Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राची, माझ्याकडे अंजलीची ती
प्राची, माझ्याकडे अंजलीची ती मोठी खवणी आहे, पण त्याचा वापरच होत नाही फारसा. ओला नारळ खूपच कमी वापरतो आम्ही. आता आईसारखी ही छोटी खवणी घेवून यायची आहे.अगदी थोडासाच खवलेला नारळ हवा असेल तर वापरता येईल.
तसंही आईकडे हे नारळ खवण्याचं काम नेहेमी बाबाच करत आलेत, त्यामूळे नारळ खवण्याचं काम परंपरेने नवर्याचं असतं असं सांगता पण येईल मला.
नवीन फ़ूड प्रोसेसर मध्ये नाही
नवीन फ़ूड प्रोसेसर मध्ये नाही का होत नारळ स्क्रेपिंग चांगले?
[आमच्याकडे साबा नंतर काकमा नावाचे यंत्र असते. फिदीफिदी ]
ttp://www.ebay.com/itm/POWERED-COCONUT-GRATER-SCRAPER-SHREDDER-/330973727275 हे कसे असेल?
alpana, direct bhajivar
alpana, direct bhajivar kinwa kadhait khobare khovun ghalayala changali upyogi padate hi khawani.
इडली : शाल : आंबणे.. शालीचे
इडली : शाल : आंबणे..
शालीचे काम आतली उष्णता आत ठेवणे इतकेच असते. मुळातच थंड पीठ असेल तर इन्क्युबेशन टेंपरेचर येणार नाही. गरम पाण्यात भिजवणे, कींवा थोडे गरम करून मग शाल गुंडाळणे असे केलेत तर बरे होईल.
ricoh food processor has
ricoh food processor has coconut scraping attachment. just fyi
@आर्या मी बाजरी, ज्वारी आणि
@आर्या
मी बाजरी, ज्वारी आणि कळण्याच पीठ फ्रीजमध्येच ठेवते(पुण्यात).
माझ्याकडे एकावेळी 2 किलोच पीठ असते. अजिबात कडू होत नाही, मला साधारण 1 महिनापुरतात ही पीठ.
थॅन्क्स गं! आता ठेवुन बघेन मी
थॅन्क्स गं! आता ठेवुन बघेन मी पण.
haataat pakaDaayachee
haataat pakaDaayachee khavaNee aaNoon paahate.
कळण्याच पीठ >>??
कळण्याच पीठ >>??
ज्वारी आणि उडीद एकत्र दळून
ज्वारी आणि उडीद एकत्र दळून आणतात. त्याला कळण्याचं पीठ असे म्हनतात. या भाकर्या करायला सोप्या पडतात आणि अधिक पौष्टिकदेखील असस्तात.
नंदिनी प्रमाण किती घ्यायचे
नंदिनी प्रमाण किती घ्यायचे ज्वारी आणि उडीदाचे?
मी उत्तर दिले तर चालेल
मी उत्तर दिले तर चालेल का?
माझे प्रमाण - 1 किलो ज्वारी + पावून किलो उडीद+अंदाजाने मीठ(आईचे- 1 किलो ज्वारीसाठी अर्धा किलो उडीद). पीठ बाजरीसारखेच थोडे जाड दळावे.
@नंदिनी-सोप्या भाकरी? उडदामुळे पीठ थोड चिवट होत सो पीठ मळताना मलातरी थोडा जोर लागतो ग. तसही मी पीठ मळताना नेहमी कोमट पाणी आणि 1 थेंब तेल टाकते.
जाड ग्व्हाच्या पिठाचे काय
जाड ग्व्हाच्या पिठाचे काय करु २ किलो आहे अजुन
त्याच्या चपात्या खाउन आता बोअर झालेत[ त्या पण जाड होत आहेत :(]
जाड ग्व्हाच्या पिठाचे काय करु
जाड ग्व्हाच्या पिठाचे काय करु २ किलो आहे अजुन....... पीठ तूपावर भाजून गूळ घालून लाडू/वड्या करा.
गव्हाच्या जाड पीठाची
गव्हाच्या जाड पीठाची बट्टी(दाल बाटी ) करता येईल.
माझी ताई जाड गव्हाच्या
माझी ताई जाड गव्हाच्या पिठाच्या दुधी घालून मुठीया करते.मस्त लागतात. ती त्याच साठी खास जाडसर पीठ दळून आणते. तिला विचारून क्रुती लिहेन.
