मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पर्धे साठी शुभेच्छा Happy

लहान ढांगा, दीर्घ श्वास आणि थोडेसे पुढे झुकुन पळणे ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की काही अवघड नाही १०च काय २१ पण पळू शकाल.

पळण्यापुर्बी आणि मग पळून झाल्यावर स्ट्रेचिंग नक्की करायचे.

जास्त तयारी न झाल्या कारणाने स्पर्धा होईपर्यंत रोज योगासने केली तर त्याचा दुखापती न होण्याकरता (टाळण्याकरता) फायदा होऊ शकतो.

लहान ढांगा, दीर्घ श्वास आणि थोडेसे पुढे झुकुन पळणे ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की काही अवघड नाही>> +१

अगदी अचूक सांगितलेस हार्पेन!

गजाभाऊ अभिनंदन!

हर्पेन, टाचदुखी आता फारशी नाही. कधी कधी टाच दुखते पण फार टोकाची कळ वगैरे नाहीये. एप्रिलच्या मॅराथॉनसाठी तयारी करतोय.

अभिनंदन गजानन Happy

ट्ण्या - टाचदुखी येती-जाती असेल तर मग ठीके, एप्रिल ला फूल मॅरॅथॉनमधे भाग घेणारेस का?

टण्या, हर्पेन, धन्यवाद. Happy

आणि एक सांगायचं राहिलं. काल आमच्याबरोबर ५० अंध व्यक्तिही स्वयंसेवकांच्या मदतीने धावत होत्या. मला ते कसं जमवतात ते बघायची इच्छा होती. पण जमले नाही. पण या बातमीमुळेही माझा उत्साह दुणावला.

काल सायंकाळपासून उजव्या खांद्यातून अधूनमधून वेदना येत आहेत. Sad

गजानन, पुण्यात एका अश्या अंध मुलाना पळाताना पाहिल होतं मदतनिसाबरोबर. मी १० के पळत होते. ५० मी पळून पाहिल डोळे मिटून, पण दिसणे ह्या इन्पुट शिवाय फक्त ऐकणे ह्या इन्पूट नी पळण अशक्य वाटल. भारी आदर वाटाला मला त्यांचा आणि त्यांच्या जिद्दीचा. Happy
मुंबई मॅरॅथॉन कोण कोण पळतय?

गजानन, अभिनंदन.

इन्ना, तू आहेस कां मुंबई मॅरेथॉनला? माझी मैत्रिण आहे हाफ मॅरेथॉनसाठी.


आणि एक सांगायचं राहिलं. काल आमच्याबरोबर ५० अंध व्यक्तिही स्वयंसेवकांच्या मदतीने धावत होत्या. मला ते कसं जमवतात ते बघायची इच्छा होती. पण जमले नाही.
>>> पुण्यातली पिंकेथॉन ही अशा प्रकारच्या उपक्रमाची सुरुवात होती. मी स्वतःच अशा अंध / ज्यांना पुर्णतः नीट दिसत नाही अशा मुलींसोबत स्वयंसेवक म्हणून धावलो आहे. जे संपुर्णतः दृष्टीहीन असतात त्यांच्या करता दोन स्वयंसेवक होते व ज्यांना थोडेतरी दिसत आहे अशा व्यक्तींकरता एक स्वयंसेवक.
खरेतर आधी मुलींसोबत पळायकरता मुली / स्त्रीया स्वयंसेवक शोधत होते पण ह्या अंधशळेतील मुली इतक्या जोरात धावणार्‍या निघाल्या की स्वयंसेवक म्हणून तयार झालेल्या मुली / बायका त्यांच्या सोबत धावू शकल्या नाहीत. मग आयोजकांच्या खास परवानगीमुळे काही पुरुष स्वयंसेवकांना पिंकेथॉन मधे धावण्याची मुभा देण्यात आली.

पुण्यात्ल्या ए बी बी अर्थात अ‍ॅड्वेंच्र्र बियाँड बॅरियर ह्या संस्थेच्या पुढाकाराने असा उपक्रम हाती घेतला गेला आहे.
त्यावर एक वेगळाच लेख लिहायला हवा खरेतर

माझ्या आयुष्यातला एक अगदी अविस्मरणिय अनुभव होता तो.

पिंकेथॉन चे फिनिशर मेडल मिळवणार्‍या काही मोजक्या (म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या) पुरुष भाग्यवंतांमधे माझाही समावेश आहे. Happy

हर्पेन नक्की लिही.
मला कुतुहल आहे, त्यांच्या त्या वेगाच. बिन्धास्त धावत होत्या त्या मुली , गणेश्खिंड रोडवर, जेव्हा एका लेन मधून सकाळाच ट्रॅफिक चालू होतं.

इन्ना, आडो, केदार , धन्यवाद.

हर्पेन, अरे काय सांगता. नक्की लिहा. अश्या प्रकारच्या स्पर्धांबद्दल खूप उत्सुकता आहे.

पिंकेथॉन चे फिनिशर मेडल मिळवणार्‍या काही मोजक्या (म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या) पुरुष भाग्यवंतांमधे माझाही समावेश आहे. <<< याबद्दल अभिनंदन!
आता याबद्दलही सांगा. Happy

पिंकेथॉन चे फिनिशर मेडल मिळवणार्‍या काही मोजक्या (म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या) पुरुष भाग्यवंतांमधे माझाही समावेश आहे >>

अरे हे सांगितलेच नाहीस तू. अभिनंदन !!

अरे मित्रांनो पिंकेथॉन ही खास आणि फक्त बायका-मुलींसाठी होणारी स्पर्धा आहे. भारतातील अनेक शहरांमधे ही आयोजीत केली जाते. वर लिहिल्याप्रमाणे त्यात भाग घेणार्‍या दृष्टीहीन मुलींना त्यांच्या वेगाने पळणार्‍या स्वयंसेवक बायका-मुली न मिळाल्याने मी आणि आमच्या गृपम्धले काही जण त्यांच्या सोबत पळलो आणि त्यामुळे आम्हाला(ही) ते मेडल मिळाले

मी ज्या मुलीसोबत धावलो ती (समीना नाव तिचे) मुलगी ५ किमी स्पर्धेत (२६ मिनिटे) लावून पहिली आली आणि त्यामुळे मला देखिल तिच्यासोबत व्यासपीठावर जायला मिळाले.

टण्या, भारद्वाज लय भारी पण झोपेच्या बाबतीत नाहीच पटले. ७-८ तास झोप हवी ना राव Happy

असो.

मुंबई मॅरॅथॉन साठी उलटी गिनती चालू झाली आहे.

तशी बरी तयारी झाल्ये, माहौल तयार झालाय ....

फक्त पुण्यात अती प्रचंड थंडी असल्या कारणाने मुंबई च्या हवामानात कसे काय होईल अशी हूर हूर देखिल लागलेली आहे.

मंडळी शुभेच्छा द्या बरे नितांत आवश्यकता आहे Happy

मलाही वरच्या भारद्वाजची मुलाखत नाही आवडली फारशी, का कोण जाणे.

ऋजुता दिवेकरच्या टिप्स वाचून घे मुंबई मॅरेथॉनसाठी.

बाकी सहभागींना शुभेच्छा.

आडो, धन्यवाद.

ऋजुता दिवेकरच्या टिप्स शोधयला गेलो आणि वेगळेच वाचत बसलो.

http://runnersforlifenewsletter.com/a-walk-along-the-mumbai-marathon-rou...

मुंबई फुल मॅरॅथॉनचा मार्ग वर्णन केलाय Happy

Pages