अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20150208-WA0008.jpg

द पॉवर ऑफ `आम' मतदार ...
"एक्जिट पोलचा निकाल ‘आप’ला स्पष्ट बहुमत दाखवत आहे.
१० तारखेला थोड्याफार फरकाने हाच निकाल लागणे अपेक्षित आहे.
केंद्रात बीजेपीचे सरकार असूनही हे घडले हे विशेष. एकाअर्थी त्या सरकारलाही दिल्लीकरांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आणि त्याचबरोबर गेल्यावेळी जे घडले ते फ्लूकमध्ये घडले नसून ते आम्हीच घडवले हे देखील दाखवून दिले आहे. आणि त्याचमुळे मलाही आनंद गेल्यावेळपेक्षा जास्त झाला आहे.

"सत्तेत राहायचे असेल तर जनतेची कामे करा, ते बघूनच जनता ठरवणार तुम्हाला सत्तेत ठेवायचे की नाही" असा संदेश जो दिल्लीकरांनी या सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे त्याचे अनुकरण देशातील प्रत्येक मतदाराने केल्यास, देशात आणि देशातल्या प्रत्येक गावात "खर्‍याखुर्‍या आम आदमीची सत्ता" यायला वेळ लागणार नाही. मग ती आम आदमीची सत्ता भाजपाच्या रुपात असो वा कॉंग्रेसच्या!. वा आणखी कोणाच्या.."

ऋन्मेऽऽष, तुमची हरकत असल्यास तुमच्या लेखातील ही वाक्ये इथून उडवून टाकते. एका 'आम' मतदाराची बोलकी प्रतिक्रिया ह्या धाग्यावर असावी असं वाटल्याने इथे चिकटवली आहेत. Happy

सत्तेत राहायचे असेल तर जनतेची कामे करा, ते बघूनच जनता ठरवणार तुम्हाला सत्तेत ठेवायचे की नाही.>>

पण दिल्लीत जी काही विकासकामं झाली त्या प्रमाणात (क्षेत्रफळ, लोकसंख्या, इन्कम ) भारताच्या कुठल्याही राज्यामधे, शहरामधे दीक्षितबैंनी केला एव्हढा विकास झालेला नाही.

मेट्रो फेज १, २ आणि आता ३ ची तयारी. नॅशनल गेम्स, नोईडा दिल्ली रस्ते विकास, गाझियाबाद - सीमा पुरी आणि ग्रेटर दिल्लीचे रिंग रोड्स आणि बरीच मोठी यादी आहे.

२०१२ चं आंदोलन, अण्णांचा उदयास्त, निर्भया प्रकरण, घोटाळ्यांची झालेली चौकशी, तुरुंगात गेलेले खासदार ही कारणे असावीत.

निर्भया नंतर अशा कितीतरी केसेस झाल्या नंतर दिल्लीत. मीडीयाने दखल नाही घेतली.

<<पण दिल्लीत जी काही विकासकामं झाली त्या प्रमाणात (क्षेत्रफळ, लोकसंख्या, इन्कम ) भारताच्या कुठल्याही राज्यामधे, शहरामधे दीक्षितबैंनी केला एव्हढा विकास झालेला नाही.
मेट्रो फेज १, २ आणि आता ३ ची तयारी. नॅशनल गेम्स, नोईडा दिल्ली रस्ते विकास, गाझियाबाद - सीमा पुरी आणि ग्रेटर दिल्लीचे रिंग रोड्स आणि बरीच मोठी यादी आहे.>>

दिवाणखाना छान सजवला दीक्षितबैंनी. पण आतल्या खोल्यांमध्ये कचरा स्वच्छ करायचा राहून गेला त्याचं काय?
भ्रष्टाचाराचं काय ? टॉयलेट पेपर ४००० रूपयांना खरेदी केला आहे म्हणे. Uhoh

दिल्लीत राहणार्‍या सर्व थरांतील लोकांना मूलभूत सुविधा सुद्धा न पुरवता तुम्ही चकचकाट करत राहिलात तर त्या लोकांच्यात गुन्हेगारी वाढणारच. मग नंतर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यात काय अर्थ आहे?
ते लोकसुद्धा टॅक्स भरतातच ना? मग पाणी-वीज ह्या गोष्टी त्यांना सुद्धा मिळायलाच हव्यात.

