विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरे काय कठीण काम होते? श्रीलंकेनं याच ऑसीज विरुद्ध याच वर्ल्ड कप मधे हे काम पाठलाग करताना केलं आहे. >> पहिली गोष्ट लंका ३१० का २० ला ऑल ऑट झाली होती नि त्या मॅचमधे हेझलवूड नव्हता. त्याच मॅच मधे स्टार्क नि फॉकनर ने जबरदस्त बॉलिंग टाकली होती.

मला माहीत आहे की इथे आता या धाग्यावर कोणी फिरकणार नाही पण तरीही हा धागा थोडे १-२ दिवस चालु ठेव पराग. कारण(आपल्या टीमबद्दल बरे किंवा वाइट) इथे लिहील्याने पराभवाचा भार हलका होण्यास मदत होउ शकते.

कालच्या दारूण पराभवाचा विचार करताना आज असे जाणवले की याआधीच्या या वर्ल्ड्कपमधल्या विजयांचे श्रेय जसे पुर्ण सांघीक होते तसेच कालच्या पराभवाचे कारणही पूर्ण सांघीक होते. फक्त बोलर्सना किंवा धवनला,विराटला,रैनाला दोषी ठरवता येणार नाही.

कालच्या सामन्यात सुरुवतीपासुन या सामन्याचे दडपण आपल्या खेळाडुंवर आले आहे हे पाल्पेबल होते. त्यांच्या देहबोलीवरुन आत्मविश्वास कमी असल्याचे नक्कीच जाणवत होते. आपण ऑस्ट्रेलियाला या दौर्यात एकदाही हरवु शकलो नाही हा विचार आपल्या खेळाडुंच्या मनात घर करुन बसला आहे असेच पुर्ण सामनाभर वाटत राहीले.जेवढा आत्मविश्वास जगभरच्या भारताच्या समर्थकांना वाटत होता.....(इन्क्लुडिंग मायबोलिकर!)... तसा आपल्या संघातल्या खेळाडुंना निदान ऑस्ट्रेलिया विरुद्ध काल तरी वाटत नसावा असच पुर्ण सामनाभर जाणवत होत.

संघाच्या थिंक टँकने बहुतेक ठरवुनच टाकले होते की आतापर्यंत आपल्या फास्ट बोलर्सना शॉर्ट पिच बोलिंगवर खुप यश मिळाले होते (कालही वॉर्नरची विकेट शॉर्ट पिच बॉलवरच मिळाली होती) म्हणुन आताही ऑस्ट्रेलियाविरुद्धही तीच स्ट्रॅटीजी पुढे चालु ठेवावी. बोलर्सनी मात्र त्याचा काल अतिरेकच केला.. लगोपाठ ४-६-४ असे फटके बसुन सुद्धा यादव(व मोहीत शर्माही!) परत चौथा बॉल शॉर्टच टाकत होता. धोनी त्याला जाउन काहीही बोलला नाही याचाच अर्थ ही टीमचीच स्ट्रॅटीजी होती. वहाब रियाझ त्यात यशस्वी झाला असल्याचे त्यांनी बघीतले असणारच म्हणुन जाणुनबुजुन आपणही तसेच करावे असे यादव आणी कंपनीला वाटले असावे. पण त्यांनी ते अस्त्र स्टिव्ह स्मिथ वर (व तेही त्याचा अतिरेक करुन!)... म्हणजे चुकीच्या टार्गेटवर सोडल्यामुळे ते एकदमच निष्प्रभ झाले. आपल्या मायबोलिवरच्या चाणाक्ष क्रिकेटप्रेमींच्या लक्षात ते काल मॅच बघताना येत होते पण आपल्या संघाला त्याची जाणीव होउ नये ही खरच खुप खुप खेदाची व खुप राग यावा अशीच गोष्ट आहे.

असो. काल इथे पोस्ट्स्चा वेग इतका होता की काही काही पोस्ट्स वाचुन त्यांना खरच दिलासा द्यावासा वाटत होता. एक म्हणजे स्नेहनिल हा आयडी.. शेवटपर्यंत या आयडीने पॉझिटिव्ह विचार करायचे सोडले नाही. कौतुक आहे तुमचे खरच!

