या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.
माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्यापैकी सुसह्य करतो.
तर झालं काय की, गेले अनेक वर्षं अनुभवत असलेली ही घटना या फोटोंच्या रुपानं अगदी ठळक झाली. सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण!
घरबसल्या अनुभवत असलेला हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. घरासमोर असलेल्या बिल्डींग्ज ही एक इष्टापत्ती समजावी. त्यामुळे सूर्याचं बदलणारं स्थान कसं चटकन नजरेत भरतं! प्रत्येक प्रचिची वेळही दिली आहे. कधी कधी केवळ थोड्यावेळात आकाशाचं रूप कसं पालटून जातं हे लक्षात येतं.
सूर्य उगवतो पूर्वेला
जातो पश्चिम बाजूला
उजवी बाजू दक्षिणची
डावी बाजू उत्तरेची
प्रचि १
Oct 6, 2013, 06:46:22
प्रचि २
Nov 18, 2013, 06:54:51
प्रचि ३
Dec 13, 2013, 07:08:48
२१ / २२ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायन संपून उलट प्रवास सुरू झाला....
प्रचि ४
Feb 1, 2014, 07:30:54
प्रचि ५
Feb 15, 2014, 06:51:58
यात प्रत्यक्ष सूर्य दिसत नसला तरी अंदाज येतोय आणि शिवाय फोटोही छान आहे म्हणून इथे टाकत आहे.
प्रचि ६
Mar 3, 2014, 07:21:06
प्रचि ७
Apr 12, 2014, 06:39:15
मग तर सूर्य सहजासहजी दिसेनासा होतो. अगदी बाल्कनीत जाऊनही फोटोत येत नाही. तेव्हाच केव्हातरी आमच्याकडच्या शालेय सुट्टीचा मोसम सुरू होतो. सुट्टीत रात्री उशीरा झोपल्यावर सूर्योदयाला काही केल्या जाग येत नाही. त्यामुळे फोटो निघत नाहीत. मग अर्थातच येतो पावसाळा आणि भास्करराव ढगांमागे पार लपून जातात. त्यामुळे २०/२१ जूनला सुरू होणारं दक्षिणायन माझ्या कॅमेर्याच्या अपरोक्षच सुरू होतं.
प्रचि ८
Oct 1, 2014, 07:03:55
प्रचि ९
Oct 13, 2014, 06:57:56
प्रचि १०
Oct 18, 2014, 06:53:34
प्रचि ११
Oct 18, 2014, 07:14:48
त्याच दिवशी थोड्या वेळानं....
प्रचि १२
Nov 7, 2014, 06:49:29
प्रचि १३
Nov 10, 2014, 07:07:46
अचानक ढगाळ झालं
प्रचि १४
Nov 13, 2014, 06:56:07
प्रचि १५
Nov 16, 2014, 07:16:43
प्रचि १६
Nov 17, 2014, 06:58:22
रोजच्या प्रमाणे सूर्योदय झाला खरा पण....
प्रचि १७
Nov 17, 2014, 07:52:00
पण केवळ तासाभरानं अगदी अचानक धनलाभ झाला!
प्रचि १८
Nov 21, 2014, 06:37:13
अगदी लेटेस्ट - आजचाच! सूर्योदयापूर्वी
प्रचि १९
Nov 21, 2014, 06:56:08
आणि नंतर....
या फोटोंवर कोणतेही संस्कार केलेले नाहीत. जसे काढले तसेच मांडले आहेत.
सर्व फोटो सुंदर . पण मला
सर्व फोटो सुंदर . पण मला प्रची 11 भयंकर आवडल . मस्तय तो फोटो.
फोटोवर वॉटरमार्क का नाही टाकलस
भारी! मला तुझे ते सूर्योदयाचे
भारी! मला तुझे ते सूर्योदयाचे फोटो असलेले गुड मॉर्निंग्ज फार आवडायचे!
बायदवे नंबर १७ - सगळ्यात जास्त आवडला!
भारी आहे हा प्रोजेक्ट! १८
भारी आहे हा प्रोजेक्ट!
१८ ऑक्टोबरचे फोटो मस्तच!
वाह, मस्तय! खिडकीतून फोटो
वाह, मस्तय!
खिडकीतून फोटो काढणे माझाही छंद. अर्थातच सुर्योदय आणि सुर्यास्ताचेच. सुर्योदयाकडॅ खिडकी आणि सुर्यास्ताकडे बाल्कनी. सुट्टीच्या दिवशीचा नेहमीचा पोग्राम,
पण जेवढा मस्त नजारा प्रत्यक्षात दिसतो तो फोटोमध्ये येत नाही, खास करून सुर्यास्ताला आकाशी जी रंगांची उधळण असते ती नाही दिसत फोटोत. बहुतेक स्पेशल कॅमेरा लागत असावा. खास करून पाऊसाचा फोटो टिपताना हळहळायला होते. पण तरीही मनाचे समाधान म्हणून फोटो काढतो.
भास्करराव मस्तच !
