Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राज वडगामा यांचे व भारथॉनचे
राज वडगामा यांचे व भारथॉनचे चेपु वरचे पान
https://www.facebook.com/events/1470298269894240/?ref=ts&fref=ts
https://www.facebook.com/raj.vadgama.9?ref=ts&fref=ts
टण्या, धनी, अभिनंदन! मी
टण्या, धनी, अभिनंदन!
मी यावर्षी २१ किलोमीटर पळायचे ठरवले आहे. स्पर्धा ४ जाने ला आहे. २१ किमीची पहिलीच वेळ आहे. तेंव्हा मनात उत्सुकता वजा धडधड वजा जे काय असते ते आहेच.
आता जरा सकाली उठून थोडे थोडे पळायला सुरुवात करायला पाहिजे.
गजानन २१ किमी धावायचा निर्णय
गजानन २१ किमी धावायचा निर्णय घेतलाय त्याकरता अभिनंदन आणि शुभेच्छा, कुठे आहे स्पर्धा?
गजानन अभिनंदन आणि शुभेच्छा!
गजानन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
असेच पळणे सुरु राहू द्या आणि कशी झाली स्पर्धा ते सांगा.
राज वडगामा ग्रेटच आहेत
राज वडगामा ग्रेटच आहेत की.
कालच रनिंग द सहारा ही डोक्यु पाहिली. डॉक्यु म्हणुन काय खास नाहिये, त्यांच्या प्रत्यक्ष पळतानाच्या वेळच्या भावना, अनुभव, हाल-अपेष्टा कमी आणि त्या बाहेरचे (बरोबरच्या चमू सोबतची भांडणे, इतर फापटपसाराच जास्त वाटला). पण तीन धावपटुंनी पश्चिम सहारा सेनेगल ते इजिप्तमधील रेड सी पर्यंत ७५०० किमीचा प्रवास ११० दिवसात धावत पूर्ण केला. हे राज वडगामा त्यांच्याही वरताण आहेत की.
कालच हाफ मॅरॅथॉन पुर्ण केली.
कालच हाफ मॅरॅथॉन पुर्ण केली. माझी पहिली. २ तास २९ मिनीटांमध्ये पुर्ण झाली. गोल २:३० चे होते संपूर्ण रेस पेसर बरोबर पळालो त्याचा फायदा झाला. शेवटच्या अंतरामध्ये पुढे आलो आणि पेसरच्या आधी पुर्ण केली.
सध्या तरी हेच अंतर ठीक वाटते आहे. अजून दोन तीन रेस नंतर पाहू पुढे जायचे का ते! मे महिन्यात ट्रेनिंग ला सुरुवात करुन हाफ पुर्ण करणे यात समाधान आहे!
जबरी.. अभिनंदन. २.२९ म्हणजे
जबरी.. अभिनंदन.
२.२९ म्हणजे खूप सही वेळ आहे.. कीप इट अप !
वॉव धनि अभिनंदन!!
वॉव धनि अभिनंदन!!
हर्पेन, धनि धन्यवाद. धनि,
हर्पेन, धनि धन्यवाद.
धनि, पुन्हा अभिनंदन!
बापरे तुम्ही मे पासून प्रॅक्टीस करत होतात? माझे कसे व्हायचे?
गजानन काळजी करु नका.तुमची
गजानन
काळजी करु नका.तुमची पहिलीच इतक्या मोठ्या अंतराची रेस आहे त्यामुळे आरामात घ्या.
थकलात तर जरूर चाला. फक्त एक अंतर ठरवुन चाला आणि परत पळायला सुरुवात करा. प्रत्येक थांब्यावर पाणी प्या आणि चाला. बरोबर काही तरी खायला ठेवा. अजुन ठरले नसेल तर लिम्लेट च्या गोळ्या वगैरे ठेवा.
मी मे मध्ये ५ किमीची प्रॅक्टिस सुरु केली. इतके जास्ती अंतर मी सुध्दा पहिल्यांदाच पळालो!
गूड लक - पळत रहा!!
संपूर्ण रेस पेसर बरोबर पळालो
संपूर्ण रेस पेसर बरोबर पळालो त्याचा फायदा झाला. <<< धनि, म्हणजे काय?
पेसर हा एक पेस ठेवुन पळणारा
पेसर हा एक पेस ठेवुन पळणारा असतो. मॅरॅथॉन आयोजक वेगवेगळ्या पेसचचे लोक ठेवतात पेसिंग साठी. ते लोक हातात पाटी, फुगे असे काही तरी घेउन असतात. त्यावर त्यांचा रेस पुर्ण करण्याची अपेक्शीत वेळ लिहिलेली असते. त्या वेळेसाठी जो पर किमी/माइल वेळ असेल ते तो पाळतात.
