Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रावी, दुधी पाण्यात किसायचा.
रावी, दुधी पाण्यात किसायचा. म्हणजे परातीत पाणी घेऊन त्यात किसणी ठेऊन दुधी किसायचा.
शिजायला टाकताना थोडा थोडा किस पाण्यातून काढायचा, दोन्ही हातांनी व्यवस्थित दाबून पाणी काढून टाकून तुपावर टाकायचा. थोडं पाणी राहिलं तरी हरकत नाही.
दुधी पाण्यात किसल्यावर म्हणजे दुधीचा कीस काळा पडत नाही. आणि हलव्याला छान हलका पिस्ता रंग येतो. आता तुम्हाला नक्की कुठला रंग अभिप्रेत आहे ते माहिती नाही
छान हलका पिस्ता रंग > हाच रंग
छान हलका पिस्ता रंग > हाच रंग हवा आहे. करुन बघेन आता. धन्स !
आणि ते पाणी आमटीत टाकायचं
आणि ते पाणी आमटीत टाकायचं म्हणजे दुधीची विरघळलेली व्हिटामिन्सपण मिळतील सगळ्यांना.
आणी त्यात थोडे
आणी त्यात थोडे बदाम-पिस्ते-काजू पण कातरुन टाकायचे, झकास चव येईल.
आणी त्यात थोडे
आणी त्यात थोडे बदाम-पिस्ते-काजू पण कातरुन टाकायचे, झकास चव येईल.>> आमटीत?
रश्मी.., दुधीहलव्यात घालायचाच
रश्मी.., दुधीहलव्यात घालायचाच सुकामेवा पण आमटीत?
रावी, मी दुधी, दुधातच किसते
रावी, मी दुधी, दुधातच किसते आणि गॅसवर शिजत ठेवते. थोड आटल्यावर साखर घालते. त्यानंतर ड्रायफ्रुटस + खवा घालते. हलवा घट्ट झाला की गॅस बंद करून १ टे.स्पून तूप घालते. दुधीचा रंग बदलत नाही. हलका पिस्ता रंग राहतो हलव्याचा.
अग मन्जुडी, नाही ग, मी
अग मन्जुडी, नाही ग, मी हलव्याबद्दल लिहीले.:स्मित: दूधीचा रन्ग पण पिस्त्यासारखा असतो म्हणून लिहीले. मला या हलवा प्रकारात ( दूधी, गाजर वगैरे) भरमसाठ सुकामेवा घालायची सवय आहे, म्हणून लिहीले. नेमके आशुडीच्या पोस्टनन्तर ते आले. लिहीताना थाम्बले होते मी.
अचूक वेळ साधलीस.
अचूक वेळ साधलीस.
आणी या गडबडीत तुला धन्यवाद
आणी या गडबडीत तुला धन्यवाद द्यायचे राहुन गेले. कितीही गडबड केली किन्वा झटापट आवरले तरी दूधी किसताना काळाच पडायचा. आता बरे झाले तुझ्या पोस्टमुळे हे काम पण झाले.:स्मित:
आणी आमटीत सुकामेवा म्हणल्यावर हिवाळ्यासाठी अती पौष्टीक सत्वयुक्त आमटी तयार झाली असती.:फिदी:
रश्मी..,पौष्टीक सत्वयुक्त
रश्मी..,पौष्टीक सत्वयुक्त काश्मिरी आमटी.
आता दुधी पाण्यात नका दुधातच किसा म्हणजे काळा पडणार नाही आणि दुधीची पाण्यात विरघळलेली व्हिटामिन्सपण मिळतील सगळ्यांना, त्यासाठी आमटीत टाकायची गरज नाही.
आरती, काश्मिरी पद्धतीच्या
आरती, काश्मिरी पद्धतीच्या आमटीत जर्दाळु पण घालत असतील तर्?:फिदी:
वर नीधपने दिलेल्या काश्मिरी पुलावासारखाच त्या काश्मिरी लोकान्चा खुबानी चावल ( मीठा जर्दाळु वाला) प्रसिद्ध आहे. मी खाल्लेला नाहीये, पण त्या पुलावावरुन त्याची आठवण आली.
अरे वा.. माझा पण हाच
अरे वा.. माझा पण हाच प्रॉब्लेम होता.. दुधी काळा पडायचा.. ही पाण्यात किसायची आयडीया मस्त आहे.. करुन बघीन!
दुधातला हलवा आवडत नाही!
मला आता पर्यंत खुबानी म्हणजे
मला आता पर्यंत खुबानी म्हणजे खजुर वाटायचा
रश्मि, दुधातला हलवा आवडत
रश्मि,
दुधातला हलवा आवडत नाही! <<< धनुकली, मग हलवा कशात शिजवते??? पाण्यात पाणचट चव येत नाही का???
आरती., दुधी दुधात किसला तर तो
आरती., दुधी दुधात किसला तर तो तुपावर परतण्यासाठी निथळून (हस्तस्पर्श टाळा!) परतता येणार नाही, आणि दुधासकट परतला तर त्याला खमंगपणा येणार नाही असं माझं मत
ज्याला जे चवीला आवडेल, सोपं वाटेल तसं त्याने करावं.