मग पाणी-वीज ह्या गोष्टी त्यांना सुद्धा मि ळायलाच हव्यात. >>

त्या कशा मिळणार ?

मिर्चीतै

कंपन्यांमधला भ्रष्टाचार, वाढलेले दर यावर काम करून उर्जा "निर्माण" कशी होईल ?
दिल्लीला वीज निर्माण केंद्र आहे का ? कुठून वीज येते याबद्दल काही सांगू शकाल का ?

जे वीजेचं तेच पाण्याचं.
यमुनेचं पाणी पिण्यायोग्य सोडा, वापरण्यायोग्य तरी आहे का ?
पाण्याचे सोर्सेस काय आहेत ?

<< कंपन्यांमधला भ्रष्टाचार, वाढलेले दर यावर काम करून उर्जा "निर्माण" कशी होईल ?
दिल्लीला वीज निर्माण केंद्र आहे का ? कुठून वीज येते याबद्दल काही सांगू शकाल का ? >>

मागची पाने चाळून बघा (पान २१-२२) काहीप्रमाणात उत्तरे सापडतील. काही प्रश्न प्रत्यक्ष काम करत असताना सुटत जातील.

दिल्लीतील पाणीप्रश्नाबाबत मागेच सविस्तर लिहिणार होते. राहून गेलं.
सत्यम घोटाळ्याचा उल्लेख झाला तेव्हा PricewaterhouseCoopers हे नाव आलं होतं आणि त्यावरून दिल्लीतील पाणी-माफियाबद्दल केजरीवालांचं एक स्पीच ऐकलेलं आठवलं होतं. तेव्हासारखं पानंच्या पानं लिहायला सध्या वेळ मिळायचं अवघड दिसतंय. जमलं तर लिहीनच. तोवर इच्छुकांनी हा व्हिडिओ पहायला हरकत नाही. खरंतर पहाच. सगळी परिस्थिती हिलारियस (!!) आहे.
How World-Bank Dictates Indian Policies

आपने आत्ताच्या निवडणुकीसाठी 'पाणी' ह्या विषयावर श्वेतपत्रिका दिली आहे. त्यात सविस्तर सगळं लिहिलेलं दिसत आहे.
हे वाचल्यावर मागच्या पानांवर नरेश मानेंनी मांडलेल्या हाऊसिंग सोसायट्यांच्या मुद्द्याचं पण उत्तर मिळतंय.
"Provision of lifeline water scheme shall be extended to group housing societies by
making bulk allotments based on number of houses, which will incentivize
societies to self-regulate their consumption."

मिर्चीतै

१. वीजेसाठी मागच्या कोणत्या पानावर जाऊ ? अवघड आहे शोधाशोध.
२. पाणीमाफियांना आळा घातला तरी पाणी "निर्माण" कसे होईल ? पाणीमाफिया सोकावण्याचं कारण शॉर्टेज आहे असं नाही का वाटत ?

वीजेसाठी पान २१ किंवा २२ वर जा.
पाण्यासाठी सध्या व्हिडिओ पहा. जमल्यास लिहीन.
पाणी 'निर्माण' करण्याइतकी वेळ अजून आली नसावी. आहे तेच व्यवस्थित वापरलं तरी बराच प्रश्न सुटेल.
<<पाणीमाफिया सोकावण्याचं कारण शॉर्टेज आहे असं नाही का वाटत ?>> अजिबात नाही !

