विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
आपण पामर काय हनन करणार,
आपण पामर काय हनन करणार, कित्येक छोटेमोठे तसेच नामवंत खेळाडू मॅचप्फिक्सिंग अन स्पॉटफिक्सिंगमध्ये सापडलेत, कित्येकांना शिक्षा झालीय, कारकिर्दीवर बंदी घालण्यात आलीय, कोचचे संशयास्पद मृत्यु झालेत, आयपीएलने तर पैश्याचा बाजारच मांडलाय... भले यात सारेच नसतील, पण जे चरीत्रवान खेळाडू म्हणून ओळखले जातात ते सुद्धा त्यांना माहीत असून अळीमिळी गुपचिळीच राहतात मग आपल्याला का बोलायची चोरी.. जेव्हा फिक्सिंग होते तेव्हा आपला विश्वासघात झाल्याचा राग नाही का येत.. मला तरी येतो.. यात सापडलेले एकूण एक खेळाडू माझ्या नजरेतून उतरलेत ते कायमचेच! >> जगात टेस्ट क्रिकेट खेळणारे १० देश, त्यातले १५ खेळाडू प्रत्येकी असे धरले तर जवळजवळ १५० जण एकाच वेळी क्रिकेट खेळत असतात. ह्यातले १० जण मॅच फिक्सिंग मधे सापडले (हा आकडा मी एव्हढया वर्षांमधे आरोप सिद्ध झालेल्यांचा म्हणून धरतो) तर जवळजवळ ९३% जण ह्यात सामील नाहित. ह्या ९३% कडे बघ नि हे वाक्य परत वाच "मॅच फिक्सिंग, ड्र्ग्ज ह्या गोष्टी आपण एवढ्या सहजतेने बोलून जातो की अनावधानाने ह्या खेळाचे केवढे मोठे चारित्र्य हनन आपण करतो आहोत हे आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही."
जेव्हा फिक्सिंग होते तेव्हा
जेव्हा फिक्सिंग होते तेव्हा आपला विश्वासघात झाल्याचा राग नाही का येत.. मला तरी येतो. >> चष्मा बदला, गेट वेल सून नाही तर सोडून द्या की मग क्रिकेट बघणे, बळजबरी केली आहे का कोणी 'हे सगळे फिक्स असू शकते आणि खेळाडू ड्रगिस्ट आहेत' हे माहित असतांना देखील बघायला.
पण प्रश्न इथेच सुटत असेल तर मला सांगा घेतातच कशाला मग उत्तेजक चाचण्या? पैश्याची उधळपट्टी करायला? >> माहित आहेत ना घेतात म्हणून चाचण्या मग का बुवा संशय येतो तुम्हाला चांगल्या पर्फॉर्मरचा .
जे क्रिकेटच्या ३५-४० वर्षांच्या ईतिहासात झाले नव्हते, वेलिंग्टन पेक्षा ग्ल्वालियरचे मोठे ग्राऊंड, अफ्रिकेचा सर्वोत्तम बॉलर्ससह तिखट बॉलिंग अॅटक, फेब्रुवारी हीट, घामाच्या धारा, छत्तीस वर्षांचे थकलेले शरीर २०० मारते तेव्हा नाही का तुम्हाला संशय आला डृग्जचा, भलतेच बुवा संधीसाधून तुम्ही.
गुप्टीलने उत्तेजक द्रव्य घेतले होते का? अशी खुली शंका घेतली तरी त्यात मला फारसे वावगे वाटत नाही.
हेच जर तो भारताविरुद्ध खेळला असता आणि अशी शंका उठली असती तर कदाचित काही जण गुप्टीलची पार्टी सोडून शंका घेणार्यांच्या पार्टीत सामील झाले असते. आणि ते सिद्ध झाल्यावर "काही हरकत नाही उत्तेजक द्रव्य घेतले तर, शेवटी खेळला तर त्याच्या स्किलवरच ना.." असे म्हणणारा एकही नसता >> चष्मा बदला, गेट वेल सून.
