विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा नविन धागा आला पण!

या मॅचेस बुधवार गुरूवार ऐवजी वीकांताला हव्या होत्या. आता जागरण आणि दिवसा काम असे करावे लागेल.

बांगला वाल्यांनी मोका मोका खूपच मनावर घेतले आहे. आज युट्युब वर किती तरी व्हर्जन्स दिसत होते Lol

आमचे कॉपी पेस्टः

भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:

प्रोव्हायडेडः

१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.

ह्या वर्ल्डकप मध्ये राईट आणि लेफ्ट आर्म सीमर्स च्या बाबतीत काही ईंट्रेस्टिंग स्टॅट्स

BattingPP | right | left
Econ| 7 | 5 (रन्स पर ओवर)
Avg | 37 | 20 (रन्स पर विकेट)

Last 10 Overs

Econ| 8.5 | 3
Avg | 26 | 17

भारत आणो पाकिस्तानचे बॅटिंग पावर प्लेचे स्टॅट्स. भारताने बॅटिंग पावर प्ले मध्ये एकही विकेट गमावलेली नाही.

Batting PP | Runs | Wickets
Pak | 20 | 1.3
Ind | 30 | 0

डेथ ओवर्समधले बेल्टींग (मोस्टली राईट हँडेड बॅट्स्मनचे) चालू झाल्यावर लेफ्ट आर्म सीमर्स रन्स रोखण्यासाठी आणि विकेट मिळवण्यासाठी फारच ऊपयुक्त ठरले आहेत. तसेच नवीन बॉल स्वींग करून राईट हँडेड बॅट्समनची विकेट मिळवण्याची त्यांची प्रॉबॅबिलिटीही राईट आर्म सीमर्स पेक्षा खूप जास्त राहिली आहे.
स्टार्क आणि बोल्ट तर लीथल दिसत आहेतच वहाब रियाज सुद्धा जोरदार मुसंडी मारत आहे.
जॉन्सन आणि ईरफान ला अजून तेवढा सूर गवसलेला नाहीये, त्यातला त्यात जॉन्सनची फायर पावर कधीही विस्फोट घडवून आणू शकते.
सेमीमध्ये पाकिस्तान आल्यास धवन, रैना आणि जडेजा ( Uhoh ) लेफ्ट हँडेड बॅट्स्मन पाकिस्तानच्या अचानक फॉर्मात आलेल्या लेफ्ट आर्म सीमर्स विरूद्ध चांगले परफॉर्म करू शकतील अशी अपेक्षा.

उपान्त्य फेरीचे सामने कोणत्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या विजेत्यांत होणार हे आधी ठरलेले नाही का?
म्हणजे पहिल्या आणि तिसर्‍या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या विजेत्यांत पहिला उपान्त्य सामना असे....
उपान्त्यफेरीचा पहिला सामना ऑकलंड : *If New Zealand qualifies for the semi-finals they will play in this match unless they play Australia, in which case the team finishing higher in the pools has home ground advantage
उपान्त्यफेरीचा दुसरा सामना सिडनी : *If Australia qualifies for the semi-finals they will play in this match unless they play New Zealand, in which case the team finishing higher in the pools has home ground advantage.

यावरून अर्थ असा लागतोय की न्युझीलन्डच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या निकालांवरून उपान्त्य फेरीत कोण कोणाशी कुठे भिडणार ते ठरेल. बरोबर आहे का?

मयेकर,
सेमी फायनल अशी ठरेल

१. लंका- सा अ मध्ये जो जिंकेल तो विरुद्ध NZ- विडिंज मधील विजेता

२. ऑस्ट्रेलिया पाक मध्ये जो जिंकेल तो विरुद्ध भारत - बांग्ला मधील विजेता

फायनल १ मधील व २ मधील विजेता.

त्यामुळे आपण जर जिंकलो तर आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू. ( पाक हरेल असे वाटते.)

तुम्ही जे if New Zealand qualifies fo लिहिले आहे. ते कोणत्या ग्राऊंड वर खेळणार (कुठे) संबंधी आहे. कोणाशी कोण हे वर मी जे लिहिले तसे आहे.

