Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रवीश कुमार यांनी अरविंद
रवीश कुमार यांनी अरविंद केजरीवाल यांना मुलाखती दरम्यान wi-fi आणि CCTV कॅमेरा संदर्भात विचारले होते आणि केजरीवाल यांची ऊत्तरे चांगली वाटली. पण २००० प्रती कॅमेरा हा खर्च कमी वाटतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'आप' वर आता खूप मोठी जबाबदारी आहे, ते त्यात यशस्वी व्हावेत ही दिल्लीची आणि व्यापक अर्थाने भारताची गरज आहे. मनोमन वाटतेय 'आप' महाराष्ट्रात देखील येवोत.
मिर्ची, मी किंमतीबद्दल म्हणतच
मिर्ची, मी किंमतीबद्दल म्हणतच नाहीये, एक्झेक्युशन बद्दल म्हणत आहे.
एवढे कॅमेरे बसवून ते पहात कोण बसणार ?
तसेच २०० किंवा ३०० करोड ही देखील किंमत कमी आहे का ?
हेच पैसे अन्य विकास कामांमधे नाही वापरता येणार ?
मनोमन वाटतेय 'आप'
मनोमन वाटतेय 'आप' महाराष्ट्रात देखील येवोत.>>>>+१
महेश, तुम्ही मनातली अढी काढून
महेश, तुम्ही मनातली अढी काढून विचार केलात तर तुम्हाला समजेल.
'दिल्ली डायलॉग' बनवताना संबंधित क्षेत्रातील तज्ञांनी चर्चा करून आराखडे बनवले आहेत. एक्झिक्युशनबद्दल विचार केला नसेल असं का वाटतं तुम्हाला?
<<तसेच २०० किंवा ३०० करोड ही देखील किंमत कमी आहे का ?
हेच पैसे अन्य विकास कामांमधे नाही वापरता येणार ?>>
दिल्लीचं बजेट ४०,००० करोड आहे. त्यातील ३०० करोड वापरल्याने महिलांना सुरक्षित वाटणार असेल, गुन्हेगारीवर आळा बसणार असेल तर... नॉट अ बॅड डील अॅट ऑल !
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी १०० करोड खर्च झालेत. योग्य की अयोग्य?
सुप्रिम कोर्ट काय म्हणालं बघा.
च्याचा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान होती ती मुलाखत
केवळ घोषणा देऊन भागत नाही,
केवळ घोषणा देऊन भागत नाही, त्या प्रत्यक्ष आणायला कसा वेळ लागतो आणि कशी आव्हाने असतात हे कळेल लवकरच. >> अहो सरकारला शपथ तर घेउ द्या की. केंद्र सरकारला अजूनही आव्हाने कळतच आहेत यांचे तर सरकारपण नाही झाले अजून स्थापन.
हेच पैसे अन्य विकास कामांमधे नाही वापरता येणार ? >> हेच तुम्ही महाराष्ट्र सरकारला पण विचारणार काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिर्ची तै, तुम्ही ज्या रु१५
मिर्ची तै,
तुम्ही ज्या रु१५ लाख प्रती कॅ मेरा बद्द्ल बोलताय तो तुम्ही अंदाजाने काढलेला प्रती कॅमेरा रेट आहे.
१ त्या पुर्ण कंत्राटावर L&T ही कंपनीच बोलु शकेल कारण त्या कंत्राटात काय काय द्येय आहे हे त्या कंपनीलाच
माहीत असावे नाही का ?
२. तसेच असे सरकारी कंत्राट देताना किमान तीन प्रतीस्पर्धी असावेत असा संकेत आहे.
३. जर २००० रु चा कॅमेरा १५ लाख रुपया पर्यंत विकत घेतला तर त्या घोटाळ्यावर दुसर्या कंपन्या काय बघत
बसणार आहे काय?
आता तेच १५,००,००० कॅमेरे लावणार्या केजरीवालनी हे काम जर ३०० कोटीत करायच ठरवल आहे तर मग त्या
साठी कंपन्या लागतील ना ते काम करायला ? का ते काम ही ते स्वता:च करणार ? जर ६००० कॅमेरा लावण्या साठी महाराष्ट्र सरकारला ४-५ वर्षे लागतात कारण ज्या निविदा निघाल्या त्या घेण्यासाठी कोणतीही कंपनी
पुढेच आली नव्हती आणी म्हणुन त्या निविदा रद्द कराव्या लागल्या होत्या. आणि जर मुंबई मध्ये ६००० कॅमेरांसाठी ९५० कोटी खर्च केल्यावर दिल्लीमध्ये १५ लाख कॅमेरांसाठी ३०० कोटी मध्ये तसेच काम करायला कोणी तयार होईल का ? अरविंद केजरीवालना भले ते काम ३०० कोटीमध्येच करायचे असले तरीही.
