युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे ही रेडीमेड चिंच खजूर चटणी मस्त मिळते. त्यामुळे घरी करायची गरज वाटत नाही. मागे केली होती ती अशी:
चिंच खजूर कुकरला टाकून ३ शिट्ट्या करून घ्याव्यात. गार झाल्यावर एका पातेल्यात घेऊन गूळ, मीठ, पाणीपुरी मसाला वगैरे घालून बारीक गॅसवर थोडं शिजवावं. गार करून बर्फाच्या ट्रे मध्ये घालून फ्रिज करावं. नंतर क्युब्ज झाले की घट्ट झाकणाच्ञा डब्यात ठेवून फ्रिजरला टाकल्यास लागतील तसे क्युब्ज थॉ करता येतील.

अगो, try Funfoods brand's tomato imli dip. It's very good. In fact, I tried many products of that brand and loved them all, except white pasta sauce. White pasta sauce was little tangy for my tastes but family members loved that too.

Typing from mobile and देवनागरी is taking forever. Sorry Sad

अगो, ही चिंच -गूळ - खजूर चटणी चं मिश्रण व्यवस्थित उकळवून घेतलं तर चटणी जास्त दिवस टिकते.

तसंच केलेली चटणी ५-६ छोट्या छोट्या कंटेनरमध्ये काढून फ्रीज केली किंवा आइसक्यूब च्या स्वरुपात फ्रीज केली तर लागेल तसं वापरायला काढता येतं. मावे मधे थॉ करुन लागेल तेवढे थंड पाणी घालायचे. फ्रीज करायची चटणी नेहमी concentrated असावी..

राजसी, फन फूड्स ट्राय करेन पण त्याची चव चिंच-गुळाच्या चटणीपेक्षा वेगळी असेल ना.

सायो, हे सगळं मिश्रण मिक्सरमधून काढण्याची स्टेप लिहायला विसरली आहेस Happy चिंच तशीच घालतेस का ? त्याचे दोरे राहत नाहीत का मिक्सरमधून काढल्यावर ? का मग नंतर सगळं गाळून घेतेस ?

शुगोल, आईसक्यूब्जची कल्पना मस्त आहे. सायोनेही विपुत लिहिली आहे. करुन बघेन नक्की. सध्या सगळे फ्रिजमध्ये टिकते म्हणतायंत तर तो सोपा पर्याय घेते.

ललिता, मी पुण्यात असल्याने तोही प्रश्न निकालात निघाला Happy

ह्यावेळी मी चिंच तर उकळलीय पण खजूर फक्त दीड मिनिट मावेतून काढला. पुढच्यावेळी सगळंच उकळून घेईन.

हो, ते मिक्सरमधून काढून गाळायचं लिहायला विसरले. उकळून घेतल्याने मस्त बाहेरच्या चटणीसारखा दाटपणा येतो.

फनफूड्सची चटणी आणि बाकी प्रॉडक्ट्स इथंही मिळतात. पण मला त्यांची चव आवडली नाही. वास पण कसला तरी विचित्र येत राहतो. त्या ब्रॅण्डचं आणलेलं एगलेस मेयोनीज फेकून दिलं.

स्मिथजोन्सची भेलपुरी चटणी नावानं ही चटणी मिळायची, चवीला एकदम मस्त आणि वासपण नाही, तीन चार सुपरमार्केटमध्ये वगैरे चौकशी केली. कुठंही मिळाली नाही. Sad

आता सायोच्या टिप्सनं घरी करून ठेवेन.

मी चिंच आणि खजूर वेगवेगळा भिजत घालते कोमट पाण्यात. चिंच कोळून घेते. खजूर मिक्सरमधून काढते. दोन्ही एकत्रं करुन त्यात मीठ घालून चांगलं उकळवते.

हो नंदिनी, स्मिथजोन्सची भेलपुरी चटणी मी अनेकदा वापरलीय. खूप छान आहे पण आताशा मला कुठेच मिळत नाहीय हि चटणी.

मी सायोसारखीच केली होती मागे फक्त इथे मिळतं ते चिंचेच काँसंट्रेट वापरलं होतं आणि कुकरम्धून न काढता गॅसवर भ र पू र उअ़अळवली होती.

