युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिल्क्मेड आणि ओले खोबरे वापरुन लाडु कसे करतात? काहि केल्या आठवत नाही.
एका जाहिराती मधे दाखवित असत

मिल्क्मेड आणि ओले खोबरे वापरुन लाडु कसे करतात? काहि केल्या आठवत नाही. <<< मिल्कमेड च्या वेबसाईट वर लिहिली आहे की!
https://www.milkmaid.in/videos/indian-dessert-and-mithai-recipes/coconut...

२० जणांसाठी आलू-पराठे करायचेत. मी प्रत्येकी २/३ धरून चालले आहे.
तर किती बटाटे लागतील? आणि पटापट करण्यासाठी काही टिप्स सांगू शकाल का?

धारा, पोटॅटो फ्लेक्स मिळतात का ते बघा. बटाट्याच्या चुरा असतो तो. पिठात थेट मिसळून पराठे करता येतात.
जास्तीची पाकिटे आणली तरी वाया जाणार नाहीत. एका पराठ्याला १ ते दीड टेबलस्पून पुरेल. हिरवी मिरची, लसूण, कांदा आवडीप्रमाणे. भिजवलेले पिठ कमी पडले तरी आयत्यावेळी तयार करता येते.

धारा, पराठ्याचा आकार केवढा असणार? एका बटाटेवड्याएवढं सारण एका पराठ्यात भरणार का?
एक किलो बटाट्यांचे साधारण ३० (+-३) बटाटेवडे होतात. एका किलोत साधारण १४-१५ बटाटे येतात. म्हणजे साधारण एक बटाट्याचे दोन वडे असा ढोबळ अंदाज. त्यानुसार पराठ्यांसाठीचा अंदाज घे.
बटाट्याचं सारण जेवढं सैल तेवढीच कणीक सैल भिजवायची. दोन्हीची कन्सिस्टन्सी सारखी असेल तर पराठे भराभर होतात.
पटापट करण्यासाठी बटाटे उकडल्यावर चिकट नाही झाले तर अगदी भराभर लाटले जातात. एके ठिकाणी प्रिन्सेसने लिहिलंय की ती बटाटे आदल्या दिवशी उकडून फ्रिजमधे ठेवते, असे बटाटे चिकट होत नाहीत.

धारा, बटाटे उकडल्यावर किसून मळून घे. त्यामुळे सारण चांगले एकजीव करता येइल व पराठे भरभर लाटले जातील.
लवकर करायची एक युक्ती आहे पण मग सारण बाहेर डोकावेल. ती म्हणजे, पुरणाप्रमाणे पोळीत सारण न भरता, दोन छोट्या पुर्‍या/पोळ्या (सेम साईझच्या) करून मग सारण स्टफ करायचे. नंतर लाटायचे. कुणी हाताशी असतील मदतीला (पोळ्या लाटायला) तर पटकन होतील पराठे. जर चपातीप्रेस्/ऱोटीमेकर असेल तरी अशा रीतीने लवकर करता येतील.

धन्यवाद दिनेशदा आणि मंजूडी आणि चिन्नु.
फ्लेक्सची बारीक पाकीटे २-३ च आहेत, ती पुरणार नाहीत. ती ऐन वेळी लागली तर म्हणून ठेवतीये.
पराठ्याचा साधारण मोठ्या पोळीचा आकार असेल. माझ्या पोळ्या पोळपाटाच्या/तव्याच्या आकाराच्या असतात/होतात.
वेगळ्या सारणाऐवजी जर कणकेतच सारण टाकून पराठे केले तर? दशमीसारखे? त्यात मी पूर्ण कणीक आदल्या दिवशी भिजवून ठेवू शकीन आणि दुसर्‍या दिवशी पराठे करीन. काय वाटते?

ऐन्वेळी भिजव>> +१.
पण हे टाळण्यासाठी कणीक आणि मक्याचं पीठ समप्रमाणात घेतलं तर पराठे होतात. मक्याचं पीठ बटाट्याचा ओलावा/ सॉगीनेस शोषून घेतो. तुझ्याकडे मिळत असेल तर मक्याचं रवाळ पीठ वापर.

पिठ आधी भिजवले तर पाणी सुटते. आयत्यावेळीच पिठ भिजवणे चांगले. न लाटलेला पराठा अशी माझी एक रेसिपी आहे. थोडा नवीन प्रकार आहे.

