युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे अर्धी बरणी भरून पातळ पोह्यांचा (विकतचा) चिवडा आहे. त्यात शेंगदाणे वगैरे भरपूर आहेत. नुसतं खाण्याव्यतिरिक्त संपवण्यासाठी युक्ती सांगा.

पोहे संपवायचेत की दाणे संपवायचेत?

दाणे वेचून (खायचे नसतील तर) कबूतरांना घाल/ (खायचे असतील तर) कूट कर.
पोहे वेचून Uhoh (ऑल द बेस्ट!) पोहे फॅन क्लबाला सामोरी जा Proud

कोणत्या भाज्या रात्री बनवून ठेवता येतील आणि सकाळी गरम करून tiffin मध्ये नेल्यास दुपारपर्यंत खराब होणार नाहीत ??

मंजुडे आणि इतर मला अख्खा चिवडा संपवायचा आहे.

श्वेतु - पदार्थात ओलं खोबरं न वापरता एखादी भाजी करून थंड करून मग फ्रिजात ठेव. शक्यतो ऑफिसला नेताना तशीच फ्रिजातून काढून ने. गरम नाही केली तरिही चालते कारण तु खाईपर्यंत ती नॉर्मल ला येईल. कारण कधी कधी मधेच गरम करून मग वस्तू बाहेर (फ्रिजच्या) राहिली तर खराब होऊ शकते.

बरं तुझं ठिकाण काय? मुंबई असेल तर वरची माहिती तुला उपयुक्त नाही.

भाज्या बनवुन का ठेवायच्या? त्यापेक्षा त्या आदल्या रात्री निवडुन, चिरुन ठेवा. पूर्वतयारी करा. शिळे कशाला खायचे? पूर्वतयारी असेल तर पटकन फोडणीला टाकुन, तुमचे आवरुन होईपर्यत कुकरला एक वाफ काढा.

भेंडी, कोबी, फ्लॉवर, फरसबी, गवार सारख्या भाज्या आदल्या रात्री चिरुन ठेवता येतील. पालेभाज्या निवडुन ठेवता येतील, फुप्रो ला सकाळी चिरुन होतील. बाकी कुणी सांगतील तसे. विचार करा.

पीठ पेरलेल्या भाज्या (जसे कांदापात, कोथिंबीर, सिमला मिरची), बटाट्याच्या काचर्‍या खरपूस करून, भेंडी बारीक चिरून व खरपूस परतून दुसर्‍या दिवशी चांगली राहाते.
कोरड्या उसळी (ओलं खोबरं न घालता) चांगल्या राहू शकतात.

भाज्या आदल्या रात्री नुसत्या उकडून गार झाल्यावर फ्रीजात घालू शकतो व दुसर्‍या दिवशी रूम टेंपरेचरला आणून फक्त फोडण्या द्यायच्या.

भाज्या आदल्या रात्री नुसत्या उकडून गार झाल्यावर फ्रीजात घालू शकतो व दुसर्‍या दिवशी रूम टेंपरेचरला आणून फक्त फोडण्या द्यायच्या >>>> भाजी करून ठेवणे आणि ही पद्धत यांत काय फरक आहे ? उगीच दोन वेळा कुटाणा.

डबा भरून फ्रीजमध्येच ठेवला आणि सकाळी तसाच उचलून ऑफिसला नेला तर जेवणाच्या वेळेपर्यंत रुम टेंपला येतो. मग अन्न फार गरम करायची पण गरज उरत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत मी फ्रिझरमध्ये ठेवते डबा किंवा ऑफिसमध्ये आल्या आल्या इथल्या फ्रिझमध्ये.

पोहे संपवायचेत की दाणे संपवायचेत?

