Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29
तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रानडेबाई, आपण सदाशिवपेठ येथे
रानडेबाई, आपण सदाशिवपेठ येथे रहाता का? तुम्हाला पार्टीत मटारउसळ आणि शिकरण खाताना बघितल्यासारखं वाटतंय.
भाऊ नमसकर, अहो
भाऊ नमसकर, अहो नायट्रोग्लिसरीनचे दोन ट्रक हेच मुळी भीतीदायक शब्द आहेत! उरलेल्या सिनेमाची तर बातच और!
आ.न.,
-गा.पै.
आहट चे सुरवातीचे काही भाग
आहट चे सुरवातीचे काही भाग खरोखर भयानक होते. >>+२
<< अहो नायट्रोग्लिसरीनचे दोन
<< अहो नायट्रोग्लिसरीनचे दोन ट्रक हेच मुळी भीतीदायक शब्द आहेत!>> गा.पै.जी, जे ४०-५० ड्रायव्हर्स जाहिरात वाचून हे काम करायला आलेले असतात, त्याना त्या कामाची भयानकता स्पष्ट करण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमधून नायट्रोग्लिसरीनचे फक्त दोन थेंब जमिनीवर टाकून काय होतं तें दाखवण्यात येतं; तो स्फोट पाहूनच जीवावर उदार झालेले केवळ ४-५ जण वगळतां बाकीचे माघार घेतात. व सिनेमाच्या प्रेक्षकांच्या छातीतली धडधडही तेंव्हापासूनच सुरूं होते !
केवळ ४-५ जण वगळतां बाकीचे
केवळ ४-५ जण वगळतां बाकीचे माघार घेतात>> अशीच स्टोरी असलेला हिन्दि चित्रपट पण येवुन गेलाय काय?
शत्रुघ्न सिन्हा होता त्यात. अजुनही एक दोन मोठे हिरो आहेत.
मला अन्धुक आठवतय. शाळेत असताना दुरदर्शन वर लागलेला अर्धवट पाहिलेला चित्रपट आहे.
भाऊ नमसकर आणि गामा
भाऊ नमसकर आणि गामा पैलवान...
खरोखरीच सर्वार्थाने एका कलात्मक चित्रपटाची तुम्ही आठवण ताजी केली आहे या निमित्ताने. 'वेजेस ऑफ फीअर' हे शीर्षकच मुळात त्या चित्रपटाची जातकुळी सांगते. 'भीतीदायक' म्हटले की सर्वसामान्यरित्या भूतप्रेत, आत्मा, अमानवी प्रकार आदी घटनांचा चिखल असलेले प्रसंग दाखवून प्रेक्षकांच्या अंगी काटा निर्माण करणे इतपतच हेतू असतो. पण वेजेस ऑफ फीअर हा खराखुरा जमिनीवरील चित्रपट आणि केवळ मनुष्यप्राणी व त्याची जगण्यासाठी चाललेली धडपड....अशी की त्यापोटी तो नायट्रोग्लिसरीनच्या ट्रक्सची वाहतूकही पुरेशा संरक्षणासाठी करण्यास तयार होतो.
मूळ कथानकच अंगावर येणारे असल्याने केवळ वाहतूक हाच एक विषय नसून त्या चित्रपटाचा शेवटही तितकाच दाहकतेचा आहे. कृष्णधवल गटातील ही एक नावाजली गेलेली कलाकृती होती, नि:संशय.
या चित्रपटातील तेलाच्या गाळात अडकलेल्या पात्राचे एक भीषण दृष्य.
अशोक पाटील
रानडेबाई, आपण सदाशिवपेठ येथे
रानडेबाई, आपण सदाशिवपेठ येथे रहाता का? तुम्हाला पार्टीत मटारउसळ आणि शिकरण खाताना बघितल्यासारखं वाटतंय>>>>> मला मटारउसळ आणि शिकरण खाताना पाहुन तुम्हाला भय वगैरे वाटल की काय तुर्रमखान? कोणत्या पार्टीत बघितल हो तुम्ही मला????