दिल्लीची पाण्याची गरज आणि पुरवठा याबद्दल कुणी सांगेल का ?

दिल्लीच्या वीजेबद्दल सांगता येईल की त्यातील ७५% वीज ही अन्य राज्यांकडून विकत घेतली जाते. दिल्लीला अपारंपारिक वीज निर्मितीचं लक्ष्य देण्यात आलं होतं त्याच्या १% ही लक्ष्य दिल्लीला पूर्ण करता आलं नाही. याबाबतीत दिल्लीला २६ वा क्रमांक मिळाला. विकत घेतलेल्या वीजेबाबत असं आहे की या राज्यांकडे जेव्हां मुबलक वीज असते तेव्हां अतिरिक्त वीजेतून गरजवंतांची गरज भागवली जाते. दिल्ली पूर्णपणे परावलंबी राज्य आहे. त्यामुळे वीज विकत घेऊन विकणा-या कंपन्या या नफा काढणारच. तोट्यात त्या काही धंदा करणार नाहीत. धंदा म्हटला की भ्रष्टाचार होणार. आपमुळे यात फरक पडेल अशी आशा करूयात. पण जेव्हां वीज पिकवणा-या राज्यांची पीक गरज वाढेल तेव्हां ते कमी वीज विकतील. परिणामी ज्या राज्यांमधे स्वतःची निर्मितीक्षमता नाही त्यांचे हाल होतात.

दिल्लीच्या बाबतीत हरीयाणाकडून मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी येते. पण २०११ पासून हरीयाणा सरकारने दिल्लीला या दोन्ही बाबतीत अडवण्याला सुरूवात केल्याने दिल्लीच्या समस्या वाढल्या. जर भाजप सरकार आले तर हरीयाणाकडून वीजपुरवठाही सुरळीत होईल आणि पाणीपुरवठाही. अर्थात आप हे सुद्धा संघाचेच पिल्लू असल्याने (कितीही नाकारले तरी) त्यांना मदत मिळू शकते.

दिल्ली हे राजधानीचे शहर असल्याने असे तात्पुरते उपाय योजण्यात येतील असं दिसतं. दिल्लीच्या समस्यांवर मुळापासून काम करायचं म्हटलं तर त्याचं फळ विद्यमान सरकारला मिळणार नाही. त्यामुळे हे सरकार सुद्धा मुळावर काम करणार नाही.

:१० तारखेची वाट पहात इव्हीएमचा फोटो पाण्यात बुडवून बसलेला भावला:

इब्लिस, तुम्ही पण असं का नाही करत ? Wink

<<जर भाजप सरकार आले तर हरीयाणाकडून वीजपुरवठाही सुरळीत होईल आणि पाणीपुरवठाही. अर्थात आप हे सुद्धा संघाचेच पिल्लू असल्याने (कितीही नाकारले तरी) त्यांना मदत मिळू शकते.>>

दोन्ही वाक्यांशी असहमत. ठळक शब्द वाचून Lol

मिर्चीतै

तुम्ही सांगितलेल्या २२ व्या पानावर केजरीवालांचे म्हणणे तुम्ही दिलेले आहे. या म्हणण्याचा सुद्धा विचार केला गेला पाहीजे. यात तथ्य असेल तर ते मान्य करायला काही हरकत नाही. मला आवडेल ते. आणि या पद्धतीने समस्या सुटली तर केजरीबाबूंना सा. दंडवत घालायलाही आवडेल. पण