एकटे पळत असलो की कधी दमलो तर आपण फार चालतो किंवा मागे पडतो पण पेसरच्या आसपास राहिलो की मग सतत आपली वेळ कायम रहाते. त्याचा अजून एक फायदा म्हंजे आपण उत्साहात रेसचच्या सुरुवातीला खुप फास्ट पळतो आणि मग एक दोन मैलांनंतर थकतो पण पेसर आपला स्पीड आटोक्यात ठेवण्यात मदत करतात. तुमच्या रेस च्या वेब साइट वर पेसर आहेत का ते पहा. आणि पेसर बरोबर ग्रुप झाला की गप्पा मारताना वेळ कसा जातो ते ही कळत नाही. अडीच तास हा तसा खुप मोठा वेळ आहे कंटाळा येउ शकतो.
धनि, ओके. धन्यवाद.
धनि, ओके. धन्यवाद.
पुणे मॅराथॉन कुणीच पळाले
पुणे मॅराथॉन कुणीच पळाले नाहीत का?
माझा भाऊ हाफ मॅराथॉन पळाला.
माझा भाऊ हाफ मॅराथॉन पळाला. २ तास ११ मिनीटे.. भारीच जोरात पळाला.. !! मेव्हणा पण १० के पळाला.. ५६ मिनीटं..
ह्यावेळी हाफ मॅराथॉन वाल्यांना गावभर पळवलं नाही.. १० के च्या ट्रॅकवरून युटर्न मारून परत आणलं... पण बाकी दरवर्षीचा ढिसाळपणा होताच.
२ तास ११ मिनीटे मस्त आहे की!
२ तास ११ मिनीटे मस्त आहे की!
२:११ म्हणजे चांगला होता की
२:११ म्हणजे चांगला होता की स्पीड. आता पुढल्या वेळी फुल पळ म्हणुन सांग त्याला. ४:३० चं टार्गेट ठेवून.
अरे वा, मॅरॅथॉनची
अरे वा, मॅरॅथॉनची चर्चा.
सध्या पूर्ण मॅरॅथॉन म्हणजे २६.२ मैल..साधारण ४२ किलोमिटर साठी ट्रेनिंग चालु आहे. पहिले १२ मैल(१९ कि.) चांगल्या प्रति ताशी वेगात पार होतात, पण त्यानंतर मात्र खुपच सावकाश वेग होतो. आतापर्यंत २० मैल पर्यंत ट्रेनिंग झालेलं आहे. पूर्ण मार्गक्रमणा हिली-छोट्या छोट्या टेकड्या प्रकारच्या मार्गावरुन आहे.
त्या मध्येच 'शिन्-स्प्लिंटस' चा चांगलाच त्रास झालाय. लवकर बरं न होणारं दुखणं आहे, डॉ. कडे जाउन आल्यावर फ्रॅक्चर नाही ना एवढंच बघण्यासाठी एकदा क्ष्-किरण काढुन आले, नशिबाने तसं काही निघालं नाही पण लांब पल्ल्याच्या ट्रेनिंगमध्ये खुपच त्रासदायक प्रकार आहे.
सध्या त्यावरचा उपाय म्हणुन 'कम्प्रेशन सॉक्स' घालते..निदान हळु हळु टुकु टुकु करत का होइना ठरवलेलं अंतर पार करते.
सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन छान वाटलं, बरीच नविन माहीती मिळाली.
धन्यवाद.
--कमळी.
अरे वा कमळी , तुमच्या
अरे वा कमळी , तुमच्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा!!
मला सध्या एकाच पायाच्या (उजव्या) टाचेला दुखते आहे. काटा टोचल्यासारखे. डाव्या टाचेला काही प्रॉब्लेम नाही. असं खूप नाही दूखत की पळताच येणार नाही, पण चालताना वगैरे बारीक दुखते. अजून कुणाला असा अनुभव? काही उपाय?
धन्यवाद टण्या! सगळ्यात
धन्यवाद टण्या!
सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सगळ्यांनी करावी ती अशी कि धावल्यानंतर स्ट्रेचींग एक्सरसाइझ खुप चांगले झालेच पाहिजेत तरच तुमच्या मस्लस -सांधे, गुढगे, पोटरीचे स्नायुंना व्यवस्थित व्यायाम मिळुन ते लवकरात लवकर पुर्ववत होतिल, नाहीतर अतिशय वेळ्खाउ प्रक्रिया असते.
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे टाचेत दुखत असेल तर डॉ. च्या सल्ल्यानुसार स्ट्रेचिंग करुन बघा. दुर्लक्ष करु नका. लागल्यास थोडया काळासाठी धावण्याला पूर्ण विराम द्या आणि मग काही फरक पडतोय का ते बघा.
तुम्हालाही शुभेच्छा!
किप रनिंग!!
-कमळी.
कमळी तुमच्या ट्रेनिंगला
कमळी
तुमच्या ट्रेनिंगला शुभेच्चा ! जर पेस सुरुवातीला थोडा कमी ठेवला तर नंतर उलट स्पीड वाढवता येईल बहुतेक.
टाण्या
स्ट्रेचिंग आणि वॉर्म अप नीट करा कंटाळा करू नका. पाय बरोबर पडतो आहे ना ते पाहून घ्या
कमळी, मस्त !! कसं करता
कमळी, मस्त !!
कसं करता ट्रेनिंग ? म्हणजे ग्रुप बरोबर की एकट्या ? कुठला प्लान वगैरे फॉलो करता का?