पण त्यात unless Newzealand play australia ; unless australia play newzealand असं लिहिलंय त्याचं काय? त्याचा अर्थ तिसर्‍या चौथ्या क्वा.फा.चे विजेते से.फा.त भिडतील असा लागतोय.

नंतर म्हणजे उपान्त्यपूर्वफेरीचे सगळे सामने संपल्यावर का? Wink

मयेकर ती कंडीशन पुल मधले नंबर ठरेपर्यंतच व्हॅलीड होती.. आता तसा प्रश्नच नाहीये.. कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध आलेच तर ते फायनललाच येतील..

हे http://www.icc-cricket.com/cricket-world-cup/fixtures अधिकृत संकेतस्थळ आहे ना? तिथे अजूनही (क्वा.फा.ठरल्यावरही) तसं म्हटलेलं दिसतंय. आधी होतं का पाहिलेलं नाही.

पण त्यात unless Newzealand play australia ; unless australia play newzealand असं लिहिलंय त्याचं काय? >>.

अनुल्लेख करा ! "कुठे" साठी ते आहे.

आँ? इथे बरंच काय काय स्पष्टीकरण देऊन कन्फ्युज करायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.
http://www.icc-cricket.com/cricket-world-cup/fixtures/finals

त्यात मला हे दिसलं
SEMI-FINAL PERMUTATIONS

The semi-final match-ups will be determined by the finishing positions from the pool stage.
Semi-final 1 Winner QF1 (A1 v B4) v Winner QF3 (A3 v B2)
Semi-final 2 Winner QF2 (A2 v B3) v Winner QF4 (A4 v B1)

म्हणजे न्युझीलंड -ऑस्ट्रेलिया उपान्त्य फेरीत एकमेकांसमोर येणं नाही हे कळलं. पण त्याच नियमानुसार भारत उपान्त्य फेरीत पोचला तर समोर किवी किंवा विंडीज येतील असं दिसतंय.
Uhoh

तिथे आधी हेही लिहिलंय QF Criteria 1 - Allocation of Host teams to QF Venues

a) If AUSTRALIA qualifies to play in a QF, then it will be played at the Adelaide Oval on Friday 20 March, regardless of where AUSTRALIA finishes on the Pool A table.

b) If NEW ZEALAND qualifies to play in a QF, then it will be played at the Wellington Stadium on Saturday 21 March, regardless of where NEW ZEALAND finishes on the Pool A table. त्याबरहुकूम होताना दिसतंय.

परत चुकताय मयेकर... वरती दिलेला क्रम उपउपांत्य सामने कुठल्या दिवशी होणार आहेत त्या नुसार दिलेले आहे.. पण इथे
The semi-final match-ups will be determined by the finishing positions from the pool stage.
Semi-final 1 Winner QF1 (A1 v B4) v Winner QF3 (A3 v B2)
Semi-final 2 Winner QF2 (A2 v B3) v Winner QF4 (A4 v B1)
गटातील क्रमवारीनुसार दिले आहे.. दोन्ही जुळत नाही...

उपांत्य फेरीतील सामने तुम्ही दिलेल्या पद्धतीतच होणार आहेत.. त्यामुळे भारत विरुद्ध बांग्लादेश ह्यांच्यातला विजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान ह्यांच्यातील विजेत्याशीच खेळणार आहे...

उगाच कन्फ्युज होऊ नका..

जे आधीचे ठरवले होते त्यात नंतर बदल केला गेला कारण यजमान देश असुन सुध्दा ऑस्ट्रेलियाला न्युझीलंड मधे सामने खेळायला भाग पडत होते. त्यातही त्यांना प्रवास बराच करावा लागला. आधीच्या सेमी फायनलनुसार जर आताचे गटक्रमांक जु़ळाल्यास ऑस्ट्रेलियाला न्युझीलंड विरुध्द सेमी आली तर त्यांना न्युझीलंड मधेच सामना खेळावा लागणार होता कारण "गटात जो प्रथम त्याला प्राधान्य" असा नियमआहे (म्हणजे क्वार्टरफायनल खेळुन परत प्रवास करुन न्युझीलंडला जायचे). अर्थातच ऑस्ट्रेलियाला यजमानगिरीचा काहीच फायदा होणार नव्हता. ही नाराजगी स्पष्टपणे बहुदा ऑस्ट्रेलियाने स्पर्धा सुरु झाल्यावर आयसीसीला कळवली.
त्यामुळेच सेमीफायनल्स साठी क्वार्टरफायनल्सचे नंबर बदल्यात आले आणि ऑस्ट्रेलिया जर सेमीला आली तर तिला सिडनी इथे खेळायला मिळेल आणि जर न्युझीलंड देखील सेमीला आली तर तिला न्युझीलंडला खेळायला मिळेल अशी व्यवस्था आयसीसीने करुन घेतली.

