Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनि, पार्टली अॅग्री.
धनि, पार्टली अॅग्री.
भाजपाचे काही मूर्ख लोकं इतर ८० टक्के चांगल्या भाजपा लोकांना तोंडघशी पाडतात. त्याची शिक्षा मिळालीच.
पण अजून चार वर्ष केंद्रात भाजपाच आहे. चार वर्ष खूप वेळ आहे काम करून दाखवायला. आणि मी मागे लिहिल्याप्रमाणे पहिले दोन वर्ष तसेही खूप काम झालेले दिसणार नाही त्यामुळे मी तरी मोदींबाबत पॉझिटिव्ह आहे.
१६ मे ला काय झाले होते तसेच १० फेबला होते आहे. लोकं २८० पण मिळणार नाहीत असे म्हणत होते आणि पहिल्या अर्ध्या तासात भाजपा २७० पार करून केली होती. तसेच अगदी आज होते आहे.
चांगली गोष्ट म्हणजे, जनताच जागृत झाली आहे आणि तिला रिझल्ट हवे आहेत. लवकर. म्हणूनच आता काँग्रेस कुठेही दिसत नाही. जनता चान्स द्यायला मागे पुढे पाहत नाही हे लोकशाहीसाठी चांगले आहे.
जनताच जागृत झाली आहे आणि तिला
जनताच जागृत झाली आहे आणि तिला रिझल्ट हवे आहेत >> +१ हे अगदी पटले!
केदार, कर्नाटकात किंवा
केदार,
कर्नाटकात किंवा केंद्रात आप आलं तर मी नक्की आपवर 'जागता पहारा' धागा काढेन.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत मला नुसताच इंटरेस्ट आहे. पर्सनल इंटरेस्ट नाही.
दिल्लीत रहाणार्या , मतदान केलेल्या कुणीतरी आपवर जागता पहारा काढायला हवा.
कारण कुणीही सत्तेत आलं तरी सतर्कपणे ते काम काय करतात हे ही पहाणे, त्यांच्या परफॉर्मन्सचा आढावा घेऊन पुढिल निवडणुकीत त्याप्रमाणे त्याचा फीडबॅक देणे हे सुजाण मतदाराचे कर्तव्य आहे.
आप आणि मिर्चीताई यांना
आप आणि मिर्चीताई यांना अभिनंदन, शुभेच्छा !
अरविंद केजरीवाल आणि आपच
अरविंद केजरीवाल आणि आपच अभिनंदन ! दिल्लीचा विकास होवो , देशाची राजधानी सुरक्षित समृद्ध होवो .
बीजेपीवाल्यांनी यातून धड़ा घ्यावा . पाच वर्षाचा जनादेश फक्त वाचाळ भाषण करण्यासाठी मिळालेला नसून काम करून दाखवण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे..
जनता जागृत झालेली आहे , तिला रिजल्ट्स हवे आहेत हे लोकशाहीसाठी उत्तम आहे . कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारीचे दिवस आता संपलेत . दिल्लीकरांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !
मिर्चीताईचदेखील अभिनंदन ! एकहाति किल्ला लढवलात .
चांगली गोष्ट म्हणजे, जनताच
चांगली गोष्ट म्हणजे, जनताच जागृत झाली आहे आणि तिला रिझल्ट हवे आहेत. लवकर. म्हणूनच आता काँग्रेस कुठेही दिसत नाही. जनता चान्स द्यायला मागे पुढे पाहत नाही हे लोकशाहीसाठी चांगले आहे.>>> +१/
आपचे अभिनंदन. यावेळी स्पष्ट बहुमत मिळत असल्यानं आपकडून "समजूतदार आणि जबाबदार" प्रशासनाची अपेक्षा करण्यात काही चुकीचे नाही. मागच्यावेळेसारखे पी आर स्टंट वारंवार होत राहीले तर मात्र कठीण आहे.
आपले दिल्ली वार्ताहर अल्पना, मंदार यांच्याकडून काही बातमी आलीये का?
