विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
>>>आता याबाबतीत कोहलीने थोडे
>>>आता याबाबतीत कोहलीने थोडे शायनिंग मारलीच. स्वत:च्या भावनांवर कंट्रोल ठेवता आला नाही. गल्लीत खेळणारे टीनएजर मुल कशी कुठली मुलगी गॅलरीतुन बघत असेल तर लगेच शॉट वगैरे जोरात मारतात तसाच काहीसा प्रकार कोहलीबाबत झालेला वाटतो. याच गर्लफ्रेंड समोर टेस्ट मॅच मधे कोहलीने शतक मारले होते. आणि जगासमोर फ्लाईंग किस चा कीस पाडलेला हे जगाने बघितले होते. पण हा वर्ल्डकप आहे. महत्वाची सेमीफायनल आहे. हे साफ विसरुन गेला. <<< हाच ओ अॅटिट्यूड
रिचर्ड्सवर नीना गुप्ता भाळून होती. तसेही रिचर्ड्सला काही फरकच पडायचा नाही त्यामुळेच बोलर्सची भंबेरी उडायची. आयुष्यात हेल्मेट वापरले नाही.
कुठे रिचर्ड्स आणि कुठे आजकालचे नाजूक साजूक फलंदाज!
बाकी शायनिंग वगैरे थोडा वेळ
बाकी शायनिंग वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवले तर असेही म्हणता येईल की कोहलीची अपर एज लागली थोडी! नाहीतर तो बॉल दिसेनासा झाला असता. आणि कोहली होता तेव्हाचाही रनरेट असा होता की एखाद दुसरा शॉट आवश्यकही होता अधूनमधून!
धोनीने अडतिसाव्या ओव्हरनंतर वेळ का घालवला हे मात्र समजले नाही ते नाहीच शेवटपर्यंत!
आयुष्यात हेल्मेट वापरले नाही.
आयुष्यात हेल्मेट वापरले नाही. <<<
आयुष्यात हेल्मेट वापरले
आयुष्यात हेल्मेट वापरले नाही.
कुठे रिचर्ड्स आणि कुठे आजकालचे नाजूक साजूक फलंदाज! >> विशेषतः ह्युजेस च्या बाबतीत काय झाले हे बघितल्यावरही असा विचार करता येतो ? खेळाडूंची सुरक्षितता मह्त्वाची कि स्टाईल ? रिचर्ड्स हा अपवाद होता असे समजा. गावस्कर वापरत नसे सुरूवातीला पण नंतर स्क्ल कॅप वापरली आहे.
रिचर्ड्स हेल्मेट का वपरत नसे ह्याचे कारण त्याने सांगितलेले ते असे
"Asked why he never opted to wear a helmet despite playing in an era when fast bowlers loved to bowl bouncers to unsettle batsmen, Richards replied: "What I always felt since I was a little boy is that when you are given a cap to represent your country, with the emblem, and you wear at the top of your head, not everyone gets that opportunity.
"And given that opportunity as a young boy to wear the cap, I felt I wouldn't be doing the cap any justice if I had anything else on my head.
"And because of that proudness of wearing that cap I felt that god would protect me in the middle from whatever I was facing out in the middle." ह्यात तो लहानपणापासून अशी फास्ट बॉलिंग खेळत वाढला वगैरे भाग नाहिये.
कोहली हा कोहली आहे, तो रिचर्ड्स नाही, सचिन नाही नि स्मिथही नाही. त्याला उगाच इतरांशी कंपेअर का करता आहात ?
नाही असामी, मी तुलना
नाही असामी, मी तुलना फलंदाजीची करत नाही आहे. कृपया गैरसमज नसावा.
मी तुलना करत आहे ती बेदरकारपणे गोलंदाजांवर तुटून पडण्याची आणि शायनिंग मारण्याची!
रिचर्ड्स खेळाच्या कोणत्याही स्टेजला असाच बेदरकारपणे तुडवत असे. दबाव म्हणून घेत नसे पठ्ठ्या! पण आजचे शायनर्स अॅक्च्युअली दबावात असतात आणि तसे न दाखवण्यात धन्यता मानतात. त्या मानाने धवनने मारलेला चुकीचा फटका निदान त्याक्षणीचा चुकीचा क्रिकेटिंग शॉट तरी म्हणता येईल कारण तोवर त्याने ऑस्ट्रेलियाला बर्यापैकी पाणी तरी पाजले होते. विराटला काय घाई होती?