भास्करराव मस्तच !
सगळेच फोटो मस्त पण चतकोरचा
सगळेच फोटो मस्त पण चतकोरचा फोटो नं. १७ भारी वाटतोय.
वाह! मस्तच फोटो! प्रचि १७ -
वाह! मस्तच फोटो!
प्रचि १७ - जास्त आवडला!
सो सेक्सी! आय जस्ट लव्ह्ड ईच
सो सेक्सी!
आय जस्ट लव्ह्ड ईच पिक!
सर्वांना धन्यवाद. प्रचि १७
सर्वांना धन्यवाद.
प्रचि १७ हा खरंच दुर्मिळ योग आहे.
होय
होय
वॉव मामी लकी आहेस हे तुला रोज
वॉव मामी लकी आहेस हे तुला रोज घरी बसल्या बघायला मिळत.
भारी. काही काही फोटो अगदी
भारी. काही काही फोटो अगदी कातिल आलेत.
जबराट फोटोज. प्रचि १७
जबराट फोटोज. प्रचि १७ मास्टरपीस!
जबरी!! टू गूड!!
जबरी!! टू गूड!!
पण केवळ तासाभरानं अगदी अचानक
पण केवळ तासाभरानं अगदी अचानक धनलाभ झाला!
>>> अप्रतिम
अप्रतीम फोटो . प्रत्येक
अप्रतीम फोटो .
प्रत्येक फोटो वेगळा आणि सुंदर.धनलाभ वाला मस्तच.काही फोटोज खरच चित्रपटातील स्पेशल इफेक्ट दिल्यासारखे दिसत आहेत.
वॉव मामी! सुंदर प्रचि.
वॉव मामी! सुंदर प्रचि.
अप्रतिम मामे, आम्हाला
अप्रतिम मामे, आम्हाला तुझ्यामुळे रोज पहायला मिळतो.
मामी, मस्त थीम आणि फोटो तर
मामी, मस्त थीम आणि फोटो तर मस्तच. तुझ्या या गुडमॉर्निंगची चटक लागलीय आता
मस्त
मस्त
मामी ,नक्की कोणत्या फोटोचं
मामी ,नक्की कोणत्या फोटोचं कौतुक करायचं हा प्रश्न पडलाय. १७ वा तर अति सुंदर.
वावावा... मामी... खूप आनंदित
वावावा... मामी... खूप आनंदित करणारे फोटोज आहेत.. सुप्पर्ब!!!
भारी कल्पना आहे! आवडली
भारी कल्पना आहे! आवडली
सगळेच फोटो मस्त. १७ खासच!!!
सगळेच फोटो मस्त.
१७ खासच!!!
मामी सुपर्ब निरिक्षण आणि
मामी सुपर्ब निरिक्षण आणि फोटोही! इन्टरेस्टिन्ग!
अहाहा ! अप्रतिम !! <<
अहाहा ! अप्रतिम !!
<< भास्करराव मस्तच ! >> हेंही आवडलं.
[आमच्या शाळेतले एक शिक्षक दक्षिणायन- उत्तरायण समजवायला वर्गाच्या भिंतीवर पडणार्या सूर्यकिरणांचे कवडसे कसे सरकतात हे दर पंधरवड्याला आमच्याकडून भिंतीवर खूणा करून घेवून स्पष्ट करायचे. शाळेची सुखद आठवणही वरील छान प्रचिंमुळे झाली, म्हणूनही खास धन्यवाद.]
मस्त. आम्हाला सुर्यास्तावरुन
मस्त.
आम्हाला सुर्यास्तावरुन लक्षात येत उत्तरायण आणि दक्षिणायण.
समोरच छोटी बिल्डिन्ग आहे. आणि दुरवर एक टेकडी. टेकडीच्या रेफरन्सने लक्षात येत.
छानच.. मामी खरे तर मुंबईतील
छानच.. मामी खरे तर मुंबईतील अनेक मायबोलीकरांनी आपापल्या घरातून चार तारखांना असे फोटो काढले पाहिजेत. तूला तूझ्या घरातून मस्त दृष्य दिसते ते किती छान. खालच्या मजल्यावर राहणार्या आणि आजूबाजूला उंच इमारती असणार्या लोकांना तर सूर्य फक्त वर असतानाच दिसू शकतो.
सर्व प्रचि छानच!!!!!! पण,
सर्व प्रचि छानच!!!!!!
पण, प्रचि १७ एकदम खास.
खरंच खुप छान फोटो आहेत
खरंच खुप छान फोटो आहेत मामी..
या फोटोंवर कोणतेही संस्कार केलेले नाहीत.
जसे काढले तसेच मांडले आहेत. +१००
>>>>
माझं वैयक्तिक मत :
फोटोवर संस्कार करुन त्याला सुंदर बनवणारे ते photoshop आर्टिस्ट आणि योग्य तो camera अँगल, प्रकाशयोजना वापरुन फोटो काढणारे ते आपल्यासारखे उत्तम फोटोग्राफर्स मामी...
Pages