दाणे वेचून (खायचे नसतील तर) कबूतरांना घाल/ (खायचे असतील तर) कूट कर.
पोहे वेचून अ ओ, आता काय करायचं (ऑल द बेस्ट!) पोहे फॅन क्लबाला सामोरी जा फिदीफिदी
+++११११११११११११

काहीही बरं का... चिवड्यात शेंगदाणे भरपूर आहेत ही अतिरिक्त माहिती आहे. चिवड्यातले नुसते दाणे संपवायचेत असं मी लिहिलंय का कुठे? Uhoh

माझ्याकडे अर्धी बरणी भरून पातळ पोह्यांचा (विकतचा) चिवडा आहे. नुसतं खाण्याव्यतिरिक्त संपवण्यासाठी युक्ती सांगा.>>>खायचा नसेल तर वाटून टाका..

त्यात शेंगदाणे वगैरे भरपूर आहेत.>>हे वाक्य त्यात आल्याने शेंगदाण्यामुळे चिवडा संपत नाही असा समज होतो/झाला.

रश्मी तसंही भाज्य चिरून ठेवल्या की त्यातली पोषक मुल्ये कमी होतात असं म्हणतात. म्हणजे तुमची ती आधी तयारी करून ठेवायची पद्धतही बादच म्हणायची.

त्यातल्या त्यात दक्षिणाने सांगितलेली पद्धत बरी वाटते.

माझी आई मला जनरली उसळी द्यायची (कोरड्या फार ओलसर नाही) आणि बाजूला दही बिही...माझा डबा कधी खराब झाला नाही. पण मुंबईच्या हापिसात फ्रीज नसला तरी एसी असायचा. तुमच्याकडे एसी नसेल तर एक दोन भाज्या तुम्हीच ट्राय करा आणि मग सांगा इथेच काय क्लिक झालं ते.

शुभेच्छा Happy

शक्यतो ऑफिसात एसी असतोच त्यामुळे घरून नेलेले डबे बॅगमधून काढून डेस्क वर वा कॅबिनेट असेल तर त्यात वेगळे काढून ठेवावेत. भाज्या चागल्या राहातात. त्या टपरवेअर च्या झाकणाच्या कडेत जर तेल गेलेलं असेल तर ते बरोबर ड्ब्यात येतं अन नंतर झाकण धुवायला त्रास होत नाही... Proud
मी कधी कधी असं करतो. मुंबईत असून ईतका प्रॉब्लेम नाही येत.
रात्रीची भाजी (२१३० नंतर केलेली) दुसर्या दिवशीच्या लंच पर्यंत राहाते. पण मग मी तिला मावे नाही दाखवत, खरंतर काही हरकत नसावी पण मला उगीच वाटत राहतं की खराब होईल म्हणून...

माझ्याकडे अर्धी बरणी भरून पातळ पोह्यांचा (विकतचा) चिवडा आहे. त्यात शेंगदाणे वगैरे भरपूर आहेत. नुसतं खाण्याव्यतिरिक्त संपवण्यासाठी युक्ती सांगा. >>> बरणीवर चिठ्ठी लाव 'चिवडा संपला आहे' म्हणुन Lol

पदार्थात ओलं खोबरं न वापरता एखादी भाजी करून थंड करून मग फ्रिजात ठेव. शक्यतो ऑफिसला नेताना तशीच फ्रिजातून काढून ने. गरम नाही केली तरिही चालते कारण तु खाईपर्यंत ती नॉर्मल ला येईल. कारण कधी कधी मधेच गरम करून मग वस्तू बाहेर (फ्रिजच्या) राहिली तर खराब होऊ शकते.>>>>>>>>>>>>>>... दक्षिणा दी ने बरोबर सांगितलय...... मी नेहेमी हेच करते....माझा जेवायचा टाईम नॉर्मली २ ते ३ च्या आसपास असतो आणि मी सकाळी ८ ला घर सोडते...फ्रिज मधुन तयार भाजी तशीच नेते...काहीच होत नाही....आणि सर्व ऑफिसांत एसी असतोच.....काहिच होत नाही...

पण आदल्या दिवशी रात्री जागून भाजी करण्यापेक्षा दुसर्या दिवशी लवकर उठून केलेली चांगली नाही का ? मोस्ट भाज्या १५ ते २० मिंटात चांगल्या शिजतात. सकाळी उठून पहिली भाजी फोड्णीला टाकायची मगच बाकीची आन्हिके आवरायची.(including दात घासणे, आंघोळ वगैरे ). मी बर्याच वेळा असंच करते.

