विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीजे Lol आता आयपीएल चालू होइलच की.

पण फायनल अगदीच स्लो चालू आहे. चुरस अशी झालीच नाही. मॅक्लमची विकेट गेल्यापासून मॅचने मान टाकलीये.

हो हो इंडीयाची मॅच असेल तर इंडीया स्वतःहुन चुरस बनवते. शेवट्च्या ओव्हर पर्यंत घेउन जाते. मग षटकार मारुन मॅच जिंकते. Happy

खरंय, आज वर्ल्ड कपची फायनल बघतोय असं अजिबातच वाटत नव्हतं. फारच प्रेडिक्टेबल झाली मॅच. न्युझीलंडने अगदीच निराशा केली. Sad

हम्म्म, ऑसीज आणि इतर संघ यांच्यात नुसत्या बॉलिंग मधे दरी किती आहे ते परत एकदा स्पष्ट झालं.

ऑस्ट्रेलियाने वेळ येताच आपला खेळ अफाट उंचीवर नेला व प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले. त्यांचा रागराग करा नाहीतर मत्सर, ते क्रिकेटच्या जगाला भारी पडतात हे सत्य बदलत नाही.

सलाम क्लार्क आणि संघ! मला तुमच्यापैकी कोणीही एक माणूस म्हणून आवडत नाही, पण एक क्रिकेटर आणि एक संघ म्हणून तुम्ही महान आहात हे त्रिवार मान्य आहे.

ऑस्ट्रेलियाने वेळ येताच आपला खेळ अफाट उंचीवर नेला व प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले. त्यांचा रागराग करा नाहीतर मत्सर, ते क्रिकेटच्या जगाला भारी पडतात हे सत्य बदलत नाही. >>> +१

अतिशय सरस खेळ केला ऑसिजने!

ऑस्ट्रेलियाने वेळ येताच आपला खेळ अफाट उंचीवर नेला व प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले. त्यांचा रागराग करा नाहीतर मत्सर, ते क्रिकेटच्या जगाला भारी पडतात हे सत्य बदलत नाही. >>> सहमत. गेले अनेक वर्षे ते हे करत आहेत. फक्त २००७ नंतर मधे काही वर्षे गडबडले होते. त्यांच्या सिस्टीम मधे असे खेळाडू बनवणारे काहीतरी आहे जे इतर ऑल्मोस्ट सगळीकडे मिसिंग आहे. त्यामानाने प्रेशर खाली खेळणे आपलेही लोक गेल्या १०-१२ वर्षांत पूर्वीपेक्षा बरेच चांगले करतात.

एक दन्तकथा ऐकत असे लहानपणी ...

धामण नावाचा डोहात आढळणारा साप , त्याने डोळे रोखताच म्हशीसारखा अजस्त्र प्राणी गर्भगळित होऊन मट्कन शक्तीपात झाल्यासारखा खाली बसतो ...

तसे या ऑस्ट्रेलिया वाल्यानी डोळे रोखताच सेमिजपर्यन्त अजिंक्य राहिल्लेया संघांचेही अवसान गळते आणि ते मटकन अंग टाकतात ... गेले दोन चार दिवस याचा अनुभव येतोय खरा. आधी आपण आज किवीज.::फिदी:

त्यांच्या सिस्टीम मधे असे खेळाडू बनवणारे काहीतरी आहे जे इतर ऑल्मोस्ट सगळीकडे मिसिंग आहे.
>>>>>>
वृत्ती! जी रक्तात, स्वभावात असते.

आधीही मी म्हटलेले की स्लेजिंग चांगली की वाईट वा कितपत असावी हा वेगळा विषय झाला, पण जे काही आहे ती त्यांनाच शोभते.
आपल्याकडे एक संतवचन आहे, "आधी करावे मग बोलावे",.. ते मात्र बिनधास्त आधी बोलून मोकळे होतात आणि मग हिंमतीने ते करून दाखवायची धमक ठेवतात. त्यामुळे आज कागदावर आफ्रिकेसारखा एखादा संघ त्याच तोडीचा वाटला तरी वेळ येताच ऑस्ट्रेलिया त्यांच्या फार पुढे निघून जाते.