असे कुठले उत्तेजक आहे जे
असे कुठले उत्तेजक आहे जे घेतल्याने केवळ घाम येत नाही. मुंबईमध्ये तुफान खपेल.
>>>आपण पामर काय हनन करणार,
>>>आपण पामर काय हनन करणार, कित्येक छोटेमोठे तसेच नामवंत खेळाडू मॅचप्फिक्सिंग अन स्पॉटफिक्सिंगमध्ये सापडलेत, कित्येकांना शिक्षा झालीय, कारकिर्दीवर बंदी घालण्यात आलीय, कोचचे संशयास्पद मृत्यु झालेत, <<<
ऋन्मेष + ११११
>>>मुळात क्रिकेट हा स्टॅमिनापेक्षाही स्किलचा जास्त खेळ आहे. <<<
असंय होय? इतर कोणकोणत्या खेळांत हे नसते? फूटबॉल, टेनिस, हॉकी, बास्केटबॉल ह्यात फक्त स्टॅमिनाच असतो का?
>>>मॅच फिक्सिंग, ड्र्ग्ज ह्या गोष्टी आपण एवढ्या सहजतेने बोलून जातो की अनावधानाने ह्या खेळाचे केवढे मोठे चारित्र्य हनन आपण करतो आहोत हे आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही.<<<
प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर हा खेळ खेळून त्याचे चारित्र्यहनन करणारे आठवतात का? इथे आंतरजालावरच्या कमेंट्स कोणी वाचतही नाही आणि तिथे खिशात रुमाल ठेवून अख्खी ओव्हर फिक्स करणारे असतात.
>>>चष्मा बदला, गेट वेल सून नाही तर सोडून द्या की मग क्रिकेट बघणे, बळजबरी केली आहे का कोणी 'हे सगळे फिक्स असू शकते आणि खेळाडू ड्रगिस्ट आहेत' हे माहित असतांना देखील बघायला.<<<
अरेच्च्या? आजवर क्रिकेटमध्ये काही खोटे झालेच नाही की काय? की तुम्हाला कंत्राट दिले आहे क्रिकेट हा खेळ नितांत प्रामाणिकपणेच खेळला जातो हे सिद्ध करण्याचे?
अॅडमीन महोदय,
वर आलेल्या प्रतिक्रियांवर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. आपल्या माहितीसाठी!
डोके शांत ठेवून प्रतिक्रिया
डोके शांत ठेवून प्रतिक्रिया का दिल्या जात नाहीत?
ह्या खालील प्रतिक्रिया इतक्या भडक का असाव्यात? हा सिंपल खेळाचा विषय आहे ना? प्रत्येकाला मते असणार ना? ती मांडायची नाहीत का? ऋन्मेष जे म्हणत आहेत ते त्यांनी म्हणूच नये ही जबरदस्ती कशासाठी? चर्चाच करायची तर शांतपणे मते खोडता येत नाहीत का?
>>>चष्मा बदला, गेट वेल सून नाही तर सोडून द्या की मग क्रिकेट बघणे, बळजबरी केली आहे का कोणी 'हे सगळे फिक्स असू शकते आणि खेळाडू ड्रगिस्ट आहेत' हे माहित असतांना देखील बघायला<<<
>>>असे कुठले उत्तेजक आहे जे घेतल्याने केवळ घाम येत नाही. मुंबईमध्ये तुफान खपेल. फिदीफिदी<<<
तर जवळजवळ ९३% जण ह्यात सामील
तर जवळजवळ ९३% जण ह्यात सामील नाहित.

>>>>>>>
जो पकडा गया वो चोर
आतापर्यंत जे पकडले गेले ते तितके पकडले गेले नसते किंवा चौकश्या होत त्यातील काही सुटले असते तर तुमचा ९३ चा आकडा ९८ असता, आणि लोक ऋन्मेषवर जास्त हसले असते की बघ ना ९८ टक्के लोक याला दिसत नाहीत
असो, जर असले प्रकार घडतात तर शंका घेतली जाणारच, याबाबत वाईट वाटून घेण्यात काही हशील नाही.
