Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिन्नु, लापशी गटातील लापश्या
चिन्नु, लापशी गटातील लापश्या (नाचणी, दलिया, रवा, साबुदाणा वगैरे), कणकेचा / रव्याचा शिरा, सांजा / उपमा, मूडाखि, गुरगुट्या भात - तूप - मेतकूट, दूध-साखर-पोळी किंवा पोळीचा कुस्करा / लाडू, फ्रेंच टोस्ट, दूध-पाव, दहीभात / दहीपोहे, पेज इत्यादी.
मी पाकवून करतात तसा गूळ केला
मी पाकवून करतात तसा गूळ केला आहे पोळी करता. पण तो (बहुदा थंडीमुळे) फार टणक झाला आहे. आता काय करता येईल. मावे मधे ठेवला तर चालेल का ?
किंचीत दूध शिंपडून मळून घे तो
किंचीत दूध शिंपडून मळून घे तो गूळ.. मऊ होईल छान.
धन्यवाद. करून बघते.
धन्यवाद. करून बघते.
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेव..आणि त्यात दुसर्या भांड्यात गूळ ठेव.. वरुन झाकण ठेव..गूळ मस्त मऊ होइल..
उद्या मेथी मटर मलई (सायोच्या
उद्या मेथी मटर मलई (सायोच्या पद्धतीने) करण्याचा बेत आहे. मझ्याकडे चितळेंच्या गुलाबजाम मिक्सची दोन पाकिटे आहेत. तर पाककृतीतल्या खव्याच्या जागी या पाकिटातले मिक्स वापरले तर चालेल का?
शर्मिला त्या गुजा मिक्समध्ये
शर्मिला त्या गुजा मिक्समध्ये खव्याबरोबरच मैदा पण असेल ना? मी अजून कधीच असे मिक्सचे गुजा केले नाहीत म्हणून आयडिया नाही.
पण मेथीमलईमटर मध्ये मी अजून कधीच खवा घातला नाही. अमुल क्रिम किंवा घरातली एक-दोन दिवसापूर्वीची साय फेटून आणि अमुलचं डेअरी व्हाइटनर किंवा एखादी मिल्क पावडर घालते मी. १-२ वेळा मिल्क पावडर कमी होती म्हणून एमटीआरचं केसर-बदाम मिक्स (दुधात घालायचं) पण १-२ चमचे घातलं होतं.
.
.
.
.
रश्मी, शर्मिलाला गुलाबजाम
रश्मी, शर्मिलाला गुलाबजाम नाही करायचेत. ते मिक्स मेथीमलईमटर मध्ये खव्याच्या जागी वापरायचे आहे.
अर्र! धन्यवाद सोनाली. घाई
अर्र! धन्यवाद सोनाली. घाई मध्ये न बघता लिहीले.
ते मिक्स मेथीमलईमटर मध्ये
ते मिक्स मेथीमलईमटर मध्ये खव्याच्या जागी वापरायचे आहे.>>>>>>>> अरे,मलाही रश्मीप्रमाणेच वाटलं होते.
Varsha che dhanya bharnyachya
Varsha che dhanya bharnyachya uktya aahet ka tandul sodun kay kay bharta yeil kay kalji ghyavi lagel
वांग्याच्या भरतात तेल खूऊऊउप
वांग्याच्या भरतात तेल खूऊऊउप जास्त पडले आहे. आणि घरात अजुन वांगी नाहीत भाजुन घालायला.
काय घालावे म्हणजे बरे लागेल आणि तेलाचे प्रमाण कमी होईल.
त्यात भाजणीचे पिठ वा बारीक
त्यात भाजणीचे पिठ वा बारीक रवा घालून थालिपिठं लावता येतील. छान लागतात.
किंवा आपले कांदेपोहे
किंवा आपले कांदेपोहे मिक्सरमधून काढून ते घालून पीठा सारखं मळून थालिपीठं. दिनेश म्हणतात त्या प्रमाणे.
