Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बटाटा + ब्रेड्क्रम्स असं
बटाटा + ब्रेड्क्रम्स असं मिश्रण वापरा. + वरून लावायला रवा वापरून पहा.
अंड चालत असेल तर त्यात घोळवून मग रवा लावता येईल...
भाज्यांचे कटलेट हाटेलात
भाज्यांचे कटलेट हाटेलात मिळतात तसे घट्ट तरीही खरपूस, खुसखुशीत बनवण्यासाठी.
माझे वरुन कुरकुरीत होतात, चव छान पण अगदी नाजुक होतात. >>>>> हॉटेलमधील कटलेटमधे थोडे बेसन
मिसळलेले असते. भाज्यांचे मिश्रणात थोडे बेसन/कॉर्नफ्लॉर घालून पहा.वर योकुनी म्हटल्याप्रमाणे रव्यात घोळवून तळा.
माझी कोथींबीरी ची चटणी नेहेमी
माझी कोथींबीरी ची चटणी नेहेमी थोडी कडवट होते. मी कोथींबीर, मिरच्या, आलं, लसूण, मीठ हे सर्व मिक्सर मधून काढ्ते. यात काही चुकते का? अरेरे Please help. >>>> लिंबू पिळा अन साखर ही घाला थोडी. कों. चटणीत मी आले लसूण घालत नाही. कों. + हि.मि. + लिंबू + थोडे खोबरे किंवा भाजलेले दाणे + थोडी साखर .. छान होते चटनी. अजिबात कडू नाही लागत.
सुनिधी, पावाचा चुरा वरून
सुनिधी, पावाचा चुरा वरून लावतेस तसाच तो कटलेटच्या सारणातही मिसळ. छान खुटखुटीत कटलेट होतात.
डाळव्याची पावडर व भाजलेला
डाळव्याची पावडर व भाजलेला रव्याने छान खुटखुटीत होतात.
घरी पनीर बनवल्यावर दूधाच पाणी
घरी पनीर बनवल्यावर दूधाच पाणी उरत त्याच काय करता येईल?
त्यात कणीक भिजवता येईल.
त्यात कणीक भिजवता येईल.
धन्यवाद अनघा. मी करून बघिन.
धन्यवाद अनघा. मी करून बघिन. Sandwich ची चटणी कशी करायची? अशीच का वेगळी?
कटलेट बद्दल सर्वांना धन्यवाद.
कटलेट बद्दल सर्वांना धन्यवाद. एकएक वापरुन प्रयोग करण्यात येईल.
पनीरच्या पाण्यात कणिक भ्जवुन मस्त होतात पोळ्या. भात पण शिजवता येईल. छान होतो मऊ.
धन्यवाद सुनिधी, स्वाती.. करुन
धन्यवाद सुनिधी, स्वाती.. करुन बघेन
अशीच चालेल की. पण जास्त पातळ
अशीच चालेल की. पण जास्त पातळ करू नको.
राजगिरा लाह्यांचे तिखट आणि
राजगिरा लाह्यांचे तिखट आणि गोड (लाडू,चिक्की) पदार्थ काय आणि कसे बनवावेत?
गीता_९ , जाड बुडाच्या
गीता_९ ,
जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप घालून चिक्कीचा गुळ घालायचा. तिळाच्या लाडवासाठी करतो तसा पाक तयार झाला की राजगिर्याच्या लाह्या आणि स्वादासाथी वेलची पावडर टाकून लाडू वळायचे.
Sandwich ची चटणी कशी
Sandwich ची चटणी कशी करायची....डाळे(पंढरपुरी डाळे) + ओलीमिरची+ आले + पुदीना+ कोथिंबीर + मीठ एकत्र करून पाणी घालून वाटावे.
धन्यवाद अनघा आणि
धन्यवाद अनघा आणि देवकी.
डाळे(पंढरपुरी डाळे) + ओलीमिरची+ आले + पुदीना+ कोथिंबीर + मीठ एकत्र करून पाणी घालून वाटावे.>>> यात लसूण नाही का घालायचे?
यात लसूण नाही का घालायचे?>>>
यात लसूण नाही का घालायचे?>>> अजिबात नाही.एक विसरले .आवडत असल्यास लिंबूरस.
मी लहानपणी गावी कोकणात
मी लहानपणी गावी कोकणात सातूच्या लाह्यांचं पीठ दूध, गूळ, ओलं खोबरं असं घालून खाल्लय... नाश्त्याला. हे सातू म्हणजे नक्की कोणतं धान्य? कुणाला माहितीये?
