विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो मग तेच सांगतोय ना. DL चा फटका मुख्यतः दुसर्‍या इनिंग मध्ये जे बॅटिंग करतात त्यांना बसतो. SA ने कमी रन करुनही २८१ NZ ला २९८ करावे लागतील. > तसे नाही केदार जिथे ५० ओव्हर करुन कदाचीत ३५०-४०० होणार होते तिथे त्यांना २८१ मिळाले आणि जेव्हा खेळ थांबला तेव्हा ३८ ओव्हर झालेले म्हणजे अवघे ५ ओव्हर मिळाले होते. आता या ५ ओव्हर मधे हाणामारी मधे विकेट्स गेले तर नंतरचे टारगेट देखील कमी होते. विकेट्स किती गेल्या यावर देखील वाढीव लक्ष्य अवलंबुन असते. त्यामुळे तुम्ही जसे म्हणतात तसे नाही. डुप्लेसीची आणि मिलरची विकेट गेली नसती तर हे लक्ष्य ३००+ असते.
डक्वर्थ लुईस नियम ईएसपीएनक्रिकइन्फो वर आहे

मला वाटत २००३ वर्ल्ड कप मधे तेंडुलकरने पाकीस्तान व इंग्लंडबरोबर जशी सुरुवात केली होती त्याची आठवण आली मॅकॉलमची आजची बॅटींग बघुन.तेव्हा पण अँड्रेयु कॅडीक ,वकार युनुस व शोएब अख्तरचे चेहरे असेच रडवेले झाले होते जसे आज स्टाइन आणी कंपनीचे झाले होते.

२ विकेट्स गेल्यावर आता पारडे इव्हन झाले आहे.

केदार किंवा कबीर.. आता पॉवर प्लेच्या पुर्ण ५ ओव्हर्स न्युझिलंडला मिळणार का? आणी शेवटच्या दहा ओव्हर्सचे नियम आता ४३ ओव्हर्सच्या मॅचमधे कधी चालु होणार?

दीपांजली.. ही मात्र तु मॅकॉलमपेक्षा जबरी सिक्सर मारलीस!:)

कोंणाला माझ्या प्रश्नांचे उत्तर माहीत आहे काय?

आता पॉवर प्लेच्या पुर्ण ५ ओव्हर्स न्युझिलंडला मिळणार का? आणी शेवटच्या दहा ओव्हर्सचे नियम आता ४३ ओव्हर्सच्या मॅचमधे कधी चालु होणार? >>

४३ ला ५० शी प्रो रेट करणार नियमाप्रमाणे.

"... and south africa reaches final of ICC World Cup for the first time.." ऐकायला कान आतुरलेत Happy

नाही रे आगावा.. अजून चोक झालेले नाहीत.. काहीही होऊ शकते आहे.. अँडरसन कॅन कट लूज एनी टाईम..

सा.अ. चे चान्सेस जास्तं दिसत असले तरी न्युझिलंड हॅजन्ट गिव्हनप.. प्रत्येक ओव्हरला पारडं वेगळीकडे झुकतय :), सेमि फयनलला साजेसा गेम चाल्लाय अजुनतरी !

Pages