसे कमवायला बसले आहेत समाज सुधारायला नव्हेत >>

दारूविक्रीतून शासनाला प्रचंड महसूल मिळतो. शिवाय दारू दुकानदारांकडून पोलिसांनाही प्रचंड हप्ता मिळतो.

एकतर शासनाने शहरातल्या विशिष्ट भागातच मद्यालये उघडावीत आणि तिथपर्यंत जाण्यायेण्याकरिता मद्यपींना प्रिमियम रेट्समध्ये (हे रेट्स या करिता कारण नंतर त्यांच्या ओकार्‍यांमुळे झालेली घाण बस धुण्याचा खर्चही वसूल झाला पाहिजे) बसेस पुरवाव्यात.

किंवा मग हप्ता घेत रात्री स्वतःची मोबाईल व्हॅन फिरवणार्‍या पोलिसांनी मद्यप्राशन केलेली कुणीही व्यक्ति स्वतः वाहन चालविणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता प्रत्येक मद्यालयाच्या आवारात काही रिक्षा व टॅक्सींची सोय करावी. या रिक्षा / टॅक्सी मध्ये न बसता जो मद्यपी स्वतःच वाहन चालविण्याचा अट्टाहास करेल त्याचा वाहनक्रमांक नजीकच्या पोलिस स्थानकात / पोलिस मोबाईल व्हॅनला कळविण्याची खबरदारी बारचालक / मालक / टॅक्सी / रिक्षावाले यांनी घ्यावे.

आता इतका उपद्व्याप करावा की सरळ दारूविक्रीच बंद करावी हा शासनाचा प्रश्न आहे. जनतेला अपघात टाळले गेल्याशी मतलब.

चेतन,
मला फक्त 'ऑडीमागे त्याच मार्गाने दुसरा चालक गेला' असे तुम्ही जे लिहिले होतेत ते, बातमी वाचुन तसे झाल्याचे वाटत नाही एवढेच सांगायचे होते. बाकी कोणी कधी काय केले त्याकडे माझा रोख नव्हताच व हेतुही नव्हता.

पण तरीही तुम्ही जे लिहिले आहेत, 'लोणावळ्याच्या राजमाची बागेत गेल्यावर पुन्हा पुण्याच्या दिशेने वाहन नेण्यास परवानगी नाही. थेट खोपोलीपर्यंत येऊन यूटर्न घेऊन यावे लागते.' ते खरंच त्रासदायक आहे. पण मी तरी वैयक्तिक असा त्रास घेऊनच परत फिरेन. अंतर वा वेळ वाचवायला विषाची परिक्षा घेणार नाही.

<< पण मी तरी वैयक्तिक असा त्रास घेऊनच परत फिरेन. अंतर वा वेळ वाचवायला विषाची परिक्षा घेणार नाही. >>

सुमारे १६ किमी अतिरिक्त अंतर होते. त्याशिवाय एसटीच्या वाहनांना अधिकृतरीत्या त्याच मार्गावरून उलट फिरण्यास परवानगी आहे. असे असताना एसटीमागोमाग इतर वाहनांनी जाणे हे विषाची परिक्षा ठरेल काय?

अतिशय संतापजनक घटना आहे. खरेतर असल्या गुन्ह्यासाठी कडक शासन व्ह्यायला हवे पण बाई वकिल आहेत पुन्हा त्यांच्याकडे पैसा आहे त्यामुळे कायद्यातील पळवाटांचा आधार घेउन सुटतीलच!! सलमान खान केस वरून अशा गुन्ह्यातून सुटका किती सहज शक्य आहे ते कळले आहेच.

बाई रिलायन्स मध्ये लीगल अ‍ॅडवायजर आहेत त्यामुळे व्यवसायानुसार आणि मालकानुसार उलट्याचे सुलटे करण्यात पारंगत असणार.
अमा, त्या बाई 'महिला' असल्याने त्याना रात्री अटक करता आली नाही. म्हणून सकाळी केली. मी दार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रूरू प्यायलेली असल्याने मला रस्ता सुधरला नाही असे बाईंचे म्हनणे आहे. बाईंनी मरिइन ड्राइव्हच्या मरिन प्लाझा मध्ये बिझिनेस डील मिळाला म्हणून पार्टी केली . तिथेच त्या दार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रूरू प्याल्या . ६ पेग व्हिस्की. नन्तर दोन तास त्या म.डा. ला नुस्त्याच गाडीत बसून होत्या . नन्तर त्यांची 'सटकली' आणि त्या चेंबूरच्या घरी जायला निघाल्या.