काली म्हणुन अजुन एक आय डी शेवटी अजुन इथे काही वाचवत नाही म्हणुन अक्षरशः बहुतेक रडवेला होउन गेला.

स्नेहनिल व काली.. इफ इट मेक्स यु फिल एनी बेटर... २००७ चा विश्वचषकातला पराभव पचवायला यापेक्षा लाखपटीने जास्त कठीण होता.. पहिल्याच फेरीत आपल्याला त्या वेळच्या बांगला देशने स्पर्धेच्या बाहेर केले होते. पण तरीही चारच वर्षानंतर २०११ मधे आपण विश्वविजेते झालो! यंदाही आपला संघ नक्कीच काहीतरी शिकला असेल व त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या विश्वचषकात जरुर होइल असा माझा विश्वास आहे. कारण आपल्या संघाचा गाभा अजुन तरुण आहे. एक धोनी सोडला तर पुर्ण संघ पुढच्या विश्वचषकात अजुन चार वर्षाच्या अनुभवाची श्रिमंती घेउन परत येउ शकतो. फक्त त्या जडेजाला बहुतेक धोनी गेल्यानंतर संघाच्या बाहेर टाकतील. होपफुली आपल्याकडे त्याची जागा घ्यायला कोणतरी चांगला खेळाडु पुढे येइलच.

धोनी गेल्यावर मात्र एक मोठी पोकळी निर्माण होइल. त्याची जागा कोण घेउ शकतो? संजु सॅम्सन? एनि थॉट्स ऑन दॅट? अर्थात त्याच्या नेत्रुत्वाची पोकळी भरुन काढायला मात्र फारच कठीण जाइल.

बेस्ट लक न्युझिलंड अँड ऑस्ट्रेलिया.. फेरफटका म्हणतो त्याप्रमाणे...मे द बेस्ट टिम विन.

एक क्रिकेट फॅन म्हणुन एवढीच प्रार्थना की फायनल कालच्या मॅचसारखी एकतर्फी न होता एकदम चुरशीची होउ देत....

मुकुंद, छान अ‍ॅनेलिसीस आहे. टीम फेल्युअर बद्दल सहमत आहे. वैयक्तिक निराशा मात्र रहाणे ने केली. पाक विरूद्ध ची एक इनिंग सोडली तर त्याने ठळक लक्षात राहील असा मोठा डाव खेळला नाही.

आता आपले बॅकिंग किवीज ना. ऑस्ट्रेलियाविरूद्ध राग बिग म्हणून नव्हे, ते खरेच चांगले खेळत आहेत व अजून कधी जिंकला नाही, म्हणून डार्क हॉर्सही.

८७ ची सेमी मधे इंग्लंड कडून हार, ९६ च्या सेमी मधली लंकेकडून, २००३ ची फायनल, २००७ चे नॉक आउट या मानाने या वेळेस भारत हरण्याचे एवढे वाईट वाटले नाही. मुख्य कारण म्हणजे ओव्हरऑल चांगले खेळले आणि सेमी मधे आपल्यापेक्षा सरस टीम कडून त्यांच्या घरच्या मैदानावर हरले. कौशल्य, फिटनेस, प्रेशर हॅण्डलिंग सर्वात ऑस्ट्रेलिया सरस ठरली आपल्यापेक्षा.

प्रत्येक शॉर्ट बॉल ला मात्र काल जबरी राग येत होता. May be Dhoni and the bowlers knew something we didn't. पण प्रत्येक फुल व गुड लेंथ बॉल्स ना त्यांना रिस्क घ्यावी लागत होती. बॅटिंग अ‍ॅनेलिसीस बघितला तर अर्धे रन्स शॉर्ट बॉल्स वर झालेले दिसतील. त्यात मुळात पिच मधे फारसा बाउन्स नव्हता. ती स्ट्रॅटेजी अजिबात कळाली नाही. फाइन लेग आत ठेवून यॉर्क करायचा प्रयत्न वगैरे अगम्य प्लॉय कळाले नाहीत. पण ठीक आहे, आपण घरी आरामात बसून मारलेल्या या कॉमेन्ट्स ना काय महत्त्व आहे.

