मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझा पेस कमी पडतो आहे का? काही वेळेस आपल्या नेहमीच्या पेस पेक्षा हळू पळलो तरी पायात गोळे येतात.

आमच्या वेळेस वातावरण ढगाळ आणि थंड होते पण सुदैवानी पाऊस नाही पडला. शेवटच्या ३ मैल मध्ये खुप वारे लागले त्यामुळे १ - २ मिनीट एक्स्ट्रा वेळ गेला बहुतेक.

आता तू जास्ती पळून पण काही उपयोग नाही. पाणी पिणे आणि पास्ता खाणे .. मज्जानी लाईफ Lol

आणि हो लेग कर्ल्स, लेग एक्स्टेंशन आणि रोजच्या १० तरी बैठका सुद्धा खूप प्रगती घडवून आणू शकतात.
फक्त लेग कर्ल्स आणि बैठका केल्या त्यादिवशी पळण्याचे रूटीन आजिबात नको.

धनि, मी जर नेहेमीपेक्षा हळू धावलो तर पाय नक्कीच दुखतात. गेल्या दोन-चार महिन्यात मी हळू धावण्याचा रादर कमी हार्ट रेटवर धावण्याचा सराव जास्ती केला. इन्टर्वल ट्रेनिंग केले पण तुलनेने कमीच. पण त्यामुळे माझा स्टॅमिना वाढला आहे - हाफ मॅराथॉनच्या सरावात मी एकदाच सव्वा तास धावलो होतो व थेट रेसमध्येच २१ किमी. पण या वेळी मी जवळपास प्रत्येक आठवड्यात १.४५ ते २.३० तास धावलो आहे. आता बघू हे सर्व काय फळ देते ते

टण्या... ओलेथाला तुला जमल तर चिअर अप करायला यायचा प्रयत्न करणार आहे.. स़काळी घरी किती वाजता येइन त्यावर अवलंबुन आहे. सुरुवात किती वाजता आहे? १५१ आणी रिज्व्ह्युला सुरुवात आणी शेवट आहे ना? का मधल्या कुठल्यातरी रस्त्यावर पाण्याची बॉटल आणु?:) तु फुल मॅरॅथॉन करणार आहेस का हाफ? कारण राउट्स वेगवेगळे आहेत.

धनि, हायझेनबर्ग, रार,टण्या,कमळी कमाल आहे तुम्हा लोकांची. मला माहीत नव्हते मायबोलिवर इतके मॅरॅथॉन प्रेमी आहेत.. रार आणी टण्याने मला सांगीतले होते पण हायझेनबर्ग तु सुद्धा? आणी हा धागा वैद्यबुवानी काढला आहे म्हणजे तोही मॅरेथॉनपटु आहे की काय? जबरी!

बरेच दिवसांनी हा धागा बघतोय आणि मस्त वाटतंय
स्पर्धा पुर्ण करणार्‍या सगळ्यांचेच अभिनंदन आणि पुढील स्पर्धेत भाग घेऊ ईच्छिणार्‍या सगळ्यांना शुभेच्छा

सध्या भारतात उन्हाळ्यामुळे फार मोठ्या स्पर्धा होत नाहीयेत. मला तर थोडासा हेवाच वाटतोय....

मुकुंद, तुम्हाला मेल करतो सविस्तर. १५१ आणी रिज्व्ह्युला सुरुवात आणी शेवट आहे. सुरुवात सकाळी ६:४५ ला आहे. मी पाच तासाचे टार्गेट ठेवले आहे. मी फुल मॅराथॉन करणार आहे. इथे मॅप आहे बघा.
http://ozrun.org/wp-content/uploads/2014/07/2015_Full_11x17.jpg

मी १६व्या मैलाला तीन तासानी पोचायचे टार्गेट ठेवले आहे. १६ मैल ते १८.५ मैल हा रस्ता पुन्हा १८.५ ते २१ मध्ये रिपीट होतोय.

धनि, अभिनंदन आणि शुभेच्छा पुढल्या कामगिरीसाठी.
टण्या, खूप शुभेच्छा... कोणतीही दुखपात न होता, ठरलेल्या वेळात फूल मॅरॉथॉन इंजॉय करत पूर्ण होऊदेत... नंतर अनुभव नक्की लिही.
मुकुंदा मला हाफ साठी आग्रहाचे आमंत्रण देत आहे , ते मी पुढील वर्षासाठी राखून ठेवते Happy

कसले काटकोनातले रस्ते आहेत.. एकदम मस्त..

