विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
अधल्यामधल्या ब्रेक्समध्ये
अधल्यामधल्या ब्रेक्समध्ये भरपूर एनर्जी ड्रिंक्स, पाणी वगैरे देऊन डिहायड्रेशन टाळले जाते अशी चर्चा झाली >>>
बरोबर बेफी. पण डिहायड्रेशन टाळले तरी दम हा लागतोच. कितीही एनर्जी ड्रिंक्स घेतले तरी. ते शरीरात संपत असताना आपण दमतो. परत घेतो याकाळात तरी थकवा दिसायला हवा ना? तोच दिसला नाही. कुठे ही.
२०११ची मॅच मधे धोनी फारच लवकर आलेला तो जसा सुरुवातीला पळत होता तसाच शेवट्च्या ओव्हर मधे देखील पळत होता. पण त्याला धाप लागत होता. हे आपण बघितले आहे. स्ट्राईक वर आल्यावर तो थांबायचा. ग्लोज काढायचा पट्ट्या टाईट करायचा. दोन्ही बाजुला बघायचा हेल्मेटमधुन डोळ्याला अंगठा लावुन मग तो स्ट्राईकवर उभा राहायचा. इतका वेळ त्याला स्वतःला कंट्रोल करण्यात लागत होता.
हा पॉईंट गुप्तिल मधे दिसला नाही.
कबीर, तुमचे म्हणणे मला तरी
कबीर,
तुमचे म्हणणे मला तरी पूर्ण मान्य आहेच.
पराग,
मीही तुम्हाला उद्देशून असे नाही हो म्हणालो, मी फक्त एवढेच म्हणायचा प्रयत्न करत आहे की कबीरांनी दर्शवलेला मुद्दा अल्टिमेटली तिथेच पोचणार ना?
हा थकलाच नाही काय फिटनेस आहे
हा थकलाच नाही काय फिटनेस आहे व्वा. असे विचार सुरुवातीला आलेच होते. अजुन ही आहेतच.>>> पण ही बाब 'खटकली' असं म्हणताय ना?
असो!
याबद्दल इथे चर्चा करून काहीच उपयोग नाहीये. त्याची इनिंग आयसीसीला संशयास्पद वाटली तर ते योग्य ती कार्यवाही करतील. तूर्तास तरी त्याच्या सुंदर इनिंगबद्दल आपण टाळ्या वाजवणेच योग्य आहे.
उपयोग अनेक चर्चांचा नसतोच हा
उपयोग अनेक चर्चांचा नसतोच
हा मुद्दा मला तरी भरपूर चर्चा करण्यासारखा वाटतो. मनात किल्मिष ठेवून वगैरे नव्हे, पण सगळ्यांना काय वाटते ते वाचायला मिळावे ह्या उद्देशातून!
एकदम उत्तेजन द्रव्य निष्कर्षा
एकदम उत्तेजन द्रव्य निष्कर्षा पर्यंत पोहचण्या आधी अजुन काही कारणे असु शकतात का? हे विचारत होतो.
जसे चिमण यांनी सांगितले हशिम आमला ला देखील घाम येत नाही. असे काहीतरी. आता आठवायला गेलो तर आठवणार नाहीच या बाबत.
राहिले ज्यांना यावर चर्चा करायची आहे त्यांनी नक्कीच करावी बाकीच्यांनी पटत नसेल तर सुंदर इनिंगवर टाळ्या वाजवत बसले तरी मला हरकत नाही.
रोहितच्या आउट वर नो बॉल दिला
रोहितच्या आउट वर नो बॉल दिला तसाच जर पाकिस्तान द आफ्रिकेच्या मॅच मधे त्यांच्या फलंदाजांना असा फायदा दिला असता तर त्यावर चर्चा झाली नसती का ? की इथे बोलुन उपयोग नाही म्हणुन कोणी बोलणारच नव्हते ?
कैच्याकै युक्तिवाद करतात लोक
मला वाटतं खूप घाम येणं, न
मला वाटतं खूप घाम येणं, न येणं हें व्यक्तीनिष्ठही असावं. मीं अनेक बॅडमिंटन खेळाडू पाहिले आहेत ज्याना तीन गेम्स खेळूनही विशेष घाम येत नसे तर कांहीं खेळाडु घामाने निथळून निघत व कोर्ट पुसण्यासाठी टॉवेल घेवून एकाला सततची ड्यूटी असे [उदा. सुरेश गोयल]!
