घरबसल्या उत्तरायण - दक्षिणायन

Submitted by मामी on 21 November, 2014 - 11:02

या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअ‍ॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.

माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्‍यापैकी सुसह्य करतो.

तर झालं काय की, गेले अनेक वर्षं अनुभवत असलेली ही घटना या फोटोंच्या रुपानं अगदी ठळक झाली. सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण!

घरबसल्या अनुभवत असलेला हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. घरासमोर असलेल्या बिल्डींग्ज ही एक इष्टापत्ती समजावी. त्यामुळे सूर्याचं बदलणारं स्थान कसं चटकन नजरेत भरतं! Happy प्रत्येक प्रचिची वेळही दिली आहे. कधी कधी केवळ थोड्यावेळात आकाशाचं रूप कसं पालटून जातं हे लक्षात येतं.

सूर्य उगवतो पूर्वेला
जातो पश्चिम बाजूला
उजवी बाजू दक्षिणची
डावी बाजू उत्तरेची

प्रचि १
Oct 6, 2013, 06:46:22

प्रचि २
Nov 18, 2013, 06:54:51

प्रचि ३
Dec 13, 2013, 07:08:48

२१ / २२ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायन संपून उलट प्रवास सुरू झाला....

प्रचि ४
Feb 1, 2014, 07:30:54

प्रचि ५
Feb 15, 2014, 06:51:58
यात प्रत्यक्ष सूर्य दिसत नसला तरी अंदाज येतोय आणि शिवाय फोटोही छान आहे म्हणून इथे टाकत आहे. Happy

प्रचि ६
Mar 3, 2014, 07:21:06

प्रचि ७
Apr 12, 2014, 06:39:15

मग तर सूर्य सहजासहजी दिसेनासा होतो. अगदी बाल्कनीत जाऊनही फोटोत येत नाही. तेव्हाच केव्हातरी आमच्याकडच्या शालेय सुट्टीचा मोसम सुरू होतो. सुट्टीत रात्री उशीरा झोपल्यावर सूर्योदयाला काही केल्या जाग येत नाही. त्यामुळे फोटो निघत नाहीत. मग अर्थातच येतो पावसाळा आणि भास्करराव ढगांमागे पार लपून जातात. त्यामुळे २०/२१ जूनला सुरू होणारं दक्षिणायन माझ्या कॅमेर्‍याच्या अपरोक्षच सुरू होतं.

प्रचि ८
Oct 1, 2014, 07:03:55

प्रचि ९
Oct 13, 2014, 06:57:56

प्रचि १०
Oct 18, 2014, 06:53:34

प्रचि ११
Oct 18, 2014, 07:14:48
त्याच दिवशी थोड्या वेळानं....

प्रचि १२
Nov 7, 2014, 06:49:29

प्रचि १३
Nov 10, 2014, 07:07:46
अचानक ढगाळ झालं

प्रचि १४
Nov 13, 2014, 06:56:07

प्रचि १५
Nov 16, 2014, 07:16:43

प्रचि १६
Nov 17, 2014, 06:58:22
रोजच्या प्रमाणे सूर्योदय झाला खरा पण....

प्रचि १७
Nov 17, 2014, 07:52:00
पण केवळ तासाभरानं अगदी अचानक धनलाभ झाला!

प्रचि १८
Nov 21, 2014, 06:37:13
अगदी लेटेस्ट - आजचाच! सूर्योदयापूर्वी

प्रचि १९
Nov 21, 2014, 06:56:08
आणि नंतर....

या फोटोंवर कोणतेही संस्कार केलेले नाहीत. जसे काढले तसेच मांडले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व फोटो सुंदर . पण मला प्रची 11 भयंकर आवडल . मस्तय तो फोटो.

फोटोवर वॉटरमार्क का नाही टाकलस

वाह, मस्तय! Happy

खिडकीतून फोटो काढणे माझाही छंद. अर्थातच सुर्योदय आणि सुर्यास्ताचेच. सुर्योदयाकडॅ खिडकी आणि सुर्यास्ताकडे बाल्कनी. सुट्टीच्या दिवशीचा नेहमीचा पोग्राम,
पण जेवढा मस्त नजारा प्रत्यक्षात दिसतो तो फोटोमध्ये येत नाही, खास करून सुर्यास्ताला आकाशी जी रंगांची उधळण असते ती नाही दिसत फोटोत. बहुतेक स्पेशल कॅमेरा लागत असावा. खास करून पाऊसाचा फोटो टिपताना हळहळायला होते. पण तरीही मनाचे समाधान म्हणून फोटो काढतो.

होय Happy

अप्रतीम फोटो . Happy
प्रत्येक फोटो वेगळा आणि सुंदर.धनलाभ वाला मस्तच.काही फोटोज खरच चित्रपटातील स्पेशल इफेक्ट दिल्यासारखे दिसत आहेत. Happy

मस्त

अहाहा ! अप्रतिम !!
<< भास्करराव मस्तच ! >> हेंही आवडलं. Wink
[आमच्या शाळेतले एक शिक्षक दक्षिणायन- उत्तरायण समजवायला वर्गाच्या भिंतीवर पडणार्‍या सूर्यकिरणांचे कवडसे कसे सरकतात हे दर पंधरवड्याला आमच्याकडून भिंतीवर खूणा करून घेवून स्पष्ट करायचे. शाळेची सुखद आठवणही वरील छान प्रचिंमुळे झाली, म्हणूनही खास धन्यवाद.]

मस्त. Happy

आम्हाला सुर्यास्तावरुन लक्षात येत उत्तरायण आणि दक्षिणायण.
समोरच छोटी बिल्डिन्ग आहे. आणि दुरवर एक टेकडी. टेकडीच्या रेफरन्सने लक्षात येत. Happy

छानच.. मामी खरे तर मुंबईतील अनेक मायबोलीकरांनी आपापल्या घरातून चार तारखांना असे फोटो काढले पाहिजेत. तूला तूझ्या घरातून मस्त दृष्य दिसते ते किती छान. खालच्या मजल्यावर राहणार्‍या आणि आजूबाजूला उंच इमारती असणार्‍या लोकांना तर सूर्य फक्त वर असतानाच दिसू शकतो.

खरंच खुप छान फोटो आहेत मामी..

या फोटोंवर कोणतेही संस्कार केलेले नाहीत.
जसे काढले तसेच मांडले आहेत. +१००
>>>>

माझं वैयक्तिक मत :
फोटोवर संस्कार करुन त्याला सुंदर बनवणारे ते photoshop आर्टिस्ट आणि योग्य तो camera अँगल, प्रकाशयोजना वापरुन फोटो काढणारे ते आपल्यासारखे उत्तम फोटोग्राफर्स मामी...

Pages