Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चपात्या गरम करू शकतो. शेकता
चपात्या गरम करू शकतो. शेकता येत नाहीत.
प्रितीभुषण.. मी ग्रील वापरून
प्रितीभुषण.. मी ग्रील वापरून प्रयोग केला होता. पण गॅसवर करू त्यापेक्षा जास्त वेळ गातो. आणि प्रत्येकवेळी आपण परतण्यासाठी मावे उघडला कि ग्रील बंद होते ( उष्णता रहात नाही ). नेमकी वेळ साधणे कठीण जाते. पापडच होऊन बसतो.
तयार टॉर्टीला मात्र शेकल्या आहेत. शिळ्या चपात्यांचा खाकराही केला आहे.
निर्लेप चा एक मा.वे. साठी चा
निर्लेप चा एक मा.वे. साठी चा तवा आला आहे. पण पोळ्या मा.वे. मधे करता येतील असं वाटत नाही.
हा धागा योग्य आहे का माहिती
हा धागा योग्य आहे का माहिती नाही पण मला युक्त्या हव्या आहेत.
माझ्याकडे २ कुटुंबं (८ जण) १ आठवडा येणार आहेत. आम्ही घरचे ४ धरले तर घरात ८ दिवस ६ मोठे आणि ६ लहान(वय ७ ते १४) असणार आहेत.
तुम्ही अशा वेळी खाण्याचं प्लॅनिंग काय आणि कसं करता?
जास्त वेळ किचन मधे न जाता
जास्त वेळ किचन मधे न जाता एंजॉय करता आलं पाहिजे, म्हणून मी साधे मेनु ठेवत असते.
दोसा (पीठ करुन ठेवा) चटणी करुन फ्रिज करा
पाव भाजी (भाजी शिजवुन फ्रिज करा)
पोळ्या विकत मिळत अस्तिल तर भाजी, आमटी, भात
खिचडी (दलिया, भाज्या घालुन/साधी)+ कढी
बरीटो, कसेडिया
फलाफल सँडवीच
वरणफळे, शेंगोळे
पनीर्/छोले + नान
पास्ता + गार्लिक ब्रेड + बेक्ड पोटेटो + सॅलड
दाल बाटी
भेळेचे सामन
खुप सारे स्नॅक्स आणुन ठेवा
कधी तरी पिझ्झा मागवा
उपमा, पोंगल, व्हेजी ऑमलेट पोटभरीचे पदार्थ नाष्ट्याला
सोप्या पदार्थांची यादी करुन ग्रोसरी आणा आणि जेवढी तयारी आधी करता येईल तेवढी करा
वय सात ते १४ म्हणजे अगदीच
वय सात ते १४ म्हणजे अगदीच लहान नाहीत, आयमीन जेवणामध्ये नीट जेवतात १०+ वर्षांची मुलं...
अन येणारे पाहुणे काही अगदीच काम करणार नाहीत असं थोडंच असेल; सो त्यांचीही मदत होईलच की!
बेस्ट लक! कायकाय कसं कसं केलं ते प्रमाणासकट लिहिशील नंतर.
उपमा, उसळी असं काही करून फ्रीज करता येईल. वर पर्याय आलेले आहेतच.
ब्रेफा नॉर्मली रेडी टू इट
ब्रेफा नॉर्मली रेडी टू इट किंवा कमीतकमी कटकटवाला ठेव.
बेगल्स, सिरीयल, हाफ फ्राय, ऑम्लेट, बॉइल्ड एग्ज, भुर्जी-पाव वगैरे.
खूप व्हरायटी, देशोदेशीचे पदार्थ असे केलेस तर होईल ती लिस्ट फ्रिजात मावणार नाही किंवा कन्फ्यूजन वाढेल. त्यामुळे एवढ्या सगळ्या दिवसातली १ किंवा २ डिनर्सच स्पेशल अशी कर. बाकीच्या वेळेला मेनू रोजचाच ठेवून एखादी रेडीमेड वस्तू स्पेशल अॅडऑन अशी ठेव.