आता हेच' ष्टेटमेन्ट'' मी दार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रूरू च्या नशेत दिलेले असल्याने ते ग्राह्य धरू नये असेही त्या कोडतात म्हंतील

या केसमधे सर्वच पुरावे तिच्याविरुद्ध आहेत. प्रत्यक्ष साक्षीदारही आहेत. पण तरी तिला फार शिक्षा होईल याची शक्यता कमी वाटतेय ( फॉर ऑबव्हीयस रीझन्स ) आणि यात काही वर्षे तर जाणारच.

किमान दुर्दैवी कुटुंबाना विम्याचे पैसे तरी त्वरीत मिळावेत अशी आशा करतो. थर्ड पार्टी इन्शूरन्स असेलच.

तिच्यासोबत जे सहकारी होते, त्यांनी तरी तिला गाडी चालवण्यापासून रोखायला हवे होते.

तिच्यासोबत जे सहकारी होते, त्यांनी तरी तिला गाडी चालवण्यापासून रोखायला हवे होते.

>>
अहो ते तरी शुद्धीवर असायला हवेत ना? मुळात हे सगळे लोक 'आपल्याला दारू बिरू काही चढत नाही बोवा' ह्या आत्मविश्वासपूर्ण अतिशहाण्या क्याटेगरीतले असल्याने रोखण्याचे कारण नाही. शिवाय 'आम्ही काय कुणाची पितो ', तो (ह) राम आम्हाला देतो' हेही आहेच....

हो, रॉबिन तेही खरेच. पण त्यांनी स्वतःच्या घरी जाताना अपघात केला नाही ( अजून तशी बातमी नाही. ) म्हणून..

कधी मुंबईला हायकोर्टाच्या जवळच असलेल्या कंदील रेस्टॉरंटमधले वातावरण अनुभवले का ? मी तर तिथे १० मिनिटेही बसू शकलो नव्हतो.

गुगळेंचा दुटप्पीपणाची हद्द आहे.
चोराच्या उलट्या बोंबा याचे हे उत्तम उदाहरण आहे.

१. तुम्ही ज्या गोळ्या घेतल्या त्याचे प्रीस्क्रीप्शन तुमच्याकडे होते का ? की ओव्हर द काउंटर घेतल्या ?
२. झोप येउ नये यासाठी कोणत्या डॉक्टरने तुम्हाला त्या गोळ्या दिल्या होत्या ?
३. मुळातच रस्त्याचा विरूद्ध दिशेने वाहन चालवणे हे चूक आहे असे तुम्हाला वाटते का ?
४. समोरचे वाहन चुकीच्या मार्गाने चालले आहे तर आपणही तीच चूक करणे योग्य आहे का ?
५.केवळ पोलिसांनी पकडला नाही म्हणून तुम्ही निरपराध सिद्ध होता का ?
६. तुम्हाला सद् सद् विवेक बुद्धी आहे का ?

आणि तुम्ही एखादी गोष्ट सार्वजनिकरीत्या स्वतःहून फुशारकी मारत सांगितली आहेत म्हणून लोका त्यावर कॉमेंट करणारच .
आणि तुम्ही उठसूट शहाणपणाचे सल्ले देत असता , मग लोकांनी नैतिकतेचे सल्ले दिले तर मिरच्या का झोंबल्या ?

अतिशय संताप्जनक घटना आहे. बाई जवळच्या माहितीतल्या आहेत म्हणुन अजुनच संताप येतोय.
गेलेल्या लोकांबद्दल आणि मागे राहीलेल्या कुटुंबाबद्दल खुप वाईट वाटतेय.
जास्त्ती जास्त शिक्षा व्हायला हवी.

@ शाहिर,

<< गुगळेंचा दुटप्पीपणाची हद्द आहे.
चोराच्या उलट्या बोंबा याचे हे उत्तम उदाहरण आहे. >>

प्रत्यक्ष घटनास्थळी स्वतः हजर नसताना इतरांनी काय केले त्यावरून त्यांना चोर / दुटप्पी ठरविणे ही बेअकलीपणाची हद्द आहे. रात्री जेव्हा राजस्थान - मध्यप्रदेश सीमा ओलांडण्याकरिता राजस्थानच्या हद्दीतील काही अंतरभर एकाच मार्गिकेतली वाहतूक चालू असते आणि त्यातही केवळ अवजड वाहने चालू असतात तेव्हा जवळपास रिकाम्या असलेल्या उलट मार्गिकेतून संख्येने अत्यल्प असलेली हलकी वाहने अशाच प्रकारे जात असतात (आणि हे शेकडो राजस्थानी पोलिसांच्या डोळ्यांसमोर घडत असते). अन्यथा त्यांना विनाकारण मोठ्या वाहनांच्या गर्दीत तासन् तास अडकून पडावे लागते. मध्यप्रदेशातून राजस्थानात जाताना असे करावे लागत नाही कारण मध्यप्रदेश पोलीसांची कार्यक्षमता. ते फारसा वेळ न घालविता पटापट तपासणी करून वाहने सोडत असतात. स्वतः प्रवास करून अनुभव घ्यावा व मगच इतरांना बोल लावावेत.

