Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिर्ची, मुंबईत मोठ्या
मिर्ची, मुंबईत मोठ्या इमारतींसाठी एकच पाण्याची जोडणी महानगरपालिकेतर्फे देण्यात येते असे मी पाहिले आहे. पाण्याचे मीटर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार्या जोडणीला लावलेले असते. ह्या जोडणीद्वारे आलेले पाणी इमारतीच्या अंडरग्राऊंड पाण्याच्या टाकीत सोडले जाते आणि तेथून ते पंपाद्वारे इमारतीच्या वरील टाकीत सोडले जाते आणि मग ते प्रत्येक रहिवाश्याच्या घरापर्यंत पोचते. आता या प्रकारात कोणता रहिवासी किती लिटर पाणी वापरतो ते कसे समजणार. ही परिस्थिती जर मुंबईत असेल तर त्याच प्रकारे ती दिल्लीत सुध्दा असु शकेल यावर तोडगा कसा काढणार हे पाहायला हवे.
मला धक्का बसला इमिग्रंट शब्द
मला धक्का बसला इमिग्रंट शब्द वाचून. (त्यातल्या त्यात संघ आणि भाजपाशी संबंधित कित्येक लोक बर्याच वर्षांपासून नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये काम करत आहेत असं नेहेमी वाचत असल्याने तर हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी) >>> +१०१
I think RSS should call back its cadres from Delhi election prachar...otherwise they will also cry with AMIt aftre results.
नरेंद्र मोदी महाधूर्त आणि
नरेंद्र मोदी महाधूर्त आणि धोरणी आहेत. कोठेही विरोध नावाला शिल्लक राहणार नाही ह्यासाठी मुत्सद्देगिरीची कमाल पातळी गाठतील. अगदी उघड उघड! आजचे समारोपाचे भाषण त्याचाच परिपाक! पण एवढे करून दिल्लीवासियांच्या मनावर आपचे गारूड आहे. सत्ता कोणाचीही येवो, बहुमतातील असो, बास!
राहुल गांधींचे भाषण पूअर होते. अॅज इफ ही हिमसेल्फ वॉज नॉट बिलिव्हिंग व्हॉट ही वॉज सेयिंग! पण काँग्रेस एक न्यूसन्स पार्टी बनू शकेल असे लेटेस्ट भाकितावरून वाटू लागले आहे.
बाकी दिल्ली हे असे शहर जिथे 'माँगनेसे कुछ नही मिलता भैय्या, छीनना पडता है' हे एकच तत्त्वज्ञान शतकानुशतके लागू होत आले आहे. त्यामुळे परवाचा सूर्य मावळला की 'छीनने' सुरू होईलच.
पक्ष कोणताही असो, कपड्यांच्या आत प्रत्येक माणूस तसाच असतो ह्याची प्रचीती येईल हे नक्की!
नरेंद्र मोदी महाधूर्त आणि
नरेंद्र मोदी महाधूर्त आणि धोरणी आहेत. कोठेही विरोध नावाला शिल्लक राहणार नाही ह्यासाठी मुत्सद्देगिरीची कमाल पातळी गाठतील.>>>+१
काँग्रेस एक न्यूसन्स पार्टी बनू शकेल असे लेटेस्ट भाकितावरून वाटू लागले आहे. >>> +१०१
Rahul asked about gazani shirt of 9 lakh was ordered from London...what happened to modi's make in india pla?
पक्ष कोणताही असो, कपड्यांच्या आत प्रत्येक माणूस तसाच असतो ह्याची प्रचीती येईल हे नक्की!
>>> I somewhat agree but I still have hopes and optimistic!!!
आज कॄष्णनगरमध्ये (किरण
आज कॄष्णनगरमध्ये (किरण बेदीच्या मतदारसंघामध्ये) आपची महिला रॅली झाली होती. भरपूर रिस्पाँस होता असं काही सहभागी बायकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मी टिव्हीवर बातमी दिसतेय का बघितलं पण काही दिसली नाही बातमी अजूनतरी. सहभागी बायकांमध्ये गुल पनांग (विथ हर बुलेट), कांचन चौधरी भट्टाचार्य (ऊडान मालिकेच्या खर्या नायिका आणि पहिल्या महिला डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस, कविता चौधरी इ होत्या.
आज पहिल्यांदा मला आमच्या मतदारसंघामध्ये भाजपाचा प्रचार वाढल्याचं जाणवलं. भाजपा ऑफिसजवळ पण तरुणांची आणि शाळकरी मुलांची बरीच गर्दी होती.
भरपूर रिस्पाँस होता असं काही
भरपूर रिस्पाँस होता असं काही सहभागी बायकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.>>> मी facebook वर पाहीले...खूप छान सहभाग होता...