या साईट वर ढिगाने चित्रपट
या साईट वर ढिगाने चित्रपट मिळतील
http://www.besthorrormovielist.com/
ओमेन सारखे सिनेमे तणाव
ओमेन सारखे सिनेमे तणाव ठेवतात, पण धारपांच्या कथांवर पोसलेल्या प्रेक्षकाला खूप घाबरवू शकत नाहीत. असे सिनेमे दर्जेदार असतात. कुठेच किळसवाणी दृश्यं नसतात. कथेचा आवाका प्रचंड मोठा असतो. भयाची छाया पात्रांवर राहते. मध्यपूर्वेपासून ते युरोपापर्यंतचा भूगोल आणि इतिहास यांची पार्श्वभूमी यामुळे कथेत विश्वासार्हता निर्माण होते. आता कुणाचा मृत्यू ओढवणार हा एक ताण राहतो. सिनेमा म्हणून हा अतिशय सुंदर बनलाय. ड्रॅक्युला हा पण असाच सिनेमा आहे. त्याचं अदबशीर वागणं बोलणं, दिपवून टाकणारी श्रीमंती, वातावरणनिर्मिती हे सारच मस्त. त्या काळी मात्र नक्कीच लोक घाबरले असतील. ड्रॅक्युला सिनेमा हॉल मध्ये आला तर नक्की पाहणार आहे. बराच फरक पडतो टीव्हीवर पाहण्यात आणि हॉलमध्ये पाहण्यात.
दरवाजा बद्दल खूप ऐकून होतो. नगरला कामानिमित्त गेलेलो तेव्हां वेळ होता म्हणून पाहिला. थेटर खाली होतं. मेक अप वगैरे हास्यास्पद असले तरी जाम टरकली होती. घाबरवण्याच्या बाबतीत रामसे बंधू हास्यास्पद असले तरी घ्या घाबरा आता या तंत्राने प्रभावी ठरतात. काही काही सिनेमे मात्र विनोदी झालेत.
माधवी 'पॅरानॉर्मल
माधवी
'पॅरानॉर्मल अॅक्टीवीटी' कसे वाटले आहेत कोणाला? मी एकही पूर्ण पाहिलेला नाही.
>>
माधवी 'पॅरानॉर्मल अॅक्टीवीटी' किंवा आजकालच्या बर्याचश्या भयपटात जे खालिल इफेक्ट्स दाखवतात.
१) निळ्या पांढर्या प्रकाशातले थरथरत्या प्रकाशातले चित्रिकरण
२) अत्यंत फिकट लहान मुलांचे भितीदायक चेहरे.
३) फ्रेम्स गाळुन भरभर जवळ येताना दाखविलेली भुते.
हे सर्व इफेक्ट्स रिंग या चित्रपटाचे प्रथम वापरलेले आहेत. म्हणुन तो सर्वात भयानक पिक्चर होता.
लहान असताना हाउस ऑफ वॅक्स बद्दल आजोबांकडुन ऐकले होते. त्याप्रकार्ची रिवोल्युशन रिंग ने भयपटात आणली. रिंग सोडुन आतापर्यंत वर लिहिलेले सर्व भयपट न घाबरता बघितले आहेत. आधि लिहिल्याप्रमाणे आता असे इफेक्ट्स सर्रास वापरले जातात.
होस्टेल वगैरे चित्रपटांना भयपट मी मानत नाही आणि ते पहातही नाही त्यात बराच खुन खराबा आहे (जाहिराती पाहुन कळले).
आहट चे सुरवातीचे काही भाग
आहट चे सुरवातीचे काही भाग खरोखर भयानक होते. >>+३
आणि त्याचे साडे नउ चे टाय्मिंग पण मस्त!
त्याच्या जाहिरातीतले ते जमिनीतुन येणारे २ हात सही होते.
<< त्या चित्रपटाचा शेवटही
<< त्या चित्रपटाचा शेवटही तितकाच दाहकतेचा आहे. >> अशोकजी, अगदीं खरंय. पण, कुणी कुतूहल वाटून त्या सिनेमाची सीडी मिळवलीच तर शेवट सांगितल्याने विरस होऊं नये म्हणून मीं तो सांगितला नाही. अर्थात आपणही सूज्ञपणे नुसता उल्लेखच केला आहे.
