Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉस्ट्कोचा खजूर मी फ्रिज
कॉस्ट्कोचा खजूर मी फ्रिज मध्येच ठेवते, कधीच खराब झाला नाहीये.
ठेऊन बघ.
सध्या आमच्याकड़े आंब्याचा सीजन
सध्या आमच्याकड़े आंब्याचा सीजन आहे.
२ पेट्या एकदम घेतल्या गेल्या आहेत. खुप आंबे एकदम पिकतील. कसे preserve करता येतील?
खाऊन संपवणे. जॅम/ जेली
खाऊन संपवणे.
जॅम/ जेली करणे.
आंब्याचा रस काढून डीप फ्रिजरमधे स्वच्छ कोरड्या डब्यांमध्ये पाण्याचा अंशही लागू न देता ठेवणे. लागेल तसा वापरणे.
आंबापोळी. रसाचा गोळा (पण हे
आंबापोळी. रसाचा गोळा (पण हे शिजवणं लई लिच्चड अन कटकटीचं काम आहे)...
एका सपाट्यात जेव्हढे जास्त संपवता येतील तेव्हढे संपवायचे
आंब्याच्या साली काढून बारीक
आंब्याच्या साली काढून बारीक फोडी करायच्या; अंदाजाने थोडी साखर घालायची (आंब्यांच्या गोडीवर अवलंबून); आणि गॅसवर साखर विरघळेल इतपत एक चटका द्यायचा, साखरांबा बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवायचा.
पक्का पाक नसल्यामुळे हा बाहेर टिकत नाही, पण फ्रीजमधे वर्षभरही टिकतो. झटपट कृती आहे, त्यामुळे माझी लाडकी पाक कडक होणे, फोडी आक्रसणे हे प्रकार होत नाहीत.
अरे खाउन टाका! आंबा काय
अरे खाउन टाका! आंबा काय ठेवायची चीज नाय!: )
सलाड, मँगो मूस, मँगो लस्सी,
सलाड, मँगो मूस, मँगो लस्सी, हे देखील करता येइल कुल्फी आंब्याचा शिरा हे देखील आहे.
दिनेशदा, वेका, अनुश्री
दिनेशदा, वेका, अनुश्री धन्यवाद!
मीही बंद करून डबा पॅन्ट्रीत ठेवला होता. काही खजूर वाळल्यसारखे होउन , बाहेरून साखर जमा होतेय असं दिसलं. बहुतेक मी खराब न झालेले खजूर फेकून दिले
खजूर खराब झालेत हे कसं ओळखायचं ?
पूर्ण तयार झालेला खजूर असेल
पूर्ण तयार झालेला खजूर असेल तर त्यात भरपूर साखर असते. ( म्हणून तो खराब होत नाही. )
पण जर अर्धवट पिकलेला झाडावरून काढला असेल तर तो मऊ पडतो, त्याला बुरशी येऊ शकते किंवा त्याला आंबूस वास येऊ शकतो.
धन्यवाद! आंब्याचा रस, मिल्क
धन्यवाद!
आंब्याचा रस, मिल्क शेक, कुल्फी आणि नुसता आंबा चिरून/चोखून खाणे हे प्रकार सध्या सुरु आहेत. पण पुढील आठवड्यात १५-२० आंबे एकदम पिकतील तेव्हा वरील प्रयोग करणेत येतील.
(इथल्या आंब्याचा गोडवा खुप आहे, घमघमाट आहे पण 'आंबा' चव मिसिंग आहे.)
समई कितीही दुकानातून तपासून
समई कितीही दुकानातून तपासून घेतली तरी गळते, काही उपाय आहे का न गळण्यासाठी? (इतर कुठे हा प्रश्न टाकावा ते कळले नाही म्हणून इथे टाकला)
राजसी, समईला पर्मनंट काही
राजसी, समईला पर्मनंट काही करता येतं का माहित नाही .. पण आई नेहमी स्टीलची प्लेट ठेवते समईखाली .. समई तेलाने पुर्ण भरत नाही .. कोणीतरी लक्ष ठेवुन असतं तेल संपत आलं तरं..
मेण लावतात, एम-सील लावतात पण
मेण लावतात, एम-सील लावतात पण माझी आजी पण ताटलीच ठेवत असे.
ओके. मी पण छोटी ताटली ठेवते,
ओके. मी पण छोटी ताटली ठेवते, ते तेलाचे ओघळ बरे दिसत नाहीत. कोणला काही नुस्का माहित असेल म्हणून विचारले. बहुतेक समई थोडी वर्ष- दोन वर्षे जुनी झाली की असं होत असावं असं. हौसेनी घेतलेली समई बदलावी असं पण वाटत नाही. निरांजनांना ही अडचण अद्यापि आलेली नाही.
मेण लावून बघेन.
धन्यवाद.
समईत घालण्यासाठी एक मध्यभागी
समईत घालण्यासाठी एक मध्यभागी भोक असलेली पंचवीस पैश्याच्या आकाराचे एक चकती मिळते. वात तेलात ठेवून वातीचं टोक त्यातून काढून वात लावायची, ज्यामुळे तेल गळत नाही.
