Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे लक्ष्य पुर्ण झाले. तसेच
माझे लक्ष्य पुर्ण झाले.
तसेच सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी सलग तीन रवीवारी (२८ सप्टेंबर, ५ ऑक्टोबर आनि १२ ऑक्टोबर), ३ अर्ध मॅरॅथॉन स्पर्धा अनुक्रमे १ तास ५२ मि., १ तास ५१ मि आणि १ तास ५० मि. अशा वेळात पुर्ण केल्या.
तिसर्या रवीवारी स्पर्धेनंतर आम्ही रक्तदान शिबीर आयोजीत केले होते, त्यात रक्तदानासकट सहभाग होता.
अत्यंत भार्री वाटत आहे.
हर्पेन ,मीही पळाले. १०
हर्पेन ,मीही पळाले. १० किमी.
तयारी नव्हती अजिबात त्यामु ळे पूर्ण करणे यवढच टारगेट होतं . तब्बल १ तास २० मि. लागले.
इथेच प्रश्न विचारते , म्हणजे सगळ्याना उपयोग होईल.
१) श्वास घेणे, तोंडानी योग्य का?
२) साडे तीन चार किमी नंतर मला पळाताना कानात आवाज येत होते. ( द्रव पदार्थ भरलेली बंद बाटली हलवल्यावर येइल तसा हसू नका प्लिज ) दुखत नव्हत आजिबात पण फार डिस्टर्बिंग होतं. हा आवाज ब्रिस्क वॉक करताना येत नव्हता.
३) पाणी अधुन मधुन घोटघोट पिण योग्य का टप्या टप्यावर २०० मिली पिण योग्य.
४) रेस च्य दिवशी थकवा जाणावला नाही पण दुसर्यादिवशी पाय तर दुखतच होते शिवात खांदे अन बरगड्याही
पण नंतर एखाद्या दिवसभरात ओक्के .
माझा पळातानाचा वेग (?) कॉन्स्टंट (हळू ) राहिला . आणि जे काही केल त्याला पळण्यापेक्षा लहान स्ट्राईड्स वाल जॉगिंग केल म्हणण योग्य होइल . २१ किमी वाल्या लोकाना पळताना पाहून माझ चुकतय अस जाणवत राहिल.
अगदिच बावळट आहेत प्रश्न पण शहाण करा नी काय.
मस्त हर्पेन..
मस्त हर्पेन..
अभिनंदन इन्ना, तयारी नसताना
अभिनंदन इन्ना,
तयारी नसताना पळालीस का? खरेतर हा प्रश्न तयारी नसताना पळालीस(च) का? असा आहे पण असो.
मी म्हणजे काही फार तज्ञ नाही पण माझ्या अनुभवानुसार तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.
१) श्वास घेणे, तोंडानी योग्य का?
श्वास तोंडाने घ्या याचा खरा अर्थ श्वास भरपूर घ्यावा असा आहे. अर्थात ज्याला पळताना नाकाने दीर्घ श्वास घ्यायला जमतोय त्याने श्वास तोंडाने घेतला नाही तरी चालेल.
२) साडे तीन चार किमी नंतर मला पळाताना कानात आवाज येत होते. ( द्रव पदार्थ भरलेली बंद बाटली हलवल्यावर येइल तसा अ ओ, आता काय करायचं हसू नका प्लिज ) दुखत नव्हत आजिबात पण फार डिस्टर्बिंग होतं. हा आवाज ब्रिस्क वॉक करताना येत नव्हता.
सर्दी झाली होती का? कानाला दडे बसल्यासारखे झाले होते का?
नसल्यास कशामुळे झाले असेल काही सांगता येत नाही.
३) पाणी अधुन मधुन घोटघोट पिण योग्य का टप्या टप्यावर २०० मिली पिण योग्य.
अधुन मधुन घोटघोट पिण्याकरता पाणी घेऊन पळायला हवे जे मला व्यक्तीशः जमत नाही. पण मी वॉटर स्टेशन पाशी देखिल घोटभरच पाणी पितो. ह्याही बाबतीत हे योग्य आणि ते अयोग्य असे काहीच नाही. पण एकदम २०० मिली. शक्यतो पिऊ नये. पण डिहायड्रेशन होऊ देवू नये. उन्हे वाढली तर आम्ही चक्क डोक्यावर देखिल थोडे पाणी टाकतो.