१-२ हुकमी भाज्या तयार करून फ्रीज करून ठेवणे
काही बेसिक भाज्या निवडून, कांदा वगैरे चिरून फ्रीज करणे
टोमॅटो प्युरी कधीही असलेली बरी पडते.
अमा मी ही सध्या मॅसन जारच्या
अमा मी ही सध्या मॅसन जारच्या प्रेमात आहे. स्मुदीज साठी छान वापर होतो. स्वस्त आणि मस्त!
साधारण कशा आवडीची लोकं आहेत
साधारण कशा आवडीची लोकं आहेत ह्याचा अंदाज घेवून प्लॅन करा नाहितर आपली मेहनत फुकट.
आमच्या घरात( नातेवाईक वगैरे) अतंरगी लोकं आहेत(खाण्याच्या बाबतीत).
त्यांना नाकं मुरडायची सवय आहे, हेच का, असेच का वगैरे.
तेव्हा मी तरी येणार्यांनाच आधीच विचारते बघ खाण्यात काय आवडेल.
नाहितर एकाला उपमा तर दोघांना पोहे आणि तिसर्याला आणखी वेगळच.
सरळ सर्व पाहुण्यांच्या आवडीविषयी विचारा. आणि तुम्हाला काही आवडतं तर मला खरच येत नाही, पण माझं किचन तुमचे नक्कीच स्वागत करेल.
माझे एक काका आहेत, त्यांची फक्त तारीफ करायची. आणि ते किचनमध्ये अगदी सगळं बनवतील. पण ते बनवलेले खाताना दोनदा, खावून झाल्यावर तीनदा असे करत दिवसातून दहावेळा छान म्हणायचं. पण ते ठिक आहे ना, आपण खपून बनवून लोकं नाकं मुरडणार.
खूप व्हरायटी, देशोदेशीचे
खूप व्हरायटी, देशोदेशीचे पदार्थ असे केलेस तर होईल ती लिस्ट फ्रिजात मावणार नाही किंवा कन्फ्यूजन वाढेल. >> तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सुचवा. लोकांवर बोट कशाला?
आधीच लिहिलयं सोपे पदार्थ, अर्ध्या गोष्टी तयार मिळतात आणि फ्रिजबाहेर रहातात (नान, पिटा ब्रेड, टॉर्टिया, पाव). रोजची भाजी पोळी करायला पण भाजी विकत आणाविच लागेल ना? तिलाही फ्रिजात जागा लागतेच!
Plan for at least three meals
Plan for at least three meals each day.Make sure you have enough snacks. Have a variety of fresh fruit on hand at all times.
Write down activities for each day as well - will some or all families be going to someone else's home for a lunch or dinner ? Will you all go on some outside- the-home activities ?
Based on that figure out how many people will be at each meal on each day? Then think about allergies and other diet restrictions. Then think about dietary preferences, likes and dislikes, interests etc. Then figure out things that you can make ( no offense intended here, but each one has her/his comfort zone in what type of food you can cook ).
Plan for shopping,prepping and storing groceries for the whole time. You may want to consider involving the kids in making their own pizzas one meal. Or decorate cookies/ cupcakes.
Ask each guest to make something - as long as you are comfortable with how they will use your kitchen .
all through this remember to have fun with these guests. Clearly, if you are inviting for them for a week, they are an important part of your life
डोसे
डोसे -चटणी
वरणफळं
पावभाजी
मिसळ / उसळ - पाव
पास्ता - गार्लिक ब्रेड - सूप सलाद
पराठे - छोले.
सँडविचेस
अशा स्टाईलच्या पदार्थांची कच्ची तयारी करून ठेवता येऊ शकते. (वाटणं, मसाले, शिजवणे, कडधान्य भिजवणे - मोड इ. व फ्रीजात दडपणे इ.)
एका वेळचे जेवण साधे, नेहमीचे. (तयार / घरच्या पोळ्या - भाजी - आमटी - भात वगैरे)
दुसरी वेळ वन डिश मील (वर सुचवलेले किंवा तत्सम पदार्थ) -काहीजणांना असे खाल्ले तरी भात - पोळी लागतेच. त्यामुळे तसे अगोदर विचारणे.
