अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी ह्याआधी कधीही कुठल्या पक्षाच्या प्रचारासाठी दारू-पैसे कसल्याही आमिषाशिवाय तरूणाई रस्त्यावर उतरून जीव तोडून आपलं म्हणणं मांडताना पाहिलेली नाही. डान्स फॉर डेमोक्रसी आणि प्ले फॉर चेंज ह्या उपक्रमांमार्फत एक संपूर्ण वेगळ्या पद्धतीने प्रचार चालू आहे. इट्स टोटली डिफरण्ट...आय एम इम्प्रेस्ड विथ इट.

हे पहिल्यांदा घडत नाहीये भारतात. पुर्वी जेपींच्या आंदोलनात असे घडले होते.

असो, भाजपला बदनाम करण्याएवढे वाईट नक्कीच नाहीये एवढे मला कळते.
कदाचित तुमच्या एवढे अभ्यासू लिहून बाजू पटवून देता येणार नाही मला, पण माझा विश्वास आहे त्यांच्या चांगुलपणावर. Happy

तसा तर तो आपवर पण होता पहिल्या निवडणुकीच्या वेळेस, आता एवढा नाहीये, पण त्यांचा विद्वेष करत नाहीये मी. उलट एकदोन पोस्टमधे लिहिले आहेच की आपला बहुमत मिळाले तरी हरकत नाही. त्यांनाही संधी मिळू दे.
पण हेच आपला आणि कॉन्ग्रेसला मानणारे एकदा सुद्धा भाजप बद्दल म्ह्णत नाहीयेत. तळमळीने द्वेष करत आहेत. Sad

मिर्चीताई, तुमच्या पोस्ट लवंगी मिर्ची पेक्षा पण जहाल आहेत.अशा खुप सार्‍या मिर्च्यांची गरज आहे.

>>जेपींच्या आंदोलनाच्यावेळी आम्ही जन्मलो नव्हतो ना पण...
मग ? त्याने जे घडले त्यात कुठे काही बदल होतो ?
लोक कोणत्याही आमिषाशिवाय जेपींच्या आंदोलनात सामिल झालेच होते.
माझे म्हणणे एवढेच आहे की आपने "पहले हम" न म्हणता "पहले आप" म्हणावे. Happy

साती, अगदी लाखमोलाचं बोललात! आपण जन्मल्यावर जग सुरू झालं अशी इथल्या काही सदस्यांची समजूत आहे. Wink
आ.न.,
-गा.पै.

साती +१

<<मिर्चीताई, तुमच्या पोस्ट लवंगी मिर्ची पेक्षा पण जहाल आहेत.अशा खुप सार्‍या मिर्च्यांची गरज आहे.>>

ज्यांना शक्य आहे त्यांनी बिया पेरत रहायच्या.आणखी मिर्च्या उगवतील....:डोमा:

<<कदाचित तुमच्या एवढे अभ्यासू लिहून बाजू पटवून देता येणार नाही मला, पण माझा विश्वास आहे त्यांच्या चांगुलपणावर. >>

महेश, हे बोलणं म्हणजे अगदी आपल्या पंप्रसारखंच झालं की ! Happy

<<आपण जन्मल्यावर जग सुरू झालं अशी इथल्या काही सदस्यांची समजूत आहे.>>

आप जन्मलो, जग सुरू झालं, आप मेलो जग बुडालं ! Wink

>>महेश, हे बोलणं म्हणजे अगदी आपल्या पंप्रसारखंच झालं की !
अरे वा, म्हणजे भविष्यात आमाला बी चानस मिळू शकतो तर Wink

जोक अपार्ट, भाजपवर विखारी टिका करून आम्हीच किती चांगले आहोत हे सांगत सुटलेल्या आपला पहाणे असहनीय आहे. Sad
पण अर्थात बरोबरच आहे असे नाही केले तर त्यांना विचारेल तरी कोण Wink

राजकारण हे नेहमी प्रस्थापितांना विरोध करूनच का केले जाते ?
याला दुसरा काही मार्ग नाही काय याच्या शोधात.

<भाजपवर विखारी टिका करून आम्हीच किती चांगले आहोत हे सांगत सुटलेल्या आपला पहाणे असहनीय आहे>

अमका नक्षलवादी, तमकी जर्सी गाय, ढमकं हायब्रिड वासरू, मोदीविरोधकांची जागा पाकिस्तानात ही तर अगदी अमृतातेही पैजा जिंके अशीच भाषा आहे. नाही का? ती ऐकल्यावर मनात कसे सात्त्विक भाव जागृत होतात म्हणून सांगू!