४) रेस च्य दिवशी थकवा जाणावला नाही पण दुसर्यादिवशी पाय तर दुखतच होते शिवात खांदे अन बरगड्याही अ ओ, आता काय करायचं
पण नंतर एखाद्या दिवसभरात ओक्के .
खांदे भरून येणे हे, आपले हात एकाच अवस्थेमधे राहिल्याने होते तसेच श्वास संपुर्ण न घेण्याने देखिल होऊ शकते.
पाय दुखणे हे तयारी नसल्याची निशाणी तस्मात परत असे न तयारी करता पळू नये.
तसे एखाद दिवस मला ही काय काय दुखत खुपत असते कारण कितीही तयारी केली असली तरी त्या दिवशी पावले कशी पडतील हे काही सांगता येत नाही. पण एकाद दिवसात बरे वाटणे हे ही नॉर्मलच.
लहान पावले / स्ट्राईड्स हे योग्यच आहे.
इती जे जे ठावे ते ते
हर्पेन तयारीनीशीच पळायच होत.
हर्पेन तयारीनीशीच पळायच होत. पण ..
आदल्या दिवशी हो नाही करता करता,इट इज अ माईंड गेम हे पडताळाव (तुक ना तितक्याच तुक ने उत्तरही द्याव ) अस वाटल.
पण ते प्रत्येक वेळी करण योग्य नाही ( हे मनाला बजावले आहे)
आता तयारी करताना वेग वाढवणे कसे करावे ? परत पाच पासून सुरू करू का? वेग वाढवणे म्हणजे मोठ्या स्ट्राइड्स अन लवकर दमछक अस होतय माझ.
वेग वाढवणे म्हणजे छोट्याच पण
वेग वाढवणे म्हणजे छोट्याच पण जास्त स्ट्राईड्स दमछाक ही होणारच सुरुवातीला
पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचे म्हणजे पळताना आनंद घेता आला पाहीजे. तो मिळत असेल तर अंतर, वेग सगळे आपोआप येते आणि त्यासाठी महत्व फॉर्म सुधारण्याला द्यायला हवे. तो नीट अस्ला तर इन्ज्युरीज कमी होतात / होत नाही. आणि आपोआप सातत्य ही रहाते.
पण ते प्रत्येक वेळी करण योग्य नाही ( हे मनाला बजावले आहे) हे बाकी उत्तम केलेस हो
धन्यवाद मनीष
अभिनंदन हर्पेन इन्ना,
अभिनंदन हर्पेन
इन्ना, तुझंही अभिनंदन
पण माझ्या मते सगळ्यात
पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचे म्हणजे पळताना आनंद घेता आला पाहीजे>>>>>> +१! परफेक्ट!
अभिनंदन हर्पेन आणि इन्ना.
धन्यवाद पराग आणि वैद्यबुवा.
धन्यवाद पराग आणि वैद्यबुवा.
पूर्ण केली अर्ध मॅरॉथॉन. २
पूर्ण केली अर्ध मॅरॉथॉन. २ तास ९ मि. ५७ से. आयुष्यात पहिल्यांदाच एव्हडे पळालो पण मजा आली. निगेटिव्ह स्प्लिट, शेवटचे अर्धे अंतर १० मिनिट कमी वेळात पळालो पहिल्या अर्ध्यापेक्षा. तेव्हा अजून जोरात पळता आले असते बहुतेक.
सहीये टण्या.. अभिनंदन ! २
सहीये टण्या.. अभिनंदन !
२ तास ९ मिनीटे म्हणजे लय भारी टाईमिंग !! किप इट अप !
ज ब री च....... रे
ज ब री च....... रे !
पहिल्यांदाच पळताना गाठलेली ही वेळ खूप चांगली आहे.
कुठे पळलास, म्हणजे स्पर्धा कोणती होती, मार्ग कसा होता, हवामान कसे होते सगळे सगळे लिही.