आणि तुमच्या ह्या वाक्यांचे स्पष्टीकरण..

उपान्त्यफेरीचा पहिला सामना ऑकलंड : *If New Zealand qualifies for the semi-finals they will play in this match unless they play Australia, in which case the team finishing higher in the pools has home ground advantage
उपान्त्यफेरीचा दुसरा सामना सिडनी : *If Australia qualifies for the semi-finals they will play in this match unless they play New Zealand, in which case the team finishing higher in the pools has home ground advantage.

जर न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोचले तर त्यांची मॅच ऑकलंड मध्येच होणार.. आणि ऑस्ट्रेलियाची मॅच सिडनी मध्येच होणार जर ते जिंकले तर.

जर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पहिल्या आणि तिसर्‍या नंबरवर किंवा दुसर्‍या आणि चवथ्या नंबरवर आले असते तर परत उपांत्य मध्ये त्यांचा सामना झाला असता आणि त्या केस मध्ये जी टीम वरच्या नंबरवर आली असती तिला होम ग्राउंडचा फायदा मिळाला असता.. आणि त्या देशाच्या ग्राउंडवर मॅच झाली असती..

अफ्रिका , श्रीलंका : अफ्रिका
भारत बांग्ला : भारत
किवीज विंडीज : किवीज
ऑसीज पाक : ऑसीज

ऑसीज भारत : ऑसीज
किवीज अफ्रिका : किवीज

ऑसीज किवीज : किवीज

माझा अंदाज Happy
तुमच काय मत आहे ?

हायझेनबर्ग.. ब्राउझरने जरी वाट लावली तरी तु केलेला अभ्यास समजला.:)

तुझे बरोबर आहे.. तुझ्या स्टॅट्च्या फॉर्मॅटींग वरुन लेफ्ट आर्म सिमर्सचे वर्चस्व दिसुनच येते.

पण कोणीतरी म्हणुन गेले आहे ना की स्टॅटीस्टिक्स आर लाइक.. त्यानुसार वन ऑफ गेममधे डिव्हिलिअर्स, कोहली,धोनी व मॅक्सवेल सारखे गेम चेंज करणारे व्हायटल विनर्स ते स्टॅटीस्टिक्स जे सजेस्ट करत आहे त्याचे सहज तिन तेरा वाजवु शकतात या मताचा मी आहे.. त्यामुळे नुसत्या स्टॅटीस्टिक्सने घाबरुन जाउ नकोस..:)

किती गोंधळ घालता रे स्केज्युल वरुन.. Happy

मला अजूनही हेंच वाटतं कीं यापुढच्या सामन्यांबद्दल एखादे वेळ अदाज बांधणं ठीक आहे पण छातीठोकपणे कांहींही सांगणे योग्य नाही. स्पर्धेत भारताची सर्वांगीण कामगिरी सातत्यपूर्ण आहे [ व तो गतविजेता आपला संघ आहे] त्यामुळे त्याच्य बाजूला कल असणे समर्थनीय. पण यापुढचा प्रत्येक सामना अनपेक्षित निकालाची दाट शक्यता घेवूनच मैदानात अवतरणार हें निश्चित ! बादफेरीचा दबाव कोणता संघ सहज पेलतो, मोक्याच्या वेळीं कोणता सघ आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवतो, चूका टाळतो यावरच बव्हंशी निकाल अवलंबून असेल.श्रीलंका व पाक यांचा स्पर्धेतील आतांच्या कामगिरीचा आलेख चढावाच्या दिशेने असल्याने भारताला त्यांच्यापासून अधिक धोका सभवतो. द.आफ्रिका 'चोकर्स' हा डाग पुसून टाकण्यासाठी जिवाचं रान करतील व त्यांच्याकडे स्टेन, डी व्हिलीयर्स, ड्यूइनी, आमला इ. जागतिक दर्जाचे प्रतिभावान खेळाडू आहेतच. एकंदरीतच स्पर्धा आत्यंतिक चुरशीचीच होणार, हें नि:सशय !