धोनी ने अजून खेळावे असे मलाही वाटते. अगदी कॅप्टन म्हणूनही. पण त्याची स्वतःची प्रायोरिटी २०-२० असेल तर काय माहीत नाही.

मुकुंद , पोस्ट आवडली

रच्याकने, काल सोशल मिडियावर (फेबु, ट्वीटर)अनुष्का, विराट , धोनी यांच्याबद्दल जे काही बोलल गेल ते पाहुन स्पोर्टिंग स्पिरिट नावाचा काही प्रकार कोणाला माहीत आहे का असा प्रश्न पडला. एक match काय हरलो लगेच टीम इंडिया अनादरास पात्र ठरली. अरे सेमी फ़ायनलपर्यत याच टीमने चांगल क्रिकेट पाहायला दिल त्याच काय ? खेळात हार जीत होणारच . खेळ जिंकण महत्वाच् आहे . टीम नव्हे. जो बेस्ट खेळला तो जिंकला . सो सिंपल

लोकहो लोकसत्ताचा आजचा अग्रलेख वाचा. त्यानी तर मार्केट ड्रिव्हन फिक्सिंगचाच सूर लावलाय. अग्रलेख आहे म्हनजे तो तितक्याच गांभीर्याने लिहिलेला असणार !

'ही तो बाजारपेठेची इच्छा "

http://www.loksatta.com/sampadkiya-news/australia-beat-india-an-aspirati...

पण ठीक आहे, आपण घरी आरामात बसून मारलेल्या या कॉमेन्ट्स ना काय महत्त्व आहे.>> +१११११११

मुकुंद, फार छान पोष्ट!!!! मी ही शेवटपर्यंत बी-पॉझिटिव्हच होतो.

रॉबीनहूड..

अहो कॉन्स्पिरसी थिअरी शोधुन काढायची या भारतातच काय पण जगात कुठेही वानवा नाही.. जॉन एफ केनेडींची हत्या कोणी केली, ९११ कोणी घडवुन आणले, बराक ओबामा हे मुसलमान आहेत पासुन ते चंद्रावर माणुस खरा गेलाच कसा नाही अश्यासारख्या अनंत कॉन्स्पिरसी थिअरीज तुम्हाला बघायला, ऐकायला व वाचायल्या मिळतील. त्यातल्या कोणत्या कॉन्स्पिरसी थिअरीवर तुम्ही किती विश्वास ठेवायचा ते प्रत्येकाने आपापली सारासार बुद्धी वापरुन ठरवायचे असते.त्यामुले लोकसत्तामधे अग्रलेख आला म्हणुन डोळे झाकुन विश्वास ठेवावे की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

माझ्याबाबतीत म्हणशील तर मला नाही वाटत की एवढ्या ब्लेटंटली.. असे ठरवुन क्रिकेट सामन्यांचा निकाल ठरवता येत असेल.. जस्ट टु मेनी प्लेयर्स अँड टु मेनी टीम्स इन्व्हॉल्व्ह्ड टु फिक्स द रिझल्ट्स...पण अझरुद्दीन्..जडेजा.. ललित मोदी सागामुळे क्रिकेट सामन्यांकडे संशयाचा चष्मा लवुन पाहायला जागा आहे. त्यामुळे जे जे असे चष्मा लावुन सगळे क्रिकेट बघतील त्यांच्यासाठी अशी आर्टिकल्स लिहायला व त्यावर विश्वास ठेवायला वाव आहे.

फारएंड.. मला अजिंक्य रहाणे हा एकदिवसिय सामन्यात गल्ली चुकलेल्या माणसा सारखा वाटतो.

