मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई मॅरॅथॉन साठी शुभेच्छा!!
मी सुद्धा आहे मुंबई मॅरॅथॉन मधे.

त्याने स्वतः आधीच ठरविलेल्या वेळात (साडेचार तास, ) ४ :३४ मिनिटात मुंबई मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल हर्पेनचे हार्दिक अभिनंदन !

शुभेच्छुक अखिल पेलटॉन ग्रूप Happy

मनःपुर्वक धन्यवाद ....
केदार, ट्ण्या, तृप्ती, पराग, मनीष, ज्ञाती, गजानन, मनीमोहोर
आभारी आहे मित्रांनो...

माझी सुरुवात खूपच चांगली झाली होती अजूनही चांगली वेळ देऊ शकलो असतो पण ....
हा पण .... आडवा येतो कधी कधी
अर्थात माझ्या मागच्या वेळेत आणि ह्या वेळेत बघीतले असता खूपच ( जवळ जवळ तासभराची) सुधारणा आहे.

त्यामुळे आनंद आहेच....

नितीन, तुम्हाला किती वेळ लागला?

अभिनंदन.. हर्पेन.
३ तास लागले कारण मॅरेथॉन च्या अगोदर ३ दिवस तब्येत बिगडली होती.
मी तुमचे फेसबुक पाहिेले. तुम्ही ग्रेट आहत. तुम्ही तर धावण्यासा वसा घेतला आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

धन्यवाद मृणाल, आणि धनि Happy

पुणे रनिंग तर्फे, येत्या महिन्याच्या शेवटच्या रवीवारी एक स्पर्धा निगडी येथे (भक्ती शक्ती चौकापासून सुरु होणाहो) आयोजित करण्यात आलेली आहे तरी कृपया अधिकाधिक जणांनी भाग घ्यावा ही विनंती.

हर्पेन तुझे लेख एकदम मोटिवेशनल आहेत. तेव्हा तु पळत आणि तितक्याच वेगाने लिहीत रहा. आम्ही इथे जरा वार्म होण्याची वाट पाहतोय.

टण्या! हाफ मॅराथॉन ३ तास.. bad timing..
पण महापौर मॅराथॉन नवी मुंबई १५ किलोमीटर साठी १ तास ५४ मि. टाइम माझा होता.
आणि आदल्या दिवशी सरावा साठी १० किलोमीटर धावलेलो. धन्यवाद

ज्ञाती धन्यवाद नक्की लिहिणार

नितीन - स्पर्धा पुर्ण केली हेच महत्वाचे वेळ बीळ काही खरं नाही.

तरीपण आदल्या दिवशी १० किमी पळणे हे काही बरोबर नाही. मोठ्या स्पर्धेच्या आदल्या दिवशीच काय पण आठवड्यात पायांना आराम द्यायचा असतो. पळलं तरी कमी पळायचं असतं.

स्पर्धा पुर्ण केली हेच महत्वाचे वेळ बीळ काही खरं नाही. >> हेच म्हणतो !

आराम खुप महत्त्वाचा आहे.

पुढचा स्पर्धेला शुभेच्छा!

अभिनंदन हर्पेन!

किती वेळ लागला त्यापेक्षा तुम्ही ते पूर्ण केलीत ह्याला महत्व आहे. धावताना अनेक वेळा असा विचार येतो कि बास झालं ...सोडुन देउया.. कशाला उगिच पळतोय. मला असं वाटतं तेच खरे कसोटीचे क्षण असतात. जेव्हा त्या विचारांवर मात करतो तेव्हाच खर्‍या अर्थाने आपण स्पर्धा पार पडलेली असते.

लगे रहो.
पुढच्या सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा.

-कमळी.

Pages