धन्यवाद धनि, पराग. पराग, मी
धन्यवाद धनि, पराग.
पराग, मी एका ग्रुप बरोबर ट्रेनिंग करते. खरतरं आम्ही मैत्रिणींनी मिळुन एक छोटासा ग्रुप बनविला होता,त्यामध्ये बहुतेक तरी सर्व माझ्या सारखे हवशे-नवशे होते.
पण एकत्र भेटुन एकमेकांना प्रोत्साहन, काही महत्वाच्या टिपस देत आता एकुण ३५-४० जणं सहज असु.
एवढ्या सगळ्यांमध्ये आपल्याला आपल्या गतीने जाणारं कोणी ना कोणी भेटतचं.
सुरवात २ मैलांपासुन केली,मग हळु हळु दर आठवडयाल एक एक मैल वाढवतं गेलो. कमी अंतरा साठी स्वःताची पाण्याची बाट्ली घेउन जायची, पण जसजसे अंतर वाढतं जाते तसे आम्ही एका दर ठराविक अंतरावर पाण्याची व्यवस्था करुन ठेवतो. त्या मध्ये पाणी, गॅटोरेड, ब्रेकफास्ट्/प्रोटीन बार चे छोटे तुकडे करुन, केळ्याचे छोटे तुकडे, सॉल्टी चिप्स-बटाटा वेफर्स ठेवतो. धावताना शरिरातले पॉटॅशियम , मिठ, क्षार कमी होतात त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची तजवीज करुन ठेवतो.
साधारण सकाळी लवकारात लवकर म्हणजे ६:०० वाजता सुरुवात केली तर उन्हाचा त्रास थोडा कमी होतो असा आमचा अनुभव आहे.
धन्यवाद.
-कमळी.
अनेक कारणांनी मला अजून तयारी
अनेक कारणांनी मला अजून तयारी करणे जमलेले नाही, आणि उरलेल्या अकरा दिवसात कितपत जमेल हेही सांगता येत नाही. मी २१ वरून १० किमी पळायच्या निर्णयावर आलोय. तयारी करायला मिळाली नाही तरी बिना सरावाचे १० किमी धावायचेच असे ठरवलेय. मागे वाचलेला बी यांचा कोणत्याही पूर्वतयारी शिवाय धावलेल्या "२१ किमी अर्ध-मॅरेथॉनचा वृत्तांत" मला मी पण हे करू शकतो या निर्धारावर स्थिर राहायला मदत करतोय. (धन्यवाद, बी.) तरीही कमीतकमी काय खबरदारी घ्यायला हवी यावर तुम्हा सगळ्यांच्या अनुभवी आणि उपयोगी टिपा कृपया द्या. धन्यवाद.
कमळी, मस्त ग्रुप आहे. आणि
कमळी,
मस्त ग्रुप आहे. आणि खाऊ ठेवायची आयडिया ही भारी!
गजानन,
घाबरू नका - १० कीमी नक्की पळू शकता. एकदम सरावासाठी खूप पळू नका आता. थोडे वाढवत न्या आणि मग कमी करा. सरावात जरी १० पूर्ण झाले नाही तरी काही हरकत नाही. रेस च्या आदल्या दिवशी रेस्ट घ्या.
आणि रेस मध्ये सुरुवातीला थोडे हळू पळा काही त्रास वाटला नाही की मग ४/५ कीमी नंतर वेग वाढवा
कमळी - स्पर्धेसाठी
कमळी - स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि इथे स्वागत
टण्या - टाच कधी आहे आता? काळजी घे. टाचेचे दुखणे फार वाईट. मला फार पुर्वी टेनिस खेळत असताना टाचदुखी मागे लागली होती, बर्याच महिन्यांनी गेली. मला त्यावर फार काही औषधे / उपाय योजना सांगीतली नव्हती. तात्पुरते काहीतरी मलम वगैरे दिले होते. दिवसभर, असे तू लिहिले आहेस तसे थोडेच दुखायचे पण सकाळी उठल्यावर पाय टेकवता यायचा नाही. जरा सावकाशीनेच गेले होते ते दुखणे.
रच्याकने मी यावेळेस पुणे मॅरॅथॉन मधे भाग घेतला नव्हता. त्या ऐवजी ट्रेनिंग चा भाग म्हणून २८ किमी लाँग रन केली. पुणे मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा नाही असे आधीच ठरवले होते. मुंबई मॅरॅथॉन मधे भाग घेतला आहे.
गजानन कोणत्या स्पर्धेत भाग
गजानन कोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहे?
पवई मॅरेथॉन मध्ये. धनि
पवई मॅरेथॉन मध्ये.
धनि धन्यवाद. उद्यापासून थोडा सराव चालू होईल.
साताठ वर्षापूर्वी टाचदुखी माझ्याही मागे लागली होती. तिने तसे बर्यापैकी हैराण केले होते. शेवटी काही इन्जेक्शनं (टाचेत) आणि ते बुटात घालण्यासाठी सिलिका कुशन मिळतात ते वापरल्याने हे दुखणे गेले.
किती पळणारे, २१ किमी का
किती पळणारे, २१ किमी का १०किमी ?
दहा.
दहा.
Pages