अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौवा, पोस्ट आवडली.

विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान ७ जागा (१०%) भाजपला मिळालेल्या नसल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ असे आपने म्हटले आहे.

कौवा, मस्तं पोस्ट.
खलबली है खलबली!
आपचा प्रचार आणि विजय बघताना दिल्लीत शूट झालेलं हेच गाणं आठवत होतं.

hats off to mirchis patience. If there is god and he is just god then mirchee will become विधान परिषद सदस्य किंवा महाम्मंडळ अध्यक्श किंवा विशेष kaaryक्यक्री dandadhikaree.

कौवा, उत्तम पोस्ट.
फक्त एक अ‍ॅडीशन करावी वाटते - अजून गावाकडे तरी पक्ष किंवा खरेतर जे कोणी स्थानिक आण्णा-भाऊ असतील त्यांना बांधलेला मतदार आहे. मात्र शहरी भागात अशी कोणतीच बांधिलकी न मानण्याकडे कल दिसतो, अशा अस्थिर मतदाराला बांधून ठेवण्यासाठी 'आप'च्या पार्टीसिपेटरी राजकारणाचा कसा उपयोग होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
मार्केट इकॉनॉमीच्या मुद्याला अनुमोदन. खूप वर्षापूर्वी मार्केट्स खुली करताना 'आम्हाला फ्री इकॉनॉमीचे आमचे स्वतःचे मॉडेल विकसित करावे लागेल, पाश्चात्य मॉडेलची कॉपी चालणार नाही' अशा अर्थाचे विधान नरसिंहरावांनीं केले होते. असे भारतीय परिपेक्ष्यातील मॉडेल आपल्याला अजूनही जमलेले नाही. त्यामुळे कार्पोरेट्स हेच भाग्यविधाते पासून तेच खरे गुन्हेगार अशा लंबकीय गुंत्यात अडकलो आहोत.

मिर्र्ची ताई आआप चे आणि तुमचे अभिनंदन.

गा पै भाजपचा लोकसभा निवडणुकीतला आणि अत्ताचा टक्का यात बराच फ़रक आहे. तो खाली गेलेला आहे.

मिर्ची ताई आता निवडणुका झाल्या अता अश्वासन पुर्तिची वेळ आहे. म्हटल्या प्रमाणे आता आपण वाद घालु शकतो. तरीही केजरीवाल यांना थोडा वेळ द्यायला हवा. पहिल्या दिवसा पासुन टीका करण्याची गरज वाटत नाहीए

मुंबई महापालिका निवडणुका आआप लढवणार असं ऐकण्यात आले.

कौवा, उत्तम पोस्ट. फारच सुरेख आढावा घेतला आहे. आपच्या विजयाची आणखी एक खासियत म्हणजे त्याने भाजपाला कॉन्ग्रेस करून टाकले आहे. आपने जसा कायापालट केला तसा भाजपाला जमला तर ठिक नाहीतर काँग्रेसप्रमाणे अस्तदेखील होईल.

आगाऊने म्हटल्याप्रमाणे गावा-खेड्यातून आपला 'आमदाराला' बांधलेला मतदार खेचता येईल का बघणे सुरस ठरेल. अर्थात मध्य भारतातल्या (युपी, एमपी, महाराष्ट्र इ.) आमदाराला बांधलेल्या मतदारांनी मागल्या निवडणुकीत भाजपाला मत देवून जाती व कौटुंबिक बांधिलकीच्या बाहेर जावून मतदान होवू शकते हे दाखवून दिले आहेच.

आपची आर्थिक निती काय असेल ह्याची सर्वात जास्त उत्सुकता आहे. दिल्लीच्या राजकारणात ती फारशी पुरी होणार नाही कारण दिल्लीत ना नवीन कारखाने येणार आहेत की नवी सर्विस इंङस्ट्री. दिल्लीत त्यांची नागरी सोयींचे व्यवस्थापन कौशल्य दिसून येईल, इन्फ्रा कसा वाढवतात ते दिसून येईल. पंजाबवगैरे एखादे राज्य त्यांना मिळाले पाहिजे.

केदारभौ, निदान आजच्या दिवस तरी भांडू नका >>

मी तुम्हाला भांडतोय हा तुमचा गैरसमज आहे. मी कुणालाच भांडत नाही.

