Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक दिवस ठिक. पण घरभाडे
एक दिवस ठिक. पण घरभाडे भरण्यासाठी पैसे कुठून येणार? असले फडतूस प्रश्न तिला पडत नाहीत. की तिला कामवाली म्हणून नेमणूक देऊन इतर पगार देणारेत?
.
सुरुवात मायकेल जॅक्सनच्या विडीयोची कॉपी केलीय...
मी पहायची सोडून दिली सिरियल.
मी पहायची सोडून दिली सिरियल. त्यापेक्षा इतना करो ना मुझे प्यार बरी आहे. ती बघते सध्या.
मी नुकताच बराचश्या
मी नुकताच बराचश्या एपिसोड्स्चा बॅकलॉग भरून काढला. झी मराठीवाल्यांनी विदाऊट अॅड व्हिडीओ दाखवणे सुरू केले दिसतेय. त्यामुळे सलग एपिसोड बघायला बरच सुसह्य झालं .
फॅशनशो एपिसोड भन्नाट होता. सगळे मस्त दिसले आहेत, इस्पेशली मीनल आणि कैवल्य. कोणीतरी प्लिज फोटो टाका फॅनक्लबवर.
इथे वर सगळ्यांनी लिहीलय तसंच मला पण वाटलेल की रेश्माला काहीच काळजी कशी नाही किंवा तिच्या घरच्यांना तिची. पण कदाचित मेन ट्रॅक फ्रेंडशिपचा आहे म्हणून त्यावर मुद्दाम फोकस नसेल ठेवला. नाहीतर आधीच रेश्माचं कॅरॅक्टर रडूबाई; त्यात ती बाकी काळज्या करत बसली तर महापूरच यायचा
स्वयंपाक वाला भाग नंतर नंतर
स्वयंपाक वाला भाग नंतर नंतर चांगला होता. 'अमीबा बनवला आहे' वाले संवाद व डोक्यावरच्या शेफ टोप्या मस्त
हो रे, मला नंतर वाटलं होतं की
हो रे, मला नंतर वाटलं होतं की सुजाने बनवलेल्या 'पोळ्या'ला आशू परामोशिअम म्हणेल एवढ्या यंगस्टर्सच्या घरात सुरणाला मिळालेले स्थान पाहून गहिवरूनच आलं.
रीया एकहाती धागा उचलून
रीया एकहाती धागा उचलून धरलायेस
चैत्रगंधा +१ भाज्या ओळखा पण
चैत्रगंधा +१
भाज्या ओळखा पण मस्त .
सुरण - दगड
I knw
I knw
मी ४ दिवसापूर्वी चालु केली...
मी ४ दिवसापूर्वी चालु केली... २१ झाले पाहून
'शोले' चा भाग आवडलाच...
ह्या मालीकेतल्या अनेक विषयांशी/गप्पांशी टोटल 'कनेक्ट' होऊ शकल्याने असेल, तर बघावीशी वाटतीये.
आमच्या घरच्या मसाल्याच्या, तुपाच्या डब्यांवर अशीच फिल्मी किंवा म्हणी असलेली नावं आहेत.. सिरीयलमधे पण असा कोणीतरी विचार केलेला पाहून ट्डोपा
मी पण पहावे म्हणते तो
मी पण पहावे म्हणते तो ऋन्मेषचा धागा वाचुन. एकंदर मिळमिळीत मालिका नसावी असे वाटते आहे. रार कुठे पहातेस?
सुनिधी, युट्यूब... सर्च मार,
सुनिधी, युट्यूब... सर्च मार, २२ - २३ मिनीटाचे भाग आहेत.
मला प्रत्येक भाग एक 'नाटक' वाटतं ह्या सिरीयलचं... अभिनय, अॅक्शन्स (म्हणजे पात्रांच्या एन्ट्री- एक्सीट्स, किंवा एकूणच त्यांचा त्या घरातला वावर स्टेजवरती काम करताहेत असा वाटतो) टायमिंग, डायलॉग बोलण्याची पद्दत आणि कॅमेरा... नाटक चाललंय असाच वाटंत. डायलॉग पण नाटकातलेच वाटतात...