पण आदल्या दिवशी रात्री जागून भाजी करण्यापेक्षा दुसर्या दिवशी लवकर उठून केलेली चांगली नाही का ? मोस्ट भाज्या १५ ते २० मिंटात चांगल्या शिजतात. सकाळी उठून पहिली भाजी फोड्णीला टाकायची मगच बाकीची आन्हिके आवरायची.(including दात घासणे, आंघोळ वगैरे ). मी बर्याच वेळा असंच करते.> अनुमोदन, बहुतेक भाज्या छोट्या भाजीच्या कूकर मधे चांगल्या होतात. शक्यतो रात्री करून ठेऊ नका.

अरे अरे.. आंघोळ नाही ठीक आहे.. पण कीमान दात घासून, तोंड धुवून तरी दिवसाची सुरुवात करा Happy

बरं, अंड्याच्या पिवळ्या बलकाचा कसा वापर करता येईल? खाणे आणि केसांना लावणे या व्यतिरिक्त..

श्री तुला फक्त विनाअर्थाच्या पिंका टाकता येतात. कशाला स्वतःचा वेळ घालवतोस? या पुढे प्लिज माझ्या लिखाणावर किंवा माझ्याशी रिलेटेड कोणत्याच पोस्टिवर वगैरे लिहिण्याचे कष्ट तू घेऊ नकोस ही विनंती.

मंजूडी, कस्टर्ड बनवता येईल. नुसत्या पिवळ्या बलकाचं ऑम्लेट बनवता येईल. (पण ते खाणे मधे इन्क्लूडिग असेल)

दक्षिणा, चिवड्यावर चुरमुरे,कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चिंचेची चटणी घालून खाऊ शकशील. मस्त यम्मी भेळ लागते.
चिवड्यात उसळ मिसळून खाता येईल.
नुसता खायला कंटाळा आला असेल तर असे काहीतरी करून संपवता येईल.

मंजूडी खाणे आणि केसांना लावणे या व्यतिरिक्त पिवळा बलक चेहर्‍यालाही लावतात मधात मिक्स करुन.

मी आमच्याकडची साय (गायीच्या दुधाची असल्याने तुपाकरता वापरता येत नाही) आणि अंड्यातला पिवळा बलक दोन्ही फ्रीजमधे डब्यांमधे दोन दिवस ठेवते. आमची पोळ्यांची बाई ते डबे घेऊन जाते. तिच्या मुलांकरता. मी तिला त्याबद्दल सांगून ठेवले आहे. (डायेट असल्याने खाता येत नाही.)

मंजुडी, साबा लेकाला पिवळा बलक + एक चमचा साखर कपात घेवुन चमचा/काट्याने २ -३ मिनटे नीट फेटुन नियमित थंडित, पावसाळ्यात देत. फेटुन बलक अगदि क्रिम सारखा होतो रंग हि पिवळा न राहता क्रिम होतो. मी कधी चव नाहि बघीतली पण लेक म्हणतो श्रीखंडा सारखच लागत. पावसात भिजुन आला कि त्या हमखास देत.

अन्जली म्हणतेय ते बरोबर आहे, पण मंजूला खाणे सोडून उपाय हवे होते म्हणून त्याबद्दल बोलले नाही. गरम दुधात कच्चं अंडं ऑस्सम लागतं. मी ट्राय केलेलं आहे. Happy

शर्मिला चेहर्‍याला बलक? वास नाही येत का गं? Uhoh

वेका अगं मला माहीती नाही का की चिरुन ठेवले की भाज्यांची पोषणमुल्ये कमी होतात म्हणून. पण या नोकरीवाल्या, इन्स्टंट जमान्यात थोडी पूर्वतयारी करावी लागणारच की. तसेही शिळे सारखे खाऊ नका असे आहारतज्ञच सारखे सांगत असतात,म्हणून तसे मी लिहीले.

बाकी वर अरुंधतीने सांगीतल्याप्रमाणे कांदापात, सिमला मिर्ची, कोरड्या उसळी नक्कीच चांगल्या राहतील.

Pages