घरबसल्या उत्तरायण - दक्षिणायन

Submitted by मामी on 21 November, 2014 - 11:02

या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअ‍ॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.

माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्‍यापैकी सुसह्य करतो.

तर झालं काय की, गेले अनेक वर्षं अनुभवत असलेली ही घटना या फोटोंच्या रुपानं अगदी ठळक झाली. सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण!

घरबसल्या अनुभवत असलेला हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. घरासमोर असलेल्या बिल्डींग्ज ही एक इष्टापत्ती समजावी. त्यामुळे सूर्याचं बदलणारं स्थान कसं चटकन नजरेत भरतं! Happy प्रत्येक प्रचिची वेळही दिली आहे. कधी कधी केवळ थोड्यावेळात आकाशाचं रूप कसं पालटून जातं हे लक्षात येतं.

सूर्य उगवतो पूर्वेला
जातो पश्चिम बाजूला
उजवी बाजू दक्षिणची
डावी बाजू उत्तरेची

प्रचि १
Oct 6, 2013, 06:46:22

प्रचि २
Nov 18, 2013, 06:54:51

प्रचि ३
Dec 13, 2013, 07:08:48

२१ / २२ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायन संपून उलट प्रवास सुरू झाला....

प्रचि ४
Feb 1, 2014, 07:30:54

प्रचि ५
Feb 15, 2014, 06:51:58
यात प्रत्यक्ष सूर्य दिसत नसला तरी अंदाज येतोय आणि शिवाय फोटोही छान आहे म्हणून इथे टाकत आहे. Happy

प्रचि ६
Mar 3, 2014, 07:21:06

प्रचि ७
Apr 12, 2014, 06:39:15

मग तर सूर्य सहजासहजी दिसेनासा होतो. अगदी बाल्कनीत जाऊनही फोटोत येत नाही. तेव्हाच केव्हातरी आमच्याकडच्या शालेय सुट्टीचा मोसम सुरू होतो. सुट्टीत रात्री उशीरा झोपल्यावर सूर्योदयाला काही केल्या जाग येत नाही. त्यामुळे फोटो निघत नाहीत. मग अर्थातच येतो पावसाळा आणि भास्करराव ढगांमागे पार लपून जातात. त्यामुळे २०/२१ जूनला सुरू होणारं दक्षिणायन माझ्या कॅमेर्‍याच्या अपरोक्षच सुरू होतं.

प्रचि ८
Oct 1, 2014, 07:03:55

प्रचि ९
Oct 13, 2014, 06:57:56

प्रचि १०
Oct 18, 2014, 06:53:34

प्रचि ११
Oct 18, 2014, 07:14:48
त्याच दिवशी थोड्या वेळानं....

प्रचि १२
Nov 7, 2014, 06:49:29

प्रचि १३
Nov 10, 2014, 07:07:46
अचानक ढगाळ झालं

प्रचि १४
Nov 13, 2014, 06:56:07

प्रचि १५
Nov 16, 2014, 07:16:43

प्रचि १६
Nov 17, 2014, 06:58:22
रोजच्या प्रमाणे सूर्योदय झाला खरा पण....

प्रचि १७
Nov 17, 2014, 07:52:00
पण केवळ तासाभरानं अगदी अचानक धनलाभ झाला!

प्रचि १८
Nov 21, 2014, 06:37:13
अगदी लेटेस्ट - आजचाच! सूर्योदयापूर्वी

प्रचि १९
Nov 21, 2014, 06:56:08
आणि नंतर....

या फोटोंवर कोणतेही संस्कार केलेले नाहीत. जसे काढले तसेच मांडले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> तूला तूझ्या घरातून मस्त दृष्य दिसते ते किती छान. >>> दिनेशदा, सध्या तरी दिसतंय. पण स्कायलाईन सतत बदलत आहे.

>>>> फोटोवर संस्कार करुन त्याला सुंदर बनवणारे ते photoshop आर्टिस्ट आणि योग्य तो camera अँगल, प्रकाशयोजना वापरुन फोटो काढणारे ते आपल्यासारखे उत्तम फोटोग्राफर्स मामी... >>>> धन्यवाद इतक्या स्तुतीकरता. पण मी खरंच या करता पात्र नाही. अँगल, प्रकाशयोजना असा काही विचार करतही नाही. हां मात्र माझ्या मोबाईलचा कॅमेरा खूप छान आहे.