किंबहुना एकदा माती खाऊन या खेळाला बदनाम करणार्या खेळाडूंना यासाठी जबाबदार धरले पाहिजे.
...............
चष्मा बदला, गेट वेल सून नाही तर सोडून द्या की मग क्रिकेट बघणे, बळजबरी केली आहे का कोणी 'हे सगळे फिक्स असू शकते आणि खेळाडू ड्रगिस्ट आहेत' हे माहित असतांना देखील बघायला.
>>>>>
बळजबरी तर मला कोणी जगायलाही नाही केली, म्हणून मी आत्महत्या तर नाही ना करणार
सांगायचा मुद्दा असा की बळजबरी तर नाही ना केली म्हणने म्हणजे प्रश्नाला टाळणे झाले उत्तर वा शंकासमाधान नाही.
.............
माहित आहेत ना घेतात म्हणून चाचण्या मग का बुवा संशय येतो तुम्हाला चांगल्या पर्फॉर्मरचा .
>>>>>
हा मुद्दा वेगळा होता. उत्तेजक द्रव्य घेतले तरी त्याने क्रिकेटचा खेळ सुधारत नाही असा जो मुद्दा वर उपस्थित केला होता यासाठी ते विचारले होते.
.........................
जे क्रिकेटच्या ३५-४० वर्षांच्या ईतिहासात झाले नव्हते, वेलिंग्टन पेक्षा ग्ल्वालियरचे मोठे ग्राऊंड, अफ्रिकेचा सर्वोत्तम बॉलर्ससह तिखट बॉलिंग अॅटक, फेब्रुवारी हीट, घामाच्या धारा, छत्तीस वर्षांचे थकलेले शरीर २०० मारते तेव्हा नाही का तुम्हाला संशय आला डृग्जचा, भलतेच बुवा संधीसाधून तुम्ही.
>>>>>>>>>
समोर तसबीरीतून गणपतीबाप्पा बघतोय मला, खोटे नाही बोलणार.. शप्पथ घेऊन सांगतो की गुप्टीलशी माझे काहीही वैयक्तिक वाद नाहीत की आमची खानदानी दुश्मनी नाही!
>>>बळजबरी तर मला कोणी
>>>बळजबरी तर मला कोणी जगायलाही नाही केली, म्हणून मी आत्महत्या तर नाही ना करणार स्मित
सांगायचा मुद्दा असा की बळजबरी तर नाही ना केली म्हणने म्हणजे प्रश्नाला टाळणे झाले उत्तर वा शंकासमाधान नाही.<<<
बहोत अच्छे ऋन्मेष!
बर पण काही असो , ते थकलेले
बर पण काही असो , ते थकलेले शरीर बिरीर नका रे म्हणू !!!
मला लगान मधले ते धापा टाकत पळणारे ईसर काका डोळ्यापुढे येतायत!
हा अस्सा विषय बदलतात बरं
हा अस्सा विषय बदलतात बरं
जो पकडा गया वो चोर >> जे
जो पकडा गया वो चोर >> जे पकडले गेलेच नाही ते सगळे चोर हे अजब लॉजिक आहे, माझ्या समजाच्या पलीकडे. खरतर हायजेनबर्गने विचारलेला प्रश्न आत्ता मला पण पडलाय कि जर मेजॉरिटी खेळाडूंच्या दानतीबद्दल शंका आहे तर नक्की फॉलो का करतोस क्रिकेट ? ह्यावर वरचे जगण्याची बळजबरी, आत्महत्या वगैरे उत्तर असेल तर नाही दिले तरी चालेल.
धन्यवाद बेफिकीर, मी काही
धन्यवाद बेफिकीर,
मी काही ठरवून गुप्टीलवर आळ घ्यायला इथे आलो नव्हतो. एक पोस्ट अशी आली की गुप्टील थकला का नाही? तर त्यावर सहज उत्तेजक द्रव्य तर नाही ना अशी शंका आली ती तितक्याच सहजपणे बोलून दाखवली.