उद्याच्या सामन्यात दोन्ही संघांची फलंदाजी चांगली आहे, फलंदाज फॉर्मात आहेत, फास्ट विकेटसवर फास्ट गोलंदाजी खेळण्यात माहीर आहेत व सीमारेषा जवळ आहेत; त्यामुळे, सामना ३००+ धांवांचा होण्याची दाट शक्यता. न्यूझीलंडला पाठीराख्यांचा घरच्या मैदानावर जिंकण्यासाठीचा पाठींबा असेल पण त्याचं दडपणही असेलच. द. आफ्रिका ह्या विश्वचषकात सर्वस्व पणाला लावून खेळेल हेंही आलंच . सामना अटीतटीचाच होणार पण किंचित द. आफ्रिकेकडे झुकलेला असं मला वाटतं.
मलाही सारखं वाटतं की अफ्रिका
मलाही सारखं वाटतं की अफ्रिका जिंकेल बहुतेक आणि आपली आणि अफ्रिकेची फायनल होईल.
ही मॅच वेलिंग्टन मधे आहे इथे
ही मॅच वेलिंग्टन मधे आहे इथे आधी खेळलेल्या मॅचेस खालील प्रमाणे
न्युझीलंड विरुध्द इंग्लंड १२३ वर इंग्लंड ऑल आउट पहिली बॅटींग करुन
इंग्लंड विरुध्द श्रीलंका ३०९ इंग्लंडने केलेले होते आणि श्रीलंकेने दुसरी बॅटींग करुन ३१२ केले
द आफ्रीका विरुध्द युएई द आफ्रिकेने ३४१ केले होते
न्युझीलंड विरुध्द वेस्ट इंडीज न्युझीलंड ने पहिली बॅटींग करुन ३९३ केले
म्हणजे आधी धोकादायक असणारी खेळपट्टी नंतर फलंदाजीला पोषक बनली.
अहो पहिली बॅटिंग असताना पण
अहो पहिली बॅटिंग असताना पण ३००+ स्कोअर झालाय की?
आणि उद्याची इडन पार्क , ऑकलंड ला आहे ना?
आपली गुरवारची एस सी जी.
फायनल एम सी जी.
आपण सेमि फायनलीत
आपण सेमि फायनलीत ऑस्ट्रेलियाला मारणार हे विशफुल थिंकिन्ग आहे असे मला वाटते . मला तसे वाटत नाही.
सिडनीत टर्न होउ लागला तर
सिडनीत टर्न होउ लागला तर दुसरी इनिंग ऑस्ट्रेलियाला खेळायला जड जाणार हे नक्की
हूड - यंदा ऑसीज जरा कमकुवत
हूड - यंदा ऑसीज जरा कमकुवत वाटत आहेत.
खरे तर चिंता करण्याजोगा एक विषय वाटत आहे पण येथे त्यावर चर्चा झालेली दिसली नाही.
चारही उपउपांत्य फेर्यांमध्ये आपण सोडून इतर तीनही विजेते 'सहजपणे' जिंकले, आपण 'फार सहज' जिंकलो नाहीत असे वाटत आहे.
वास्तविक आपले प्रतिस्पर्धी
वास्तविक आपले प्रतिस्पर्धी सर्व पराजितांच्या तुलनेत सर्वाधिक कमकुवत समजले जातात.
१००+ रन्स च्या फरकाने जिंकलो
१००+ रन्स च्या फरकाने जिंकलो की. अजून किती सहज हवंय!

काय होतं , की मॅच बघताना आपल्या ओवर अॅन्क्शस स्थितीमुळे आपल्या २-३ विकेट पडल्या किंवा प्रतिस्पर्ध्याची एखादी ओव्हर धुवाधार बॅटिंग झाली तरी आपल्याला टेन्शन येते. त्यामुळे उगीचच मॅच अटीतटीची झाली असे वाटते.
परवा बांगलादेश ला काही चान्स नव्हता. पिरियड !
सेमी ची भिती वाटतेच आहे पण ऑस्ट्रेलियाची पाक बॉलिंग वर थोडी का होईना हालत खराब झालेली बघून मला अजून जरा होप्स निर्माण झाल्यात !!
उद्या ६५% पावसाचे चांसेस
उद्या ६५% पावसाचे चांसेस आहेत. द आफ्रिकेने लिंबुभाउकडुन एकदा पत्रिका तपासुन घ्यावी. आणि काय तो यज्ञ वगैरे उरकुन घ्यावा . कोणत्या राशिला क्रिकेट टीम जन्मली देवास ठाउक
पाउस काय पाठ सोडत नाही.