आउट्डोअर्स.. न्युझिलंड साउथ आफ्रिकेतला सामना हा वन फॉर द एजेस असा होता.. असे सामने जर रोज रोज व्हायला लागले तर आपल्यासारख्या डाय हार्ड क्रिकेट फॅन्सची चंगळच! Happy

मैत्रेयी.. ते अनुष्का शर्माबद्दलचे पोस्ट तुला वैयक्तिक उद्देशुन नव्हते ग.. मी पण रोज हिंदी समालोचन ऐकत असल्यामुळे तुझे शोएब अख्तरवरचे कॉमेंट्स वाचुन जबरी मजा आली.:)

दीपांजली,हिम्स्कूल्,कांदापोहे,बेफिकीर्,कबीर्,मंजु,मनीष,नंदिनी,जाई,वत्सला,ऋन्मेष,फेरफटका,रमड,चिमण.. या इथे..या बीबी वर.. नियमित येणार्‍यां बरोबर.. गेल्या दिड महिन्यात हा विश्वचषक बघताना खुप मजा आली.

झक्की,भाउ नमसकर,फारएंड आणी रार पाहूणे कलाकार म्हणुन इथे आले Happy

असामी आणि हायझेनबर्ग यांच्या अनेक अभ्यासु पोस्टींमुळे या बीबीला एक अभ्यासु वलय आले. त्याबद्दल त्या दोघांचे खरच धन्यवाद!

अँड लास्ट बट नॉट द लिस्ट... वैद्यबुवांमुळे या बीबीला खरच खुप जान आली.. त्याचा ओसंडता उत्साह व या खेळाची जेन्युइन आवड.... त्याच्या प्रत्येक प्रतिसादातुन जाणवत होती.. तो त्याचा उत्साह व क्रिकेटप्रेम ...हे दोन्ही.... या बीबीवर खुपच पाल्पेबल व कंटॅजिअस होते. आणी जाता जाता हेही नमुद केले पहीजे की वैद्यबुवांमुळे या बीबीवर येणार्‍यांच्या मराठी व्होकॅब्युलरीमधे फार मोठी भर पडली..:)

चला परत भेटु चार वर्षांनी.. आशा करुयात की पुढच्या वेळी आपल्यापैकी बरेच जण इथे परत गोळा होउन एकच कल्ला करु शकु व पुढच्या वेळी अजुन दोन पावले पुढे जाउन विश्वचषक जिंकल्याचा आनंद लुटु शकु!

लोकहो,
शेवटप्रयंत पॉझिटीव्ह असण्याबद्दल कौतुक चालु आहे म्हणून अगदीच रहावत नाही हे लिहिल्याशिवाय , नथिंग पर्सनल !
तर पॉझिटिव असणं ठिकच आहे पण ३२९ धावांचं भलंमोठं टार्गेट , रैना -कोहली अक्षर्शः फुकटात गेलेले , इन फॅक्ट कोणीच फार काही मैदानावर केलं नाहीये एक कॅप्टन सोडून, ६ विकेट पडल्यायेत अशा वेळी आपेक्षा करणं हे जरा जास्तच अचाट आणि अतर्क्य नाही का ?
जेंव्हा एकटा धोनी खिंड लढवतोय ( १२ पेक्षा जास्तं रिक्वायर्ड रनरेट असताना) , कधी नव्हे ते धोनीही टेन्स्ड, त्याचीही बॉडी लँग्वेज लढायची दिसत नव्हतीच , बाजुला कोण तर जडेजा, अशा वेळी पॉझिटीव्ह असणे मला थोडे बालिश वाटले खरं तर किंबा रिअ‍ॅलिलिटी न समजणे असं माझं मत ( अर्थात इतरांना माझं मत पेसिमिस्टिक वाटत असेन हेही खरं !)
जर खेळ आहे कळतय, तर कधीकधी वस्तुस्थिती पाहून आपण नाही जिंकणार हे अ‍ॅक्सेप्ट पण करता आलं पाहिजे खिलाडु वृत्तीने Happy
क्रिकेट इज नॉट अ फेअरीटेल कि अशा सिच्युएशन मधे जादूची कांडी फिरेल .जस्ट अ‍ॅक्सेप्ट रिअ‍ॅलिटी!
अर्थात खेळाडुंवर वैयक्तिक टिका, पोस्टर्स जाळणे वगैरे प्रकाराचा तीव्र निषेध !
आपल्या टिमने अत्ता परयंत मिळवलेले ७ विजय , कॅप्टन कुल च्या कामगिरीबद्दल नेशन शुड फिल प्राउड फॉरेव्हर !
असो, तर #wewantitbackin2019 Happy