तुम्ही दिल्लीच्या रहीवासी आहात की नाही माहीत नाही.
मी गेली ३० वर्षे पाहतोय दिल्लीमधे इन्वर्ट्स वापरले जातात. आपल्याकडे ते माहीत सुद्धा नव्हते. दिल्लीचे वीजेचे जे जाळे आहे ते सदोष आहे. वाट्टेल तसे वीजजोड दिले, घेतले गेले आहेत. काही ठिकाणी अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. पहाडगंज, करोलबाग, सदर, लाल किल्ला या ठिकाणी तर आकाश दिसत नाही. हे सर्व लोक फुकट वीज वापरतात. हे खरंय. खाजगी कंपन्या आल्यावर काय झालं ? या भागाची वीज कापण्यात आली आणि मीटर बसल्यावर देण्यात आली. पण या धोकादायक तारांमधे सुधारणा नाही झाली. यातून होणारी वीजगळती प्रचंड आहे. तसंच पीक अवर्समधे आजही त्यांच्याकडे सोल्युशन नाही. मग पीक अवर्समधे महागड्या दराने वीज खरेदी करावी लागेल. राजधानीच्या शहरामुळे अन्य राज्यांची वीज ओढली जाते आणि दिल्लीला पुरवली जाते.

देशात मुबलक कोळसा आहे तरीही मागणी आणि पुरवठा यातलं अंतर प्रचंड आहे. पाचव्या प्लानिंग कमिशनने वीज उत्पादनाचे १००००० मेवॉ हे दिलेले लक्ष्य पूर्ण झाले नाही कारण याला पर्यावरण मंत्रालयाने विरोध केला. कारण एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करायची तर जंगलं नष्ट करून कोळसा काढण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागणार होती. तसंच सदोष मॉडेल (जुनाट पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर, आकाशातून वीजेचे पारेषण इ.) यामुळे प्रचंड वीजगळती तर होणारच होती शिवाय पारंपारिक निर्मितीमुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचणार होती. याला पर्याय न सापडल्याने वीजनिर्मिती थंडावलेली आहे. २००९ नंतर एकही नवा वीजप्रकल्प उभा राहीलेला नाही. सरदार सरोवरचे टप्पे २००४ ते २००९ पर्यंत पूर्ण झालेले आहेत. त्यांची अतिरिक्त वीज महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान ला मिळेल. त्यामुळे या राज्यांकडून मागणी कमी होण्याची लक्षणे मात्र नाहीत. कारण नवनवे प्रकल्प, वाढती लोकसंख्या, शहरीकरण यामुळे ही वीजसुद्धा कमी पडणार आहे.

अशा परिस्थितीत दिल्लीसाठी अतिरिक्त वीजेचं कठीण आहे.

काऊ
रामलीला मैदानावरचे पोस्टर्स, सुरुवातीला सपोर्ट करणारे संघाचे कार्यकर्ते, यू ट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणारे आयटीचे स्वयंसेवक, असीम त्रिबेदीची व्यंगचित्रे हे सर्व पाहता हा अजेण्डा कुणाचा असेल असं वाटतं ?
शिवाय किरण बेदी वेळेवर आल्याच की भाजपात. अण्णा सोडले तर सर्वांचं पुवर्सन झालं.

केजरीवालांनी मोदींना लोकसभा निवडणुकीत केलेली मदत विसरलात का ?

फूटेज खात चित्रविचित्र प्रतिसाद टाळून इथे मांडलेल्या मुद्यांवर काही भर टाकता येत असेल तर तेव्हढी मेहरबानी करा नाही तर कटलात तरी चालेल. तुमच्या फूटेज खाण्याचं खास कौतुक नाही. हे समजलं की शंका आहे अजून ?

आंग्रे,
तुम्हाला मिठ्या मारायची वेळ येईल, तेव्हा भेटू परत. सध्या मला तुमच्यात इंटरेस्ट नाही. मी फक्त नवीन सदस्य म्हणून तुम्हाला हाय म्हटले तर तुम्ही मिठ्या मारू लागलात Wink
मांडलेल्या मुद्द्यांत भर घालायला समर्थ लोक इथे आहेत. जिथे कमी तिथे आम्ही अशी आमची अवस्था असल्याने, कमी पडेल तेव्हाच येतो.
सध्या,
धन्यवाद!

Pages