ऊत्तेजक द्रव्य काय, चाचणी काय
ऊत्तेजक द्रव्य काय, चाचणी काय अरे बापरे सुतावरून स्वर्ग गाठण्यात माबो जनता १ नं.
मी पूर्ण मॅच बघितली. बहूतेक दोन वेळा (एका ड्रिंक्स च्या वेळी तर नक्कीच) गप्टील आत गेला होता. आता ह्याचा अर्थ ऊत्सर्जनासाठी की ऊत्तेजना साठी तो ज्याने त्याने आपापल्या मेंदुच्या कुवतीप्रमाणे लावावा.
ऊत्तेजक द्र्व्य घेऊन चांगले क्रिकेट खेळता येते
तर गावस्कर अमरनाथ ने विंडिज च्या बरगडीतोड तोफखान्याला सामोरे जातांना घेतले असते, त्यावेळी तर चाचण्याही नव्हत्या. जडेजाचा बॉलही मग १०० मैलाचे रेकॉर्ड तोडू शकेल तो सुदिन आता दूर नाही.
मै +१. एकदम मनातलं लिहिलस.
मै +१. एकदम मनातलं लिहिलस. आपण नक्की ऑस्ट्रेलियाच्या पुंग्या टाईट करु शकतो.
ऐसा दिया तडी टोचनवा!
भर गये पानी से फ्यानो के लोचनवा!
जय धोनी! नै मांगेगे कांगरु पानी!
मैदेवी आणि
मैदेवी आणि बुवा,
ऑस्ट्रेलियाला आपण हरवू असे वाटत आहेच.
तौलनिकदृष्ट्या कमकुवत संघाला आपण क्वॉफामध्ये जरा जास्तच खपवून घेतले इतकेच म्हणायचे होते.
श्रीलंकेला द. आफ्रिकेने, वेस्ट इंडिजला एन झेड ने फार सहज हरवले असे म्हणायचे आहे.
प्लिज साउथ अफ्रिकेसारखी टिम
प्लिज साउथ अफ्रिकेसारखी टिम फायनल ला ही कल्पनाच सहनच होत नाहीये मला :(, असतील मोठी स्टार प्लेयर्सची नावं पण जसे इंडीया आणि पाक विरुद्ध जसे खेळले त्यावरून मला पर्सनली अशी टिम फायनल ला आलेली पहायला अजिबात नाही आवडणार :(.
तिकडची अनबिटेबल न्युझिलंड वि अनबिटेबल इंडीया टिम हेच डिझर्विंग काँबो वाटतं !
असो, यु नेव्हर नो..बघुया काय होतय , होप आज न्युझिलंड उत्तम खेळ करून जिंकतील .
आजची मॅच रात्री ९ EST ला आहे.
आजची मॅच रात्री ९ EST ला आहे. त्यामुळे थोडा वेळ रात्री बघून पुन्हा पहाटे उठून बघणार. आपली पण मॅच अशी लवकर सुरु व्हायला हवी होती राव
ऊत्सर्जक द्र्व्य घेऊन चांगले
ऊत्सर्जक द्र्व्य घेऊन चांगले क्रिकेट खेळता येते>>
ऊत्सर्जक नाही हो उत्तेजक.
उत्तेजक द्रव्य घेऊन चांगले क्रिकेट खेळता येते का हा प्रश्नच नाहीये. प्रश्न त्याच्या स्टॅमिनाचा आहे आणि तो उत्तेजक द्रव्य घेऊन टिकवता/वाढवता येऊ शकतो.(गुप्तिलने उत्तेजक द्रव्य घेतलं असं मला म्हणायच नाही.)
म्हणून काही उत्तेजक द्रव्यांवर ऑलिंपिक संघटनेने बंदी घातली आहे ना. तिथे तर सामन्याच्या आधी आणि नंतरही टेस्ट होतात. तरीही काहीजण ते घेतातच.
क्रिकेटमधे अशा टेस्ट होत नाहीत का? एवढंच विचारायच होत मला.
मै +१. एकदम मनातलं लिहिलस. >>
मै +१. एकदम मनातलं लिहिलस. >> +१.