भरित ठेवलेलं भांडं तिरपं ठेव.
भरित ठेवलेलं भांडं तिरपं ठेव. थोडयावेळाने तेल काढून घे..
भाजलेल्या वांग्यालाही तेल सदृश द्रव /पाणी सुटते.
तेल काढुन तर घेतेच, पण थोडा
तेल काढुन तर घेतेच, पण थोडा उकडलेला बटाटा घालावा का ? बरे लागेल ? नाहीतर सगळेच वाया जायचे.
धन्यवाद, दिनेश, दक्षिणा आणि वत्सला.
आरती! आता उपयोग होइल की नाही
आरती! आता उपयोग होइल की नाही माहिती नाही पण उकडलेला बटाटा,दाण्याचा कुट्,मटार वाफवुन घालता आले असते/येतिल...
किन्वा
भान्डे तिरके ठेवुन तेल काढुन घ्यायचे त्यात अगदी थोडा चिरलेला कान्दा,टोमॅटो घालुन कलसायचे मग त्यात बटाटा घालुन खरपुस करुन मग सगळ एकत्र करायच.
टोमॅटो कांदा वगैरे घालून
टोमॅटो कांदा वगैरे घालून नॉर्थ इंडिअन पद्धतीने बैंगन का भर्ता. तडका करताना तेल कमी घाला.
कलसायचे<< म्हणजे काय?
कलसायचे<< म्हणजे काय?
योग्य प्रश्न...कलसायचे आणि
योग्य प्रश्न...कलसायचे
आणि दक्षी कांदेपोहे म्हणाली ते जाड पोहे असावेत. नाहीतर आधी भरीत करा. मग परत कांदे कापा (आम्ही तिथेच गळून जाऊ) कांदेपोहे करा आणि ते त्याच्यात घाला. ओम शांती शांती शांती.
ढबु मिरची बारीक चिरुन त्याच
ढबु मिरची बारीक चिरुन त्याच तेलात परतुन भरतात मिसळली तरी एक छान वगळा स्वाद येतो.
कलसणे - परतणे - सॉते करणे -
कलसणे - परतणे - सॉते करणे - सवतळणे (हे मात्र मला चवताळणेच वाटतं नेहेमी :दिवा:)
कलसणे विदर्भातला शब्द आहे
कलसणे विदर्भातला शब्द आहे बहुतेक. म्हणजे खरपूस परतणे.
कलसणे विदर्भातला शब्द आहे
कलसणे विदर्भातला शब्द आहे बहुतेक. म्हणजे खरपूस परतणे.>> येस्स! कान्दा-टोमॅटो एकजिव होवुन तेल सुटोस्तवर परताय्चे.
कलसलेलं वरण (घट्ट वरण) नि
कलसलेलं वरण (घट्ट वरण) नि भाकरी असा मेनू बरेचदा असतो विदर्भात.
धन्यवाद सगळ्यांना. कांदा आहेच
धन्यवाद सगळ्यांना.
कांदा आहेच घातलेला. आता मटार दाणे, टोमॅटो / बटाटा घालुन बघते.
परवा कोणत्यातरी चॅनल वर
परवा कोणत्यातरी चॅनल वर मिल्टन ऑईल सेप्रेटर पिकल जार ची जाहिरात पाहिली. हे प्रॉडक्ट मला फारच आवडलं. जरी पिकल जार असली तरी एखाद वेळेस भाजीत तेल जास्त झालं तर यात सेप्रेट करता यायला हरकत नाही. ( या साठी एखादं भांडं एक्स्ट्रा घ्यावं लागेल कदाचित)
हो हो मी पण पाहिली ही
हो हो मी पण पाहिली ही जाहिरात.. जियो दक्स..
आधी बघुन.. लोक काय च्या काय विकतात असं वाटलं.. पण नॉट बॅड!
Pages