Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29
तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विवाह हा चित्रपट घरच्या
विवाह
हा चित्रपट घरच्या टिव्ही वर लागला तर मी घाबरुन पळून जातो
सहन होत नाही आणि बंद करा असे सांगताही येत नाही घरच्या महिला मंडळाला ..................
रामगोपाल वर्माचा जंगल.
रामगोपाल वर्माचा जंगल. भूतपिशाच्च वगैरे नाही. खरतर डाकू लोकांची टोळीसुद्धा तितकी भीतीदायक नाही. पण ज्या प्रमाणे रामूने जंगलाचं चित्रण केलं आहे ते मस्त आहे. डाकू टोळीतना सुटून उर्मिला आणि फरदीन जंगलात वाट फुटेल तसे पळत जातात. उन्हाचा कहर वाढत जातो. वगैरे वगैरे... रामूने जंगलाला स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त करून दिले आहे. मी टीवीवर बघितलेला, कदाचित हॉलमध्ये जास्त परिणामकारक झाला असेल.
Orphan मस्त आहे. शेवटपर्यंत
Orphan मस्त आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
ते सबटायटल म्हणजे मोठा जोकच
ते सबटायटल म्हणजे मोठा जोकच असतो कधी कधी.त्या पट्ट्या वाचायच्या की भुतं पाहायची यात फार घोळ होतो. फिदीफिदी >>>>>> सिनी माझ्याबाबतीत म्हणशील हे भूतान्च्या सिनेमाच्या बाबतीतच नव्हे तर सार्याच देशी -परदेशी चित्रपटान्बाबत होते.:हाहा:
मध्यन्तरी ते सबटायटल्स वाले सिनेमे बघुन मला सब -टायटल्स नसलेल्या सिनेमान्च्या वेळी टिव्ही आणी डिव्हिडी वर खाली सारखे बघायची सवय लागली होती. पाट्या का दिसत नाही या विचाराने मी हैराण.:खोखो:
ज्यांना हॉरर , भितीदायक आणि
ज्यांना हॉरर , भितीदायक आणि किळसवाणा यांच्यात फरक कळत नाही तेच लोका अशा चित्रपटांना भयपट / भितीदायक म्हणू शकतात >>> प्रचंड अनुमोदन. अत्यंत किळसवाणे चित्रपट आहेत राँग टर्न मालिकेत.
मला तर कित्येक शॉर्ट फिल्म
मला तर कित्येक शॉर्ट फिल्म पूर्ण लांबीच्या भयपटांपेक्षा सरस वाटतात. मॉन्स्टर नावाची शॉर्ट फिल्म कोणी पाहिली आहे? खतरनाक आहे. सोबत लिंक देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=s6n7MpB8xdU
ज्यांना हॉरर , भितीदायक आणि किळसवाणा यांच्यात फरक कळत नाही तेच लोका अशा चित्रपटांना भयपट / भितीदायक म्हणू शकतात >>> अगदी अगदी. प्रचंड रक्तपात तोसुद्धा किळसवाणा दाखविल्याशिवाय लोक घाबरणारच नाही अशी ठाम समजूत असावी राँग टर्नच्या दिग्दर्शकाची.
राँग टर्न अगदी किळसवाणा आहे
राँग टर्न अगदी किळसवाणा आहे हे मान्य पण त्यात त्या मुलीचा ते लोक जो पाठलाग करतात ते पहाताना मात्र शहारा येतो. काही वेळाने तर अक्षरश: ते लोक आपलाच पाठलाग करत आहेत असे वाटु लागते इतकं भितिदायक आहे. पण त्यातल्या रक्ताळलेल्या दृष्यांमुळे नंतरचे भाग अजिबात पाहिले नाहीत.
तेच 'सॉ' चे. बघवत नाही.
यापेक्षा 'savage harvest' , 'ghost and the darkness' मधे जास्त भिती वाटली होती. 'मिमिक'मधे वाटली होती.
some east coast movies
some east coast movies -
takashi bhatkha.
mika nakoshi.
phun kun pi.