तुम्ही लिहिले आहे की तत्त्व वगैरे सोडून खुर्ची टिकवावी. मग ह्या भुमीकेत अन काँग्रेसच्या काय फरक आहे हे मी लिहिले. त्याला तुम्ही भांडण वगैरे लिहिताय आणि मुळ मुद्द्याला बगल देताय. Happy

असो

आआपला मिळालेल्या अभुतपुर्व यशाबद्दल आआपचे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे, दिल्लीच्या जनतेचे आणि विशेषतः मिर्ची यांचे अभिनंदन.

कौवा यांची पोस्ट खुप आवडली. आता आआपने दिल्ली विधानसभा निवडणुकपुर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करावी ही अपेक्षा. आश्वासनांचा प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने त्यांची पुर्तता करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. पाच वर्षाच्या काळात दिलेल्या बहुतांश आश्वासनांची पुर्ती व्हावी. काही आश्वासनांची जरी पुर्तता झाली नाही तरी त्यांच्या पुर्ततेच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न त्यांनी जनतेसमोर मांडावीत. जर त्यांनी योग्य दिशेने राज्यकारभार चालवला तर भारताच्या राजकीय पटलावर आआपरूपी एक समर्थ पर्याय निर्माण होऊ शकतो हे माझे वैयक्तिक मत.

कौआ आणि आगाऊ, दोघांच्याही पोस्टी आवडल्या.

पंजाबवगैरे एखादे राज्य त्यांना मिळाले पाहिजे.>>> हे होवू शकेल कदाचीत. पंजाबमध्ये बर्‍यापैकी सपोर्ट आहे आपला आणि त्याहीपेक्षा जास्त अकाली दल-भाजपा सरकारविरुद्ध (स्पेशली बादल खानदान) असंतोष आहे. काहीही झालं तरी यावेळी बादलना सत्तेतून हटवायचं हा तिथल्या जनतेचा अजेंडा आहे. या असंतोषाचा फायदा काँग्रेस आणि आपपैकी आपला जास्त व्हायची शक्यता आहे.

भक्तांनो पहीले 9 महिने शांत बसा. जसा स्वत: हनिमुन दिवस साजरे केलात तसे इतरांना देखील करू द्या
काय लावले आश्वासन पुर्ण करा म्हणून? 9 महिन्यात किती आश्वासन पुर्ण झालीत हे आधी तोंड उघडून विचारा Wink

अल्पना, मस्त पोस्ट. प्रत्यक्ष स्थलदर्शीकडून वर्णन आल्याने आणखीन छान वाटलं.
दिल्लीतील माझे दोस्त, ट्वीपाल्स फोटोज, व्हिडिओज पाठवायचे त्यावरून ४०-४५ जागांपर्यंत तर काहीच अडचण नाही अशी खात्री होती. ६७ इज टु गुड !

कौवा, उत्तम विश्लेषण. शक्य असेल तेव्हा लिहीत रहा. Happy
आगाऊ, टण्या +१

विकु, मी राजकारणापासून शंभर हात दूर पळणारा प्राणी आहे (होते). हे आपचं प्रकरण वेगळं वाटलं/वाटतंय म्हणून ओढली गेले त्यात. विधानपरिषद सदस्य किंवा महामंडळ अध्यक्ष किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी वगैरे मेरे बस की बात नहीं Happy
तुमच्या कौतुकासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
युरो, नरेश माने तुम्हालाही धन्यवाद.
युरो, आता आपण नक्कीच वाद घालू शकतो. खरंतर आता इतरही बरेच विचारी लोक स्वतःहून पोस्टी लिहीत आहेत हे पाहून बरं वाटलं. उगीच डिवचणार्‍यांकडे दुर्लक्ष केलं आणि एकेक मुद्दा घेत गेलो तर छान चर्चा होऊ शकेल.

केदार,
राजीनामा देऊ नका असं म्हटलं म्हणजे कसेही वागून खुर्चीला चिकटून रहा असं नाही म्हणायचंय मला.
कालच्या दिल्लीत झालेल्या दारूण पराभवानंतर मोदी सरकारने पायउतार व्हावं अशी मागणी MDMK अध्यक्ष वायको ह्यांनी केलीये. मला हेसुद्धा मान्य नाही, जरी मी बाँग्रेस समर्थक नसले तरी (आणि मोदींची कट्टर विरोधक असले तरी :डोमा:)
आपने पुन्हा सरकार सोडावं म्हणून विरोधक खुसपटं काढत रहाणार. उदा.-वीजकंपन्यांनी ऑडिट करायला अडथळे आणले, १५ लाख ऐवजी १२ लाखच कॅमेरे बसवले. तर आता द्या राजीनामा.
तर असल्या गोष्टींना बळी पडू नये. जो काही लढा द्यायचा आहे तो सत्तेत राहून द्यावा. भगोडाचा टॅग पुन्हा लागला तर ह्यावेळी तो पुसणं जास्त अवघड होईल.
असो, राजीनाम्याचा प्रश्न आता हायपोथिटिकल असल्यासारखा आहे. त्यामुळे सोडून देऊ या Happy