९५० करोड भागिले ६००० = ???
९५० करोड भागिले ६००० = ???
सोडवा गणित.
"The Bharatiya Janata Party (BJP)-led government in Maharashtra on Saturday awarded works contract to L&T for the installation of 6,000 CCTV cameras in Greater Mumbai. The project costs Rs 950 crore and L&T will have to complete the installation in 90 weeks by September 2016. "
मिर्ची, तुमचे आभार मानायचे
मिर्ची, तुमचे आभार मानायचे विसरलो.
'आप' विषयी मला सॉफ्ट कॉर्नर होता (भाजपा फर्स्ट लव :)) पण तुमच्या मुळे 'आप'च्या कार्याची अधिक चांगली ओळख झाली. अन्यथा मिडियाच्या गोंधळात माझ्याही मनात 'आप' आणि अ.कें. विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. इथे लिहिणे असेच चालू ठेवा. Go AAP!!! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला अजून एक न समजलेलं गणित
मला अजून एक न समजलेलं गणित म्हणजे जर ओबामा येणार म्हणून दिल्लीत १५००० कॅमेरे काही महिन्यात (की दिवसात) लावले होते तर ६००० कॅमेरे मुंबईत लावायला दीड वर्ष का दिलंय? (जेन्युइन प्रश्न आहे)
>>राज, ढग, आभाळ ?? पावसाळा
>>राज, ढग, आभाळ ?? पावसाळा लांब आहे अजून <<
अहो पावसाचा ढग नाहि, वर्चुअल स्टोरेजचा - क्लाउड. आणि हो, त्यातहि सिक्युरिटीत डोकेदुखी/धोका आहे, हॅकर्स अॅटॅक पासुन. उध्या कदाचित हेच $३५ चे कॅमेरे हॅक झाले, डेटा काँप्रमाइज झाला तर केजरीवाल मल्हार आळ्वायला मोकळे - नभ मेघांनी आक्रमिले...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
च्याचा, धन्यवाद (काही)
च्याचा, धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(काही) मिडियाने त्याचं निष्पक्ष काम थांबवलंय म्हणून तर सामान्य लोकांना ह्यात पडावं लागतंय.
<< जर २००० रु चा कॅमेरा १५ लाख रुपया पर्यंत विकत घेतला तर त्या घोटाळ्यावर दुसर्या कंपन्या काय बघत
बसणार आहे काय?>>
हम्म. मोठा गहन प्रश्न आहे. दुसर्या कंपन्यांचे हात दुसर्या कुठल्या दगडाखाली अडकले आहेत का हे पहायला हवं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनिष,
ओबामा गेल्यावर कॅमेरे काढून पण टाकले लगेच.
बरं, सध्या शुभरात्रि. घरची मंडळी हाकलून देतील आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>मला अजून एक न समजलेलं गणित
>>मला अजून एक न समजलेलं गणित म्हणजे जर ओबामा येणार म्हणून दिल्लीत १५००० कॅमेरे काही महिन्यात (की दिवसात) लावले होते तर ६००० कॅमेरे मुंबईत लावायला दीड वर्ष का दिलंय? (जेन्युइन प्रश्न आहे) <<
थोडक्यात उत्तर - १५००० कॅमेरे काहि दिवसात हे बँडएड अॅप्रोचचं नेमेकं उदाहरण आहे. सामुग्री भाड्याने आणली कारण अॅसेट्स बिल्डअप करणे, लाँगटर्मकरता हा हेतु नव्हता (जो अर्थात दुर्दैवी होता). पुढे रितसर हा प्रोजेक्ट कॅपीटल एक्स्पेंडिचर अंतर्गत घेता येइल, हा त्यामागचा विचार असावा...
दुसर्या कंपन्यांचे हात
दुसर्या कंपन्यांचे हात दुसर्या कुठल्या दगडाखाली अडकले आहेत का हे पहायला हवं
हे म्हणजे अतीच होतय !! सर्व पक्षाचे नेते गद्दार, सर्व कंपन्या गद्दार, सर्व सरकारी अधिकारी गद्दार, सर्व पोलिस गद्दार !! आणि हो विसरलोच मिडीया, सर्वच्या सर्व मिडीया बिका हुआ है !!