मस्त लिहिलंय मुकुंद!! मी कालपासून तुमच्या पोस्टची वाट बघत होते. फारेंडाची पोस्टही छान!

काल व्हॉट्सअ‍ॅपवर एका ग्रूपवर इतक्या नकारात्मक पोस्टी आल्या की अक्षरशः नैराश्य आलं. आत्तापर्यंत ७ वेळा जिंकलो तेव्हा एकदाही त्यासंदर्भात एकही पोस्ट त्या ग्रूपवर आली नव्हती. आणि काल टोमणे/शिव्यांचा वर्षाव. हे असंच्या असं लिहून तिथे टाकलं तर ग्रूपवर एकदम सन्नाटा पसरला. शेवटी आम्ही व्हिलनच! असो.
पण आज सकाळी एक फुंकर घालणारी फॉर्वर्ड पोस्ट आली की सचिन तेंडुलकरने काल म्हटलं (ख.खो.मा.ना.),
If you can't stand with them in defeat.... U should not celebrate their wins also. A team that many outruled of reaching semifinals also performed well in world cup. Winnign and loosing are part of the game. All d best for the future games. Play n have fun - Sachin Tenndulkar

ही पोस्ट त्या ग्रूपवर टाकल्यावर जीव थंडावला.

>>>लोकहो,
शेवटप्रयंत पॉझिटीव्ह असण्याबद्दल कौतुक चालु आहे म्हणून अगदीच रहावत नाही हे लिहिल्याशिवाय , नथिंग पर्सनल !
तर पॉझिटिव असणं ठिकच आहे पण ३२९ धावांचं भलंमोठं टार्गेट , रैना -कोहली अक्षर्शः फुकटात गेलेले , इन फॅक्ट कोणीच फार काही मैदानावर केलं नाहीये एक कॅप्टन सोडून, ६ विकेट पडल्यायेत अशा वेळी आपेक्षा करणं हे जरा जास्तच अचाट आणि अतर्क्य नाही का ?<<<

अनुमोदन

धन्यवाद मुकुंद ! तुमच्या पोस्टही छान होत्या . या बीबी वर येऊन मित्रांबरोबर एन्जॉय करत असल्याच फिलिंग येत होत
थॅंक्स टू all guys

मंजू, अगदी अगदी
इतके खालच्या दर्जाचे शब्द वापरले गेले . सुसंकृतपणा कुठे लोप पावला हा प्रश्न पडला

सचिनची पोस्ट मलाही आलीय व्हॉट्स अप वर

चला परत भेटु चार वर्षांनी >>> मुकुंद, चार वर्षांनी कशाला? आयपीएल आहे. ते नको असेल तर कसोटी सिरीज आहेत नंतर. येत राहा येथे.

सचिनचा नंबर शेअर कर नं..>>> LOL काश ऐसा होता Lol Proud
अग म्हणजे शेयर केलिये एकाने व्हॉट्स अपच्या ग्रुपवर

वैद्यबुवांमुळे या बीबीवर येणार्यांच्या मराठी
व्होकॅब्युलरीमधे फार मोठी भर
पडली..>>> सहमत . टोचन हा नवा शब्द कळाला. कधी बॉसने नाटक केलिच तर वापरता येईल Lol Proud

चला मिळालेले आता विजय आणि पराभवाचे विश्लेषण करायची गरज आहे.