ब्रेफाला ठराविक पर्याय (ओटमील / पॉरिज / ब्रेफा सीरीयल / टोस्ट वगैरे) किंवा तयार काहीतरी.
स्नॅक्स / मधल्या वेळेसाठी पदार्थ बाहेरून आणून ठेवणे. उदा. भेळेचे साहित्य, फरसाण, पाणीपुरीच्या पुऱ्या व पाणी तयार करायचे साहित्य, फ्रोजन बेक्ड समोसे, फराळाचे पदार्थ वगैरे.
फळे, ज्यूस, सुकामेवा, तोंडात टाकायला चकॉम चकॉमचे पदार्थ. आईस्क्रीम्स व पेस्ट्रीज्, चिप्स.
येणारी मंडळी किचन, स्वैपाक, तयारी व आवरासवरीत किती सहकार्य देऊ शकतात तेही बघणे उत्तम. मेनू प्लान करताना त्यांच्याकडून फार मदत मिळणार नाही हे गृहित धरून प्लान केला तर फार दगदग होणार नाही.
शूम्पे, इतक्या लोकांसाठी
शूम्पे, इतक्या लोकांसाठी सांजसकाळ भाज्या, आमट्या करण्याचा पेशन्स संपतो. आणि घरी एरवी जे खाल्लं जातं तेच पुन्हा मोठ्या प्रमाणावर करण्याचा कंटाळाही येतो. तेव्हा रेग्यूलर जेवणातल्या भाज्या-आमट्या न करता वन डिश मील, बाहेरून मागवलेलं किंवा वेगवेगळे घटक समोर ठेवून स्वतःचं स्वतः तयार करून खाता येण्याजोगं बरं पडतं असं वाटतं.
अकुनं सुचवलेलं वरणफळं, पावभाजी, मिसळ / उसळ - पाव, पास्ता - गार्लिक ब्रेड - सूप सलाद हे आवडलं. या जोडीला आधी करून ठेवलेले दहीवडे - बिसिबेळेभात, करवून घेतलेले बटाटेपराठे-चटणी, पिझ्झा, एखादे दिवशी बार्बेक्यू, १-२ दा बाहेर जाऊन जेवणं, शिळंसप्तमी असं नाही का चालणार?
वा वा वा वा... मस्त सजेशन्स
वा वा वा वा...
मस्त सजेशन्स आहेत.
बाहेर खाण होइलच १-२ दा नाही चांगल ४-५ वेळा
ब्रेफा : डोनट्स, बेगल्स-क्रीम्चीज, भुर्जी पाव, क्रोसॉ, फ्रिटाटा, पोहे, उपमा, साखि
स्पेशल मील्स ते लोकं येणर त्या दिवशीच करीन म्हणजे लोकांच्या गोंधळाशिवाय मला बनवायला निवांतपणा मिळेल.
चहा करायच्या ड्युट्या लावीन..
मुलांसाठी जंक स्नॅक्स आणीन, फळं आणून ठेवीन
पाव भाजीची भाजी, खीमा, पापु चं बक्ल मध्ये पाणी असं थोडं करून फ्रीजमध्ये ठेवीन.
सग़ळ्यांचे आभार.
मेधा, remember to have fun with these guests. ह्या रिमाइंडरबद्दल एक्स्ट्रा आभार.
शूम्पी, आधी थोडा भाजीचा मसाला
शूम्पी, आधी थोडा भाजीचा मसाला बनवला तर भाजी लवकर होईल. शिवाय ग्रीन बीन्स सारख्या फ्रोझन भाज्या वापरल्या तरी वेळ वाचतो.
शुम्पी! दाल-बाटी कर की !
शुम्पी! दाल-बाटी कर की ! माबोवर सध्या जोरात आहे तर
भारतातुन पाहुणे यणार असतिल तर इथल्या स्पेशालिटी खाउ घाल.
सगळ्या पदार्थाची विषयवार यादी करुन एका पेपर वर ब्रेफा,लन्च्,डिनर अशि यादी करुन ठेव.. नाहितर एकदा सगळे आले की चिवचिवाटात तुला काही सुचणार नाही..
पाहुणे इथलेच आहेत शिवाय ज्ये.