फक्त मी आणि मीच एकटा ईनामदार !!
अहो आप जिंकलय. ते खुल्या
अहो आप जिंकलय. ते खुल्या मनाने स्वीकारा. त्यांना वेळ द्या. भाजपा पण कधीकाळी कुठल्यातरी राज्यात, देशात पहिल्यांदाच जिंकले होते.
>>महेश, तुम्ही मनातली अढी
>>महेश, तुम्ही मनातली अढी काढून विचार केलात तर तुम्हाला समजेल.
माफ करा, पण नाही जमणार.
>>अहो आप जिंकलय. ते खुल्या मनाने स्वीकारा. त्यांना वेळ द्या. भाजपा पण कधीकाळी कुठल्यातरी राज्यात, देशात पहिल्यांदाच जिंकले होते.
एवढ्या सहजतेने नाही स्विकारता येणार, कारणे अनेक आहेत. भाजप मधे आणि यांच्यात खुपच फरक आहे.
लवकरच अजुन सविस्तर लिहायचा प्रयत्न करीन.
विरोधी पक्ष नाही म्हणुन कोणी विरोध करूच नये असे आहे की काय ?
किरण बेदीबाईंचं फतवा पुराण
किरण बेदीबाईंचं फतवा पुराण ऐकून 'बुडत्याचा पाय खोलात' 'रडीचा डाव खडी' आणि अश्या अनेक म्हणी आठवू लागल्यात.
या बाईंबद्दल नितांत आदर मनात होता. खरंतर अजूनही आहे.
अगदी भाजपात गेल्या, तरी धर्म, जात यांचे कार्ड त्या खेळणार नाहीत असा विश्वास होता.
आणि आता बुखारींनी फतवा काढून मुस्लिम मते फिरवल्याचा आरोप?
अकेंनी तर सरळसरळ बुखारींचा पाठिंबा नाकारला होता.
आता इसी कडे जाऊन बेदींचे नेमके कोणते उद्दीष्टं सफल होणार आहे?
बाईंनी आता राजकारणाचा नाद सोडावा किंवा राजकारण फ्रॉम स्क्रॅच चालू करावं.
हा असा आयत्या पक्षाच्या मुख्यमंत्री व्हायचा नाद सोडून द्यावा.
आआप ने धार्मिक पाठींबा
आआप ने धार्मिक पाठींबा नाकारला, दंगली केल्या नाही, निवडणुकीच्या खर्चाबद्दल हाईकोर्टाकडून फटकार खाल्ली नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बरेच फरक आहेत
मतदानादिनी वेड्यासारखी इथून
मतदानादिनी वेड्यासारखी इथून तिथून पळत होती, गाडीवर चढून ओरडत होती तेव्हाच लोकांना कळले काय करायचे.;)
एवढ्या सहजतेने नाही स्विकारता
एवढ्या सहजतेने नाही स्विकारता येणार, कारणे अनेक आहेत. >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
<<हे म्हणजे अतीच होतय !! सर्व
<<हे म्हणजे अतीच होतय !! सर्व पक्षाचे नेते गद्दार, सर्व कंपन्या गद्दार, सर्व सरकारी अधिकारी गद्दार, सर्व पोलिस गद्दार !! आणि हो विसरलोच मिडीया, सर्वच्या सर्व मिडीया बिका हुआ है !!
फक्त मी आणि मीच एकटा ईनामदार !!>>
रमाकांत, चुकलंच खरं. एक डाव माफी बर्का.
"सर्व पक्षाचे सर्व नेते प्रामाणिक, सर्व सरकारी अधिकारी प्रामाणिक, सर्व पोलिस अधिकारी प्रामाणिक. आणि हो विसरलेच. सर्वच्या सर्व मिडिया प्रामाणिक आणि निष्पक्ष आहे !
फक्त आणि फक्त केजरीवाल भ्रष्ट आहेत !"
खुष????
कैच्याकै. डिनायल मोड मधून जितक्या लवकर बाहेर येउ तितकं आपल्यासाठी चांगलं आहे.
कबीर +१
खरंतर बेदीतैंनी आता आणखी हसं करून घेऊ नये. वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. भाजपाच्या नादी लागून त्यांनी आयुष्यात कमवलेली (आभासी का होईना) विश्वासार्हता सुद्धा घालवून घेतली.