"कार्यकर्ता याचा अर्थ होयबा म्हणणारा गुलाम अशी जी व्याख्या होऊन बसली आहे त्याला छेद देणारे, नेत्यांना प्रसंगी जाब विचारू शकतील इतके निर्भिड कार्यकर्ते असतील तर ते पक्षाच्या नेत्यांवर चांगला अंकुश ठेवू शकतात नि सत्तातुर होऊ देत नाहीत असा माझा होरा आहे."
- माझ्या 'आप्टर्ड' मित्रांनो. छान लिहिलं आहे.

<<मुंबई महापालिका निवडणुका आआप लढवणार असं ऐकण्यात आले.>> लढवू नयेत असं माझं मत आहे.

भाजपाच्या दिल्लीतील रणनितीबद्दल हा एक वेगळा अँगल वाचायला मिळाला. मजेशीर आहे, पण अगदीच बिनबुडाचा नाही वाटत.

मोदी सरकार आल्यावर "जागता पहारा" असा काही बाफ आला होता. "आप" वर नाही आला अजुन,, का त्यांना डिस्काउंट? Happy असो.

मिर्ची आणि केजरीवाल दोघांचे अभिनंदन..मला आशा आणि इच्छा आहे की केजरीवाल आपले वादे पुर्ण करण्यात यशस्वी व्हावेत.

मनस्मि, इथेच ६१ व्या पानावर या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे.
वाचा आणि ऊत्तराचा लाभ घ्या.
Wink

मनस्मि, धन्यवाद. Happy
आपवर तर जास्त कडक पहारा करायला पाहिजे. लोकांनी विक्रमी बहुमत दिलं आहे. लोकांचे पैसे वापरून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे ते लोकांना उत्तरे द्यायला पूर्ण बांधिल आहेत.
(बिटवीन द लाइन्स : ज्यांनी 'अनएक्स्प्लेण्ड' दात्यांचे पैसे वापरून निवडणूक लढवली आहे, ते त्यांना परतफेड करायला कटिबद्ध आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला मूक प्रेक्षक बनण्याशिवाय गत्यंतरच नाही !)

शिवाय ७० पैकी ६७ जागा म्हटल्यावर विरोधी पक्षच नाही. मग आपणच विरोधक, टीकाकार व्हायचं. हाकानाका.
पहार्‍यासाठी वेगळा धागा काढायची गरज वाटत नाहीये. पण तरी पाहिजे असेल तर काढूया की. पब्लिक रेफरेण्डम Wink Proud

युरो,
तुम्ही म्हणत होतात त्या मुंबई महापालिकेच्या निवडणूका २०१७ मध्ये आहेत. मग हरकत नाही लढवायला. तोवर आपवाले काय-काय करू शकतात ते आपल्यालाही कळेल. त्यांनाही त्यांची क्षमता आहे की नाही ते लक्षात येईल.
तोवर बाहेरूनच विरोधी पक्षाचं काम करत रहायला हवं त्यांनी. मुद्दे उचलायला हवेत.

उदा.- सध्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या ६००० सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रकल्पात एका कॅमेर्‍याची किंमत १५.८३ लाख इतकी येते आहे. तर त्यात नेमकं काय आहे, किती वर्षांचा मेण्टेनन्स समाविष्ट आहे हे पहायला पाहिजे.
केजरीवाल म्हणत आहेत ३०० करोडमध्ये १५ लाख कॅमेरे बसवणं शक्य आहे. म्हणजे २००० रूपयाला एक कॅमेरा. (खरंतर हे मला जरा विनोदी वाटतंय. पण त्या क्षेत्रातील दोस्तलोक म्हणत आहेत की बल्क ऑर्डर्स, पारदर्शी कंत्राट दिलं तर हे शक्य आहे.)
२००० रूपये प्रति नग जेवढं अशक्य वाटतंय त्याहून १५.८३ लाख प्रति नग अतिशयोक्तीचं (खरंतर हास्यास्पद) वाटतंय.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

इब्लिस, काँग्रेसच्या पडझडीबद्दल तुमचे मत काय आहे (कुत्सित प्रश्न नाही, जेन्युइनली विचारतो आहे). जरी भाजपा दिल्ली निवडणुकीत हारली असली तरी जास्त हानी काँग्रेसची झाली आहे.

