अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ की वाकडे जे काही असाल ते ,
फुटायचं मग.
हाय बाय करायला हे गप्पांचं पान वाटलं की चाट बॉक्स वाटला ? असल्या पानावर तुमच्यासारख्या ड्युआयडीशी हाय बाय अरण्यात जराही रस नाही. समजलं असेल तर पुन्हा या पानावर असला वैयक्तिक प्रतिसाद देऊ नका. कुठली गोष्ट कुठं करावी हे कळत नाही का ?
मुद्द्यावर काही बोलायचं असेल तर जरूर विचार करू. हा प्रतिसाद अशाच इतर भंपक लोकांनाही लागू.

सुचक

वर काऊला उत्तर दिले आहे. सविस्तर उत्तर (तर्काधारीत) नंतर वेळ मिळाल्यावर लिहीन. पटलं तर घ्या.
तोपर्यंत वाराणसी लोकसभा (२००९) निवडणुकीचे सांख्यिकी काढून ठेवा. पुढच्या चर्चेत सोपं जाईल आपल्याला. केजरीवाल तिथून लढल्याने नेमक काय झालं याबद्दल बोलूयात.

२००९

आप हे संघाचे पिल्लु आहे ?>>>>>आप ने घर वापसी सारखे कार्यक्रम केले किंवा चार मुलाचा फतवा काढला तर ते
संघाचे पिल्लु आणि जर विकासाची कामे केली तर आप.

घर वापसीचा कार्यक्रम भाजप करतेय का ? भाजपच्या राज्यात विकास नाही का होत ? गोवा, गुजरात. साधेपणात मनोहर पर्रीकर केजरीवाल यांना वरचढ ठरतील पण ते असो. तुम्ही निष्कर्ष काढलाच आहे तर आपण तो विषय बंद करूयात. काम वाचेल टंकण्याचं.

समाजवादी किंवा आपच्या समर्थकांचे म्हणणे आहे की मोदींसाठी सर्व वाहीन्यांनी पायघड्या घातल्या आहेत. त्याचं असंही म्हणणं आहे की आता सर्व वाहीन्यांवर अंबानींच वर्चस्व आहे. आयबीएन ७ हा ग्रुप अंबानींनी विकत घेतला. तसंच मोदींच्या निवडणुकीसाठी कार्पोरेट सेक्टरकडून पाण्यासारखा पैसा वाहीला. अधिकृत आकडे जाहीर झालेच आहेत. अनधिकृत सूत्र सांगतात की एक लाख कोटींचा चुराडा झाला.

याबद्दल काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

असल्या पानावर तुमच्यासारख्या ड्युआयडीशी हाय बाय अरण्यात जराही रस नाही.

>>>
लिहिणार्‍याचे वय पाच दिवस फक्त !!!::फिदी:

सुचक | 8 February, 2015 - 12:11

आप हे संघाचे पिल्लु आहे ?>>>>>आप ने घर वापसी सारखे कार्यक्रम केले किंवा चार मुलाचा फतवा काढला तर ते
संघाचे पिल्लु आणि जर विकासाची कामे केली तर आप.

>>> +१०१

सुरुवातीलाच पाच दिवस असू शकते वय. त्यातूनच पुढे पाच वर्षे होऊ शकते ना ? की डायरेक्ट दहा वर्षे वय होईल ?

पान क्र. २ वर मला जे म्हणायचे आहे त्यातले बहुतांश आलेले आहे. पुढेही आले असेलच. त्यामुळं पुन्हा लिहीण्यात अर्थ नाही. याला उत्तर दिलं गेलंय अं अद्याप दिसलेलं नाही.

झी न्यूजच्या पोर्टलवर संघ - केजरीवाल - टीम अण्णा संबंध यावर चांगलं भाष्य होतं. दुर्दैवाने अंबानी बंधूंच्या केजी बेसीन घोटाळ्यांच्या बातम्या जशा नाहीशा झाल्या तशा या लिंकदेखील आता उघडत नाहीत. काय कारण असेल ?

http://www.smartinvestor.zeebiz.com/hindi/tags/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%...

http://aajtak.intoday.in/story/arvinder-singh-lovely-says-aap-is-b-team-...

http://www.samaylive.com/nation-news-in-hindi/137126/arvind-kejriwal-mee...

काँग्रेसकडून जे आरोप केले गेले आहेत त्यात जराही संदर्भ नाहीत किंवा तर्क दिलेले नाहीत. यापेक्षा याच धाग्यावर जास्त माहीती दिली गेली आहे.