आजची बातमी- दिल्ली
आजची बातमी-
दिल्ली विधानसभेतील एकाही नव्या आमदारावर खूनाचा किंवा बलात्काराचा आरोप नाही.
ही 'बातमी' व्हावी लागली हे आपल्या सगळ्यांचे दुर्दैव!
पण अश्या बातम्या येऊ लागल्यात हे सुदैव!
अख्ख्या भारतात हे कधी होणार कुणास ठाऊक.
Why BJP lost my analysis 1.
Why BJP lost my analysis![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
1. Attitude
2. Induction of Kiran Bedi at last stage of election and statements of Kiran Bedi (This was really unexpected and shocking)
3. BJP ads targetting Kejriwal & his family personally.
4. Making issue of the donations at the time of election. (Donetion received 8 moths earlier why BJP was sleeping for so long)
5. Corruption in Delhi Munciple corporation (run by BJP)
6. Narendra Modi's not so immpresive election rallies. People are bored of this.
7. People are not happy with central govt performance as there is no reduction in inflation and people understand that reduction of petrol diesel prices are nothing to do with Modi Govt.
8. 700 Ltr free water daily
9. Electricity at half the rate (even cong & BJP also promised the same. But people trusted AAP as they have done this in their last govt)
10. As per Amit Shah people will not get 15 Lacs in their account
11. Gharwapasi, Sadhvi statements etc.
<<ही 'बातमी' व्हावी लागली हे
<<ही 'बातमी' व्हावी लागली हे आपल्या सगळ्यांचे दुर्दैव!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण अश्या बातम्या येऊ लागल्यात हे सुदैव!>>
अगदी हाच विचार आला होता मनात साती
मंदार, (मराठीतून) सहमत.
चुकवू नये असे काही. नेहमीपेक्षा जरा वेगळे प्रश्न.
दणका इतका जोरात बसलाय की
दणका इतका जोरात बसलाय की दुखतेय कुठे हे कळायला काहींना दोन दिवस लागलेले दिसत आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
केजरीवाल सीसीटीव्ही कुठून आणणार याची चर्चा करण्याआधी जनतेने आपल्याला का लाथाडले याचे 'चिंतन शिबीर' घ्या.
(No subject)
<एवढ्या सहजतेने नाही
<एवढ्या सहजतेने नाही स्विकारता येणार, कारणे अनेक आहेत. भाजप मधे आणि यांच्यात खुपच फरक आहे. लवकरच अजुन सविस्तर लिहायचा प्रयत्न करीन.>
महेश, क्षमा करा, पण तुम्ही या धाग्यावर अनेक वेळा हेच लिहिले आहे. भाजपला हिंदुत्ववादासाठी पाठिंब आणि त्यामुळे अन्य पक्षांना विरोध ही भूमिका उघडपणे घ्यायला काही हरकत नाही. अनेकांनी घेतली आहे.
<विरोधी पक्ष नाही म्हणुन कोणी विरोध करूच नये असे आहे की काय ?>
विरोध करूच नये असे इथे कोणी म्हणाले असल्याचे दिसले नाही. पण.....
मोदी सरकारच्या कारभारावरील चर्चेसाठी धागा काढला तेव्हाची भूमिका काय होती बरे ? ...जनतेने नाकारले आहे तेव्हा गप्प बसा. त्रागा संघ, मातम आणि काय काय.
त्या धाग्यावरचे हे काही परिच्छेद.
<<<<<<<<<"मोदी सरकारला जनतेने निवडून दिले आहे म्हणजे काही मोदी आणि भाजपवर उपकार केलेले नाहीत. साठ साठ वर्षे इतरांनी सत्ता केल्यावर बदल घडणे निव्वळ स्वाभाविक आहे. काँग्रेसच्या शासनात विकासही झाला आणि घोटाळेही झाले. चांगल्या व वाईट अश्या दोन्ही गोष्टी प्रत्येक शासनात होणारच! फक्त एका विशिष्ट वेळी जनता वैतागली व संधी मिळताच तिने सत्ता पालटवून दाखवली. ह्याचा अर्थ मोदींच्या प्रत्येक कृतीला 'आता दिलंय ना निवडून, आता दाखवा की कर्तबगारी' ह्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार मिळत नाही. काँग्रेसच्या प्रशासनाच्या वेळी असे 'जागता पहारा' वगैरे धागे का निघाले नाहीत कोण जाणे!