पाहुणे इथलेच आहेत शिवाय ज्ये. ना कोणी नाही. खायचे प्यायचे नखरे कोणाचे नाहीत. शिवाय मदत नक्कीच करतील.
त्यामुळे थोडं प्लॅनिंग केलं तर सगळं मस्त होइल असं वाटतय.
पुन्हा एकदा आभार.
मॅसन जार म्हणजे काय ते माहित
मॅसन जार म्हणजे काय ते माहित नव्हतं. गूगलवर शोधलं. काचेच्या बरण्या आहेत का? (असं वाटलं. तशा असतील तर इतक्या महाग का आहेत?) काचेच्याच अथवा टिनच्या झाकणासहित? त्यांचं काय विशेष मग? खरंच माहित नाहीये. प्रकाश पाडा प्लीज
पूनम, मेसन जार म्हणजे
पूनम, मेसन जार म्हणजे लोणच्याच्या काचेच्या बरण्या
हो ना? वाटलंच मला!
हो ना? वाटलंच मला!
Someone has given me a pack
Someone has given me a pack of soya chunks. Kashat vaprayche te? Patkan shijtat ka? Sorry for English, i am using a tab.
वर्षा, आंतरजालावर खूऽऽप
वर्षा, आंतरजालावर खूऽऽप रेसिपीज मिळतील सोया चंक्सच्या. पटकन शिजतात. हेल्दी असतात. तुला जो पॅक मिळाला आहे त्यावरही असतील रेसिपीज. सोया चंक्स कटलेट, सोया चंक्स पुलाव/ बिर्याणीही एकदम मस्त होते. त्यांना व्हेज-चिकन असेही म्हणतात
तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही
तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सुचवा. लोकांवर बोट कशाला? <<
मी तुमचं नाव घेतलेलं नाही. कुणी काही सुचवण्याचा संदर्भही नाही.
तुमची ही खुसपट पोस्ट बघितल्यावर तुमची पोस्ट वाचली.
उगाच का चिडचिड करताय? मला जे वाटेल तेच मी सुचवलंय आणि लोकांवर बोट वगैरे तुमच्या मेंदूतून आलेले भ्रम आहेत.
लोणच्याच्या बरण्या का आहेत
लोणच्याच्या बरण्या का आहेत फॉर्मात म्हणे? (कालच घरात आता मोठ्या प्रमाणावर लोणची घातली जात नाहीत म्हणून घरातल्या अशा तीन बरण्या देऊन टाकल्या.)
अगं त्या मेसन जारांची (हे राम
अगं त्या मेसन जारांची (हे राम काय हे अनेकवचन!) काच उत्तम असल्याने अनेक वस्तू त्यात भरता येतात, भरून नेता येतात वगैरे.. सध्या पिंटरेस्टवर मेसन जार रेसिपीज लय फार्मात आहेत.
ओके पौर्णिमा. बघते मी.
ओके पौर्णिमा. बघते मी. अॅक्चुअली ब्रँडेड पॅक नाहीये म्हणून त्यावर काही माहिती नाहीये. असो. करुन बघीन. हेल्दी असले तर उत्तमच. सोया पुलाव/बिर्याणी करुन बघते.
सोया चंक्स - चिकनच्याच
सोया चंक्स - चिकनच्याच पद्धतीने याची भाजी करता येते. चिकनच्या ऐवजी सोया चंक्स घालायचे.
सोया चंक्स तसे लवकर शिजतात. उकळत्या पाण्यात शिजवून घ्यायचे. घट्ट पिळायचे. पुढे सर्व क्रुती चिकनसारखी.
अच्छा. थँक्स नताशा. लेकाला
अच्छा. थँक्स नताशा. लेकाला चिकन आहे असं सांगून देणार.
http://www.amazon.in/s/?ie=UT
http://www.amazon.in/s/?ie=UTF8&keywords=mason+jars&tag=googinhydr1-21&i...
इथल्या मेसन जार्सच्या किंमती वाचुन चक्रावलेच.
ओह, असं आहे होय. लोणच्याच्या
ओह, असं आहे होय. लोणच्याच्या बरण्यांना बरे दिवस आले म्हणायचे!
Pages