ऑसीजची बेंचस्ट्रेंथ नेहमीच अशी असते की तुम्ही वर्ल्डक्लास प्लेअर असाल तरच संघात टिकाल. आणि पुर्वपुण्याईवर तर लिजंड असलात तरीही नाही.
त्यांचा डोमेस्टीक क्रिकेटचा दर्जाही खूप भारी आहे. सतरापगड संघ नाही. आपल्याकडे रवींद्र जडेजा रणजीत त्रिशतक झळकावतो पण एक कसोटी प्लेअर म्हणून त्याची काय पात्रता आहे याबद्दल वेगळे सांगायला नको.

याउपर अजून एक मुद्दा म्हणजे मला कधी त्यांच्या क्रिकेटमध्ये राजकारणाच्या बातम्या फारश्या आढळल्या नाहीत. ऑफ द फिल्ड असे फारसे काही घडत नाही की त्याचा परीणाम कोण्या खेळाडूवर वा संघावर व्हावा. आपल्याकडे टीम सिलेक्ट झाली की आधी गॉसिपिंगला सुरुवात होते. शेजारच्या पाकिस्तानबद्दल बोलायलाच नको. वेस्टईंडिजमध्ये आपल्याच बोर्डाशी वाद चालू असतात. आफ्रिकेचा काळा ईतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. ईंग्लंडमध्येही ते पीटरसन प्रकरण म्हणा वा गेल्या काही महिन्यांपूर्वी कॅप्टन कोण यावरच चर्चा होत्या. वगैरे वगैरे.. असो, डिजर्व्ह करत होते तेच अखेर जिंकले ! ऑस्ट्रेलिया हरावी असे बरेच जणांना वाटणे यातच त्यांचे चॅंम्पियन असणे लपले होते. (भले इथे त्यांच्या स्लेजिंगमुळे ते आवडत नाहीत असा युक्तीवाद केला गेला तरीही Wink )

अवांतर - तरीही मी बोलत होतो की पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यात एकदिलाने पाकिस्तानला सपोर्ट करा. जे पाहून पाकिस्तानही भारावून गेला असता आणि ऑस्ट्रेलियाला कदाचित चकवला असता.. आणि मग.. मग काय.. आज वर्ल्डकप आपला असता.

मग.. मग काय.. आज वर्ल्डकप आपला असता.>>> भावना चांगली आहे ऋन्मेष, पण हे तुमचे विधान आत्याबाईला मिश्या असत्या तर छापाचे झाले आहे.
प्लस साखळी वर्गातल्या भारत पाक सामन्यात जे टेंशन येते त्याची तुलना इतर कोणत्याही संघाशी होऊ शकत नाही

सेमीला / फायनलला पाक म्हणजे बापरे !!!

भारतपाक सामन्याचे टेंशन .. सेमीचे टेंशन.. ते तर मग आपल्याएवढे त्यांनाही असणारच, किंबहुना आजवर ते आपल्याशी विश्वचषकात जिं कले नाहीत मुळे त्यांनाच जास्त असते.. याउपर सद्यपरीस्थिती आपला संघही त्यांच्यापेक्षा पटीने सरस होता आणि साखळी सामन्यातही हरवून झाले होते.. पाकिस्तान हे मुळातच सॉफ्ट टारगेट असते आपल्यासाठी, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत तर आणखीनच..

असो.. झाले ते झाले.. पुढच्या विश्वचषकाला या चुका टाळा आणि वर्ल्डकप मिळवा Happy

https://www.dailymotion.com/video/x2ls7zs_this-ad-was-made-before-india-...

जर भारत ऑस्ट्रेलिया विरुध्द सेमी फायनल जिंकला असता तर ही अ‍ॅड "मौका मौका" टिव्हीवर येणार होती.
पण ...
असो आम्ही परत कप घेउच

याउपर अजून एक मुद्दा म्हणजे मला कधी त्यांच्या क्रिकेटमध्ये राजकारणाच्या बातम्या फारश्या आढळल्या नाहीत. ऑफ द फिल्ड असे फारसे काही घडत नाही की त्याचा परीणाम कोण्या खेळाडूवर वा संघावर व्हावा >> ह्याचा अर्थ फक्त एव्हढाच कि तू ऑसी मिडिया फॉलो करत नाहीस. Happy ऑफिसमधे दोन ऑसी आहेत त्यांच्याकडून बरेच काही ऐकायला मिळते. बिग बॅशने कसे त्यांचे क्रिकेट कल्चर बदलत चालले आहे नि पुढे टेस्ट क्रिकेट मधे त्यांचे कसे होणार असे उसासेही टाकत असतात. चॅपेल वगैरे ह्याबद्दल बरेच काही बोलत असतात.

Pages