असामी, माफ करा, पण रिचर्ड्सचे
असामी,
माफ करा, पण रिचर्ड्सचे ते उत्तर जरा काहीच्या काहीच आहे. पण वेस्ट इंडिजमध्ये लहानपणापासून तुफान फास्ट बोलिंग खेळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. खरे तर बोलिंग अधिक फास्ट पडावी म्हणून बोलर्स प्रॅक्टिसही बीचवर करतात.
रिचर्ड्स बेदरकारच होता. त्याने दिलेले वरचे उत्तर हे देशभक्तीचा मुलामा लावलेले आकर्षक उत्तर आहे इतकेच!
तुम्ही एक सामना घेऊन analysis
तुम्ही एक सामना घेऊन analysis करणार का फलंदाजीचे ? हाच विराट कोहली ना जो subcontinental pitches वर कुठल्याही संघाविरुद्ध ३००+ चेस करण्याची मास्टरी बाळगून आहे. त्या वेळी त्याने दाखवलेली मॅच्युरिटी सोडून द्यायची का ? त्याचा शॉट मला बेजबाबदार वाटला पण त्यावरून शायनिंग वगैरे पर्यंत तात्पर्य काढण्याची घाई कशाला ? रच्याकाने खर तर त्याने ह्या सामन्यात रिचर्ड्स सारखाच " बेदरकारपणे गोलंदाजांवर तुटून पडण्याचा" अनाठायी प्रयत्न केला जो त्याच्या अंगाशी आला असे म्हणता येईल. खर तर त्याचा ऑफ स्टंपबाहेरचा वीकनेस जॉह्न्सन ने मस्त exploit केला, फुल मार्क्स फॉर हिम.
अमका खेळतो/खेळत होता, हा नाही ह्याला काय अर्थ आहे नक्की तुम्हीच बघा ? 'तो कवठी चाफा कसला जबरदस्त रहस्य कथा लिहितो, तुम्ही काय लिहिता बघा' ह्यासारखेच निरर्थक विधान. *हे फक्त हायलाईट करायला घेतलेय. तुमच्या जातकुळी वेगळ्या आहेत त्यामूळे हे निर्रथक वाक्य आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे*
>>>रच्याकाने खर तर त्याने
>>>रच्याकाने खर तर त्याने ह्या सामन्यात रिचर्ड्स सारखाच " बेदरकारपणे गोलंदाजांवर तुटून पडण्याचा" अनाठायी प्रयत्न केला जो त्याच्या अंगाशी आला असे म्हणता येईल.<<<
ह्या अनाठायी ह्या शब्दाबद्दलच वर चर्चा चालली आहे असामी. कबीर ह्यांनी तेच लिहिले आहे की तो शायनिंग मारायला गेला जी नडली. त्याचा तो पिंडच नाही तर का करावे तसे, अशी चर्चा आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणात सांगायचे तर रहस्यकथा लिहिण्याचा वकूबच नाही तर मी कवठीचाफा व्हायला का जावे?
बाकी एका सामन्यावरून अॅनॅलिसीस करणार का, हा प्रश्न अगदी व्यासपीठावर शोभणारा असला तरी हे असे एकेक्च सामने असतात जेव्हा खरा कस लागतो. त्यामुळे त्यावरच अॅनॅलिसिस करावे लागते.
हाच विराट कोहली ना जो
हाच विराट कोहली ना जो subcontinental pitches वर कुठल्याही संघाविरुद्ध ३००+ चेस करण्याची मास्टरी बाळगून आहे. >> मग काय दर वेळी इथेच वर्ल्डकप खे़ळायचा का?
कि इथेच मास्टरी आहे म्हणुन बाहेर घेउनच जायचे नाही?
तो जो प्रसंग झाला त्यावर कोहलीला बोलत आहे. त्याने मागे काय केले कसे केले त्यासाठी त्याची स्तुती झाली आहे. त्यावेळेला काय केले ? याचे काय? मागे बरेच प्रताप केले म्हणुन त्याप्रसंगात ते केले बरोबर ठरते का >?