आहट चे सुरवातीचे काही भाग
आहट चे सुरवातीचे काही भाग खरोखर भयानक होते. << हे वाचुन युट्यब वर बघायला घेतला. एपिसोड १ अगदिच हस्यास्पद होता. "जन्नत" हवेली चा. त्यात ती एक उजवीकड्चे सगळे काळे आणि डावीकडचे सगळे पांढरे असे केसं असलेली बाई होती. तिच का मालिका? की मी वेगळच काही बघत होते?
अदिति | 2 August, 2013 -
अदिति | 2 August, 2013 - 09:37 नवीन
आहट चे सुरवातीचे काही भाग खरोखर भयानक होते. << हे वाचुन युट्यब वर बघायला घेतला. एपिसोड १ अगदिच हस्यास्पद होता. "जन्नत" हवेली चा. त्यात ती एक उजवीकड्चे सगळे काळे आणि डावीकडचे सगळे पांढरे असे केसं असलेली बाई होती. तिच का मालिका?
>>
अदिती तु युट्युब वर श्रीदेवीचा चालबाझ (ना जाने कहासे आइ है) बघ! नाहीतर माधुरीचे सुपरहीट एक, दो तीन नाच. मी मुलीला दाखवायला घेतला. पाच मिनटात बंद केला. काही गोष्टी तेव्हाच आवडतात, शिवाय पिक्चर क्वालिटी, साउन्ड, रात्रीची वेळ सर्व जुळुन यावे लागते.
विश्वजीतचा वीस साल बाद त्याकाळी खुप गाजलेला म्हणुन आईने (१९८५ मध्ये) आम्हाला दाखविला. आम्हाला मात्र पाहताना जरापण भिती वाटली नाही.
खर आहे निलीमा.
खर आहे निलीमा.
हो निलिमा खरं आहे, एक रामसे
हो निलिमा खरं आहे, एक रामसे बंधुंचा विराना म्हणून पिक्चर होता, तो मी लहानपणी पाहिला तेव्हा भीती वाटली होती, पण नंतर पुन्हा पाहिल्यावर फार हास्यास्पद वाटला
असंख्य भयपट पाहिले आहेत.
असंख्य भयपट पाहिले आहेत. सर्वात असा सांगता येणार नाही. पण काहीकाही आठवत आहेत ज्यात मोठेपणी सुद्धा भिती वाटली. savage harvest, deep blue see, jeepers creepers (भाग १), mimic, ghost and the darkness.
ring टीव्हीवर पाहिला होता म्हणुन खुप भिती वाटली नाही, पण थेटरात पाहिला असता तर नक्की भयंण्कर भिती वाटली असती. त्यात ती मुलगी तोंडावर केस सोडलेली दाखवतात ते क्रीपी आहे.
exorcist चक्क अजुन पाहिला नाही. कसा काय पण राहुन गेला पहायचा खरे.
'द शायनिंग' आणि 'रोझमेरीज
'द शायनिंग' आणि 'रोझमेरीज बेबी'.
अनेक वेळा बघूनही दरवेळी तितकेच क्रीपी वाटतात.
एक पुस्तक आहे लेफ्ट साईड ऑफ
एक पुस्तक आहे लेफ्ट साईड ऑफ गॉड, एका अघोरपंथीच चरीत्र. त्यात त्याने 'द शायनिंग' च कौतुक केलय की हे अस असत.
मी विमानात पहायचा प्रयत्न केला. तो नुसता भितीदायक नाही तर मनात अत्यन्त निराशा निर्माण करणारा आहे.
अलिकडचा १९२० बघून पण घाबरायला
अलिकडचा १९२० बघून पण घाबरायला झालं होतं.>>>>>>>> माझा नवरा थीयेटर मधे इतक्या जोरात ओरडला होता एका सीन ला की मी आणि पाठच्या रो मधले पब्लिक घाबरायचं सोडुन हसायला लागले होते..
ओरडण्याचा एक प्रसंग आठवला -
ओरडण्याचा एक प्रसंग आठवला - कालजात मैत्रिणी 'कोहरा' पहायला गेलो. भिती वाटत नव्हती. मजापण येत होती पण शेजारी मैत्रिण घाबरली होती बहुतेक. एका प्रसंगात मनापासुन, मोकळेपणी जोsssरात किंचाळली. त्यावर फिदीफिदी हसुन घेतले.