पंचवीस पैश्याच्या आकाराचे एक
पंचवीस पैश्याच्या आकाराचे एक चकती बहुधा देवळाच्या जवळपासच्या दुकानात बघावी लागेल अथवा महाराष्ट्र ट्रीप ची वाट बघायची. धन्यवाद.
Cut mango into large pieces
Cut mango into large pieces and spread them on a plate lined with butter paper. Put the plate in deep freezer for about 4 hrs. Now you can store them in Ziploc sandwich bags to get good sized portions. This way the mango pieces will not clump together.
These are great for making smoothies, it does the job of both flavor and ice
वातीचं टोक तेलात असल्यामुळे
वातीचं टोक तेलात असल्यामुळे वात भिजलेली राहते. वरून चकती ठेवल्यामुळे वातीवरून तेल ओव्हरफ्लो होत नाही.
राजसी, तात्पुरता उपाय म्हणून नटबोल्टमधला बोल्ट वापरून बघू शकता.
माझ्याकडे मक्याचे पोहे आहेत.
माझ्याकडे मक्याचे पोहे आहेत. (जवळपास १ कि)
तळून चिवडा करण्याव्यतिरिक्त काय करता येइल त्याचं???
मायक्रोवेव्ह मध्ये भाजून
मायक्रोवेव्ह मध्ये भाजून चिवडा.
कांदे-पोहे पण करतात (साध्या पोह्यासारखेच धुवून) पण मला ते विशेष आवडत नाहीत. गिच्च गोळा होतात.
धन्स सिमंतिनी.... करुन
धन्स सिमंतिनी.... करुन बघेन
कांपो होत असतिल तर मग कटलेट्स करुन बघावे का?
I want to make veg biryani
I want to make veg biryani and I have Everest Shahi Biryani masala. As per instructions I need to add ginger-garlic paste and finely chopped onions. But right now I don't have garlic and onions and can't go to market.
I have garlic-onion powder (Kolhapuri kanda lasun masala powder)
May sound odd.... but would that work if I add it into vegetables along with biryani masala?
May sound odd.... but would
May sound odd.... but would that work if I add it into vegetables along with biryani masala? भाजीला चालेल पण बिर्याणीला नक्को...
मंजूडी +१ प्रज्ञा९, कांदा,
मंजूडी +१
प्रज्ञा९,
कांदा, लसूण नसेल तर बिर्याणी ऐवजी वेज पुलाव कर.
I am pulao recipe challenged
I am pulao recipe challenged
I don't know what goes wrong, but pulao is my fiasco recipe.
मी पण पुलाव चॅलेंज्ड होते. पण
मी पण पुलाव चॅलेंज्ड होते. पण मैत्रीणीने टिप्स दिल्या. गरजेपेक्षा मोठे भांडे घ्यायचे, तांदूळ धुवुन अर्धा तास बाजूला ठेवायचे. तेल आणि तूप एकत्र गरम करून त्यात अख्खा मसाला, मग तांदूळ, बिर्याणी/पुलाव मसला, हळद घालून परतते. मग उभ्या चिरून मिरच्या/तिखट घालते. परतून तांदळाच्या दुप्पट पेक्षा थोडे कमी , कोमट पाणी घालायचे. मीठ घालून चव बघते. पाण्याची चव थोडीशी खारट हवी म्हणजे मीठ पुरेसे आहे असे धरते. आता भाज्या- पहिल्यांदा गाजराचे तुकडे घालते, मग ५ मिनिटांनी तेलावर परतून घेतलेल्या फ्लॉवरचे तुकडे घालते. भातातले पाणी आटायला लागले की मटार, फरसबी, काजू आणि थोडे बेदाणे घालते. पाणी आटले की पाच मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर ठेवते. मग फोर्कने काढून १३x९ च्या पॅनमधे पसरते. या स्टेजला चव बघायची. गरज असेल तर मसला, मीठ परत भुरभरवून फोर्कने हलक्या हाताने ढवळायचे. आयत्या वेळी झाकण ठेवून (घट्ट लावायचे नाही) मावेत गरम करायचे.
मी नुकताच ३० जणांच्या पॉटलक ला (सगळे अमेरिकन) साईड डिश म्हणून नेला होता. सगळ्यांना खूप आवडला.
If you have Ruchira book by
If you have Ruchira book by Kamlabai Ogale, follow her pulav recipe exactly. It tastes fantastic.
Thanks Swati and
Thanks Swati and Rajasee...
Today I done biryani without onion-garlic. It is just OK. not so much tasty. anyways.... Tomato saar and kakadi salad will help me.
I will try pulao definitely with your tips and also once referring Ruchira.
घरी चॉकलेट केलॉग्स पडले आहेत
घरी चॉकलेट केलॉग्स पडले आहेत .
नुसते किन्वा दूधात घालून खायचे नसल्यास काय करावे ?
Swasti, powder some chocolate
Swasti, powder some chocolate flakes in mixer, add milk to make thick batter consistency. Add sugar and chocolate sauce to taste. Put it in freezer and make ice cream ☺ Make first batch for one serving. If everyone likes it then within no time it will be finished.
Pancakes is another option but you might need egg or some other binding agent.
Pages