आता येऊन इथे पाहिले तर त्यावर चर्चा झडत होती.
बरे यातही मला गुप्टीलला टारगेट करायचेय किंवा तो दोषी निघाला तर माझा अंदाज खरे ठरल्याचा आनंद होईल असे नाहीये. किंबहुना दुखच होईल, नेहमीच असे एखादे प्रकरण उघडकीस येते तेव्हा होते...
सध्या मी इथे भाष्य करतोय ते अशी शंका घेण्यावर जे आक्षेप उचलले जात आहेत त्याविरुद्ध ..
वर नंदिनी यांनी म्हटले, >> असे कुठले उत्तेजक आहे जे घेतल्याने केवळ घाम येत नाही. मुंबईमध्ये तुफान खपेल. >>> तर नसेलही असे द्रव्य, शेवटी मला जी होती ती शंका होती आणि शंका अज्ञान किंवा अनभिज्ञतेतूनच येते.. अन्यथा दावाच केला असता.
जर मेजॉरिटी खेळाडूंच्या
जर मेजॉरिटी खेळाडूंच्या दानतीबद्दल शंका आहे तर नक्की फॉलो का करतोस क्रिकेट ?
>>>>>>>
मेजॉरटी या संज्ञेला इथे डिफाईन करावे लागेल.
मेजॉरटी म्हणजे ५०% + का?
तुम्हाला ७ टक्के फिक्सर चालू शकतात पण माझे मन कलुषित करायला ४ टक्के फिक्सर सापडणेही पुरेसे ठरावे.
पण याचा अर्थ त्यांच्यामुळे मी क्रिकेट बघणे सोडावे असेही होत नाही..
तसेच तरीही क्रिकेट बघतोयस तर तुला नावे ठेवण्याचाही हक्क नाही असेही होत नाही..
एक उदाहरण देतो,
तुम्हाला माबोवर काही धाग्यांवर जातपात, देवधर्म, राजकारण यावरून चार-पाच ड्यू आयडी गोंधळ घालत आहेत असे चित्र दिसले (जे दिसतेच) तर तुम्ही माबोवर येणे सोडाल का? किंवा तरीही माबोवर येत आहात तर ईथे येऊन गुणगाणच गायचे अशी सक्ती चालेल का?
>>क्रिकेट हा स्किल गेम आहे
>>क्रिकेट हा स्किल गेम आहे आणि उत्तेजक द्रव्य घेऊन स्किल सुधारत नाही हे कबूल..<<
चुक. परफाॅर्मंस एनहासिंग ड्रग्ज हेल्प इंप्रुव फोकस अँड ॲलर्टनेस, जे क्रिकेट खेळाडुंसाठी आवश्यक आहे. पिइडीमुळे बॅट्समनला कदाचित क्रिकेटचा बाॅल साॅकरबाॅल एव्हडा दिसत असेल...
राज, धन्यवाद या माहितीबद्दल
राज, धन्यवाद या माहितीबद्दल
४० चा अॅवरेज असणार्या
४० चा अॅवरेज असणार्या गप्टीलने आज मला ५० ओवर्स खेळून २५० बनवायचे म्हणजे बनवायचेच आहेत असे ठरवले आणि त्यासाठी मला ऊत्तेजक लागणार आहे तर ते मी घेतो असे ठरवले. बरं.
किंवा कदाचित ४ वर कॅच सोडल्यानंतर आपण जरा अजून ताकद लावून शॉट्स मारल्या पाहिजेत अशी जाणीव झाल्याने त्याने पटकन खिशातून काढून दोन गोळ्या तोंडात टाकल्या असतील. सचिन म्हणतो 'बुस्ट' ईज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी' तसा मला एकदम गप्टील ची अॅडच दिसली डोळ्यांसमोर ,'ड्रग्ज ईज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी'
लिहिणार नव्हतो पण ठीक आहे. पायांची तीन बोटे नसतांना, महत्त्वाच्या सामन्यात संघ अडचणीत आला असतांना एक माणूस द्विशतक मारून जातो, माझ्या लेखी तरी त्याला एक कडक सलाम ठोकण्याशिवाय दुसरी भावना नाही. तुमचे संशय तुम्हाला लखलाभ.