जेंव्हा एकटा धोनी खिंड लढवतोय
जेंव्हा एकटा धोनी खिंड लढवतोय ( १२ पेक्षा जास्तं रिक्वायर्ड रनरेट असताना) , कधी नव्हे ते धोनीही टेन्स्ड, त्याचीही बॉडी लँग्वेज लढायची दिसत नव्हतीच , बाजुला कोण तर जडेजा, अशा वेळी पॉझिटीव्ह असणे मला थोडे बालिश वाटले खरं तर किंबा रिअॅलिलिटी न समजणे असं माझं मत ( अर्थात इतरांना माझं मत पेसिमिस्टिक वाटत असेन हेही खरं !)
) कुठल्याही खेळात आपल्या जवळची व्यक्ति सहभागी असेल आणि जरी ती हरायला आली तरी जिंकेल अशी आशा आपण ठेवतोच. प्रेम हे प्रेम असते बाबा. मग त्या व्यक्तिसाठी असो या टीम इंडीया साठी नाही का
(हेही माझे वैयक्तिक मत हं )
जर खेळ आहे कळतय, तर कधीकधी वस्तुस्थिती पाहून आपण नाही जिंकणार हे अॅक्सेप्ट पण करता आलं पाहिजे खिलाडु वृत्तीने स्मित
क्रिकेट इज नॉट अ फेअरीटेल कि अशा सिच्युएशन मधे जादूची कांडी फिरेल .जस्ट अॅक्सेप्ट रिअॅलिटी!
अर्थात खेळाडुंवर वैयक्तिक टिका, पोस्टर्स जाळणे वगैरे प्रकाराचा तीव्र निषेध !>>>>>>>खरच बोललात दिपांजली, बेफी. मलातरी या खेळातील रन, ओव्हर, विकेट आणि जिंकले का हरले सोडून ओ की ठो कळत नाही.(तुमच्याएवढे तर नाहीच नाही). जोपर्यंत धोनी खेळत होता तोपर्यंत तरी आपण जिंकू अशी अंधुक आशा होती, कारण ये इंडीया है यहा कुछ भी हो सकता है, म्हणून हा पॉझिटीवनेस ठेवला होता. यातला थोडा पॉझिटीवपणा आपल्या टीममध्ये असता तर हरण्याचा रनरेट तरी कमी झाला असता(असे माझे वैयक्तिक मत हं
दोनदा पोस्टली
दोनदा पोस्टली
स्नेहनिल, बरेच मुद्दे पटले.
स्नेहनिल,
बरेच मुद्दे पटले. तसेच, दीपांजलींच्या त्या प्रतिसादाला मीही लगेच अनुमोदन दिले होते. निरर्थक सकारात्मक विचार करणे आणि वास्तववादी असणे ह्यात फरक आहेच की?
खाजवून खरूज असे समजू नयेत!
खाजवून खरूज असे समजू नयेत!
पण तोच विषय चालला आहे म्हणून येथे लिहितो. हे सगळे ह्याच धाग्यावर आहे मागच्या पानांवर!
साखळी सामन्यांत विराट असाच वेडेपणा करून बाद झाला म्हणून मी चिडून त्याच्याबद्दल काही लिहिले.
हायझेनबर्ग ह्यांनी मला उद्देशून लिहिले की विराट ह्या चुकीमुळे आणखी शहाणा झाला असा अर्थ मी घेतो.
पुढच्याही सामन्यात तो असाच वेडेपणा करून बाद झाल्यावर मी हायझेनबर्गना त्याची आठवण करून देत विचारले की कुठे शहाणा झाला विराट? पुढे दिवाही दिला.
त्यावर मुकुंद ह्यांनि विचारले की 'बेफिकीर, आता विराट बाद झाला की प्रत्येकवेळी आम्हाला दिवा देणार का?'
त्यानंतर सेमीफायनलला तो पुन्हा तसाच बाद झाला.
आता काय त्याच्या गेल्या पाच वर्षांचे अॅनॅलिसिस करणे अपेक्षित आहे की काय? सलग तीनवेळा तो वेड्यासारखा बाद होतो हे अॅनॅलिसिस करायला पुरेसे नाही का? साखळी सामन्यांत तो बाद झाल्याने काहीही फरक पडला नाही. पण सेमीफायनलला फरक पडलाच!