ऊत्सर्जक नाही हो उत्तेजक. > >त्यांचे वाक्य बघा. ते म्हणताहेत कि "उत्सर्जनासाठी गेला कि उत्तेजक पेय घेण्यासाठी" हे तुम्हीच ठरवा. ह्यातला पहिला भाग म्हणजे bio break असे ते सुचवत आहेत. ICC test नक्कीच घेते. इथे घेतली कि नाही ते माहित नाही. प्रश्न हा आहे कि घेतली असेल नि काही नसेल सापडले तरी किती जण विश्वास ठेवतील.
उद्या ६५% पावसाचे चांसेस
उद्या ६५% पावसाचे चांसेस आहेत. द आफ्रिकेने
लिंबुभाउकडुन एकदा पत्रिका तपासुन घ्यावी.
आणि काय तो यज्ञ वगैरे उरकुन घ्यावा .
कोणत्या राशिला क्रिकेट टीम जन्मली देवास
ठाउक
पाउस काय पाठ सोडत नाही. :-D;-);-);-);-)
असामी, त्यांचा तिसरा पॅरा
असामी, त्यांचा तिसरा पॅरा पहिले वाक्य वाचा. मी तिथे दुरुस्ती सुचवली आहे.
टेस्ट निगेटिव्ह असेल तर गुप्तिलवर विश्वास ठेवलाच पाहिजे अस माझं तरी मत आहे.
ओह ओ़के निधी.
ओह ओ़के निधी.
दुरूस्ती सुचवण्यासाठी धन्यवाद
दुरूस्ती सुचवण्यासाठी धन्यवाद निधी, बदल केला आहे. फोनवरुन टाईपतांना जरा घोटाळा झाला.
मतितार्थ मात्र असामी म्हणतात तोच आहे,
यू आर मिसिंग द पॉईंट!
ऊत्तेजक द्रव्य घेऊन स्टॅमिना वाढला तर ऑलिंपिक मध्ये तुम्ही अव्वल पर्फॉमन्स देऊ शकाल कारण ऑलिंपिक मधल्या जवळ जवळ सगळ्याच खेळांमध्ये स्कील पेक्षाही दमसास आणि ताकद ह्यांचीच परिक्षा असते.
पण क्रिकेट मध्ये स्टेरॉईड्स घेऊन स्टॅमिना वाढवून मी वकार चे टो क्रशिंग यॉर्कर्स , अक्रमचे अफलातून रिवर्स स्विंग्स, वॉर्नचे गुगली आणि फ्लिपर्स, मॅकग्राची अनप्लेएबल लाईन अँड लेंग्थ, ब्रेट ली/अख्तर चा १०० मैलांनी सांय सांय करत जाणारा ईनस्विंगर कसे खेळणार हे माझ्या समजण्यापलिकडे आहे.
त्यासाठी क्रिकेटिंग आय क्यू , प्रचंड प्रॅक्टिसने कमावलेले टायमिंग आणि हँड-आय-फीट को-ऑर्डिनेशनच कामाला येणार ना? गप्टीलवरच्या स्कीलवरचा अविश्वास तुम्हाला त्याच्याबद्दलच्या बर्याच महत्त्वाच्या गोष्टी माहित नाहीत हेच सांगतो.
त्याचा क्रिकइन्फो वरचा बायो डेटा आणि विकीवरची माहिती जरूर वाचा. नशीब जॉन्टी र्होड्स वर कोणी असे आरोप केले नाहीत. रियाझ वहाब चा स्पीड काही काळात ११० वरून १४०+ आला आहे, नव्हे त्याने तो कमावला आहे. मग त्याच्यावरही संशय घ्यायचा का?
मॅच फिक्सिंग, ड्र्ग्ज ह्या गोष्टी आपण एवढ्या सहजतेने बोलून जातो की अनावधानाने ह्या खेळाचे केवढे मोठे चारित्र्य हनन आपण करतो आहोत हे आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही. मान्य आहेत काही घटना घडल्या आहेत पण प्रत्येक गोष्टं त्याच चस्म्यातून बघायची असल्यास आपण क्रिकेट तरी का बघतोय हा प्रश्न मला तरी पडेल.
क्रिकेटमधे अशा टेस्ट होत
क्रिकेटमधे अशा टेस्ट होत नाहीत का? एवढंच विचारायच होत मला<<< एका मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जेव्हा भरवली जात असेल तेव्हा अशा टेस्ट्स् होणार नाहीत का?
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या स्पर्धांमध्ये ड्रग्ज टेस्ट होते मग वर्ल्ड कपमधे होणार नाही का?