१. लेटस लुज सर जडेजा. जसे विजय आणि पुजारा स्पेशलाईज्ड टेस्ट प्लेअर आहेत तसेच जडेजा हा फक्त "भारतातच खेळणारा" प्लेअर करावा. अक्षर पटेल बॅक फिल करायला आहे. टाईम अ‍ॅन्ड अगेन त्याने फार काही भरीव कामगिरी केली नाही.

२. मला अश्विन बद्दलही डाऊट आहे. त्यानी बरीच चांगली बॉलिंग केली पण तो बरीच चांगली आणि चांगली मध्ये खूप फरक आहे. इम्रान ताहिर आणि तो ह्यात हा फरक जाणवेल. (स्पेशली वल्डकप मध्ये) - लेटस फाईंड आउट गुड ऑफी. तो उत्तरप्रदेशचा १९ वर्षाचा पोरगा कुठे आहे?

३. मोहित शर्मा असु द्या पण भुवी शुड बी द फर्स्ट चॉईस. काल नोटीस केले का? सर्व ऑसी बॉलर्सला स्विंग मिळत होता. आणि आपला खंदा स्विंगर बाहेर बसला होता. मी कालही आणि त्यापूर्वीही लिहिले की हा माणूस रिंगच्या बाहेरून पळत येतो आणि १३० नी टाकतो. समथिग इज रियली विअर्ड. त्याने १३८ जनरेट केले आहे, पण भूवी असताना ही शुड जस्ट बी ऑन बेंच.

४. मुकूंदने लिहिल्यासारखे रहाणे वनडे मध्ये अजूनही बावचळलेला वाटला ( वल्डकप मध्ये) पण तो असायला हवा. ही हॅज इट. सो ब्रिड हीम.

ऑलराऊंडर कोण आहे? अक्षर आहेच, पण अजून एक हवा असे वाटते.

आपला नेहमीचा प्रॉब्लेम हा आहे. की बाहेर मार खाऊन आल्यावर लगेच IPL असते त्यामुळे कुणीही खूप सिरियसली ह्यावर विचार करत नाही, त्यामुळेच पहिले ऑस्ट्रेलिया, सा अफ्रिका, मग इंग्ल्ड आणि आता परत ऑस्ट्रेलिया वरून मार खाल्यावरही तेच ते प्लेअर खेळत राहतात.

थँकफुली धोणी न्यु, ही सक्स इन टेस्ट त्यामुळे तो रिटायर झाला. पण त्याला वनडे मधूनही रिटायर व्हा म्हणणे म्हणजे टू मच आहे, सध्या तरी. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर तो रिटायर होऊ शकतो. तेंव्हा तो ३५+ होईल.

जाई Wink

मंजूडी, सचिन तर तुमचा शेजारी Proud पण तरी काल तो मेसेज वाचल्याव्र बरं वाटलं. इव्हन गांगुलीनं पण असंच काहीसं म्हटलंय.

आता हळूहळू सट्टाबाजारात ही मॅच फिक्स केली होती म्हणणारे लोकं डोकं वर काढताहेत. सात मॅचेस सुंदर खेळाचं प्रदर्शन करून जिंकत असताना हे लोकं तीर्थयात्रेला गेले होते वाट्टं. मूर्ख इडियट्सना हे समजत नाही की जर भारत फायनलला गेला अस्ता तर फायनल वर किती सट्टा लागला असता. फायनलचा टीआरपी काय असता!!!! भारत सेमी फायनलमध्ये हरल्यानं सर्वात जास्त नुकसान सट्टेवाले आनि जाहिरातदार यांचं झालं आहे. फायनलची जाहिरात दर धाडकन खाली कोसळलेत. स्लॉट्स रिकामे व्हायला लागले आहेत. ज्यांना क्रिकेटमधलं सोडा, साधा सट्टा बाजार म्हणजे काय ते समजत नाही ते एका मॅचवरून भारताच्या खेळाडूंची इंटीग्रीटी काढताहेत. यडपट लेकाचे!!!

वैद्यबुवांची मराठी व्होकॅबुलरी हा संशोधनाचा विषय ठरावा यात वाद नाही.