(प्लीज आता त्याला सातू असं म्हणतात गं वेडे...असं सांगू नका. सातू म्हणून सर्च केला तर सत्तू म्हणून कायतरीच सापडतय गुगल वर)
सातू म्हणजे बहुतेक बार्ली.
सातू म्हणजे बहुतेक बार्ली.
गहू आणि डाळं दळून ते एकत्र
गहू आणि डाळं दळून ते एकत्र करून सातूचं पीठ करतात असं मला वाटतं. त्यात सुंठ वगैरे पण घालतात. नक्की आठवत नाहीये. मुलं लहान असताना आई पाठवायची हे पीठ त्यांच्यासाठी.
सातू म्हणजे बार्ली. अमेरीकेत
सातू म्हणजे बार्ली. अमेरीकेत फफ्ड बार्ली म्हणून लाह्या मिळतात.
ओह... खरच? पण सातूच्या लाह्या
ओह... खरच?
पण सातूच्या लाह्या छोट्या चांदण्यांसारख्या दिसायच्या असं आठवतय. बार्ली जरा मोठं वाटलं धान्यं... पण असेल हं. माझी आठवण ती... खंदकात पडलेल्या वस्तूंसारखं असतय माझ्या आठवणींचं.
Sandwich ची चटणी कशी
Sandwich ची चटणी कशी करायची....डाळे(पंढरपुरी डाळे) + ओलीमिरची+ आले + पुदीना+ कोथिंबीर + मीठ एकत्र करून पाणी घालून वाटावे. - खोबरे नाही घालायचे का? मी घालते म्हणून माझे Sandwich बाहेर पेक्षा वेगळे होत असतील का???
गहू आणि डाळं दळून ते एकत्र
गहू आणि डाळं दळून ते एकत्र करून सातूचं पीठ करतात असं मला वाटतं>>> परफेक्ट
गव्हाला ओला हात लवुन ठेवायचे आणि मग जरा कांडुन पाखडायचे. मग कोंडा काढुन डाळं बरोबर दळायचे. तरी एक्दा कन्फर्म करुन सांगेल नक्की प्रोसेस काय ते. पण हे कोणतेही एक्च धान्य वा बार्ली नक्की नाही.
धन्यवाद स्वाती२.. करते आता...
धन्यवाद स्वाती२.. करते आता...
<<<गहू आणि डाळं दळून ते एकत्र
<<<गहू आणि डाळं दळून ते एकत्र करून सातूचं पीठ करतात असं मला वाटतं. त्यात सुंठ वगैरे पण घालतात.
<<<गव्हाला ओला हात लवुन ठेवायचे आणि मग जरा कांडुन पाखडायचे. मग कोंडा काढुन डाळं बरोबर दळायचे. तरी एक्दा कन्फर्म करुन सांगेल नक्की प्रोसेस काय ते. पण हे कोणतेही एक्च धान्य वा बार्ली नक्की नाही.
बरोबर आहे. त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर पण घालु शकतो!!! दुध + गुळ घालून मस्त लागतं!!!
त्या पिठात कच्चा कांदा व
त्या पिठात कच्चा कांदा व टॉमॅटो + मस्त खारासकट कैरीचे लोणचे + मीठ + गरज वाटल्यास तेल घालुन मुट़कुळे करुन खायचे. मला ते गोड प्रकरण नाही आवडत, मी हे असे तिखट करते सातुचे पिठ
सातु म्हणजे जव. हे वेगळेच
सातु म्हणजे जव. हे वेगळेच धान्य आहे. आपल्या गव्हात सापडतो ना सालीसकट गव्हाचा दाणा, तसेच दिसते ते. ते थन्ड असते. म्हणजे उन्हाळ्यात त्याचे पीठ कालवुन साखर वेलची वगैरे घालुन घेतात. किन्वा ताक पण घालतात.
पण आपल्याकडे त्या गहुमिश्रीत डाळ पीठालाच सातु म्हणतात. खरे सातु बाधत नाहीत. दाद तुम्हाला हवे असल्यास कुणी युपी वगैरे कडच्या लोकाना विचारा.
dineshadaanaa vichaaraa,
dineshadaanaa vichaaraa, tyaaMnee madhyaMtaree lihilaM hotaM. saatoo he vegaLaM dhaany aahe te mhaNaje jav kaa te aaThavat naahee.
सातू
सातू
खोबरे नाही घालायचे का? मी
खोबरे नाही घालायचे का? मी घालते म्हणून माझे सँडविच बाहेर पेक्षा वेगळे होत असेल>>>> Sandwich च्या
चटणीत खोबरे अजिबात घालू नका.वर दिलेली चटणी बरेचदा टोस्टसँडविचसाठी करते.
Pages