सिनेमा संपल्यावर बाहेर येताना एक बाई माझ्याकडे पाहुन हातवारे करुन सर्वादेखत 'कसलं वरडतय गं? म्हणत मलाच रागावली.
इतका राग की काय बोलु तेच सुचेना. शेवटी फणफणत मैत्रिणीला विचारले, 'ओरडली ते ओरडली, पण माझ्या आवाजात का ओरडलीस?'...
ती कितीतरी दिवस माझ्या असंबद्ध प्रश्नाने हसत होती.
डीप ब्ल्यू सी माझा आवडता
डीप ब्ल्यू सी माझा आवडता सिनेमा आहे. मी खूप वेळेला पाहिलाय. भयपट नाहिये तो.
आणि जुन्या हाऊस ऑफ वॅक्स पेक्षा नविन जास्ती भञाण आहे. आणि एन्डही ओपन आहे. सॉलिड सिनेमा आहे.
हे सर्व इफेक्ट्स रिंग या
हे सर्व इफेक्ट्स रिंग या चित्रपटाचे प्रथम वापरलेले आहेत. म्हणुन तो सर्वात भयानक पिक्चर होता. >> रिंगू हा मूळ चित्रपट जॅपनीज आहे ज्याचे ring हे अमेरिकन अडॉप्टेशन होते ज्यात रिंगु मधल्या बर्याच कल्पना उचलल्या होत्या. भूतांचे काळेभोर बुब्बुळे नसलेले डोळे दाखवायची सुरुवात ग्रज च्या जॅपनीज सिनेमाने सुरू केली जे आजकल बहुतेक सर्वत्र वापरली जाते. हल्लीच्या बहुतेक अमेरिकन भूतपटांमागे east asian सिनेमे असतात म्हणे.
विकांताला थेटरात 'The
विकांताला थेटरात 'The Conjuring' पाहिला. चांगला वाटला. २-३ सिन्स असे आहेत की जाम दचकायला होतं. माझ्या मागे काही कॉलेजकन्यका बसल्या होत्या. एका सिनमध्ये एक पात्र बेडखाली वाकून बघतं तेव्हा त्यातली एक दुसरीला विचारत होती 'कुछ है बेडके नीचे? कुछ है?' दुसरी म्हणाली 'नही है' बरं झालं तिने सांगितलं कारण मी पण डोळे मिटले होते
तलाश, व्ह्यामपायर....
तलाश, व्ह्यामपायर....
Poltergeist: good horror up
Poltergeist: good horror up to one point. I hate the other half. Most scary is the way word "Mommy" is pronounced by little, the joker and tree outside window.
The Little Girl Who Lives Down the Lane : Young Jody foster movie
Asylum: Peter Cushing
Duel : By Steven Spielberg
Child's Play
Hide and Seek: Robert De Niro
Older version of Omen and House of Wax.
Jaws
The shining
I personally don't like movies like Exorcist or Ring. I prefer more Psycho Thriller/ horror.
सर्वांत भितीदायक चित्रपट :
सर्वांत भितीदायक चित्रपट : सायलेन्स ऑफ द लँब्ज.
खुपच लहान असतांना बघितला
खुपच लहान असतांना बघितला गेल्यामुले असेल कदाचीत पण अमोल पालेकर आणि शबाना आझमीचा खामोश खुप भीतीदायक वाटला होता
भितीचा स्पर्श मानवी मनाला
भितीचा स्पर्श मानवी मनाला झाला की आपोआपच कश्या नाट्यमय घटना जन्माला येतात आणि मग माणूस कसा त्या परिस्थितीचा गुलाम होऊन बळी जातो ह्याचा अप्रतिम नमुना The Blair Witch Project.
आठ दिवसात, एका छोट्याश्या टीमने एक कॅमेरा वापरून ३५ हजार डॉलर्समध्ये बनवलेल्या ह्या चित्रपटाने २५० मिलिअन्स चा गल्ला जमवला. (साभार विकी)
रिंगच्या पंख्यांनी तोवर हे बघा, हेडफोन्स लाऊन.
http://www.youtube.com/watch?v=HaEOcVDkVHI
हो हो, सायलेन्स ऑफ द
हो हो, सायलेन्स ऑफ द लॅम्ब्जपण.
Pages