निवडक गोष्टी घेऊन टिका करू नये ही विनंती.

भाजप पुर्णपणे चांगला पक्ष आहे असे नाही, त्यामधे काही अविवेकी आणि अतिउत्साही लोक आहेत ज्यांच्यामुळे हानी होत आहे. पण असे लोक सर्वच पक्षात असतात असे नाही का ?
माझा मुद्दा एकच आहे की आपचा "आम्हीच काय ते चांगले आणि बाकीचे वाईट" हा हेका चुकीचा आहे.

अनेक वर्षे दबल्या गेलेल्या लोकांना आवाज मिळाला की त्यामधे कमी जास्त होणार.
केंद्र सरकारने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

माझे वैयक्तिक मत असे आहे की मोदींचे जे व्यक्तिमहात्म्य वाढले (किंव वाढवले) आहे ते जरा जास्तच होत आहे. पण केंद्रातील निवडणुकांच्या वेळेस दुसरा पर्यायदेखील नव्हता.

मिर्ची ताई

आप मध्ये जे २ कोटी बेनामी पैसे जमा झाले आहेत ( ५० लाख ४ बोगस कंपन्याकडुन) त्याबद्दल तुमच काय मत आहे. आप मधले बरेच नेते ह्याला भाजप ची चाल आहे किंवा बाकीचे पण करतात असे स्पष्टीकरण देत आहे. फक्त कमल मित्र चिनॉय चुक झाल्याचे मान्य करत आहेत.

२ कोटी ही काही कमी रक्कम नाही. जरी हे पैसे चेक ने आले तरी कुठुन आले हे बघणे त्याचे काम होते. ह्या कंपन्या आप ला देणगी देण्यासाठीच जन्माला आल्या होत्या. त्यानी आपला देणगी द्यायचे सोडुन दुसरे काही काम केले नाही. आप पण हे चेक आपल्या खात्यात जमा करुन त्यवर ८ महिने बसुन होते.

थोडक्यात बाकीचे पक्ष आणी आप मध्ये काही फरक नाही. बाकीचे पक्ष रोकडा घेतात तर आप वाले बोगस कंपनीच्या चेक तर्फे घेतात. बाकीचे पक्ष ५ वर्ष सरकार तरी चालवतात. ४९ दिवसात पळुन जात नाहीत.

मागील निवडणुकीत क्रमांक दोनवर असताना सत्ता स्थापन करायचीच नव्हती. जर "हम राजनीती करने नही आये हैं जी" असेल तर सरळ सांगायचे होते की आम्हाला स्पष्ट बहुमत नाहीये, त्यामुळे आम्ही अजिबात सत्ता स्थापन करणार नाही आहोत. हवे असेल तर भाजप आणि कॉन्ग्रेस यांनी मिळून सरकार बनवावे आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून राहू. असे केले असते तर इतिहास काही वेगळा घडला असता आणि आप बद्दल खुप काही विरोधी सूर उमटले आहेत तसे न होता त्यांची प्रतिमा अजुनच उजळली असती.

एखादी कंपनी किंवा व्यक्ती जेव्हा चेकने देणगी देते तेव्हा त्या कंपनीचे किंवा व्यक्तीचे ऑडिटही आपनेच करावे ही अपेक्षा चुकिची आहे. हे सरकारचे काम आहे. आपल्याला आलेल्या सार्‍या देणग्या इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याची हिंमत फक्त आपच दाखवते. राजकीय पक्ष RTI खाली यावेत अशी मागणीही फक्त आपच करते आहे. मुळात हे तथाकथित स्कँडल आपने देणग्या प्रसिद्ध केल्यामुळेच बाहेर आले आहे. भाजप लब्बाड आहे. आपल्या देणग्या प्रसिद्ध करत नाही आणी आपने प्रसिद्ध केलेल्या यादीतून अशी प्रकरणे बाहेर काढून ट्वीटर वर ट्रेंड करायचा प्रयत्न करते.

हे पहा AVAM चे खरे रूप.

https://www.youtube.com/watch?v=-Q3Ck-KOCpM

बर, मग भाजप किंवा काँग्रेसला किती देणग्या आणि कशा मिळतात ह्याची चौकशी 'आप'नीपण करू नये अशी अपेक्षा ठेवावी का?