आआप, केजरीवाल, आणि लाखो आआप
आआप, केजरीवाल, आणि लाखो आआप कार्यकर्त्यान्चे दिल्ली विधानसभा निवड्णुकात मिळवलेल्या अभुतपुर्व यशाबद्दल
अभिनन्दन. स्वच्छ, कार्यक्षम प्रशासनासाठी नव्या सरकारला शुभेच्छा. मायबोलीवर चिवटपणे किल्ला लढवल्याबद्दल मिर्ची यान्चे खास अभिनन्दन.
'आप'चं अभिनंदन आणि पुढील
'आप'चं अभिनंदन आणि पुढील उत्तम कामासाठी ऑल द बेस्ट!
यावेळी स्पष्ट बहुमत मिळत असल्यानं आपकडून "समजूतदार आणि जबाबदार" प्रशासनाची अपेक्षा करण्यात काही चुकीचे नाही.>> +१ आणि वचन दिल्याप्रमाणे कुठलं एखादं काम करता आलं नाही तरी हरकत नाही कारण थियरी आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक असू शकतो. पण, ते काम करता आलं नाही तर ब्लेम गेम खेळू नये. वाटल्यास कामाची दिशा बदलावी जरुरीप्रमाणे.
अभिनंदन, आम आदमी पार्टी.
अभिनंदन, आम आदमी पार्टी.
शेअर मार्केट २०० अंकांनी
शेअर मार्केट २०० अंकांनी वर!
लोकसभेत भाजप जिंकली तेंव्हा ते अँटी-एस्टाब्लिशमेंट होते जे लोकांना आश्वासक वाटले आणि त्यामुळे याच दिल्लीत सगळ्या जागा त्यांना मिळाल्या. आता त्याच जागी लोक त्यांना 'सत्ताधारी' या नजरेने पाहू लागलेले दिसतात. आणि हाच त्यांना सर्वात मोठा धोका आहे.
केजरीवाल आणि आप ह्यांचे
केजरीवाल आणि आप ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता स्पष्ट बहुमताच्या सामर्थ्याने ५ वर्षे चांगला कारभार करण्यासाठी शुभेच्छा!
ग्रेट ग्रेट ग्रेट..
ग्रेट ग्रेट ग्रेट..
Contrats AAP & AK. Now in
Contrats AAP & AK. Now in Delhi Vidhansabha there is no opposition. Hope they will work to make Delhi better and safe place.
Now AAP's next target is should be Punjab assembly.
Now BJP & Akali Dal needs to concentrate on Punjab as people there are very unhappy with current govt the AAP is very popular in Punjab.
मिर्ची आपले हार्दिक अभिनंदन!
मिर्ची
आपले हार्दिक अभिनंदन! अगदी मनापासून!
आपण या धाग्यावर ज्या संयतपणे मुद्देसूद 'प्रचार' अर्थात आपल्या आवडत्या पक्षाचे मत मांडले त्यावर तर आपण एकदम फिदा आहोत. प्रचारक असावा तर असा. कोणाचाही अपमान न करता आपली योग्य ती पातळी राखून जे समर्थन केलेत त्याला तोड नाही.
काही वेळेस धाग्यावर उदयुक्त करण्याचा प्रयत्न झाला, पण आपण आपला संयम सोडला नाहीत, त्याचे बक्षीस म्हणून admin ने धागा वाहता न करता सुरूच ठेवला, त्याबद्दल admin चे आभार!
भाजप का हारल आणि आप का जिंकल
भाजप का हारल आणि आप का जिंकल -
१) दिल्ली च्या निवडणुकी मध्ये स्थानिक मुद्दे शिवाय राष्ट्रीय मुद्दे पण महत्वाचे होते . मोदी सरकारच्या हनिमून पिरीयड मध्ये भाजप ने महाराष्ट्र , हरियाना आणि इतर निवडणुका पण जिंकल्या . पण आता ९ महिन्यानंतर बरीच धूळ बसली आहे . मोदी सरकार अपेक्षे इतक काम करत नाहीये हि भावना आता हळूहळू देशभर मूळ धरू लागली आहे . त्यामुळे त्याचा फटका भाजप ला बसला .