आतापर्यंत आपल्या फास्ट बोलर्सना शॉर्ट पिच बोलिंगवर खुप यश मिळाले होते (कालही वॉर्नरची विकेट शॉर्ट पिच बॉलवरच मिळाली होती) म्हणुन आताही ऑस्ट्रेलियाविरुद्धही तीच स्ट्रॅटीजी पुढे चालु ठेवावी. बोलर्सनी मात्र त्याचा काल अतिरेकच केला..>> ++100

सगळेच छान लिहीत आहेत. काल बॉलींगनंतर संयमी फलंदाजी असती तर जिंकलो असतोच. असो. आधी आपली दारुण अवस्था असताना आपण कमबॅक करुन सेमी पर्यंत गेलो व चांगल्या संघाशी हारलो. संपूर्ण भारतीय टीमचे त्याबद्दल खरोखर अभिनंदन.

काल एक मस्त मेसेज वाचला.

"जर फायनल न्युजीलंड व ऑस्ट्रेलीयालाच खेळायची होती तर बाकी १२ संघांना नाचवलेच का?" Proud

<< संघाच्या थिंक टँकने बहुतेक ठरवुनच टाकले होते की आतापर्यंत आपल्या फास्ट बोलर्सना शॉर्ट पिच बोलिंगवर खुप यश मिळाले होते (कालही वॉर्नरची विकेट शॉर्ट पिच बॉलवरच मिळाली होती) म्हणुन आताही ऑस्ट्रेलियाविरुद्धही तीच स्ट्रॅटीजी पुढे चालु ठेवावी>> सहमत. शेवटच्या ५-६ षटकांत यॉर्कर / पूर्ण लांबीचेच चेंडू टाकण्यावर भर द्यायला हवा होता, असं राहून राहून वाटत होतं.
हरल्याच्या दु:खापेक्षां आपण आपल्या कुवतीच्या मानाने कांहींच खेळ केला नाही - विशेषतः फलंदाजी - हें दु:ख अधिक तीव्र होतं. सेमिच्या दडपणामुळे भारताचा खेळ झाला नाही, ह्या गावसकरांच्या मताशीं सहमत होणं मात्र कठीण -

qurter.jpg

नमसकर काका, वेलकम. तुमच्य व्यंगचित्रांची आज खरंच गरज आहे. या व्यंगचित्रावर वॉटरमार्क टाका, नाहीतर व्हायरल होइल.

आपल्या गोलंदाजीच्या वेळी आखुड टप्प्याचे चेंडू टाकले म्हणून होणारी टीका रास्त आहेच. पण जॉन्सनसारखे शेपूटसरदारही अचाट मारामारी करू शकतात हे शिकण्यासारखे आहे. धोनीने परखडपणे हे बोलून दाखवले की आमचे शेपूट अजिबातच फलंदाजी करत नाही. शिवाय धोनीने सौम्य शब्दांत धवनवरही टीका केली. रहाणेबाबतही तो बोलला पण विशेष टीकात्म नव्हे. मात्र शर्मा, कोहलीबाबत काहीच बोलला नाही. हे सगळे सामना संपल्यानंतर धोनी मैदानात जे बोलला त्याबाबत आहे. नंतर बोलला असला तर माहीत नाही.

सर जडेजांच्या नावातील 'सर'चा मराठी अर्थ लवकरच त्यांना घ्यायला लावायला हवा आहे.

विनिंग काँबिनेशन हा प्रकार मला तरी भासमान वाटतो. विशिष्ट अकरा जणांचा समुह जिंकत आहे म्हणून तो बदलू नये हे पटत नाही. समोरचा प्रतिस्पर्धी, खेळपट्टी, प्रेक्षक, शहर ह्या सगळ्याचा विचार करून संघनिवडीचा फेरविचार करायला हवा होता असे उगाच आपले वाटत आहे. तसेच, युवराजला अजिबात न नेणे ही एक चूक असल्याचे अजून कोणी खासकरून म्हंटलेले दिसत नाही.

आज कोठेतरी एक बर्‍यापैकी वाचायला मिळाले.