रश्मी.. माझा तर अजुन एक
रश्मी.. माझा तर अजुन एक प्रॉब्लेम आहे ,संवादातला एखादा शब्द शोधुन समजेपर्यंत टिव्ही वरच्या पट्ट्या पटापट पुढे जातात आणि मग लिंक लागत नाही स्टोरीची .त्यापेक्शा तुनळी जिंदाबाद रिवांईड करुन पाहता येतो सिनेमा. चार्ली चैपलिन चे सिनेमे अपवाद.
पण काही म्हणा सबटायटल्स ची सवय वाईटच
मध्यन्तरी ते सबटायटल्स वाले
मध्यन्तरी ते सबटायटल्स वाले सिनेमे बघुन मला सब -टायटल्स नसलेल्या सिनेमान्च्या वेळी टिव्ही आणी डिव्हिडी वर खाली सारखे बघायची सवय लागली होती. पाट्या का दिसत नाही या विचाराने मी हैराण << मलाही सबटायटल ची इतकी सवय झाली आहे की नसल्यात तर सिनेमा समजेल की नाही ही शंका येते.
तेच 'सॉ' चे. बघवत नाही. >>>
तेच 'सॉ' चे. बघवत नाही. >>> हॉस्टेल पण याच पठडीतला. तरी सगळ्यात घाणेरडा आहे तो 'द ह्यूमन सेंटिपीड'.
बाकी नुक्ताच आलेला द बाबाडूक बरा आहे.
सर्वात भीतीदायक पिक्चर अजून सापडला नाहीये. त्यातल्या त्यात 'पोल्टरगाईस्ट' भयंकर आहे. 'हाऊस ऑन अ हाँटेड हिल' पण चांगला हॉरर आहे.
टिंब टिंब.
टिंब टिंब.
.
.
अशा सिनेमांचे पण दोन गट पडतात
अशा सिनेमांचे पण दोन गट पडतात - स्लॅशर आणि स्प्लॅटर (splatter).
यातील स्लॅशर तरी काही प्रमाणात सहन करता येतात. यात मुख्य क्रायटेरिया एक अनश्वर वाटणारा किलर असणे. जसा हॅलोवीन चा मायकेल मायर्स, फ्रायडे द १३थ चा जेसन इ. यात रक्तपात असला तरी तुलनेने टोन्ड डाऊन असतो व किमान शेवटी किलर मरण्याची गॅरेंटी असते. स्प्लॅटर मध्ये कथानकापेक्षा रक्तपात जास्तीत जास्त वास्तव (आणि किळसवाणा) दाखविण्यावर भर असतो. वर उल्लेखिलेले सर्व चित्रपट स्प्लॅटर. डॉन ऑफ द डेड लौकिकार्थाने पहिला स्प्लॅटर. पण यात काही कथानक देखील होते व मर्यादा सांभाळलेली होती. सध्याच्या स्प्लॅटर्स मध्ये मात्र कथानकाचा मुद्दा कापरासारखा उडून गेला असून किळसवाण्या दृश्यांची मालिका तेवढी राहिली आहे.
पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटी, द
पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटी, द अनइन्व्हाईटेड
आयला... मेरा माबो
आयला...
मेरा माबो महान....
धागाकर्ते दुसर्या अवतारात विलीन झाले किंवा अंतर्धान पावले....
तरी धागा अजून सुरुच आहे....
थोडक्यात काय? तर मरावे परी किर्ती रुपे उरावे...हे जितके खरे तितकेच....
धागे काढावे आणि अंतर्धान व्हावे, हे पण खरेच....
1408 with negative ending..
1408 with negative ending.. (thr is the one with positive ending too.. and that takes away the impact)
I was actually scared!
वास्तुशास्त्र हा रामगोपाल
वास्तुशास्त्र हा रामगोपाल वर्मांचा हिंदी चित्रपट सर्वात भीतीदायक वाटला मला!
रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी माझ्या मावस भावाने थीएटर मध्ये दाखवला होता. सिनेमा हॉल मध्ये पहातांना नक्की भीती वाटते. त्यावेळेस त्या सिनेमाच्या निमित्ताने रामगोपाल वर्मांनी एक नवा पायंडा घातला होता. तो म्हणजे घरात एखाद्या व्यक्तीच्या आसपास त्या व्यक्तीच्या नकळत आत्म्यांचा असलेला सहज आणि सतत वावर असणे. विशेष म्हणजे सर्वात शेवटी प्रत्येक जण मरून लगेच आत्मा बनतो आणि सुश्मिता सेन च्या मागे लागतो तो शेवटचा अर्धा तास सहन करायला सततच्या भीतीदायक प्रसंगां मुळे खूप जड जातो. त्याचा खूप प्रभाव राहातो. मनावर!