मुळात क्रिकेट हा स्टॅमिनापेक्षाही स्किलचा जास्त खेळ आहे. स्टेरॉईड्स घेऊन क्रीझवर चार तास रनिंग बीटवीन द विकेट्स धावणे इतकाच खेळ नसतो ना? प्रत्येक बॉलला कसा शॉट मारायचा, फिल्डर प्लेसमेंट लक्षात घेऊन, विकेट वाचवायची, हे सर्व करायला स्टेरॉइड्स कामी येत नाहीत. अफलातून तीक्ष्णता, भेदकता, निणयक्षमता, सतत खेळून खेळून बनवलेली मसल मेमरी वगैरे बर्याच गोष्टी याव्या लागतात. बहुतेकजण "उत्तम खेळाडू" बनल्यावर मग आपण त्यांना फायनल ११ मध्ये बघतो त्याआधी त्यांनी किती काय सराव केला असेल याची माहिती तरी असते का?
मॅच फिक्सिंग, ड्र्ग्ज ह्या
मॅच फिक्सिंग, ड्र्ग्ज ह्या गोष्टी आपण एवढ्या सहजतेने बोलून जातो की अनावधानाने ह्या खेळाचे केवढे मोठे चारित्र्य हनन आपण करतो आहोत हे आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही.
>>>>>>>>>>
आपण पामर काय हनन करणार, कित्येक छोटेमोठे तसेच नामवंत खेळाडू मॅचप्फिक्सिंग अन स्पॉटफिक्सिंगमध्ये सापडलेत, कित्येकांना शिक्षा झालीय, कारकिर्दीवर बंदी घालण्यात आलीय, कोचचे संशयास्पद मृत्यु झालेत, आयपीएलने तर पैश्याचा बाजारच मांडलाय... भले यात सारेच नसतील, पण जे चरीत्रवान खेळाडू म्हणून ओळखले जातात ते सुद्धा त्यांना माहीत असून अळीमिळी गुपचिळीच राहतात मग आपल्याला का बोलायची चोरी.. जेव्हा फिक्सिंग होते तेव्हा आपला विश्वासघात झाल्याचा राग नाही का येत.. मला तरी येतो.. यात सापडलेले एकूण एक खेळाडू माझ्या नजरेतून उतरलेत ते कायमचेच!
.........................
आता उत्तेजक द्रव्यांकडे वळूया,
क्रिकेट हा स्किल गेम आहे आणि उत्तेजक द्रव्य घेऊन स्किल सुधारत नाही हे कबूल..
पण प्रश्न इथेच सुटत असेल तर मला सांगा घेतातच कशाला मग उत्तेजक चाचण्या? पैश्याची उधळपट्टी करायला?
याचे उत्तर मला वरचा मुद्दा मांडणार्यांनी द्यावे.. मला त्यांच्या मुद्द्याला वेगळे उत्तर द्यावे लागणार नाही, त्यांना स्वतालाच उत्तर मिळेल
..................................
आता गुप्टीलकडे वळूया ,
गुप्टीलने उत्तेजक द्रव्य घेतले होते का? अशी खुली शंका घेतली तरी त्यात मला फारसे वावगे वाटत नाही.
हेच जर तो भारताविरुद्ध खेळला असता आणि अशी शंका उठली असती तर कदाचित काही जण गुप्टीलची पार्टी सोडून शंका घेणार्यांच्या पार्टीत सामील झाले असते. आणि ते सिद्ध झाल्यावर "काही हरकत नाही उत्तेजक द्रव्य घेतले तर, शेवटी खेळला तर त्याच्या स्किलवरच ना.." असे म्हणणारा एकही नसता
हायझेनबर्ग आणि नंदिनी तुमचे
हायझेनबर्ग आणि नंदिनी तुमचे म्हणणे मला मान्य आहेच. या सर्व बाबी मला ही माहीत आहेतच.
मी सर्वात पहिली कबीर यांची पोस्ट वाचुन माझे बाल मनातील प्रश्न विचारले. माझा समज चुकीचा असु शकतो. साॅरी.
मी सुद्धा आवडीने क्रिकेट फाॅलो करायची पण अझरूद्दीन काळात झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणाने इंटरेस्ट खुप कमी झाला. त्यामुळे या टेस्ट बद्दल माहित नव्हते. आता आवडतेय पुन्हा क्रिकेट.
Pages