अभिनंदन !
http://www.desmoinesmarathon.
http://www.desmoinesmarathon.com/
डे मॉइन नावाच्या शहरात होती. आज (१९ ऑक्टो) सकाळी. ५-६ डिग्री सेंटिग्रेड तापमान होतं. पण फार थंडी नाही वाजली. कोर्स पूर्णपणे सपाट होता, अगदीच किरकोळ चढाइ-उतार होता. साधारण ६००० लोक हाफ मॅराथॉनला होते आणि २००० फुल मॅरॉथानला. मी पोचल्यावर एखाद मिनटात फुल मॅराथॉनचा विजेता पोचला म्हणजे ज्या वेळात मी २१ किमी पळलो त्याच वेळात पठ्ठ्या ४२ किमी पळला.
निगेटिव्ह स्प्लिट, शेवटचे
निगेटिव्ह स्प्लिट, शेवटचे अर्धे अंतर १० मिनिट कमी वेळात पळालो पहिल्या अर्ध्यापेक्षा. तेव्हा अजून जोरात पळता आले असते बहुतेक.
ट्ण्या - हा प्रकार जरा ट्रिकी असतो. जर आधीच जोरात पळालो तर आपली एनर्जी संपून जाण्याची शक्यता अस्ते. आणि शेवटच्या ५ किमी. मधे धाव / वेग बारगळणे होऊ शकते. लांब पल्ल्याच्या अंतरांमधे इट्स अ वेरी थिन लाईन.
पण तू मागेही लिहिले होतेस त्यावरून 'बॉर्न निगेटिव्ह स्प्लिटर' दिसतोयस.
कीप इट अप
मस्तच टण्या. अभिनंदन. तू
मस्तच टण्या. अभिनंदन. तू हल्लीहल्लीच पळायला लागलास नां? हाफ मॅरेथॉनपर्यंतची उडी लवकर मारलेली दिसत्येस त्यामानाने.
कालच्या मॅराथॉनमध्ये प्रेक्षक
कालच्या मॅराथॉनमध्ये प्रेक्षक धावणार्यांचा उत्साह वाढवायला फलक घेऊन उभे होतेच. लक्षात राहिलेले काही संदेश :
Run now, poop later. Never trust a fart!
फिनिश लानच्या अगदी जवळ एक सुंदर मुलगी ही पाटी घेऊन उभी होती:
If you think you have got the stamina, call me!
Believe in yourself, we do! - एक म्हातार्या जोडीने हा फलक घेतला होता. होप की ते नासित्क होते
Hell is real, dont lie! - स्टार्टिंग लाइनच्या नंतर लगेचच चर्चच्या बाहेर सैतानाच्या वेशात हा फलक घेऊन काही लोक उभे राहिले होते. त्यांना मला ओरडून सांगावेसे वाटले की Don't waste your life on meaningless things. But then it started a train of thought that anyway the life is meaningless, how does it matter if they spend it on meaningless things etc. etc. मला दोन तास चघळायला चांगला विषय मिळाला. कुठले तरी भंकस गाणे कम्पल्सरी गुणगुणत जाण्यापेक्षा बरेच. तरी हेल शब्दामुळे हायवे टू हेल - AC\DC चे गाणे डोक्यात बसलेच.
Don't waster your time reading this message you moron, run!
अभिनंदन टण्या! टाईम फारच
अभिनंदन टण्या! टाईम फारच भारी! ग्रेट!
पाट्या
पाट्या लईच भारी, अजून
पाट्या लईच भारी, अजून आपल्याकडे तितकासा रूळला नाहीये हा प्रकार
पाट्या टण्या आणि हर्पेन
पाट्या
टण्या आणि हर्पेन तुमचे हार्दिक अभिनंदन!! कीप इट अप! आणि इथे लिहीत राहा.
या समरला माझे १० के करायचे टार्गेट होते ते राहुन गेलेय. पुढच्या स्प्रिंगला हाफ मॅरेथॉन करता येइल का असा विचार आहे. बघुया. तोपर्यंत इथल्या पोस्टी वाचून हुरूप जमवून ठेवते.