मी वरच्या एका पोस्टीत चौकटीत जी लिंक दिलेली आहे त्यात वाराणसीच्या निवडणुकीबद्दलचं भाष्य आहे त्यामुळे पुन्हा लिहायला नको. गरज पडल्यासच स्टॅट्स देऊन केजरीवालांच्या उमेदवारीने मोदींना कसा फायदा झाला हे दर्शवून देण्याची तयारी आहे. याची परतफेड दिल्लीत संघ आणि मोदी करणारच. मोदींच्या सभा मध्यंतरी बंद होत्या. बेदीबाईंना बळीचा बकरा म्हणून आणण्यात आले. शिवाय संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून भाजपची हालत खराब असल्याबद्दलचा लेख निवडणुकीच्या ऐन धामधुमीत छापून आला. यापूर्वीही भाजपला अनेकदा पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. पण असं कधी झालं नव्हतं. भाजपच्या पराभवाची कबुली संघाचं मुखपत्र देतं यातून कुठला संदेश जातो आणि कुणासाठी ?

केजरीवालांनी माझे संघाबरोबर संबंध नाहीत या म्हणण्याला काही अर्थ नाही. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या व्होटबेसचा फंडा बीजेपी विरोध आहे. त्यामुळं जर भाजपच सरकार नसेल तर भाजपच्या बी टीमचे सरकार निवडून यावे हा फंडा रामलीला मैदानावरच्या आंदोलनामागे असल्याचं आता समजून येईल. दिल्ली निवडण्याचे कारण म्हणजे जे दिल्लीत होतं ते संपूर्ण देशभर होतं. दिल्लीतून हा संदेश जाणार आहे की जर भाजपला पराभूत करायचं असेल तर ती क्षमता आप मधे आहे. मीडीयातून हा पक्ष गरीबांचा आहे हे सांगितलं जात आहे.

सगळं कसं व्यवस्थित प्लाननुसार चालू आहे.

व्वा व्वा छान प्लान आहे. संघाच्या नावाने का होईना विकास होन्याशी मतलब.
सर्वधर्मसमभाव जपले जाण्याशी मतलब
.भारतिय संविधानाची मुल्य जपुन भारताचा विकास होण्याशी मतलब

स्वतःच ठरवा. मला कशाला विचारताय ? इथं की बोर्ड बडवतोय तर तुमची शेरेबाजी चालू आहे.

<<आप ने घर वापसी सारखे कार्यक्रम केले किंवा चार मुलाचा फतवा काढला तर ते
संघाचे पिल्लु आणि जर विकासाची कामे केली तर आप.>> +१०००

<<घर वापसीचा कार्यक्रम भाजप करतेय का ? भाजपच्या राज्यात विकास नाही का होत ? गोवा, गुजरात.>>

भाजप केंद्रात सत्तेत आहे. घरवापसीसारख्या गोष्टींना भाजप विरोध करतंय का?? करणं गरजेचं नाही का??
गोव्याबद्दल अभ्यास केला नाही. गुजरातमध्ये विकास झालाय ह्यावर मुळीच विश्वास नाही. पण त्या चर्चेसाठी ही जागा नाही.

तुमच्या बाकीच्या मुद्द्यांवर आधीच लिहून झालंय. त्यामुळे पुन्हा तेच लिहिण्यात अर्थ नाही.

HSBC मध्ये खाती असलेल्या काही भारतीयांची नावे आज लीक झाली आहेत. इंडियन एक्स्प्रेसमध्ये मुख्यपानावर बातमी आहे. टीव्ही चॅनेल्सनी आपच्या "हवाला अ‍ॅट मिडनाईट(:हाहा:)" ला जितकं कव्हरेज दिलं होतं तितकं ह्या बातमीला देतात का ते बघायचं. त्या यादीत प.पू. अंबानी बंधूंचीही नावे आहेत. २०१२ मध्ये केजरीवालांनी पत्रकार परिषद घेऊन काही नावे उघड केली होती तेव्हा 'पत्रकार परिषद का दाखवली' म्हणून अंबानींनी चॅनेल्सवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती (की दाखल केला होता?)
२०१२ मधला व्हिडिओ.
तेव्हा रिलायन्सने स्विस बँकेत खातं असल्याचंच नाकारलं होतं.