>> ह्या वर्ल्डकप मध्ये राईट आणि लेफ्ट आर्म सीमर्स च्या बाबतीत काही ईंट्रेस्टिंग स्टॅट्स
ऑसी न्यूझिलंड मॅच मधे १२ की १४ विकेटी लेफ्ट आर्म सीमर्सनी काढल्या. त्यापेक्षा जास्त (१६ मला वाटतं) भारत वि. ऑसी मॅचमधे लेफ्ट आर्मर्सनी (सगळ्या सीमर्सना नव्हत्या) काढल्या होत्या.

केदार जाधव, तुझ्या भाकिताशी मी बराचसा सहमत आहे. फक्त श्रीलंका द. आफ्रिका मधे श्रीलंका जिंकेल असं वाटतंय मला.

भाउ नमसकर.. पटतय तुम्ही जे सांगत आहात आहे ते.. पण एकदम कुंडली किंवा हात हातात घेउन ज्योतिषीच वर्ल्ड कपचे भविष्य सांगत आहे असाच मला एकदम भास झाला तुमचे पोस्ट वाचता वाचता..:)

आयला आणी हायझेनबर्ग म्हणजे कोण ते मला तुझ्या गुळ्(मला खुप आवडलेल्या) या कथेवरुन समजले!..कसा आहेस? काय जबरी नाव घेतल आहेस रे .. तुझ्या जुन्या नावाच्या एकदम १८०!

पण जेव्हा तुझे नाव या बीबीवर पहिल्यांदा वाचले तेव्हा मला वाटले की हा हायझेनबर्ग बाबा आता आपल्याला इथे क्वांटम (क्रिकेट) मेकॅनिक्सचे धडे द्यायला आला की काय? म्हणजे.. चेंडुचा स्विंग कसा अनसर्टन असतो.. अथवा डिव्हिलीअर्सचे फटके तो कसा मारतो त्या थिअरीवर खुद्द डिव्हिलीअर्स सुद्धा कसा सर्टन नसु शकतो वगैरे..:) एनिवे.. बर वाटल तुला या बीबीवर बघुन..

मुकुंद तसा हायझनबर्गचा सुद्धा डोक्याचा चमन (गोटा) होता त्यामुळे इतकाही १८० नी टर्न नाही घेतलाय त्यानी.
Lol

भाऊ +१

लेफ्ट आर्म सीमर्सला खेळायला आपले धवन, रैना उपयोगी येतीलच. पहिल्या १५ ओवरांमधल्या सीमर्सची दमछाक होऊ पर्यंत तरी धवन टिकला पाहिजे! आणि अर्थातच रोहित शर्मा. पहिली बॅटिंग असेल तर पुढे रायना आहेच लेफ्ट आर्मरांच्या पुंग्या टाईट करायला.

द.आफ्रिका 'चोकर्स' हा डाग पुसून टाकण्यासाठी जिवाचं रान करतील >>>>

प्रॉब्लेम त्यांचा इथेच होतो, चोकर्स हा डाग पुसण्यासाठी खेळणे म्हणजेच हा डाग डोक्यात घेऊन खेळणे.
आणि मग समोरच्या संघाने दोन क्विक विकेट काढल्या किंवा दोन ओवर फोडल्या तर लगेच डोक्यात ते चोकरगिरीचे चक्र चालू होणे..

पण त्याचबरोबर एकदा यातून ते बाहेर पडले की मग ती टीम फार डेंजरस होणार हे ही नक्की!

असो,
उद्या माझे पैसे लंकेच्या बॅटींग फॉर्मवर Happy

Pages