मी आज त्या रॅलीत गेलेल्या दोन
मी आज त्या रॅलीत गेलेल्या दोन महाराष्ट्रातल्या स्त्री नेत्यांना आणि त्या मतदारसंघात काम करत असलेल्या अजून एका महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला (त्यांना नेता म्हटलेलं आवडत नाही. :)) संध्याकाळी भेटले होते.
अजून २-३ नेत्यांना भेटले. पण ते लोक आज कोणत्याही रॅलीज मध्ये सहभागी न होता वेगवेगळ्या स्कॉलर्सना आणि ग्रूप्सना भेटत आख्ख्या दिल्लीत फिरले होते.
महाभारतातील संजया प्रमाणे
महाभारतातील संजया प्रमाणे अल्पनाजी प्रत्यक्ष युद्धस्थानावरून जे अपडेट्स देत आहेत ते प्रशंसनीय आहेत. देव करो आणी एक दिवस अल्पनाजी बरखा दत्त च्या खुर्चीवर दिसोत.
(No subject)
महाभारतातील संजया प्रमाणे
महाभारतातील संजया प्रमाणे अल्पनाजी प्रत्यक्ष युद्धस्थानावरून जे अपडेट्स देत आहेत ते प्रशंसनीय आहेत>>. +१
विकु +१ दिल्लीतील दोस्तांनी
विकु +१
दिल्लीतील दोस्तांनी सांगितलं की तिथे NDTV hindi ब्लॉक करण्यात आलंय (काल मोदींच्या रॅलीतील तुरळक जमाव दाखवल्याबद्दल ? AVAM चं सत्य दाखवल्याबद्दल??)
अल्पना, मंदार, तुमच्याइथे दिसतंय का?
कालचं मोदींचं भाषण ऐकलं का लोक्स? वेरी अॅग्रेसिव्ह.
भारताच्या पंप्रंनी काल जाहीर व्यासपीठावरून अजून एक शब्द देशाला अर्पण केला - "बाजारू" !
त्यांच्या भाषणातील वाक्य -"When LS elections were ongoing, I myself was a candidate. During those elections there wasn't as much crowd as is being witnessed this time."
खरी परिस्थिती - Unusual scenes from a Modi rally: Empty chairs, sleeping BJP leaders in South Delhi
ह्या रॅलीच्या प्रक्षेपणात बरेच चॅनेल्स 'बीजेपी फीड' दाखवत होते, NDTV ने स्वतःचं फीड दाखवलं. म्हणूण बंदी घातली असं लोकांचं म्हणणं आहे.खखोमोजा.
काल चॅनल बदलत बदलत झी न्युज
काल चॅनल बदलत बदलत झी न्युज हिंदी वर येउन थांबलो. त्यांचा संपादक सुधीर चौधरी इंडिया गेटच्या हिरवळीवर उभ्या उभ्याच केजरीवालांची मुलाखत घेत होता. 'आप' ला मिळत असलेल्या देणगीचा विषय होता, त्यांच्यात झालेला संवाद असा, कदाचित शब्द इकडे तिकडे झाले असतील माझ्याकडून पण आशय मात्र तोच:-
संपादक: जीन लोगोंसे 'आप' को जो पैसा मिल रहा है, उस संस्था या व्यक्ती के चरीत्र के बारे मे जानकारी लेते है.
केजरी: जी जरूर करते है.
संपादक: कीस तरह कि जानकारी लेते है.
केजरी: मुझे एक बात बताइये, आप के चॅनल पे जो लोग ईश्तेहार advertisement देते है, क्या आप उस संस्था या व्यक्ती से कंपनी के बारे में जानकारी लेते है.
संपादक: जी हां, जरूर लेते है. हम उनसे उनकी बॅलन्स शिट मांगते है.
केजरी: कल से ही तो हमने हमारे पार्टी की advertisement आपके चॅनल पे दी हैं, हमसे तो कोई बॅलन्स शिट नहीं मांगी गई.
http://navbharattimes.indiati
http://navbharattimes.indiatimes.com/assembly-elections-2015/delhi-assem...
अतिशय दु:खद प्रकार. किरण बेदींना निव्वळ वापरुन घेण्यात येत आहे. खापर फोडण्याकरिता वापरण्यात येणारी वस्तु म्हणजे बेदी आहेत. हे त्यांना आधीच समजायला हवे होते. जिंकण्याचे श्रेय बेदींना कधीच मिळाणार नव्हते. कारण ते श्रेय "मोदी लाटेत" समाविष्ट केले गेले असते. आणि पराभवाचे श्रेय किरन बेदींच्या प्रचारावर आणि त्यांना असणार्या दिल्लीतील विरोध यांच्यावर टाकले गेले असते. उदा. वकिलांची नाराजगी. भाजपा कार्यकर्त्यांची नाराजगी. इ. थातुरमातुर कारणे देउन वेळ टाळणार आहेत.
http://navbharattimes.indiati
http://navbharattimes.indiatimes.com/india/BJP-president-attack-on-AAP-o...