लेखावर मस्त प्रतिक्रिया आहेत! आपचा जाहीरनामा हा डावीकडे झुकलेला वाटतोय अस मला वाटते. अनेक उद्दिष्टे आणि योजना विचारपूर्वक आखलेल्या वाटत आहेत आणि काही तर अचाट आहेत - जसे … पेन्शन योजना अन १५ लाख कैमेरे. पण १५ लाख कैमेरे लावलेत तर त्यांवर लक्ष कस ठेवणार? ते फक्त गुन्हा घडून गेल्यावर गुन्हेगार पकडण्यासाठी उपयुक्त ठरतील असे वाटते. अर्थात तेही नसे थोडके

काही सुरेख मुद्दे म्हणजे जनरिक औषधांचा प्रचार आणि डॉक्टरांना संरक्षण, हे आवश्यकच झालय.

इतरही भरपूर मुद्दे आहेत जसे दिल्लीला शैक्षणिक, व्यापारी, सेवा सुविधा अन पर्यटनकेंद्र बनवणे. अर्थात दिल्लीची सध्याची इमेज बघता हे करण आपला कठीण जाणार. यमुना शुद्धीकरण प्रकल्पसुद्धा छान वाटतोय. आपच्या समित्यांनी त्यांना कसे आर्थिकदृष्ट्या मदत पुरवायची हेही ठरवले असेलच.

सो यंदा होऊन जाऊदे आपचे सरकार!!

भरत, विकु +१

<<२ कोटी ही काही कमी रक्कम नाही. जरी हे पैसे चेक ने आले तरी कुठुन आले हे बघणे त्याचे काम होते. ह्या कंपन्या आप ला देणगी देण्यासाठीच जन्माला आल्या होत्या. त्यानी आपला देणगी द्यायचे सोडुन दुसरे काही काम केले नाही.>>

ज्या बोगस कंपन्यांनी देणग्या दिल्या त्यांचा जन्म आप च्या जन्माआधी झालाय ! वॉव, आप कडे 'टाइमटर्नर' पण आहे...यिप्पी ! Wink
fake companies.jpgkake companies 2.jpgFake companies 3.jpgfake companies 4.jpg

<<बर, मग भाजप किंवा काँग्रेसला किती देणग्या आणि कशा मिळतात ह्याची चौकशी 'आप'नीपण करू नये अशी अपेक्षा ठेवावी का?>>

अज्जिबात ठेवू नये. कारण "सर्व(आपसहित सर्व) राजकीय पक्षांच्या देणग्यांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी" असं पत्र आपचे नेते आजच सुप्रिम कोर्टाकडे देत आहेत !
आता सोनिया गांधी आणि अमित शहा काय करतात तेवढं सगळेजण पाहूया Wink
प्राऊड ऑफ माय लीडर ! (राघव चढ्ढा दरवेळी डिबेटसमध्ये केजरीवालांचा उल्लेख 'माय लीडर' म्हणून करतो, मस्त वाटतं. :))

<<मागील निवडणुकीत क्रमांक दोनवर असताना सत्ता स्थापन करायचीच नव्हती. जर "हम राजनीती करने नही आये हैं जी" असेल तर सरळ सांगायचे होते की आम्हाला स्पष्ट बहुमत नाहीये, त्यामुळे आम्ही अजिबात सत्ता स्थापन करणार नाही आहोत. हवे असेल तर भाजप आणि कॉन्ग्रेस यांनी मिळून सरकार बनवावे आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून राहू. असे केले असते तर इतिहास काही वेगळा घडला असता आणि आप बद्दल खुप काही विरोधी सूर उमटले आहेत तसे न होता त्यांची प्रतिमा अजुनच उजळली असती.>>

"काँग्रेसचं समर्थन का घेतलं हा प्रश्न जे अजूनही विचारत आहेत ते एकतर राजकीय धूर्त आहेत....किंवा राजकीय मूर्ख !" ---कुमार विश्वास.
खूप उगाळून झालाय हा विषय आता. पुरे करू या.

कालच्या प्रकाराने एक मोठ्ठा ज्ञानोदय झाला - हवाला व्यवहार राष्ट्रीयीकृत बँकांच्या धनादेशातून होतात ! ---धन्यवाद पियुष गोयलजी Wink

८ महिने झाले सत्तेत येऊन. ढळढळीतपणे दिसून येणार्‍या बोगस कंपन्यांच्या सूत्रधारांना पकडून कारवाई करता येऊ नये अजून??? Uhoh

निवडणूकीच्या आधीची चिखलफेक म्हणजे दुसरं काय असतं?

aap funding.jpg

ह्याचं कारण एकच आहे--भाजपाकडे दिल्लीकरांना देण्यासारखं काहीही नाही. त्याउल्ट आपने मजबूत प्लॅन समोर ठेवला आहे.

