विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी जश्या आपल्या काठया काढल्या तश्या आपल्याला का काढता येत नाहीत.. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.. मॅच व्यवस्थित कंट्रोल मध्ये होती. पण तेव्हा विकेट पडायच्या ऐवजी बदाबदा धावा दिल्या आणि तिथेच मॅच गेली>> +१

आणि ह्यांच्या विरुद्ध कायम आपलच बॅड लक का? ह्यांच्या विरुद्ध कायम अडखळत खेळ.

ही मॅच सोडून पूर्ण वर्ल्डकप मधे सगळ्या मॅच मधे निर्विवाद वर्चस्व गाजवत, ग्रुप मधे अव्वल नं ला होतो. आजचा दिवस आपला नव्हता. परवा द. आफ्रिकेने जबरदस्त टक्कर तरी दिली होती न्यूझिलँड्ला. आज आपण अजिबातच चांगली बॅटिंग नाही केली. धोनीला विजयी निरोप देण्यासाठी तरी चांगलं खेळायला हवं होतं. विराट ची खेळी संशयास्पद होती. जर त्याने मुद्दाम केलं असेल, तर आपल्या सारखे प्रामाणिकपणे देहभान हरपून खेळ पाहणारे प्रेक्षकंच वेडे ! अजून काय...

नंदिनी अगदी बरोबर.

ही मॅच जर आपण हरलो असेल तर त्याला कारण फक्त आणि फक्त विराट कोहली आहे आणि धोनीचे चुकीचे गणित.

विराट क्याप्टन झाला तर तो एक असंस्कृत आणि वाईट उद्धट कॅप्टन असणार आहे.... तो अनुस्काला सुद्धा टीममध्ये घेईल Happy

किमान वेस्टइंडीज सारखे खेळायला हवे होते
मारुन मारुन त्यांच्या गोलंदाजांची पण वाट लावायची Wink

अरे धोणी काही रिटायर होणार नाही. होऊ नये वन डे मधून अजून. तुम्ही लोकं शेवटची मॅच का म्हणताय?

फक्त जडेजाला मात्र काढावे आणि मोहित हा विक लिंक आधीपासूनच आहे. भूवी तसाही मध्ये येईल.

बॅटींग्ला दोष देताना शॉर्ट बॉलचा अतिरेक करायचा गेमप्लॅन बनवणार्‍याला नि तो चालत नाहीये हे लक्षात आल्यावरही बदल न करणार्‍यांनाही दोषी धरायला विसरू नका. इतक्या मॅचेसमधे मोहित नि शमी इकोनॉमिकल असल्यामूळे यादव विकेट टेकिंग बॉलर म्हणून अधिक प्रभावी वाटला. ह्या वेळी नेमके सगळेच रोलप्ले मधे गडबडले.
कोहलीचा शॉट बेजबाबदार होता नि राहाणेचा अतिशय विचित्र. रैना एकदम क्लूलेस् वाटला मधे.

असो, इथवर आले त्याबद्दल कौतुक मानण्यापलीकडे आणखी आपण काय करू शकतो. It was finally just a game असे धरायचे नि मूव्ह ऑन व्हायचे.

काहीही असो ३००+ चेस करायचे तर जयसूर्या, सेहवाग आदींनी दाखवलेला मार्गच बेस्ट ठरतो. पहिल्या १०-१५ षटकात तुफान मारझोड! परवा ब्रेंडन मकुलमने जसे आफ्रिकेला झोडपले तसे. एव्हडे करूनही ती म्याच चुरशीची झाली होती.

आता मनात ऑसीज ना चारी मुंड्या चीत केलेले कधी बघता येईल हे स्वप्न बघतेय !! पाक चं काही नेक्स्ट टाइम खिजगणतीत धरलं नाही तरी चालेल ! Happy

आजचा गेमप्लानच चु़कीचा होता. आणि बॅटिंग अत्यर्क. इथे मायबोलीवर असणारे आपल्या सारखे नो व्हॉईस लोकंही ओरडत होते , तर त्यांना कळायला हवे होते फुल टाकायला. ऑसीजने कुठे जास्त शॉर्ट टाकले? निदान लेंग्थ व्हेरी तरी? शेवटच्या ४ओव्हर तर प्रिडिक्टेबल होत्या.

द थिंग इज ५ व्या नंतर मॅचविनर हवा कुणीतरी तो नव्हता. चेस करताना त्या दिवशी धोणीने ८३ केले म्हणून आपल्या लिमिटेशन दिसल्याच होत्या, इट वॉज जस्ट की विनिंग मध्ये आपण त्या अ‍ॅक्सेप्ट करत नव्हतो.

जडेजा वॉज प्रेझ्ड अ‍ॅज मॅचविनर, माय फुट. त्याने विन करण्यापेक्षा घातल्या आहेत जास्त.

आज मी तरी धवणला दोष देणार नाही. ही डीड गुड. त्याने टोन सेट केला होता. रोहित, रैना, विराट, अजिंक्य आणि धोणी कडे जास्त दोष जातो आजच्या बॅटिंग फेल्युअरचा.

लोक्स, टॉस पासुनच गोष्टी आपल्या विरोधात गेल्या. प्रत्येकाला माहिती होते, सिडनीवर टॉस महत्वाचा ठरणार ते. त्यांच्या स्मिथ आणि फिंच प्रमाणे कोणीच टिकुन खेळले नाही.

नो चिमण, आय डोन्ट अ‍ॅग्री. ७६ वर १ अजिबात वाईट नाही. / रादर नव्हते.

हे त्या लंका सेमी फायनल सारखे झाले. सचिन आउट झाल्यावर सर्व घरी परतले. तेंव्हाही ८० प्लस वर १

Pages