इंटरव्यू में अमित शाह ने ब्लैक मनी वापस लाने और हर परिवार के खाते में 15 लाख रुपये जमा कराने की मांग पर खुलकर बात की। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ब्लैक मनी को वापस लाने पर हर परिवार को 15 लाख रुपए तक मिलने वाली बात कहावत के तौर पर कही थी और हर कोई जानता है कि किसी के खाते में पैसे जमा कराना संभव नहीं है। अमित शाह के मुताबिक, अगर काला धन वापस आया तो सभी लोगों के आर्थिक विकास में लगाया जाएगा।
ऐकुन आनंद झाला.
सूनटून्या, हेच तर इंगित आहे
सूनटून्या,
हेच तर इंगित आहे केजरीवालांचे. सतत सतत कोणाकडे तरी बोटे दाखवत फिरायचे. आणि लोकांना वाटते की वा हा माणुस काय बोलती बंद करतो आहे सर्वांची. अतिशय धुर्तपणाचा कळस आहे की नाही हा
प्रश्न विचारलाय तर विचारणार्यालाच कोंडीत पकडायचे, वा काय न्याय आहे ना
महेश, विपूचे उत्तर दिले आहे.
महेश,
विपूचे उत्तर दिले आहे.
महेश त्यात एक बोट
महेश
त्यात एक बोट केजरीवालांकडे आणि दुसरे मिडिया कडे आहे.
महेश, अरे वा, जजमेंट देऊन
महेश,
अरे वा, जजमेंट देऊन मोकळे सुद्धा.
तुम्हाला काय काय माहीत आहे आपवर गेल्या ३-४ दिवसांत झालेल्या देणग्यांबद्दलच्या आरोपांबाबत? आणि तुमचं स्वतःचं काय मत आहे ?
<<त्यात एक बोट केजरीवालांकडे आणि दुसरे मिडिया कडे आहे.>> +१
कालची मुलाखत घेणारे सुधीर चौधरी म्हणजे १०० कोटींच्या खंडणीप्रकरणात तुरुंगात जाऊन आलेले गृहस्थच आहेत ना? किती अरेरावी आणि कडवटपणा होता त्याच्या बोलण्यात
केजरीवालांनी बोलता-बोलता त्याला जनतेची माफी मागायला सांगितलं
AK is learning to rein his anger. Good.
हो हो तेच ते १०० कोटीवाले.
हो हो तेच ते १०० कोटीवाले. झोप हवी असेल तर झी न्यूजवर यांचा कार्यक्रम जरूर पाहा. :):-):स्मित:
कुठला कार्यक्रम?
कुठला कार्यक्रम?
रात्री आठ किंवा नऊ नंतर
रात्री आठ किंवा नऊ नंतर दिसतात ते TV वर.
जाहिर प्रचार संपला. बाहेरून
जाहिर प्रचार संपला. बाहेरून आलेले सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आज दिल्लीबाहेर जाणार. आज रात्री कार्यकर्त्यांना हॉटेलात बुकींग नाहीये. ज्या लोकांच्या उद्या सकाळच्या ट्रेन्स आहेत तेसुद्धा आज हॉटेलांमधून चेकआउट करून ओळखी-पाळखीच्या कोणाच्या तरी घरी आजची रात्र काढणार.
बाहेरचे कार्यकर्ते परत गेलेत ना हे चेक करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी हॉटेलांमध्ये चेक करतात असं कळलं. (ही सगळी माहिती माझ्यासाठी नवीनच होती.)
बाहेरून आलेले सगळ्या पक्षांचे
बाहेरून आलेले सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आज दिल्लीबाहेर जाणार >> खासदार, केंद्रीय मंत्र्यांनापण बाहेर घालवायला पाहिजे की ते कार्यकर्त्यांमधे मोडत नाहीत
तुमचं दिल्लीमध्ये घर असेल तर
तुमचं दिल्लीमध्ये घर असेल तर कामासाठी थांबता येतं. त्यामूळे खासदार आणि केंद्रिय मंत्र्यांना हा नियम लागू होणार नाही. नातेवाईकांकडे पण थांबू शकतात. झालंच तर शेजारच्या राज्यात पण थांबता येईल लोकांना. पण आपचे कार्यकर्ते/ नेते मात्र कालपासूनच परत जायला लागलेत.
आमच्याकडच्या (घरातल्या) आपच्या कार्यकर्त्यांना परतीचं कन्फर्म तिकिट न मिळाल्याने ते अजून २-३ दिवस घरीच असतिल. नातेवाईकांकडे थांबलेत म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन नसेल ते.