निरर्थक सकारात्मक विचार करणे
निरर्थक सकारात्मक विचार करणे आणि वास्तववादी असणे ह्यात फरक आहेच की?>>> आहेच की बेफी. म्हणून तर धोनीची विकेट गेल्यावर प्रतिसादात फक्त रनरेट आणि विकेट पोस्टत राहिले.
जाउद्या भाऊ. माझे क्रिकेटबद्दल चे प्रतिसाद आता सरळ पुढच्या विश्वचषक क्रिकेट च्या धाग्यावर. आणि त्यावेळी माझे सकारात्मक विचार नक्कीच निरर्थक नसतील अशी आशा बाळगते
>>>आहेच की बेफी. म्हणून तर
>>>आहेच की बेफी. म्हणून तर धोनीची विकेट गेल्यावर प्रतिसादात फक्त रनरेट आणि विकेट पोस्टत राहिले.<<<
हो ना मग? मी तुम्हाला कुठे काय म्हणतोय?
लोकसत्तातल्या अग्रलेखातल्या
लोकसत्तातल्या अग्रलेखातल्या infrastructure, system, training, mindset and all these things leading to performance as against depending heavily on individual talent ह्या मुद्द्याशे सहमत. पण हा नविन मुद्दा नाहीये. ह्या मुद्द्यावर चर्चा आणी एकमत already झालय. Economics involved आहे, ह्यात त्यांनी नवविनकाही सांगितलं नाहीये. सगळ्याच क्षेत्रात काहीतरी देवाण-घेवाण / सप्लाय-डिमांड हे असतच. हे दोन मुद्दी मांडून एकदम फिक्सिंग वर गाडी घसरवणं हे खूप उथळ वाटलं. असो. त्यांचं वृत्तपत्र आहे, त्यांनी त्यात काय लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे.
अॅज अ टीम, आपण कमी पडलो. ह्यात गेले ३-४ वर्ष जी टीम बांधणी चालू होती, जे सिलेक्शन झालं, जे खेळले आणी परवा सामन्यात जसा खेळ झाला, ते सगळं आलं.
बेफी , "ह्या अनाठायी ह्या
बेफी , "ह्या अनाठायी ह्या शब्दाबद्दलच वर चर्चा चालली आहे असामी. कबीर ह्यांनी तेच लिहिले आहे की तो शायनिंग मारायला गेला जी नडली." मी वाचलेले वाक्य शायनिंग करायला गेलेला वाटतो असे होते. ह्यातला वाटतो हा शब्द मह्त्वाचा कि नाही हे तुम्हीच ठरवा. अॅनालिसिस तुम्ही ठरवलेल्या त्याच्या शायनिंगचे करणार
माफ करा, मला त्यात इंटरेस्ट नाही.
कबीर, तुम्ही माझे पोस्ट्स नीट वाचलेत तर तुमच्या लक्षात येईल कि माझा आक्षेप कोहलीला (किंवा इतर खेळाडूला) रिचर्ड्स किंवा इतरांशी करणार्याला नि शायनिंग (तेही तुम्ही नि बेफिंना वाटणार्या) ह्या शब्दाला नि त्याच्या so called analysis ला होता. खेळाच्या अॅनालिसनाला नाही. (थोडेव्पाठी स्क्रोल केलेत तर मी कोहलीच्या त्या शॉट बद्दल जे लिहिलेले तुम्हाला आढळेल त्यावरून मुद्दा स्पष्ट होईल.)
हे दोन मुद्दी मांडून एकदम
हे दोन मुद्दी मांडून एकदम फिक्सिंग वर गाडी घसरवणं हे खूप उथळ वाटलं. >>+१. फे फे परत त्यानी स्पष्टपणे न लिहिता तिथेही 'नरो वा कुंजरो' स्टांस घेतलस्टांसः)
>>>अॅनालिसिस तुम्ही
>>>अॅनालिसिस तुम्ही ठरवलेल्या त्याच्या शायनिंगचे करणार <<<
असामी,
तुमचे म्हणणे लक्षात आले. पण मग तसे म्हंटले तर आपण जवळपास सगळेच अनेक विधाने 'वाटण्यावरून' करत असतोच की? प्रत्यक्ष स्टॅटिस्टिकल अॅनॅलिसिस हे आपल्या सगळ्यांच्याच चर्चेत हार्डली पाच दहा टक्के असते ना?