टण्या आणि हर्पेन अभिनंदन! मी
टण्या आणि हर्पेन अभिनंदन!
मी या शनिवारी १५ किमी पळणार आहे. पहिलाच प्रयत्न आहे. पाहू किती वेळ लागतो आहे ते. तलसा मध्ये तलसा रन आहे.
http://tulsasports.org/tulsarun/
ज्ञाती, धनि, अनेक शुभेच्छा
ज्ञाती, धनि, अनेक शुभेच्छा
धनि, स्पर्धा पार पडली की इथे येऊन सांगा काय झाले ते
१५ किमी पळणे सफल झाले. खुप
१५ किमी पळणे सफल झाले. खुप गरम दिवस होता. तपमान ८५ फारन्हाइट गेले होते. आणि मार्ग पण उन्च सखल डोन्गराळ (हिली) होता. तरी पण १ तास ४१ मिनीटात पुर्ण केली. मे मध्ये ट्रेनिन्गला सुरुवात केली होती त्यानन्तर ही प्रगती असल्याने बरे वाटले.
अजून एका महिन्यात अर्ध मॅरेथॉन आहे. ती पण पळायचा विचार आहे. या ग्रुप मुळे खुप हुरूप आला ट्रेनिन्ग ला.
टण्या, धनि आणि हर्पेन
टण्या, धनि आणि हर्पेन अभिनंदन!
धनि, congratulations!!
धनि, congratulations!! प्रयत्न / सराव सुरू ठेवा.
काल विब्रमचे फाइव्ह पिंगर शूज आणले आहेत. माझ्या लक्षात आले की सुरुवातीला प्रन्ट फूट स्ट्राइक बरोबर होत होता मात्र हाफ मॅराथॉनच्या दुसर्या हाफमध्ये मात्र (फोटो आले आहेत त्यावरून वाटते आहे तसे) हील स्ट्राइक झाला आहे. विब्रमने फरक पडतो का बघू.
टण्या विब्रमचा वापर
टण्या
विब्रमचा वापर प्रोग्रेसिवली करणे मस्ट आहे. हलके आणि सोपे वाटते म्हणून लॉंग रन केल्यास (माझ्यामते ५ मैलांपैक्षा जास्तीचा) आणि हिल स्ट्राईक होत असल्यास टाचांची वाट (कायम्ची नव्हे पण पळणं २-३ आठवडे बंद पडण्याएवढी) लागल्याचा स्वानुभव आहे. फ्रंट फुट स्ट्राईकवाल्यांना आजिबात त्रास होत नाही असे नाही पण तो तुलनेने कमी होतो आणि रिकवरी लवकर होते.
टण्या, धनि
अभिनंदन... कीप ईट अप.
हर्पेन
अमेझिग. ऐकत नाही बॉ तुम्ही आता
टण्याच्या फलकांच्या लिस्ट मध्ये अजून काही अॅडिशन
I am running away from my wife, Please help me.
Run Pepper run, You have trained harder than that bitch, Amanda
I am running for my kids, Look you coward moron. (हे कदाचित तिच्या पळून गेलेल्या नवर्याला किंवा मित्राला ऊद्देशून असेल)
Mike, Don't come home, if you don't finish it.
The prettiest girl in my class promised me a date, if I kiss her at the finish line.
My daughter is waiting for me at the finish line.
धनि, अभिनंदन.. चालु ठेवा
धनि, अभिनंदन.. चालु ठेवा पळणं..
मस्त धनि, मला पण माझ्या
मस्त धनि,
मला पण माझ्या पहिल्या वहिल्या स्पर्धेतल्या १५ किमी ला १ तास ४० मि. लागली होती. आणि असेच त्यानंतर महिन्याच्या आत हाफ मॅरॅथॉन धावलो होतो.
सांगायचा मुद्दा असेच धावत रहा आणि हाफ पण आरामात पळाल.