चिन्नु+१
दिनेश ची रेसिपी ने उत्तम होतात, बटाटे कणकेत मिसळ्याने फुटाफुटि होत नाही! किसण्यापेक्षा फोर्कने मअ‍ॅश केले तर कमी चिकट होतात.

मी वर दिलेली रेसिपि वापरते फक्त लाटुन करते... लाटणार असल्याने जरा घट्ट भिजवते.तरी सैल झालच तर ब्रेड क्रम घातल तर लवकर मीलुन येत आणि क्रिस्पी ही होतात.

ऐनवेळी भिजवण्याचा घाट नकोय, म्हणून मी तो कणीक+सारण विचार करत होते. तेव्हा आपला पुपोसारखा नेहेमीचा पराठाच ठीक वाटतोय. सकाळी ९-१० पर्यंत सगळे (५०+) पराठे तयार करायचेत, म्हणून मी थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करत होते. असो.

दिनेशदा, तुमचा तो आळशाचा पराठा नाश्त्याला आमच्याकडे हिट्ट आहे. पण हे पब्लिक मला जरा नविन असल्याने त्यांच्यावर आता प्रयोग नाही करत.

उद्या चिन्नु म्हणतेय तसे दोन लाट्यावाला पनीर/एग पराठा करून बघीन. जर ते जमले म्हणजे नेहेमीपेक्षा लवकर झाले तर तीच कृती परवाच्या आलू पराठ्यांना वापरीन. नाही तर नेहेमीची पुपो पद्धत.

सर्वांचे धन्यवाद. Happy

डब्यात ठेवलेल्या मैदयात कीडे झालेत. मैदा टिकवण्यासाठी काय करावे?
डब्यात अगदी लहान पाखर झालीत. आत कशी काय गेली असतील? डब्याला झाकण आहे, डब्यावर आण़खी एक डबा आहे. आणी हे सगळ. कपाटात आहे...... Sad

दीपा--

मैदा जास्त दिवस आणुन ठेवु नये...नाहीतर हे असे होते... आता तो ड्ब्यातला मैदा व्यवस्थित चाळुन वापर

तो मैदा फेकून द्या. कारण डोळ्यांना लगेच न दिसणार्‍या अळ्या आणि किडेही आहेत त्यात.

मैदा नेहमी फ्रीजमधेच ठेवावा लागतो.

मला वाटते तो मैदा फेकुन द्यावा म्हणजे मी तरी तेच केले असते.>>> +१. शिवाय असल्या जुन्या मैद्याचे पदार्थ कधीच चांगले होत नाहीत.

उकडून बटाट्यांची आपण नेहमी करतो त्या भाजीची (फोडणीत हिंग, मोहरी, हळद, तिखट घालून उ. बटाट्याच्या फोडी घालून परतणे) एक खमंग आवृत्ती आज खाऊन पाहिली. बहुतेक माबोवरच वाचलं होतं त्याप्रमाणे फोडणीत एक छोटा चमचा धणेपूड व त्याच्या एक तृतीयांश जिरेपूड घालून खरपूस परतले व त्यानंतर त्यात उ. ब. फोडी घालून परतले. खाशी चव! Happy

वर पोटॅटो फ्लेक्सबद्दल चर्चा आहे.
हे पोटॅटो फ्लेक्स पुण्यात मिळतात का ? पावभाजीत पण वापरता येतात असे ऐकले आहे ते बरोबर आहे का ?

अगो,
पोटॅटो प्लेक्स पुण्यात मिळतात. कुठल्याही चांगल्या दुकानात मिळतील. दोराबजी, रिलायन्स इथे नक्की मिळतील.

अकु, वेळ असेल तर हे बटाटे मंद आचेवर परतावे गोल्डन ब्राऊन होइतो. जर तुकडा पडला तर वेगळा बदकन आवाज येतो. तेव्हा मसाले घालून सारखे करावे. असे बटाटे मस्त होतात, क्रिस्पी अँड नाईस!

माझ्याकडे फ्रोझन चिकूचे तुकडे आहेत. बर्फी, आईसक्रीम आणि मिल्कशेक सोडून काय करता येईल?

तुझा नेहमीचा चिक्कूपणा कर असं नवर्‍याने सांगितल... 'व्वा...' अशी दाद गेलीच नकळत...
अन मी अजून काही बोलायच्या आधी नवराही गुल्ल.
असो....
मला रेसिपी हवीये.. जोक झालेत Happy

Pages