उदाहरणार्थः
१. आज विकेट स्लो वाटत आहे
२. आज आऊटफिल्ड फास्ट दिसतंय
३. आज रहाणे चाचपडतोय (प्रत्यक्षात तो सहाच्या सहा आऊट स्विंगर्स सुरक्षेसाठी म्हणून सोडत असेल)
४. आज धोनी टेन्स्ड दिसतोय
५. आज ऑस्ट्रेलियाच्या ३५० होतील असं वाटतंय
६. जॉन्सनच्या २८ धावा महाग पडणार असं वाटतंय! (प्रत्यक्षात सुमारे ८५ धावांनी की काहीतरी आपण हरलो वगैरे)
ह्यात चुकीचे काहीच नाही वाटत. हे एक स्पिरिट आहे.
पण विराटसारख्याकडून नेमक्या अश्याच सामन्यांमध्ये अपेक्षा ठेवणार ना? त्याने त्याचे टेंपरामेंट वगैरे आत्ताच नको होते का दाखवायला?
त्यावर काऊंटर म्हणून असे कसे म्हणता येईल की तो आजवर चालला? आजवर चालला म्हणून तर वन डाऊन पोझिशनवर टीममध्ये नाही आहे का? 
हेही अर्थातच मान्य की
हेही अर्थातच मान्य की जय-पराजय हे खेळाचे भाग आहेतच. अनुष्काच्या उपस्थितीचा तर अक्षरशः बिनडोक इश्यू करण्यात आला सोशल मीडियावर! विराटचीही आणि रैनाचीही चूक होऊ शकते हेही समजण्यासारखेच!
पण शेवटी आपण दिडशे कोटी लोक डोळे लावून बसलेलोच असतो ना त्या क्षणाकडे!
त्यामुळे मग जो तो आपापले मतप्रदर्शन करतोच भावनिकतेने!
कबीर ह्यांनी रिचर्ड्सचा उल्लेख केला तो वेगळ्या हेतूने! विराट रिचर्ड्ससारखा बेदरकारपणे खेळायला गेलात हे तुम्ही म्हणालात! हे सगळे त्याच भावनिकतेतून, नाही का? त्याच भावनिकतेतून मीही म्हणालो की रिचर्ड्सचा बेदरकारपणा विराटने कॉपी करायला नको होता, त्याने संयम दाखवायला हवा होता.
असामी, माझ्या टोपणनावाची अगदी
असामी, माझ्या टोपणनावाची अगदी फेफे उडवलीत
पण हा आजू-बाजूच्या चार गोष्टी सांगून एकदम आपल्याला हवा तो मुद्दा मांडणं ही एक खास स्टाईल आहे. त्या आराधना मधल्या 'बागोंमे बहार है' गाण्यासारखं वाटतं मला.
'वन डाऊन पोझिशन'वरून एक मजा
'वन डाऊन पोझिशन'वरून एक मजा आठवली.
द्रविड व्हर्सेस विराट!
विराट इज प्रॉबेबली मच सुपिरिअर इन टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि चिवटपणा!
द्रविड टेंपरामेन्टमध्ये सुपिरिअर असावा असे वाटते.
दोघेही जिंकण्यासाठीच लढणारे! पण परिपक्वता का कोणास ठाऊक द्रविडमध्ये अधिक आढळते. बहुधा कोहलीचे 'अँग्री यंग मॅन' बिहेवियरही कारणीभूत असेल ह्या मताला!
बागोमे बहार है
<< द्रविड व्हर्सेस विराट! >>
<< द्रविड व्हर्सेस विराट! >> मला वाटतं विराट ज्या वातावरणात प्रसिद्धि झोतात आला तें वातावरण आधीच्या खेळाडूंच्या वाटेला आलेल्या वातावरणापेक्षां खूपच वेगळं आहे - 'जनरेशन गॅप' ,म्हणा हवं तर - व म्हणूनच त्याची , त्याच्या वर्तणूकीची तुलना सचिन, द्रविड इ.इ.शी करतना हा महत्वाचा घटकही लक्षात घ्यायला हवा. खेळाची गुणवत्ता इथपर्यंतच ही तुलना औचित्यपूर्ण ठरावी.