पण मजा येतीये बघायला.. आषूचं टायमिंग काहीच्या काही भारी आहे !
नाटक चाललंय असाच वाटंत >>>
नाटक चाललंय असाच वाटंत >>> परफेक्ट! अनेक सीन्स मधे मला असेच वाटले. पण नाटकातला अभिनय सिरीयल मधे क्लोज अप्स मधे खूप लाउड वाटतो हे अनेक मराठी "विनोदी" कलाकारांच्या/दिग्दर्शकांच्या लक्षात येत नाही. तसेच विनोद झाला, की तो प्रेक्षकांना कळतो. मागे ट्याव, टुई, कोणीतरी आपटल्याचे म्युजिक मारायची गरज नसते, हे ही.
हे या सिरीज मधे खूप कमी आहे, पण तरीही जाणवते.
स्वयंपाकाचा एपि आवडला. सुरण
स्वयंपाकाचा एपि आवडला. सुरण असेल याची खरंच कल्पना नव्हती. आशू नेहेमीप्रमाणे मस्तच. खोटे खोटे आई बाबा डायलॉग
रार, युट्ञुब वर खराब क्वालिटी
रार,
युट्ञुब वर खराब क्वालिटी बघण्या पेक्षा ओरीजिनल एपिसोड्स बघ
http://www.zeemarathi.com/shows/dil-dosti-duniyadaari/video?page=3
शँक्स, जबरी !
शँक्स, जबरी ! धन्यवाद....
(काश सिरीयलची क्वालीटी पण थोडी सुधारली असती :D)
कालचा एपिसोड फारच पाणचट पणा
कालचा एपिसोड फारच पाणचट पणा केला.. बळच टीपी२ चे प्रमोशन केले.
हिम्सकूल+१
हिम्सकूल+१
हे टाईमपासच जोडप, होणार सून
हे टाईमपासच जोडप, होणार सून च्या एपिसोडमध्ये पण काल घुसल होत.:फिदी: मला वाटल खन्डोबा आणी दुरावा मध्ये पण येतात की काय?:खोखो:
झी वाले पण मुर्ख आहेत, जिथे तिथे प्रेक्षकान्वर बळजबरी करतात.
कालचा एपिसोड फारच पाणचट पणा
कालचा एपिसोड फारच पाणचट पणा केला.. बळच टीपी२ चे प्रमोशन केले. >>> टोटली! आत्ताच पाहिला. जाम बोअर झाला. एखादा फेमस कलाकार आणणे वेगळे आणि हा प्रकार वेगळा. एकदम भंकस. आणि सीन्सही काही भारी नव्हते.
ई, आणि ती प्रिया बापट किती
ई, आणि ती प्रिया बापट किती नाटकी वाटत होती! तिच्यापुढे हे नेहमीचे रॉकिंग लोक बळंच टोनडाऊन किंवा कच्चा लिंबू होऊन वावरत होते. फार बोअर केलं.
दुरावा मधे मांगले आले होते
दुरावा मधे मांगले आले होते २-३ दिवसांपूर्वी
आता खंडेरायाच्या शिरेल मधे
आता खंडेरायाच्या शिरेल मधे प्रियाला ढकला... म्हणजे सगळीकडे जाहीरात होईल..
कालचा भाग पण टुकार..
कालचा भाग पण टुकार..
+१ फार बोर केले
+१ फार बोर केले टाईमपासवाल्यांनी.
मला एक कळाल नाही, मीनल आणि दगडू आधी भांडतांना दाखवले, मग अचानक ती त्याला मदत करायला कशी तयार होते, का मध्ये काही दाखवल आणि मी मिस केलं असं झालय का?
'किती दिवस झाले ओळखता आहात दगडूला' वर अॅनाची रिअॅक्शन आणि हाsssफ डे भारी होत. शेवटचा डान्स मात्र या सगळ्याना जबरदस्तीने धरून टाईमपासवाल्यांबरोबर नाचवलय असच वाटत होतं.