२) साध्वी , स्वामी , योगी , घरवापसी , लव जिहाद , हा कोळसा जितका कमी भाजपवाले उगाळतील तितक बर . लोकसभे मध्ये विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मोदी यांना मत दिली होती . पण मोदी विजयाचा विहिप , बजरंग दल या लोकांनी आता आपल्याला रान मोकळ असा लावला त्यामुळे मध्यममार्गी जनमानस भाजप च्या विरुद्ध गेल .
३) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी भाजप ने काळा पैसा वापस आण्याच जे आश्वासन दिल तो एक प्रचारात वजन आणण्यासाठी वापरलेला एक निव्वळ 'जुमला ' होता अस विधान केल . ते भाजप ला जाम भोवल . सोशल मिडीयावर या विधानावरून अमित शाह आणि मोदी यांची जाम टर उडवण्यात आली . आप ने या मुद्द्याचा वापर कौशल्याने करून भाजप निवडणुकीतली आश्वासन पाळण्यात गंभीर नाही हे लोकांच्या मनावर ठसवल .
४) भारतीय लोकांना underdog च आकर्षण असत . आप ने कौशल्याने असे चित्र उभ केल की एकट्या मफलर मन विरुद्ध पंतप्रधान , अर्ध केंद्रीय मंत्रिमंडळ , ४ मुख्यमंत्री , १२० खासदार दिल्लीच्या गल्लीबोळात प्रचार करत आहेत . त्यामुळे एकहाती लढा देणाऱ्या केजरीवाल च्या बाजूने जनमत एकवटले .
५) सोशल मिडिया जिथे भाजप मजबूत होत तिथे पण आप ने बाजी मारली . पंतप्रधान यांनी घातलेला १० लाखाचा सुट वैगेरे मुद्द्यावरून त्यांनी भाजप हा श्रीमंत लोकांचा पक्ष आहे अशी इमेज व्यवस्थित उभी केली .
६) किरण बेदी यांच parachute नेतृत्व . या बाईनी भाजप च्या स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली नाही . नंतर नंतर तर त्यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत व्हयला लागली . आलिया भट ची आणि किरण बेदी ची तुलना करणाऱ्या क्लिपा मोबाइल वर फिरू लागल्या होत्या . या बाई विधानसभेला पडल्या तर ते त्यांच्यासाठीच बर राहील . कारण १० -१२ भाजप विधायकांसोबत त्या विधानसभेत काय करणार हाच प्रश्न आहे .
७) हा पराभव भाजप च 'स्तालीनग्राद ' ठरू नये . कारण मोदी आणि शाह जोडगोळी अजेय नाही हा संदेश लोकांमध्ये आणि विरोधकांमध्ये गेला आहे .
Aap main election office is
Aap main election office is just २ mins from my place. Huge crowd was present there in early morning ( at the time of my morning walk). I am at work. My husband has taken off and is at aap office.
बावरा मन, छान
बावरा मन, छान विवेचन.मुद्द्यांची क्रमवारी फक्तं वेगळी होईल.
आणि किरण बेदी सोडून दुसरं कुणी मूळ बीजेपीतलाच असतं तरी हाच निक्काल लागला असता ही खात्री आहे.
आआपचे हार्दिक अभिनंदन ! आता
आआपचे हार्दिक अभिनंदन ! आता खरी कसोटी !
औषधालाही विरोध नाही? ७० पैकी
औषधालाही विरोध नाही? ७० पैकी ६६ जागेवर आघाडी, भाजपा ३, कॉन्ग्रेस ०.
धीस इस ट्रूली एपिक
धीस इस ट्रूली एपिक विन!!!
हार्दिक अभिनंदन केजरीवाल.
आपला एकूण मतांच्या ५३% मते
आपला एकूण मतांच्या ५३% मते मिळाली आहेत, जस्ट अमेझिंग!
"Spoke to @ArvindKejriwal &
"Spoke to @ArvindKejriwal & congratulated him on the win. Assured him Centre's complete support in the development of Delhi," Modi said in a tweet.
मोदीकाकांच्या खिलाडुवृत्तीचेही स्वागत!
आता दोघांच्या सहयोगाने दिल्लीकरांना 'अच्छे दिन ' पहावयाला मिळोत!