लिहिणार नव्हतो पण ठीक आहे.
लिहिणार नव्हतो पण ठीक आहे. पायांची तीन बोटे नसतांना, महत्त्वाच्या सामन्यात संघ अडचणीत आला असतांना एक माणूस द्विशतक मारून जातो, माझ्या लेखी तरी त्याला एक कडक सलाम ठोकण्याशिवाय दुसरी भावना नाही. तुमचे संशय तुम्हाला लखलाभ.
>>>>>>>>>>>>
खाली असे लिहिलेय की ती अफवा होती.
http://www.sportskeeda.com/cricket/martin-guptill-gestured-two-fingers-h...
There are a lot of rumours going around that Martin Guptill had gestured with two of his fingers during his innings today because he has only two toes on his left foot after being involved in a forklift accident during his younger days. But from what we gather, that piece of information is wrong.
The 28-year-old was actually gesturing to Craig McMillan, who is the current batting coach of the New Zealand cricket team.
He was pointing two fingers to McMillan because on the previous ball, he became only the second batsman to hit the top of the roof at the Westpac Stadium, Wellington. The only batsman to have done it before was McMillan.
देवा रे देवा, लवकर खेळ सुरु
देवा रे देवा, लवकर खेळ सुरु होऊ दे. तुफान गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सुरु होऊ दे. म्हणजे इथले लोक खेळाबद्दल बोलतील. एकमेकांबद्दल नाही.
ऋन्मेश तुमच्या एकंदर क्रिकेट
ऋन्मेश तुमच्या एकंदर क्रिकेट ज्ञानाबद्दल माझ्या मनात खूप शंका आहेतच पण त्याबद्दल मला काहीही देणे घेणे असण्याची गरज नाही. पण तुम्ही जे अफवा पसरविणे आणि घातक संशय निर्माण करण्याचे काम करत आहात ते तात्काळ थांबवा अशी मी तुम्हाला विनंती करेन. बाकी तुमची मर्जी
At the age 13, Guptill was involved in a forklift accident and lost three toes.[4] (This fact was revealed to the world by provincial teammate Scott Styris whilst Styris was commentating on Guptill's ODI debut. This has since earned Guptill the nickname "Two Toes" within the Black Caps team).[5] When Guptill was in the hospital, his father asked Jeff Crowe if a New Zealand player could visit him. Stephen Fleming, the then New Zealand captain, visited him at the hospital the next day.
मी कुठेही गप्टिल ने द्विशतक झळकावल्यानंतर काय केले त्याबद्दल लिहिलेले नाही.त्यामुळे माझ्या वाक्याच्या संदर्भाने तुम्ही कुठल्या तरी साईटवरचा मजकूराचा दिलेल्या दाखल्याचे प्रयोजन कळाले नाही.
मी दिलेली माहिती विकीवर ऊपलब्ध आहे.
हायझेनबर्ग, तुम्ही एक बातमी
हायझेनबर्ग,
तुम्ही एक बातमी आणली आहे, आणि ती बातमी अफवा असल्याची बातमी मी आणली आहे.
मी बातमी काही घरी बनवली नसून तिची लिंक दिली आहे. आपणही द्यावी.
आपण दोघे मिळून कोणती बातमी (कोणाची बातमी नव्हे) खरी आणि कोणती खोटी हे शोधूया. यात काही हारजीत नाही, सत्य काय ते समोर येईल
हायझेनबर्ग आपली बातमी खरी
हायझेनबर्ग आपली बातमी खरी आहे, टू टोज..
या शोधाशोधीत एक चांगली लिंक हाताला लागली.
इथे असे दहा खेळाडू आहेत, आणि दहाही एकसो एक खेळाडू आहेत.
http://www.sportskeeda.com/slideshow/10-international-cricketers-battled...