बाद फेरी व उपउपांत्य सामन्यापैकी एक दक्षिण आफ्रिका सोडले तर बाकीचे आपल्या तुलनेत सुमारच संघ होते.

ऑस्ट्रेलियाच्या रुपाने प्रथमच आपला कस लागला टूर्नामेंटमध्ये!

शेवटप्रयंत पॉझिटीव्ह असण्याबद्दल कौतुक चालु आहे म्हणून अगदीच रहावत नाही हे लिहिल्याशिवाय >> डीजे तुझी पोस्ट नाही पटली. जे पॉझिटिव्ह होते त्यांच्याबद्दलच लिहिलंय. जे रियलिस्टिक होते त्यांना वाईट म्हटलं नाहिये कोणी. नॅटवेस्ट ट्रॉफी लक्षात असेल तर त्यावेळीही बरीचशी कालच्या सारखीच अवस्था होती पण तिथून आपण जिंकलो होतो Happy

बाकी मुकुंद, केदार आणि फारेंड.. चांगल्या पोस्टी.. आणि मुकुंद ४ वर्षांनी का? पुढच्या वर्षी टी-२० आहे की Happy

अनुष्कावर राग काढणे हे चुकीचे आहे.

जेव्हा विराट कोहली मैदानात आला तेव्हा सेट होण्याकरीता थोडे बॉल बघुनच खेळत होता. जॉन्सनने देखील त्याला बाउंन्सर वगैरे टाकले बहुदा थोडीफार स्लेजिंग देखील केली. ७-८ बॉल खेळुन झाल्यावर स्टेडीयमच्या मोठ्या स्क्रिन वर अनुष्काचा चेहरा दाखवला गेला. अर्थात हे सगळ्याच खेळाडुंनी बघितले असेलच. यानंतर जाँन्सनने विराटला बाउंन्सर टाकला. विराटने तो चुकवला. या दरम्यान परत एकदा अनुष्काची छबी दाखवली गेली.
यानंतर दोन एक बॉल दम घेतल्यावर पठ्ठ्याने जॉन्सनने टाकलेल्या बाउंसरवर " माझ्या गर्लफ्रेंड समोर मलाच बाउंसर वर बाउंसर मारतोस आता बघच मी मारुन दाखवतोच" या आवेशात बॅट अशी काही घुमवली की कॅच झालाच. (हे स्क्रिन वर अनुष्काला दाखवले हे काहीजणांकडुन कळले कामामुळे मॅच बघता आली नाही)
आता याबाबतीत कोहलीने थोडे शायनिंग मारलीच. स्वत:च्या भावनांवर कंट्रोल ठेवता आला नाही. गल्लीत खेळणारे टीनएजर मुल कशी कुठली मुलगी गॅलरीतुन बघत असेल तर लगेच शॉट वगैरे जोरात मारतात तसाच काहीसा प्रकार कोहलीबाबत झालेला वाटतो. याच गर्लफ्रेंड समोर टेस्ट मॅच मधे कोहलीने शतक मारले होते. आणि जगासमोर फ्लाईंग किस चा कीस पाडलेला हे जगाने बघितले होते. पण हा वर्ल्डकप आहे. महत्वाची सेमीफायनल आहे. हे साफ विसरुन गेला. दिपीका पादुकोण आणि युवराजचा देखील असेच काहीसे होते. तेव्हा देखील युवीचा फार्म म्हणजे जाडेजाची बॅटींग झालेला. विविअन रिचर्डसन २-४ गर्लफ्रेंंड घेउन फिरायचा असे म्हणत होते पण त्याच्या बॅटींग वर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. आपल्या बैलामधेच खोट असेल तर शेजारच्या गोठ्यातल्या गाईला कशाला दोष द्यावा?
आश्चर्य म्हणजे हे असले काही बायकोसमोर होत नाही. गुप्तीलची बायको स्टेडीअम मधे असताना तिला दाखवण्याकरीता वगैरे गुप्तिलने कोणताही आडवातिडवा शॉट खेळला नाही. शांतपणे शतक दिड शतक द्विशतक केले.

Pages