अंडा भुर्जी करायला स्टीलचे
अंडा भुर्जी करायला स्टीलचे भांडेच वापरतो पण करताना नेहमी तळाला फार लागते व नंतर फार कटकट होते घासताना. काही युक्ती आहे का तसे न होण्यासाठी? non stick नाही वापरत व तेल पण जास्त नाही वापरत. अंडे थेट फोडुन टाकल्याने प्रोब्लेम होतो का?
सुनिधी, मी लोखंडी तवा वापरते
सुनिधी, मी लोखंडी तवा वापरते भुर्जी करायला. लेकाला शिकवताना ते तवा प्रकरण जमेना. त्याच्या साठी शोधलेला उपाय - कांदा, टोमॅटो, बेलपेपर वगैरे स्टीलच्या भांड्यात तेलावर परतून हळद, तिखट, मीठ घालून घ्यायचे. पायरेक्स वगैरेच्या काचेच्या भांड्यात ते मिश्रण घालून त्यातच अंडी फेटायची आणि मावेत १ मिनिट शिजव, ठवळ असे करत शिजवायचे. दोन भांडी होतात पण स्वच्छ करणे सोपे असते.
तेल जास्त टाकणे ही नवर्याची
तेल जास्त टाकणे ही नवर्याची युक्ती आहे
आणि तो पुर्ण होईस्तो खटाखट ढवळत राहतो. माझी आई लोखंडी कढईत करायची. स्वाती२ यांचे उपाय चांगले वाट्ताहेत.
अमेरिकेत स्वयंपाकासाठी आणि
अमेरिकेत स्वयंपाकासाठी आणि तळणासाठी कोणते तेल वापरावे? मी "Canola Oil" वापरते. पण काही तळल्यावर घरात वास भरुन राहतो आणि १-२ दिवस जात नाही. मी तळताना Kitchen Exhaust Fan चालू ठेवते. वास राहू नये म्हणून काही उपाय आहे का ?
स्वाती२, मावेचे करुन पहाते.
स्वाती२, मावेचे करुन पहाते. सोपे वाटतय. पण झाकण ठेवायचे का? नाहीतर अंडे उडेल असे वाटते.
वेका, तेल जास्त टाकले तर छान होते खरं, कमी घात्ले की बिघडते.
कोणी उत्तर देइल का?
कोणी उत्तर देइल का?
मी गेली १५ वर्षं मेझोलाचं
मी गेली १५ वर्षं मेझोलाचं कॉर्न ऑइल वापरतेय. COSTCOमधून १० लिटरचा कॅन आणते. तळणासाठी तापवल्यावरही कधी वास आला नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/34477
http://www.maayboli.com/node/9538
हे दोन धागे वाचून सुद्धा तुम्ही ठरवू शकता कुठले तेल वापरायचे.
सुनिधी, झाकण नाही ठेवायचे.
सुनिधी, झाकण नाही ठेवायचे.
खारट झालेल्या सुपारीसाठी सुके
खारट झालेल्या सुपारीसाठी सुके खोबरे + बडीशेप + ओवा + लवंगा भाजून घातल्याने फरक पडला. इथे उपाय सुचवलेल्या सर्वांना धन्यवाद.
धन्यवाद मृण्मयी , सिंडरेला
धन्यवाद मृण्मयी , सिंडरेला
आशुडी, असं नुसतं नाही, सॅम्पल
आशुडी, असं नुसतं नाही, सॅम्पल पाठव.
काल रात्री साधा भात - पांढरा
काल रात्री साधा भात - पांढरा आणि साधं तुरीचं वरण जास्त झालं. आज त्याचं काही करता येईल का?
दोन्ही फ्रिज मधे ठेवलं आहे.
भाताचा भाज्या घालून फोभा आणि वरणात कांदा-लसूण-मसाला घालून कोरडं वरण हा बेत कसा वाटेल.
थालिपीठं लावता येतील दोन्ही
थालिपीठं लावता येतील दोन्ही एकत्र करून त्यात तिखटमीठ हिंगहळद जिर्याची पूड वगैरे घालून. वरणात पाणी असेल तर मिसळण्याआधी काढून टाका.
Pages