मेजॉरटी या संज्ञेला इथे
मेजॉरटी या संज्ञेला इथे डिफाईन करावे लागेल. >> नाहि रे, खरच नको. दिडशे वर्षे हे जग मेजॉरटीचा जो अर्थ लावून काम चालवते आहे त्यात माझे ज्ञान अॅड करायची माझी इच्छा नाही. कॉमन अर्थ माझ्यासाठी पुरेसा आहे.
तुम्हाला ७ टक्के फिक्सर चालू शकतात पण माझे मन कलुषित करायला ४ टक्के फिक्सर सापडणेही पुरेसे ठरावे.
पण याचा अर्थ त्यांच्यामुळे मी क्रिकेट बघणे सोडावे असेही होत नाही..
तसेच तरीही क्रिकेट बघतोयस तर तुला नावे ठेवण्याचाही हक्क नाही असेही होत नाही..
>> फक्त ०.१% चालत असेल तरीहि माझे म्हणणे नाही. प्रश्न एव्हढाच पडतो कि मग असा खेळ फॉलो करण्यात वेळ का वाया घालवतोस ? बघणे सोड असे तुला सुचवत नाहीये तर 'तरीही का बघतोस ?' असे विचारतोय. ह्यामधला फरक कळला असेल अशी आशा.
"तसेच तरीही क्रिकेट बघतोयस तर तुला नावे ठेवण्याचाही हक्क नाही असेही होत नाही.." हे वाक्य मी लिहिलेले नसल्यामूळे किंवा मी तसे सुचवलेले नसल्यामूळे माझ्यातर्फे ते सोडून देतोय.
कृपया त्या गुप्टीलचं झाड सोडा
कृपया त्या गुप्टीलचं झाड सोडा आता आणि पहिल्या उपांत्य सामन्याबद्दल बोला
२ तासात होईलच सुरु दंगा! आय
२ तासात होईलच सुरु दंगा! आय रियली होप पुचाट मॅच होऊ नये! नेलबाईटर होऊन जाऊ द्या!
आपली नेलबाईटर नाही झाली तरी चालेल.
गुप्तील पुराण सोडा. आजच्या
गुप्तील पुराण सोडा. आजच्या मॅच चा आनंद घ्या.
अबाबाबाबा कसला वळतोय टप्पा
अबाबाबाबा कसला वळतोय टप्पा पडल्यावर बॉल बोल्टचा! डेंजर!
बॅट लागली तर कॅच उडणार असं वाटतं. एकदम सुपरफास्ट ट्रेन सारखा येतो बोल्ट. सॉलिड बॉलिंग आहे!
न्यूझीलंडचा यूनिफॉर्म
न्यूझीलंडचा यूनिफॉर्म सगळ्यात चांगला आहे.
ओवरपिच दिले तर पबलिक हाणणार!
ओवरपिच दिले तर पबलिक हाणणार! गूडलेंतचे बॉल खेळणं निव्वळ अशक्य वाटतय. एकही गूडलेंत वाला बॉल नीट खेळता आलेला नाही आमला किंवा डि कॉक ला.
खतर्नाक ! अमला आउट! अफ्रिका
खतर्नाक ! अमला आउट! अफ्रिका चोकिंग मोड मधे नका जाऊ म्हणावं इतक्यात
गेला! मारुन घेतला की स्ट्रेट
गेला! मारुन घेतला की स्ट्रेट बोल्ड झाला? कॉमेडी आहे आमला. विड्थ वगैरे घ्यायला काय बघत होता बोल्ट च्या बॉलिंगवर, ते ही सेट झालेलं नसताना? बोल्ड मुव! गॉट हिम इन ट्रबल!
बोल्ट - द मॅन ऑन मिशन. द मॅन
बोल्ट - द मॅन ऑन मिशन. द मॅन ऑन फाय्र्र...द मॅन टू बी मोस्ट स्केअर्ड ऑफ
Pages