"Reliance Industries Limited, the HSBC bank, the Dabur group have all denied the charges levelled against them by India Against Corruption activist-turned-politician Arvind Kejriwal who accused their chiefs of having crores of cash deposits in Swiss bank accounts where money, he alleged, was transferred through hawala."

<<घर वापसीचा कार्यक्रम भाजप करतेय का ?>>

हे बघा - भाजपा खासदार योगी आदित्यनाथांनी देशभरातील सगळ्या मशिदींमध्ये गौरी-गणपतींची स्थापना करायची धमकी दिली.
विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करून निवडून आलेलं भाजपा सरकार धार्मिक भावना भडकावणार्‍या स्वतःच्या खासदारांना ताब्यात ठेवू शकत नाही का????

"महात्मा गांधींना आम्ही मारलंय, आम्ही अरविंद केजरीवालांनाही जीवे मारू" म्हणणारे हिंदू महासभेचे प.पू. स्वामी ओमजी - दिल्लीत निवडणूकीला उभे राहिले आहेत. आवरा !! Proud Sad

http://www.dailyo.in/opinion/delhi-polls-were-no-class-war-even-middle-c...
उत्तम अ‍ॅनॅलिसिस, जसजसे मतदाराचा आर्थिक स्तर वाढत जातो तसा दिल्लीत भाजपचा व्होट शेअरही वाढतो! गरीब, दलित, कनिष्ठ मध्यमवर्ग यात 'आप'ला जोरदार पाठिंबा आहे.

आप ला मला वाटते की गरीब जनते बरोबरच बिजेपी पासून या वाचाळांमुळे बाजूला गेलेल्या तरूणांचा ही पाठींबा मिळाला.

आता तरी ५ वर्ष नीट काम करावे

कुडोस टू आप ! क्लिन स्वीप !

काँग्रेस तर कुठेही नाही. गंमत म्हणजे आपने जे काँग्रेसचे लोकं "आपने" आयात करून पवित्र केले ( भाजपासारखेच) ते पण निवडून येत आहेत. (बाकी मिर्चीचे मत ह्यावर कळाले नव्हते. Happy मे बी ते पवित्रच असावेत. Happy

केजरीवाल लहर आहेच, पण त्याही पेक्षा खरे कारण .. मोदीकडून लोकांचा खूप अपेक्षा आहेत आणि ती काही एका वर्षात पूर्ण होऊ शकणार नाहीत हे खरे असले तरी बिजेपीची जास्त भाषणं आणि कमी कृतीने लोकं भाजपाकडून आपकडे वळली.

आप आणि केजरीवालांचे अभिनंदन ! दिल्ली जनतेने भाजपाला योग्य ती जागा दाखवून दिल्याबद्दल दिल्ली जनतेचे अभिनंदन !

आता आपवरही जागता पहारा येणार का? Proud

केदार खरे म्हणजे अती बोलणार्‍यांना आवरू न शकल्या मुळेच मोदी आता दिसत होते तितके मोठे दिसत नाहीत आणि यामुळे लोकांचा भ्रमनिरास झालाय. ते सगळे पुन्हा आपली चूक मान्य करणार्‍या केजरीवालांच्या पाठीमागे गेले.

EC नुसार - अ/ब/क --४६/८/०

<<काँग्रेस तर कुठेही नाही. गंमत म्हणजे आपने जे काँग्रेसचे लोकं "आपने" आयात करून पवित्र केले ( भाजपासारखेच) ते पण निवडून येत आहेत. (बाकी मिर्चीचे मत ह्यावर कळाले नव्हते. स्मित मे बी ते पवित्रच असावेत. >>

केदार,
बाँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार "३ C" च्या चाचणीवर उतरले आहेत. राहता राहिला प्रश्न ह्या लोकांच्या फ्युचर कण्डक्टचा. आयात केलेले काय किंवा मूळचे काय, आपच्या कोणीही उमेदवाराने भ्रष्टाचार केला तर केजरीवालांनी त्यांना धमकी दिली आहे "बिल्कुल छोडूंगा नहीं, जहण्णूम तक पीछा करूंगा" !
हे जाहीर मुलाखतीत सांगितलंय. लोकांना आपच्या उमेदवारांवरही स्टिंग करण्याचं खुलं आवाहन आहे. आणि "जे बोलतील ते करतील" ह्याबद्दल माझा अकेवर विश्वास आहे Happy

<<आता आपवरही जागता पहारा येणार का? >>

नक्कीच यायला हवा. नो डाउट.

Pages