उद्याचा सामना निर्विकारपणे पाहून मजा लुटण्याची संधी आली आहे. दोन्ही संघात फॉर्मात असलेले तुफानी गोलंदाज व धडाकेबाज फलंदाज आहेत. मिशेल जॉनसनला या स्पर्धेत नेमक्या वेळीं लय गवसली आहे ही ऑसीजची जमेची बाजू तर व्हेटोरीच्या अनुभवी व चलाख फिरकीमुळे न्यू झीलंडच्या गोलंदाजीत आलेली विविधता ही त्यांची जमेची बाजू ! हे दोन गोलंदाज किती प्रभावी ठरतात , हें निर्णायक ठरेल असं वाटतंय .
न्युझीलंडच्या कॅप्टनने
न्युझीलंडच्या कॅप्टनने भारतीयांचा सपोर्ट मागितला आहे.
उद्या मॅक्युलम चालावा ही इच्छा (चालावा म्हणजे शतक द्विशतक वगैरे मारावे ) नेहमी तुफ्फान स्टार्ट देतो. फायनल मधे तुफ्फान स्टार्ट तर द्यावाच आणि गाडी क्रॉसलाईनपर्यंत वेगात घेउन जावी
न्यूझीलंड आतापर्यंत सारे
न्यूझीलंड आतापर्यंत सारे सामने मायदेशात खेळले आहेत, तर आता ऑस्ट्रेलियात खेळताना ते आपला गेमप्लान कसे चेंज करतात आणि अचानक एका सामन्यात कंडीशन कसे अॅडोप्ट करता यावर सारे अवलंबून आहे.
उदाहरणार्थ इथे मॅक्कुलम क्रीझमधून पुढे येऊन दे दणादण सुरुवात करून देऊ शकेल का?
किंवा छोट्या ग्राउंडवर सीमापार चेंडू भिरकावून षटकारांत खेळणारे ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या ग्राऊंडवर त्यानुसार खेळ बदलतील का?
जर बोल्टला उद्या येथील बाऊन्सशी लगेचच जुळवून घेता आले नाही आणि त्याची जागा दुसर्या कोणी भरून काढली नाही आणि सुरुवातीपासून विकेट काढायचे आक्रमक डावपेच गंडले तर..
न्यूझीलंडसाठी उद्या बरेच जर तर असणार..
येस्स बदलाची गरज तर आहेच, पण सतत ज्या प्रकारे खेळत जिंकत आलेत ते डावपेच बदलायला जिवावर येतात, जसे काही जण विनिंग कॉम्बिनेशन बदलू नये या खुळचट विचारात अडकून असतात..
पण उद्या न्यूझीलंडला प्लान ए बी सी तयार ठेऊनच उतरावे लागणार..
एक चांगलेय, ती टीम खूप प्रोफेशनल आहे, आणि हे सगळे त्यांचे रेडी असणार .. बस्स आता घडतेय काय कसे हा थरार उद्या बघणे ही पर्वणी आहे..
ऑस्ट्रेलियाला होमपिचचा अॅडवान्टेज आहेच, न्यूझीलंड टॉस जिंकून तो नलिफाय व्हावा अशी इच्छा!
मोठ्या मैदानाचा प्रॉब्लेम
मोठ्या मैदानाचा प्रॉब्लेम फक्त नॉर्मल ओव्हर्स मधे जास्त येइल. कारण पॉवर प्ले मधे बर्याच ठिकाणी बाहेर फिल्डर्स नसतातच एनीवे. स्टार्क्/जॉन्सन वि मॅकल्लम, बोल्ट वि. वॉर्नर बघायला मजा येइल. आपला पाठिंबा किवीज ना.
न्युझिलंड जिंकु देत ! ऑसीज
न्युझिलंड जिंकु देत !
ऑसीज बघवणार नाहीत
मला पण न्यूझीलंड जिंकायला हवे
मला पण न्यूझीलंड जिंकायला हवे आहे पण ऑसीज त्यांचा धुव्वा उडवणार असं माझं प्रेडिक्षन आहे.
मला aussies जिंकायला हवेत
मला aussies जिंकायला हवेत कारण क्लर्क चा शेवटचा सामना आहे... आणि कप इथेच राहील
त्यामुळे त्यांनाही सपोर्ट करावासा वाटतोय. 
पण at the same time, किवी कप्तान ने आपला सपोर्ट एकदम हम्बल होऊन मागितला आहे
Pages