१५ लाख कॅमेरे - खरंच ३०० कोटींमधे हे काम केजरीवालांच्या सरकारने केलं (आणि कॅमेरे कार्यरत ठेवले) तर हॅट्स ऑफ. कुठेतरी वाचनात आलं की, हे सगळे कॅमेरे वाय्-फाय बेस्ड असणार आहेत. आता प्रश्न हा आहे कि दिल्ली शहर वाय्-फाय एनेबल आहे का? असल्यास वाय्-फाय नेटवर्क रिलायबल आहे का? प्रत्येक कॅमेरा २००० रु. (~ $३०-$३५), या किंमतीत फक्त इंडोर कॅमेरा येइल. तो दिल्लीच्या हवामानात तग धरु शकेल का? हे कॅमेरे रेकॉर्डिंग करु शकतील का? असल्यास डेटा कुठे स्टोर करणार? ढगांत? त्या इन्फ्रास्ट्रुचर्सचा खर्च कुठुन येणार? आभाळातुन???

दिल्लीला वायफाय इनेबल्ड करणार आहेत. ही जबाबदारी आदर्श शास्त्रींवर टाकतील असं ऐकलं होतं मागे.

"Adarsh Shastri has over 17 years of extensive work experience in sales,marketing, key accounts management, business development & strategy in the telecom and retail industry, both in India and abroad as well.He has been actively involved with the growth of mobile and retail Industry in India and as with any industry in its nascent stage have been one of the pioneers in pushing new sales and distribution norms; and articulating retail and channel development processes."

इथेही नजर टाका - तो क्या है मुफ़्त वाई-फ़ाई सुविधा?
राज,
ढग, आभाळ ?? पावसाळा लांब आहे अजून Lol

एक फ्लाय ओव्हर बनवताना हाय लेव्हल कमिशन, एक्स्पर्टस कमिटी वैगेरे बनवुन त्याबद्दल संपुर्ण आराखडा
बनवला जातो, पण ,

संपुर्ण दिल्लीसाठी १५,००,००० कॅमेरे कोणी ठरवले ? कसे ठरवले ? कोणत्या ठिकाणी लावणार ?
त्याच ठीकाणी का ? असे प्रश्न त्यांना पडत नसावेत. त्याशिवाय अश्या कॅमेरावर मिळालेल्या डेटाच काय
करणार ? कुठल्या ही प्रकारची फास्ट रिस्पाँस टिम साठी मौक्याच्या ठेवण्यासाठी त्या जागी चौक्याही बनवायला ही काही योजना आहे का ?

कदाचीत आप कडे अगोदर त्याबद्दल स्टडी झालेला असावा !!

राज +१०१
केवळ घोषणा देऊन भागत नाही, त्या प्रत्यक्ष आणायला कसा वेळ लागतो आणि कशी आव्हाने असतात हे कळेल लवकरच. इतरांना बोलणे सोपे असते. Happy

कदाचित या योजनेत १५ लाख लोकांना रोजगार सुद्धा मिळणार असेल. कारण प्रत्येक कॅमेरा काय टिपतो आहे हे कोणीतरी पहावे तर लागणार ना. आणि नुसते पाहुन चालणार नाही तर जे काही चालले आहे ते चूक की बरोबर हे कॅमेरा किंवा मशिन नाही ठरवू शकणार. Happy

मिर्चीताई निखळ अभिनन्दन.:स्मित: आपने बाकी घोषणाना हळु न्याय दिला तरीचालेल, पण दिल्लीतुन गुण्डगिरी कायमची हद्दपार करावी ही इच्छा. केन्द्राने पण साथ द्यावी ही भाबडी अपेक्षा.

<<कदाचीत आप कडे अगोदर त्याबद्दल स्टडी झालेला असावा !!>>
हुश्श Happy

महेश, रमाकांत,
प्रति नग १५.८६ लाखाबद्दल तुमचं मत ऐकायला आवडेल.

धन्यवाद रश्मी Happy

Pages