१४०८ नक्कीच भीतीदायक
१४०८ नक्कीच भीतीदायक आहे.पुन्हा एकदा पाहायला हवा.शेवटी त्या रेडीओ वर आवाज एकु येतो तो सीन परत पाहाय्चा आहे.
वास्तुशास्त्र छानच आहे
वास्तुशास्त्र छानच आहे घाबरवतो पण ,मी टी व्ही वर पाहीला होता.पण शेवट नेहमी सारखा वाटला बहुतेक चित्रपटांमधे शेवट तसा करतात. मला हल्ली आलेला "आत्मा" आवडला होता .घाबरण्यासारखे काही सीन मस्त आहेत पण एकुण नवाजुद्दीन आणि बिपाशाने चांगलं काम केलं आहे. शेवट्पण आवडला .शेवट वेगळा आहे . तुनळीवर आहे.
१४०८ नवीन चित्रपट आहे का ?
१४०८ मुळे एक सेकंदही घाबरायला
१४०८ मुळे एक सेकंदही घाबरायला झालं नाही. पुन्हा रात्री वगैरे पहायला हवा.
धागाकर्ते दुसर्या अवतारात
धागाकर्ते दुसर्या अवतारात विलीन झाले किंवा अंतर्धान पावले....
तरी धागा अजून सुरुच आहे.
.......
गप्पागोष्टी धाग्याचे मालक आयडी मोक्ष पावले तरी धागा सुरु आहे. फाटकराव , आले का लक्षात ?
१४०८ मूळ स्टीफन किंगच्या
१४०८ मूळ स्टीफन किंगच्या त्याच नावाच्या लघुकथेवरून घेतलाय. मूळ लघुकथा चांगली आहे पण पूर्ण लांबीच्या चित्रपटाएवढे मटेरिअलच नाही. त्यामुळे काही प्रसंग ओढुन ताणून आणल्यासारखे वाटतात. एण्डही बदललाय. त्यामुळे कल्पना किंगची मसाला दिग्दर्शकाचा असा एकूणात प्रकार आहे.
"तुनळी" @ सीनि भयंकर
"तुनळी" @ सीनि
भयंकर हसतोय...
अजूनही हसतोय!!
अवांतर:
महेश मांजरेकर "यु आकाराच्या ट्यूब ने धुणं धुवायचे म्हणतो" तो प्रसंग आठवला ... नव्या "हिम्मतवाला" मधला.
रामुचे सर्व भयपट भीतीदायक
रामुचे सर्व भयपट भीतीदायक होते..काल परवा त्याचा तेलुगु मधील Ice cream पाहीला हा पण चांगलाच भीतीदायक आहे... तिकडे हा सिनेमा चांगलाच हिट झाला आहे you tube वर संपूर्ण सिनेमा आहे. एकदा अवश्य पाहण्या सारखा आहे.
हायला, Ice cream नवाचा भयपट
हायला, Ice cream नवाचा भयपट आहे? बघायला पाहिजे , आणि आईस्क्रीम खायलाही.
ह्या सिनेमात रामुने नविन
ह्या सिनेमात रामुने नविन प्रयोग केला आहे. ह्यात
flowcam system technology चा वापर करण्यात आला आहे हा प्रयोग भारतीय सिनेमात पहिल्यांदाच करण्यात आला आहे..
Ice cream ची HDलिंक :
Ice cream ची HDलिंक : http://youtu.be/FqRSXXZx1JY
मलातर देशद्रोही हा पिक्चर
मलातर देशद्रोही हा पिक्चर सर्वात भितीदायक वाटतो.
राँग टर्न : ज्यांना हॉरर ,
राँग टर्न :
ज्यांना हॉरर , भितीदायक आणि किळसवाणा यांच्यात फरक कळत नाही तेच लोका अशा चित्रपटांना भयपट / भितीदायक म्हणू शकतात >> +१
Pages