टण्या फुल मॅरेथॉनसाठी शुभेच्छा... आणि अनुभवांवर वेगळा लेख पाड.. इथेच डकवू नकोस..

टण्या.. शनिवारी सकाळी १०० टक्के पाउस आहे आमच्याकडे..:(

मॅपमधे दर्शकांना उभे राहायची ठिकाणे म्हणजे प्रत्येक माइलचे माइल मार्कर आहेत की रिले एक्स्चेंज पॉइंट्सची आहेत? माइल मार्कर असतील तर माइल मार्कर १९(क्युव्हेरा व १२५ च्या आसपास) मला जवळ पडेल व तिथे तु तुझ्या टार्गेटप्रमाणे १० ते १० ३० च्या आसपास पोहोचशील अस वाटतय.. १० वाजेपर्यंत मी तिथे यायचा प्रयत्न करीन..(होपफुली) सुरुवात व शेवटला खुपच गडबड असेल पार्कींगची.

रार.. जरुर.. आता तु आणी टण्याबरोबर धनिला पण पुढच्या वर्षीचे आमंत्रण! हायझेनबर्ग.. तुही येउ शकतोस का?:)

टण्या.. मॅरॅथॉनसाठी माझ्याही शुभेच्छा!

हिम्सकूल.. मस्त आहे आमची सिटी!.. गार्मीन जी. पी. एस. (जी कंपनी या मॅरॅथॉनची मुख्य स्पॉन्सर आहे), स्प्रिंट टेलिकॉम कंपनी , ब्लॅक अँड विच,सर्नर व तसेच जगप्रसिद्ध हॉलमार्क कार्ड कंपनी.. या सगळ्यांचे हेड्क्वार्टर्स इथे आहेत.:)

५ तास ३५ मिनिट. It was hell. १३ मैल निम्म्या अन्तरापर्यंत मी माझ्या schedule प्रमाणे होतो. २ तास २० मि. मग १५व्या मैलाला पाय शिसाप्रमाणे जड झाले. आधी ४.४५ तास आणि मग ५ तास वाले पेसर पण पुढे गेले. १५ ते १६ मैल चालत थोडं पळत पार पाडला. १६.५ मैलावर बायको आणि सासूसासरे भेटणार होते म्हणून इज्जत राखायला पुन्हा पावलं उचलली. १६ ते १८.५ मैल रस्ता एका ट्रेलवर होता. आणि १८.५ मैलावर यु टर्न मारून पुन्हा २१ मैल त्याच रस्त्यावर परत. पाऊस जोरात पडत होता. चीखल होता. चढ उतार जाम. तसा सगळ्याच २६ मैल चढ उतार होते फ्लॅट रस्ता नावला नाही. पण या ट्रेलच्या ५ मैलानी घाम काढला. २ मिनट पळणे आणि १ मिनिट चालत असे निघालो. मग चालतच निघालो. पुन्हा बायको उभी होती तेव्हडे धावलो. म्हटले आता ६ तासात काय शक्य नाही. का नसती अवदसा आठवली म्हणुन स्वतःला शिव्या घालत होतो. पण मग एक जोडपं माझ्या सारखेच पाय खेचत होते. अजून चार पाच लोक पण होते. मग आम्ही सगळे थोडं २-३मिनिट चालायचं आणि मग मैलाचा झेंडा गाठायला खेच खेच खेचायचं असं करत २५ मैल गाठले. शेवटचा मैल कसा बसा मग चालत पळत गाठला. आता पाय अंग मजबूत दुखतय. मेडल फारच सुरेख आहे.

फार रनर नव्हते. फुल मॅरेथॉन मध्ये ६०० लोकं असावीत जेमतेम. त्यातल्या ५६० लोकांनी पूर्ण केली. माझा नंबर ४९५वा आला. कोर्स फ्लॅट आणि फास्ट आहे असे वेबसाइटवर लिहिले होते. That was far from truth. मी परत कधी पूर्ण मॅरेथॉनमधे भाग घेईन क़ी नाही ते माहिती नाही पण आजचा अनुभव आणि दमणूक दोन्ही माझ्या अनुभवात सर्वोत्तम

http://onlineraceresults.com/race/view_race.php?race_id=46270&submit_act...

garmin medal_!.jpg

टण्या.. अभिनंदन!