सर्वांनाच धन्यवाद. Happy

मामी, माझी आई पुर्वी अंगारकी चतुर्थी करायची. मालाडला असताना गच्चीवर गेलो कि चंद्र बरोबर कॅलेंडरमधे दिलेल्या वेळीच दिसायचा. चेंबूरला आल्यावर पहिल्यांदा तसा अगदी घरातून दिसायचा. मग नंतर इमारती व्हायला लागल्या, आणि आईला तिष्ठावे लागले. मी आणि माझी बहीण, ठिकठिकाणी जाऊन बघत असू. आम्ही चंद्र दिसला असे सांगितले कि ती आम्हाला प्रसाद देत असे.. पण स्वतः मात्र चंद्र बघितल्याशिवाय उपवास सोडत नसे...

आता तूझ्या घरातून चंद्र टिपता येतो का ते बघ Happy

माझ्या घरातूनही सेम दिसते. रोज खरेच उत्तरायण दक्षिणायन मस्त दिसते. वरील फोटोंप्रमाणे अगदी अगदी. त्यातही सूर्योदयाच्या वेळेच्या जस्ट आधी. डोंगराच्या मागे घाटातले एक मोठे डोंगर क्षेत्र दिसते. व सूर्य उगवला कि ते नाहिसे होते. मॅकेनाज गोल्ड मधील क्लायमॅक्स मध्ये कसे सूर्योदयाच्यावेळीच सोन्याच्या खाणीचा रस्ता दिसतो त्या सीनची मला आठवण येते.

मावळतीच्या वेळेस सूर्य अगदी आय लेव्हलला दिसतो. पौर्णिमेचा चंद्रोदय तर अगदी लाजवाब दिस्तो. - हे उगवतीला. रात्री तीन चार च्या सुमारास चंद्र परत आय लेव्हल ला दिसतो. कधी कधी चंद्रोदय झाल्यावर रात्री स्वच्छ पुसलेल्या जमिनीवर प्रतिबिंब दिसते व दोन चंद्र दिसतात. एकदा मी असे दोन चंद्र दिसत असताना पूर्ण गाणे पटाखा गुड्डी ऐकले त्यात एक बाईच्या आवाजात व खुद्द रहमानच्या आवाजात!! वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स इन माय लाइफ.

मी पण नवीन असताना फोटो व्हिडिओ घेतले होते पण मामी लिहीतात त्या प्रमाणे त्या क्षणांचे खरे सौंदर्य फोटोत उतरवता येत नाही. व रोजच छान दिसते म्हणून आता फोटो घेणे सोडले आहे. कधी कधी चांदण्यात गझला वगिअरे ऐकायला पण सुरेख वाटते.

अजून एक; हेच चित्र दिवाळीच्या दिवसातही फार सुरेख दिसते. छान फोटो फीचर मामी.

फार सुंदर फोटो. आम्ही २५वर्षे सुर्योदय पाहतोय पुढचे ठाऊक नाही. पहाटे जाग यावी आणि डोळे उघडल्यावर खिडकीतून बुध ,शुक्र ,चंद्रकोरीत शुक्राची चांदणी ,वृश्चिक राशीत शुक्र (ज्योतिषातही चांगला समजत नाहीत)फार वाईट्ट केविलवाणा इ॰लक्षात राहिले आहेत.
फोटोरूपी नजराणा सर्वाँसाठी दिलात आणखी काय पाहिजे.

अप्रतिम नजारा. सर्वच फोटो खूपच सुंदर. १७ नंबर तर सॉलिड.

चंद्रपण खूपच लोभस दिसतोय.

मामी यु आर लकी सूर्य-चंद्र असे मस्त दर्शन देतात आणि ते सर्व इथे शेअर केलं म्हणून आम्हाला आनंद घेता आला. धन्यवाद.

कालचा नारळीपुनवेचा पूर्णचंद्र. थोडेफार ढग होतो त्यामुळे चंद्र तलम पडद्याआड आहे.

२९ ऑगस्ट २०१५, रात्री ८.२९ मिनिटे

Pages