पण आजकाल दीप्चीच आणते इंग्रो मधून.
मी इथे एक आगाउ सल्ला देउ का? अशी रेडिमेड चटणी/ण्या फ्रीज मध्ये असल्या तर सारखच मनात येत राहातं शेव बटाटा पुरी, पाणीपुरी, भेळ असे पदार्थ खावेत असं...त्याने दूरगामी तोटा होतो Proud

चटण्या बिटण्या फ्रिजमध्ये करुन ठेवल्या तरी पुर्‍या वगैरे स्टॉक अप करून ठेवू नयेत. बाहेर जाऊन घेऊन येण्याच्या विचाराने खायची इच्छाही आपोआपच मरेल. Wink

भेळ हा प्रोटीन, व्हिटामिन सी, बी आणि ए (उतरत्या क्रमाने) आणि कमी कॅलर्या असणारा तिशी नंतर खायचा अत्यावश्यक पदार्थ आहे. Wink तेव्हा वरील दोन तीन पोस्टी मी इग्नोर मारते Wink Happy

चटण्या बिटण्या फ्रिजमध्ये करुन ठेवल्या तरी पुर्‍या वगैरे स्टॉक अप करून ठेवू नयेत. बाहेर जाऊन घेऊन येण्याच्या विचाराने खायची इच्छाही आपोआपच मरेल. >>>> अगदी! अगदी! पुर्‍या पण हल्ली फार भारी मिळायला लागल्या आहेत इथे. येताजाता उगाचच एक दोन खाल्ल्या जातात!

कोणीतरी सुगरणीने हे सगळे फ्रिजमधे ठेवल्यवर दिसणार्‍या फ्रिजचा फोटो टाकावा.------ Happy

माझ्या फनफूडस फ्रिजचा फोटो चालणार आहे का :p ?

स्मिथजोन्स आणि मॅगी इमली पिचकू बद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. कारण दुकानात खूप वेळा दिसले पण आणायचा धीर होत नव्हता - सगळ्या बाटल्या मोठ्या होत्या. सॅशे किंवा छोट्या बाटल्या दिसल्या नाहीत.

पुण्याहून आणवलेली चिंगु चटणीची पाकिटं कालच संपली. त्यामुळे जरा खिन्नच होते. मला चिंच कोळून, खजूर भिजवून,मिक्सरमधून काढून उकळून वगैरे चटणी करण्याचा उरका/सुगरणगिरी जमत नाही. Proud त्यामुळे सगळी भिस्त तयार मालावर

घरी चुरमुरे, फरसाण कायमच असतं तेव्हा ही चटणी असणं मस्ट Wink तसंही आमच्याकडे कोरडी भेळ खाणं (झालमुडी) हे रोजचं असलं तरी चालतं. त्याची भेळ व्हर्शन कधीमधी करायला छान वाटतं.
पापुऐवजी मात्र फुचकाच हवा

मला उलट ती चिंगू चटणीच आवडत नाही फारशी. बाकी काहीच मिळालं नाही तर ती आणते. मॅगी इमली पिचकू ची चव अधिक चटकदार असते.

हो, ती चटणी मलाही फारशी आवडली नाही. पण गरजवंत असल्याने चालवून घेत होते इतकंच. आता या वीकेण्डला जाऊन ती इमली पिचकू घेऊन येते

स्नू, भारतात कुठल्याही मोठ्या दुकानात किचन प्रेस नावाने सोर्‍या मिळेल. तो वापरून चकली, शेव, पापडी सर्व करता येते.
हाताने कडबोळी वळतात. तामिळ लोक थोडासा पीळ देऊन एक प्रकार करतात तसा खरा.

उरलेल्या अल्फ्रेडो सॉसचं काय करता येईल? मी जेव्हा पास्ता करते तेव्हा अर्धी छोटी बाटली वापरली जाते आणि पास्ता भरपूर प्रमाणात होतो तेव्हा पुन्हा पास्ता करावासा वाटत नाही. गेल्या वेळी उरलेला सॉस वाया गेला. अजून काय पदार्थ करता येतील ज्यात क्रिमी अल्फ्रेडो वापरता येईल?

Pages