किरण बेदी अडीच हजार मतांनी
किरण बेदी अडीच हजार मतांनी पुढे असं निवडणूक आयोगाचं संकेतस्थळ म्हणतंय. त्यांचे मोठीच पंचाईत होईल. निवडणुकांचं राजकारण सोडून जायची सोय राहणार नाही.
आता दोघांच्या सहयोगाने
आता दोघांच्या सहयोगाने दिल्लीकरांना 'अच्छे दिन ' पहावयाला मिळोत!>>>> ते गरजेचेच आहे कारण दिल्लीचा कितीतरी भाग केंद्राच्याच अखत्यारित आहे. तिथे केजरीवालांना सहकार्य केले नाही तर ते परत आपले 'धरणे' राजकारण सुरु करु शकतात आणि त्याचा भाजपलाच त्रास होईल.
पण आपले पंप्र दिर्घद्वेषी आहेत त्यामुळे भविष्यात हे सहकार्य मिळेलच याची शंका वाटते.
एक गोष्ट दुर्लक्षित करून
एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. भाजपाचा मत टक्का १% ने कमी झाला आहे फक्त. म्हणजे भाजपाचा कोअर बेस तसाच राहिला. कॉन्ग्रेसची सर्व एक गठठा मते आपला मिळाली. याचा अर्थ भाजपा आपला कोअर बेस वाढवू शकले नाहीत. पण तो त्यांच्या हातातून गेलादेखील नाही.
जर भाजपा कोअर बेसच्या बाहेर वाढू शकले नाहीत व जिथे जिथे कॉन्ग्रेसची मते उपलब्ध होतील तिथे तिथे भाजपाची हार होइल.
अमित शाहच्या कॉन्ग्रेसमुक्त भारताच्या उद्दिष्टात अजून एका राज्याची भर पडली!
त्या कोअर आईडीआलॉजी धरुन
त्या कोअर आईडीआलॉजी धरुन राहिले तर फक्त ही कोअर व्होट्सच मिळत राहणार आणि ती सोडून दिली तर आहे तेही राहणार नाहीत. मुळात काँग्रेसला पर्याय तर बनायचे पण तसे होताना त्याच्याप्रमाणे सर्वसमावेशक व्हायचे नाही किंवा होता येत नाही असा काहीतरी तिढा झाला आहे.
त्या कोअर आईडीआलॉजी धरुन
त्या कोअर आईडीआलॉजी धरुन राहिले तर फक्त ही कोअर व्होट्सच मिळत राहणार आणि ती सोडून दिली तर आहे तेही राहणार नाहीत.
>>>
आय बेग टू डिफर. बीजेपीचा मोठा कोअर बेस आर्थिक विचारसरणीवर आधारीत आहे, फक्त हिंदूत्वावर नाही. पुढल्या काही वर्षात ते अधिक स्पष्ट होइल. काँग्रेसची हालत अधिकाधिक खराब होत जाईल असे दिसते.
ऐतिहासिक !! अजून विश्वास बसत
ऐतिहासिक !! अजून विश्वास बसत नाहीये.
Kudos to AAP volunteers ! Hats off...
टण्या, +१
टण्या, +१
मी देखील 'केवळ'
मी देखील 'केवळ' हिंदूत्वाबद्दल बोलत नाहीए, पण तो सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे याबद्दल तरी दुमत नसावे. उरला प्रश्न आर्थिक धोरणाचा, युपिएला जो आर्थिक अजेंडा त्यांच्याच नतद्रष्ट राजकारणाने पुढे ढकलता आला नाही तोच आता भाजप पुढे नेत आहे आणि त्यात काही चूक नाही, ती अपरिहार्यता आहे. पण आर्थिक अजेंड्यावर मत देणारे कधीच तुमचे कोअर व्होटर्स नसतात ते फक्त त्यांचा स्वार्थ साधला जातो आहे ना ते पहातात. त्यामुळे उद्या जर भाजपचा कोअर 'सांस्कृतिक' अजेंडा या आर्थिक धोरणांच्या आड येऊ लागला तर मात्र हा संधिसाधू मतदार पाठ फिरवू शकतो.
Pages