टण्या,
हील स्ट्राईक होत नाहीये याकडे आवर्जून लक्ष दिले नाही तर माझीही अवस्था अगदी १० किमी पळताना देखिल शेवट शेवट अशीच व्हायची. त्यामुळे त्याकडे अधून मधून नीट जाणीवपुर्वक लक्ष दिले की असे होणार नाही तसेच उतारावर हील स्ट्राईक होणे स्वाभाविक आहे (अर्थात त्याचा विचार केला असशीलच)
आणि विब्रमचे म्हणशील तर त्यापेक्षा साधे कॅनव्हास्चे जोडे बरे (किंमतीचा विचार करता तर जास्तच ) आणि चमन नी म्हटल्याप्रमाणे ते घालून पळण्याचे अंतर सावकाश्च वाढवत ने, एकदम जास्त अंतर पळू नकोस. जरी जन्मतः आपल्याला अनवाणी चालण्या/ धावण्याची सवय असली तरी मधली खूप वर्षे बूट घालून त्याची सवय मोडलेली असते त्यामुळत्याच्या, त्याच्या वरचा आणि पोटरी खालचा भाग ताणला जातो, टाचांबरोबरच तिथेही दुखू लागते. तेव्हा काळजी घे.
चमन,
असेच एकाने सबफोरचे खूळ डोक्यात भरवलंय त्यामुळे म्हटलं आधी सबटू तरी करून बघू
आता मुंबई मॅरॅथॉन सबफोरचे टार्गेट गाठू नाही शकलो तरी ठेवू शकेन याची तरी खातर्जमा झाल्ये.
बाकी त्या दिवशी जे होईल तेच खरे
मी विब्रमचे मिनिमलिस्टिक
मी विब्रमचे मिनिमलिस्टिक सपाता घालून आता ६ वेळा धावलोय साधारण ६ किमी सरासरी प्रत्येक वेळी (३५ ते ४५ मिनिटे) - रस्त्यावर, इन्डोर ट्रॅकवर आणि ट्रेडमिलवर प्रत्येकी २ वेळा. मला त्रास अजून तरी झालेला नाही.
एप्रिल २५ला फुल मॅराथॉन पळण्याचा मानस आहे. त्यासाठी या आठवड्यापासून तक्ता बनवून पळणे सुरू करणार.
ट्ण्या - त्रास झाला नाहीये तर
ट्ण्या - त्रास झाला नाहीये तर चांगलेच आहे, फूल मॅरॅथॉन साठी शुभेच्छा
उद्या पुण्यात होणार्या पिंकेथॉन मधे कोण कोण भाग घेतंय.... मी पण असणारे
सध्या पुण्यात 'राज वडगामा'
सध्या पुण्यात 'राज वडगामा' नावाच्या धावपटूचे आगमन झालेले आहे. ह्या माणसाने भारतभरात मिळून १००००किमी धावण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून १५ ऑगस्ट २०१३ रोजी सुरुवात केली होती. त्यांचे उद्दीष्ट दर दिवशी ९०किमी धावून १४ डिसेंबर रोजी संपवण्याचे होते पण काही कारणास्तव एक महिना उशीराने ते पुर्ण होईल असा अंदाज आहे. त्यांनी आतापोतर अर्ध्याहून थोडे अधिक अंतर पार केले आहे.
हे सध्या पुणे मुक्कामी विद्यापीठात धावत आहेत. सकाळी साडेसहा वाजता सुरु करून दुपारच्या जेवणापर्यंत ते धावताहेत. पुण्यातल्या मुक्कामी त्यांनी ठ्रवलेले अंतर बरेच असल्याने त्यांना कोणी सोबत करणार असल्यास त्याचे स्वागत आहे. दर दिवशी खूप अंतर पार पाडायचे असल्याने त्यांचा वेग अगदी कमी असतो व त्यामुळे त्यांच्या सोबत गप्पाही मारता येतात व अनुभव ऐकायला मिळतात. तरी ज्यांना कोणाला त्यांच्या बरोबर पळायचे असेल त्यांनी विद्यापीठात जाऊन त्यांच्या बरोबर धावल्यास हवे आहे. शक्यतो सकाळी ८-९ पर्यंत सोबतीला बरेच जण असतात पण ज्यांना त्यानंतर धावता येणे शक्य आहे त्यांनी जरूर नंतर धावावे.
Pages