पाण्यात अ ओ, आता काय करायचं
पाण्यात अ ओ, आता काय करायचं पाणचट चव येत नाही का???>> दुधीचा कीस नुसता वाफेवर छान शिजतो. नंतर थोडं दुध आणि साखर घातल्यावर सुटलेल्या पाण्यात व्यवस्थित मऊ शिजतो. मग खवा घालून परतते मी.
मला तुपात भाजलेले हलवे
मला तुपात भाजलेले हलवे आवडतात.. दुधात उकळलेले जरा फदफदीत लागतात असं मला वाटतं!
मी लागल्यास पाण्याचा हबका मारते.. पण पुर्ण तुपातच शिजवते गजर, दुधि, कोहोळे..
खीर अन हलव्यात मला सरमिसळ आवडत नाही!
लोक दुध टाकुन आटवतात त्याला हलवा म्हणवत नाहीच मला..
७ वर्षे असा दुधात उकळलेला सक्तीचा गाजराचा हलवा (मी ह्यला घट्ट खीर च म्हणते) खाल्ल्यावर 'असली' हलव्याची चव ह्च विसरुन गेलिय
मंजुडी, आमची पद्धत पूर्ण
मंजुडी, आमची पद्धत पूर्ण वेगळी आहे. आम्ही दूधीचा किस किंवा गाजराचा किस तूपात परतत नाही त्याने किस आक्रसतो. परतलेल्या किसाची चव आणि किसाचा रंग थोडा बदलतो ते आम्हाला आवडत नाही.
मंजुडी, माझीही हिच
मंजुडी, माझीही हिच पध्धत..!
असो.. आपापल्या आवडीनुसार बनवावा
७ वर्षे असा दुधात उकळलेला
७ वर्षे असा दुधात उकळलेला सक्तीचा गाजराचा हलवा <<<< धनुकली, तुला आवडतो तसा बनवून खा.
हो, दूधी आधी तुपात परतला तरच
हो, दूधी आधी तुपात परतला तरच चव येईल. कारण आधीच त्यात पाणी भरपूर, परतला नाहीतर पाणचट चव येईल की.
परतला नाहीतर पाणचट चव येईल
परतला नाहीतर पाणचट चव येईल की.<<< रश्मी, पाणचट चव नाही येत. हलवा तयार झाल्यावर गॅस बंद करून वरून तूप घालायच. एकदा वरील पध्दतीने बनवून बघा.
चालेल आरती.तसा करुन बघेन.
चालेल आरती.तसा करुन बघेन.
खूप कीस पाडलाय मुलींनी
खूप कीस पाडलाय मुलींनी दुधीचा..............
म्हणून माझी भरः
दुधीचा कीस थोडा पातळ तुपाचा हात लावून चक्क छोट्या कुकरात शिजवायचा. नंतर त्यात मिल्क पावडर आणि सुका मेवा साखर घालून मावेत २ मि. शिजवायचा.
इतक्यांदा दुधीचा किस असं
इतक्यांदा दुधीचा किस असं वाचून वाचून दुधीला भरून पावलं असेल आणि दोडक्या जेलस झाला असेल.
मानुषीकाकू त्या किसात अजून
मानुषीकाकू त्या किसात अजून एक भर त्यादिवशी विसरली.
आम्ही १ चमचा खसखस कोरडी हलकी भाजून शिजत असलेल्या दुधीच्या किसात घालतो. खाताना मस्त टेस्ट येते.
खजूर खराब होउ नये म्हणून
खजूर खराब होउ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावा का? कॉस्ट्को मध्ये मेड्जूल खजूर म्हणून मोठा डबा मिळतो. इतके गोड आणि मस्त खजूर असतात की दुसरा कोणता खजूराचा प्रकार आणवत नाही. पण ते संपायच्या आधीच खराब होउन जातात.
ज्ञाती, खजूर सहसा खराब होत
ज्ञाती, खजूर सहसा खराब होत नाही. त्यासाठीच वाळवंटातील लोकांचा तो प्रिय खाऊ आहे. घरी खराब होत असेल कारण त्याला पाणी वगैरे लागत असेल. त्यासाठी छोटे पॅक्स करून फ्रिजमधे ठेवा. खायच्या आधी थोडावेळ बाहेर काढून ठेवा. थंड केलेले पदार्थ आपल्या जिभेला थोडे कमी गोड लागतात.
कॉस्टकोचा तोच खजुर आमच्याकडे
कॉस्टकोचा तोच खजुर आमच्याकडे पण आणला जातो. कधी खराब झाल्याचं आठवत नाही. पण मी तो पँट्रीत आतमध्ये ठेवते आणि झाकण नेहमी नीट बंद करून ठेवते. काहीवेळा तो सुकतो अगदीच नाही वापरात आला तर. ओलेपणा लागेल अशा ठिकाणी ठेवू नका.
Pages