मोदीनां जनतेने आश्वासन दिले
मोदीनां जनतेने आश्वासन दिले आहे. ' वोट देंगे आपको '
>>मोदीनां जनतेने आश्वासन दिले
>>मोदीनां जनतेने आश्वासन दिले आहे. ' वोट देंगे आपको '<<
आय्ला, मोदिंनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देउन दिल्लीत उमेदवारीचा अर्ज भरला कि काय??? (रिवर्स केजरीफिकेशन)
मोदींना जनतेने आश्वासन दिले
मोदींना जनतेने आश्वासन दिले आहे. ' वोट देंगे "आप" को '
पूर्ण प्रचार "चलो चले मोदी के साथ" असं म्हणून केला. पण आता मोदींना वाचवायची भाजपाची तयारी सुरू सुद्धा झाली.
दरम्यान, काही पक्षांचे "प्रचारकार्य " जाहीर प्रचार संपल्यावरच सुरू होतं. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपने 'आप स्पायकॅम सेना' सज्ज केली आहे--२०००+ छुपे कॅमेरे आणि ६०००+ छुपे ऑडिओरेकॉर्डर्स. आणखीनच कोंडी.
विकु महाभारतातील संजया
विकु
महाभारतातील संजया प्रमाणे अल्पनाजी प्रत्यक्ष युद्धस्थानावरून जे अपडेट्स देत आहेत >> हे मस्तय
मिर्ची, माझे मत सांगितले तर
मिर्ची, माझे मत सांगितले तर तुम्हाला कदाचित पटणार नाही.
सद्ध्या तरी आपने देणग्यांचा एवढा बाऊ करून आ बैल मुझे मार करून घ्यायला नको होते.
सरळ सरळ अन्य पक्षांप्रमाणे फंड उभारून केवळ नियमाने आयटी फाईल करणे असे केले असते तरी ठीक होते.
कालच बरखाने रविशंकर प्रसाद आणि योगेन्द्र यादव दोघांना अगदी पिनपॉइन्टेड प्रश्न विचारल्याचे पाहिले.
आणि यादव चक्क बॅकफूटवर दिसले. काय बोलणे झाले ते लिहितो जरा वेळाने.
आपला मिळालेल्या २ कोटींच्या
आपला मिळालेल्या २ कोटींच्या देणग्या त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर कोणाकडून मिळाल्या ते जाहिर केले,
पण त्या कंपन्या नकली असल्याचे निष्पन्न झाले, इ. सर्वांना माहिती आहेच.
त्यावर कालच्या शो मधे बरखाने योगेन्द्र यादवांना विचारले की तुम्ही लोक स्वतःच मापदंड ठरवता चांगले असण्याचे, इतरांचे चुकीचे आहेत असे म्हणत असता हे कितपत योग्य आहे.
उलट तुमच्या चांगले असण्याच्या निकषांमधे तुम्हीच बसत नाही आहात तर यावर तुमचे काय म्हणणे आहे.
सुरूवातीला त्यांनी एक युक्तिवाद केला तो असा,
आम्हाला देणग्या मिळाल्या त्यामधे काही लपवाछपवी न करता आम्ही त्या जाहीर केल्या, आता मुळात त्या कंपन्या खर्या नाहीत त्याला आम्ही काय करणार किंवा असा काही कायदा पण नाहीये.
पण त्यावर प्रसाद यांचे म्हणणे होते की साधारणपणे सर्व पक्ष पाळतात तो पायंडा असा आहे की ज्या काही देणग्या मिळतात त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे आणि पक्षाचे इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे भरणे. देणग्यांचे स्त्रोत जाहीर करणे बंधनकारक नाही. आपवर असलेला सर्वात प्रमुख आक्षेप हा होता / आहे की लोकसभा निवडणुकांनंतर अजुनपर्यंत त्यांनी टॅक्सच्या नियमांची पुर्तताच केलेली नाही.
कधी नव्हे ते यादव म्हणाल्याचे मी पाहिले की आम्ही काही नविन पायंडा / मापदंड ठरवले राजकारणात हे खरे आहे आणि आम्ही त्या कंपन्यांची सखोल चौकशी करायला हवी होती हे ही खरे आहे, पण आमच्याकडे असलेल्या अपुर्या बळामुळे आणि कमी वेळामुळे आम्ही असे करू शकलो नाही, पण पुढे नक्कीच यावर विचार करून जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू. तसेच टॅक्सच्या नियमांची पुर्तता झाली नव्हती / नाही हे अयोग्य आहे असे आम्ही मानतो आणि त्यांची पुर्तता पण वेळेत केली जाईल याची काळजी घेऊ.
अजुन एक आक्षेप होता तो पण यादव यांनी मान्य केला, तो आत्ता आठवत नाहीये.
http://www.ndtv.com/video/player/the-buck-stops-here/will-modi-juggernau...
Pages