मला तर सकाळचा तास दिड तास पडणारा तुफान पाउस बघुन( ९ च्या सुमारास) वाटले बहुतेक मॅरॅथॉन रद्द करतील.. आमच्या इथे मुसळधार पावसाबरोबर चक्क वाटाण्या एवढ्या टणाटण गाराही पडत होत्या! मी म्हटले टण्या व इतर मॅरॅथॉनवाल्यांच काही खर नाही!

पण तश्याही परिस्थीतीत तु जिद्दीने रेस पुर्ण केलीस हेच मल कौतुकाचे वाटते. आता थकलेल्या शरीराची व स्नायुंची( काही काही ठिकाणी तुला स्नायु आहेत हे तुला आजच कळले असेल! Happy ) काळजी घे.

मस्तच रे टण्या, हार्दिक अभिनंदन

माझी पण पहिल्या (मुंबई) फुल मॅरॅथॉन ची वेळ साधारण साडेपाच तासच होती.

मी पण, त्यावेळी परत कधी पूर्ण मॅरेथॉनमधे भाग घेईन क़ी नाही ते माहिती नाही असेच म्हणत होतो.

माझ्या दुसर्‍या (हैदराबाद) मॅरॅथॉन्ला पण मी तितकाच वेळ लावला.
माझ्या तिसर्‍या (परत मुंबई) फुल मॅरॅथॉन ची वेळ ४ तास ३५ मिनिटे आहे.

चौथ्यात पण मी भाग घेणारे

तर सांगायचं तात्पर्य तुझ्या पुढच्या फुल मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा Happy

पण हाफ आणि फुल मॅरॅथॉन ह्या पुर्णतः वेगळ्या रितीनी सामोर्‍या जावे अशा गोष्टी आहेत.

आणि तू आता फुल मॅरॅथॉन पुर्ण करणार्‍या जगातल्या मोजक्या लोकांमधे मोडतोस

परत एकदा अभिनंदन

टण्या..... हार्दीक अभिनंदन, ग्रेट अचिव्हमेंट! हॅट्स ऑफ.
(खरे तर तुला उचलुन खान्द्यावर घेऊन नाचवित नाचवित अभिनंदन करायचे आहे..... तसच केलय असे समज! झकोबा (किंवा जे कोणी ताकदवान माबोकर) पुढच्यावेळेस टण्याला भेटतील, त्यांनी टण्याला माझ्या तर्फे उचलुन घेऊन अभिनंदन करा बर का! Proud )

२६ मैल म्हणजे कन्व्हरटर वर बघितले तर जवळपास ४२ किमि होतात म्हणजे निगडीहून पळत पुण्यात जायचे अन परत निगडीला यायचे.... अरे बापरे, आता अंतराचा अंदाज येतोय. खूपच आहे. अन सहा तासात ४२ किमि म्हणजे ताशी ७ किमीचा वेग.... म्हणजे साडेआठ मिनिटात एक किमी सरासरीने वेग हवा! अवघड आहे रे हे.

>>>> आणि तू आता फुल मॅरॅथॉन पुर्ण करणार्‍या जगातल्या मोजक्या लोकांमधे मोडतोस <<<<
क्क्या ब्बात है! मला हे वाक्य सगळ्यात जास्त आवडलं.

टण्या मस्त रे. हार्दीक अभिनंदन!! पुढील मॅरेथॉनसाठी शुभेच्छा. पुढ्च्या वेळेपासुन आता दर २ मैलानंतर बायकोला उभे कर. Wink

>>>> पुढ्च्या वेळेपासुन आता दर २ मैलानंतर बायकोला उभे कर. <<<<< Lol
गुड आयडिया...
[पांशा मोड ऑन: आता खोटं कशाला बोलू? वरच्या वाक्यात "एकेका" हा शब्द दिसत नसूनही वाचला गेला त्याबद्दल क्षमस्व
पांशा मोड ऑफ] Proud

Pages