स्वतःला राजस्थान - मध्यप्रदेश सीमा ओलांडायचा योग येत नसल्यास रविवारी / सार्वजनिक सुटीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास शिवापूरचा टोल नाका ओलांडून सातार्‍याच्या दिशेने पुण्याकडे येऊन बघा. टोल नाक्यावर पुणे - सातारा दिशेने असलेल्या वाहनांच्या गर्दीच्या तूलनेत प्रचंड गर्दी सातारा-पुणे दिशेने जाणार्‍या वाहनांची असते त्यामुळे नाक्यावर पुणे-सातारा दिशेच्या दोन मार्गिका सातारा-पुणे दिशेच्या वाहनांकरिता खुल्या केलेल्या असतात. अशा प्रकारे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांनी केवळ टोलनाका ओलांडणे अपेक्षित असते तरीही पुढे बरेच अंतरापर्यंत ही वाहने अशाच विरुद्ध मार्गिकेतून जात असतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या हक्काच्या मार्गावर इतरांनी केलेले अतिक्रमण - यात रस्त्यावरील फेरीवाले, मध्येच उतारू चढविण्या / उतरविण्याकरिता थांबलेली अवजड वाहने हे सर्व येतात.

वाहतूक कोंडीमुळे स्वत:ची हक्काची मार्गिका उपलब्ध नसताना केवळ काही किरकोळ अंतर चूकीच्या मार्गिकेतून नाईलाजास्तव काळजीपूर्वक व इतरांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीने सावकाश वाहन चालविणे आणि असे काही रास्त कारण नसतानाही विरुद्ध मार्गिकेतून तुफान वेगाने वाहन हाकून इतरांना धडका या दोन्ही प्रकारांना एकाच तराजुत तोलणारे अज्ञानी / मूर्ख किंवा ढोंगीच असू शकतात.

स्वतः प्रवास केलेल्या व्यक्तिने हे सर्व पाहिलेले असते. त्यामुळे टीका केलेल्या व्यक्तिने एकतर हे सर्व पाहिलेले नसते किंवा मग सारे समजून उमजून ती ढोंगीपणाने टीका करीत असते.

वाहतूक कोंडीमुळे स्वत:ची हक्काची मार्गिका उपलब्ध नसताना केवळ काही किरकोळ अंतर चूकीच्या मार्गिकेतून नाईलाजास्तव काळजीपूर्वक व इतरांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीने सावकाश वाहन चालविणे आणि असे काही रास्त कारण नसतानाही विरुद्ध मार्गिकेतून तुफान वेगाने वाहन हाकून इतरांना धडका या दोन्ही प्रकारांना एकाच तराजुत तोलणारे अज्ञानी / मूर्ख किंवा ढोंगीच असू शकतात.

<< १. तुम्ही ज्या गोळ्या घेतल्या त्याचे प्रीस्क्रीप्शन तुमच्याकडे होते का ? की ओव्हर द काउंटर घेतल्या ?
२. झोप येउ नये यासाठी कोणत्या डॉक्टरने तुम्हाला त्या गोळ्या दिल्या होत्या ? >>

तो औषध दुकानदार बेनेड्रील देखील प्रिस्क्रीप्शन शिवाय देत नाही, परंतु त्याने मला त्या गोळ्या दिल्या यावरून गोळ्यांचे उपद्रवमूल्य काय ते समजा. शिवाय सीमा तपासणी नाक्यावर वाहन उलट दिशेने चालविले तेव्हा मी त्या गोळ्यांचे सेवन केले नव्हते. ते रात्री उशिरा केले होते. लेख पुन्हा एकदा नीट वाचा (ही लेखाची जाहिरात नसून तुम्ही त्या एकमेव लेखाचा आधार घेत टीका करीत असल्यामुळे तुमच्या टीका करण्याचीच ती बेसिक गरज आहे.)

@ रॉबीनहूड
<< गुगळेंना सिरिअसली घेऊ नका... त्यांचे मनोरंजन मूल्य अफाट आहे. >>
मला कोण किती गांभीर्याने घ्यावे की नाही याचे सल्ले तुम्ही द्यावेत हेच आश्चर्य आहे. असो ज्यांच्या स्वतःच्या वास्तविक नावाला अजिबात मूल्य नाही असे त्यांना स्वत:लाच पटलेले असल्याने ऐतिहासिक दरोडेखोरांची नावे घेत लेखन करणार्‍यांना निदान मी तरी गांभीर्याने घेत नाही.

Pages