aapvsbjp1.jpg

>>"काँग्रेसचं समर्थन का घेतलं हा प्रश्न जे अजूनही विचारत आहेत ते एकतर राजकीय धूर्त आहेत....किंवा राजकीय मूर्ख !" Lol
मुद्दे नसले की असे होते मिर्ची मॅडम (तुमच्या बद्दल नाही कुमार बद्दल म्हणत आहे)

आपले वय काय ? आपली उंची किती ? आपले वजन किती ? आपण उड्या किती मारतो ? Wink

आधी दिल्लीतला लोकल पक्ष म्हणुन वर यायचे आणि मगच जास्त हातपाय पसरायचे असे करायला काय हरकत होती ? एकीकडे म्हणायचे की हम राजनीती करने नही आये हैं आणि केंद्राच्या निवडणुका लढविण्याची हनुमान उडी घेऊन तोंडावर पडायचे. Uhoh

<निवडक गोष्टी घेऊन टिका करू नये ही विनंती.

भाजप पुर्णपणे चांगला पक्ष आहे असे नाही, त्यामधे काही अविवेकी आणि अतिउत्साही लोक आहेत ज्यांच्यामुळे हानी होत आहे. पण असे लोक सर्वच पक्षात असतात असे नाही का ?>

माझ्या पोस्टमधली जर्सी गाय, हायब्रीड वासरू, नक्षलवादी, एके फोर्टिनाइन ही सुवचने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मुखारविंदातून ओघळलेली आहेत. त्यांना अविवेकी व अतिउत्साही म्हणताय?

विरोधकांना उदार मनाने पाकिस्तानात जागा देणार गिरिराज सिंह सध्या केंद्रिय मंत्री आहेत.

काल मीमराठी वर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आप ला मिळत असलेल्या देणग्यांविषयी ना-ना आरोप करीत होते. आप च्या प्रवक्त्यांनी आणि सूत्रधार वागळे यांनी त्यांना रोकडा सवाल टाकला. जर भाजपला अस वाटतेय आप ला काळापैसा देणगी स्वरुपात मिळतोय, तर ते त्याची सखोल चौकशी का करीत नाहीत. संपूर्ण सरकार तुमच आहे, पोलिस खात, गुप्तहेर खात, आयकर खात, सगळच तर आहे तुमच्याकडे.

या प्रश्नाला केशव उपाध्ये यांच्याकडे कोणतही उत्तर नव्हत. फक्त टोलवाटोलवी चालली होती. यांनाही कळून चुकलेलं आहे जर चौकशी केली तर यातून काहीही निष्पन्न होणार नाही उलट झाली तर भाजपचीच बदनामी होईल. निवडणुकीपर्यंत फक्त आरोपांची राळ उडवायची, चौकशी नको.

vijaykulkarni | 2 February, 2015 - 21:28
एखादी कंपनी किंवा व्यक्ती जेव्हा चेकने देणगी देते तेव्हा त्या कंपनीचे किंवा व्यक्तीचे ऑडिटही आपनेच करावे ही अपेक्षा चुकिची आहे. हे सरकारचे काम आहे. आपल्याला आलेल्या सार्‍या देणग्या इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याची हिंमत फक्त आपच दाखवते. राजकीय पक्ष RTI खाली यावेत अशी मागणीही फक्त आपच करते आहे. मुळात हे तथाकथित स्कँडल आपने देणग्या प्रसिद्ध केल्यामुळेच बाहेर आले आहे. भाजप लब्बाड आहे. आपल्या देणग्या प्रसिद्ध करत नाही आणी आपने प्रसिद्ध केलेल्या यादीतून अशी प्रकरणे बाहेर काढून ट्वीटर वर ट्रेंड करायचा प्रयत्न करते.>>>> +१०००

महेश, नवीन काहीतरी बोला हो.

युरो, घोषणा चालू आहेत. तरूण-वृद्ध "दिल दिया है, जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए" म्हणत, गिटार वाजवत फिरत आहेत. पण आपल्याला नाही दिसणार हे. कारण मिडिया आपच्या प्रचारसभा नाही दाखवत...दिवसभर #HawalaAtMidnight वर काथ्याकूट करत बसतो.

Delhi polls: AAP moves to SC for SIT probe into funding of BJP, Congress and self बूमरँग का काय म्हणतात ते हेच का ? Wink

भरत +१
"चमडी उधेड देंते", "पीठ में छुरा खोप दिया" वगैरे वाक्प्रचार व्यासपीठावरून बोलणारे मोदी हे बहुतेक भारताचे पहिलेच पंतप्रधान असावेत !

खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार.....'चौकीदार', 'थानेदार' और 'तडीपार' ---ट्वी. साभार.

सुनटून्या +१

एकंदरीत भाजप प्रचारात न इतर गोष्टींमध्ये मागे पडलीय Lol मोदी सरकारच्या शिडातली हवा दिल्लीत गायब झालीय, कारण एकच, जेवढे बोलले तेवढे केले नाही.

बाकी आपचा जाहीरनामा जोऱ्यात आहे. वर जसे चर्चिले आहे, त्या प्रमाणे आपची सत्ता दिल्लीत आली तर दिल्ली सरकारचे हा मजबूत प्लॅन प्रत्यक्षात आणण्याइतके बजेट आहे काय असा प्रश्न पडतो.

असल्यास फारच उत्तम, पण नसल्यास काय उपाययोजना?

की पुन्हा केंद्र पैसे देत नाही म्हणून धरणे धरणार काय? एकंदरीत पुन्हा धरण्यांमध्ये हरवायची वेळ दिल्लीवर येउ नये Happy

आप सतत भाजप विरोधात बोलत असल्यामुळे मला त्यांचा खुप राग येत आहे इतकेच. आता अजुन नविन काय सांगू ?
असे असले तरी मी त्यांना शुभेच्छाच देत आहे. पुर्ण बहुमत मिळवून दाखवा करून काय दाखवायचे ते. Happy

"I think we should keep the honorable courts away from this dirty politics: FM Arun Jaitley on AAP to move SIT " Rofl Lol 'आ बैल मुझे मार' केल्यानंतर आता ही पश्चातबुद्धी ?

<<आप सतत भाजप विरोधात बोलत असल्यामुळे मला त्यांचा खुप राग येत आहे इतकेच. >>

महेश, तुम्ही म्हणतात ते लोकसभा निवडणूकीच्या वेळचं असेल तर मान्य आहे. पण दिल्लीतील आत्ताच्या निवडणूकीत आपने पूर्ण फोकस फक्त सकारात्मक मुद्द्यांवर ठेवल्याचं स्पष्ट दिसतंय. उलट भाजपा ह्यावेळी अगदीच अशोभनीय जाहिराती, विधाने देऊन नकारात्मक प्रचार करत आहे.
असो.

कदाचित भाजप आणि आप मधे यावेळेस आपने यावे यासाठी गुफ्तगु असू शकेल. हू नोज ? Wink

काँग्रेस बाद झालीय स्पर्धेतून! त्यांच्याविषयी काय बोलणार? अन भाजप स्वताहून बावळटपणा करत सुटलाय. ज्या पध्द्तीन काँग्रेस मोदींवर आरोप प्रत्यारोप करत होती, अगदी तेच आज भाजप करतेय आप अन केजरीवालांबाबत. इतक्या लवकर काँग्रेस होईल त्यांची वाटल नव्हता.

काँग्रेसवर लोक खरोखर चिडले होते. परंतु ४९ दिवसांमध्ये आपनी काम केले होते अन त्यामुळे जनतेस सुप्तावस्थेतका होईना सहानुभूती होतीच. अन पंतप्रधान, अक्खा भाजपचा फौजफाटा यामुळे एक केजरीवाल विरुद्ध प्रचंड ताकदीचे भाजपचे लोक, असा सामना तयार करण्यात केजरीवाल यशस्वी ठरले अन त्यामुळेच केजरीवाल त्या सहानुभूतीस परत मिळवण्यास समर्थ ठरले

लोकसभेच्या वेळेची आक्रमक अन अचूक टाईमिंग साधणाऱ्या भाजपच्या सोशल मीडिया टीमला काही कळून नाही राहिलंय अस वाटतंय. कारण ते काँग्रेसविरुद्धची स्ट्राटेजी आपविरुद्ध वापरत आहेत आणि म्हणूनच ती आपटणार आहे.

एकंदरीत निवडणुकीत अतिआत्मविश्वासानी अपुर्या तयारीनिशी उतरल्यावर जे हाल होणार असतात, तेच हाल सध्या भाजपचे होताहेत, एका मागोमाग एक योजना फेल जाऊन राहिल्यात अन म्याच हातातून गेल्याच पहाव लागतंय Lol

जेटली अस बोलले?? घ्या आता!!! Rofl Biggrin Lol

बेदी कमी होत्यात बोलायला की हे पण बोलून राहिले … तिकडे शहा डोक्यावरती हात आपटत बसलेत अस चित्र दिसतंय Wink

Pages