काल मजा आली नवपरिणीत
काल मजा आली नवपरिणीत दांपत्यामुळे. ती नाईट गाऊन घालून बाहेर येते तेव्हाचा क्षण मुलं मुली सगळ्यांसाठी जड भारी होता! कमाल एक्सप्रेशन्स दिलेत! ही सगळीच मुलं फार गुणी आहेत.
विसाव्या वर्षी आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करायचं तर लग्न करून बसलेत > टिपीकल सुजा.
सुजा आणि आशूइतकं कुणाचंच पात्र लिहून आणि अभिनयानं पक्कं झालेलं नाही. सहज उंची गाठतात ते.
'किती दिवस झाले ओळखता आहात
'किती दिवस झाले ओळखता आहात दगडूला' वर अॅनाची रिअॅक्शन आणि हाsssफ डे भारी होत. >>> हो तो एक सीन आणि "माझी मदत करा" चे कैवल्यने (की सुजय ने) त्याला करायला लावलेले करेक्शन हे दोनच संवाद आवडले. बाकी जाम बोअर.
नंतरचा ते कपल वाला बरा होता. 'नाव गाव फळ फुल' चा पहिला उल्लेख परफेक्ट टाइम वर
आधी सुरूवातीला नवीन लग्न झालेले जोडपे आले आहे म्हंटल्यावर मी विचार करत होतो आता कोणत्या सिरीज मधे/पिक्चर मधले लोक येतायत. श्री आणि जाह्नवी येतायत की काय अशी एक भीतीयुक्त शंकाही आली. पण ब्रेक्स मधला त्यांचा तो पंजाबी डान्स व हार्ट शेप्ड फुगे लोकांचा वैतागाचा कोटा पूर्ण करतील असे झी ला समजले असावे.
टीपी-२ च्या महाबोअर एपिसोड
टीपी-२ च्या महाबोअर एपिसोड नंतरचा कालचा भाग भन्नाट होता. सगळेच जण (त्या नवपरिणित जोडप्यासकट) रॉकिंग होते. रच्याकने, ती नवपरिणीत वधू अजून कुठल्यातरी सिरियल मधे पाहिल्यासारखी वाटली. कुठे ते लक्षात नाही येत...
+१ मला ४ही जण फार
+१
मला ४ही जण फार आवडतात.
अॅना जरा कमी आवडते
रेश्मा नक्को नक्को होते
नवपरिणीत दांपत्याचे 'चाळे'
नवपरिणीत दांपत्याचे 'चाळे' पाहून मीनलचे चेह-यावरचे भाव, त्यांचं आत काय काय चालू असेल हे इमॅजिन करून सगळ्यांचे चेहरे.... मस्त झाला कालचा भाग खरंच
ती वधूच नाही आवडली मला. ती या सर्वांचीच ताई वाटत होती चेह-यावरून
रेश्माचे केस इतके सुंदर आहेत. त्यांच्या किती सुरेख हेअरस्टाईल्स होतील आणि ती दिसेलही वेगळी जरा. तिला स्टयलिस्ट का देत नाहीत कोणी? केस मागे ओढून नुसता हाय-पोनिटेलही छान दिसेल तिला. पण नेहेमी केस चेह-याभोवती वेढून घेते ती.
माफक तेवढीच स्टाईल करता येते
माफक तेवढीच स्टाईल करता येते गं तिला. गावाकडून आलीये शिवाय ताई टाईप! एकूणच, नेहमी घरात तेही मुंबईतल्या उकाड्यात सदैव केस गळ्यात घेऊन, तरीही एक केस इकडचा तिकडे न होऊ देता., शिवाय सर्व कामं कमालीच्या शिताफीने करत फिरणार्या रेश्मा, एना, मीनल, आदिती, मेघना या योगिनी किंवा तपस्विनीच वाटतात मला! तेथ कर माझे जुळती! जान्हवी आपल्यातली वाटते.
Pages