"भाजपचे सरकार येणे म्हणजे जणू त्यांच्यासमोर सत्तेचे तुकडे फेकल्यासारखे लोक वागू लागले आहेत. अरे तुमचे एक मत आहे, ते तुम्ही एका पक्षाला दिलेत आणि तो पक्ष निवडून आला. सव्वाशे कोटींच्या देशात ढळढळीतपणे दिसतील अश्या सुधारणा घडवायला दोन दिवस पुरतात ही कोणती थिअरी म्हणे?"
इतकेच म्हणायचे आहे की जो दृष्टिकोन, जे निकष, जी मोजमापे भाजपला लागू करण्याची एकुणच घाई केली जात आहे ती काँग्रेसलाही लागू करायला हवी होती हे कोणालाच का सुचू नये?
ह्याचा अर्थ ही लोकशाही हेल्दी नसून येथे निव्वळ 'आपला तो बाब्या' असा प्रकार आहे हे उघड आहे.">>>>>>
आता मोदी सरकारच्या जागी आप -सरकार घालून वाक्ये पुन्हा वाचायची का?
आप सरकारच्या कामगिरीवरही चर्चा व्हायलाच हवी. होईलही. आप, देशातील अन्य राज्यांतही पावले टाकतो आहे. त्यामुळे त्यांची ध्येयधोरणे व त्यांची अंमलबजावणी कशी होते हे पाहण्यात नक्कीच रस आहे.
आपले काय चुकले ते शोधून ,
आपले काय चुकले ते शोधून , जनतेत जाऊन त्याची कबुली देऊन त्यात सुधारणा करण्याची जी हिंमत आपने दाखवलीय आणि त्यांना जनतेचा जो प्रतिसाद मिळालाय, त्यापासून काँग्रेसने धडा घ्यायची गरज आहे.
भरत मयेकर यांना अनुमोदन.
भरत मयेकर यांना अनुमोदन. आआपचे सरकार निवडून आले म्हणजे त्यांनी एका दिवसात जादूची कांडी फिरवून सर्व दिलेल्या घोषणा पुर्ण कराव्यात ही अपेक्षा ठेवणेच चुकीची आहे. त्यांनी पाच वर्षे काम करून दिलेल्या वचनांची जास्तीत जास्त पुर्तता करावी आणि दिल्लीच्या जनतेने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावावा हीच अपेक्षा.
दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ
दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ ह्या धाग्यावरही चांगली चर्चा चालू आहे.
आपशी संबंधित असल्याने इथे नोंद करून ठेवत आहे.
होय भाजपचा असा पराभव झाला
होय भाजपचा असा पराभव झाला याचे मला मनस्वी दु:ख होत आहे,
तसेच भाजप बद्दल जे काही बोलले गेले "इनकी नियतही खराब हैं" इ. इ. मुळे तर जास्तच.
आणि हे कबूल करायला मला कोणाची भिती नाही.
स्वतः चांगले आहोत हे दाखवायला इतर कोणाला नावे ठेवायची काय गरज आहे.
मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला ?
पहिल्या निवडणुकीत मला आआपचे कौतुक होतेच होते, तेव्हाही असे वाटत होते की अरेरे भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास या लोकांनी मधेच येऊन हिसकावला. खरेतर १५ वर्षांनंतर मोदी लाटेमुळे वातावरण चांगले तयार झाले होते, पण या लोकांनी अण्णांना हाताशी धरून त्या परिस्थितीचा फायदा उचलला.
तरी देखील तेव्हा असे वाटत होते की ठीक आहे नविन लोक येत आहेत तर यावेत, चांगलेच आहे.
पण नंतरच्या घटनांनी लक्षात आले की जे काही चालू आहे ते जरा जास्तच वेगळेच काहीतरी आहे.
एक गोष्ट नक्की आहे की आआपला एक फॉर्म्युला सापडला आहे, आणि तो आहे साधेपणाचा:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती तो साधेपणा ? सरळपणा ? अगदी विश्वात शोधून सापडणार नाहीत ना अशा साध्या व्यक्ती ?
या फॉर्म्युला बद्दल सविस्तर नंतर केव्हातरी लिहिणार.
येथे हिंदुत्व याबद्द्ल काहीही लिहिलेले नाही, कृपया नोंद घ्यावी. तो विषय पुर्ण वेगळा आहे.
चांगले आहे, शुभेच्छा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages