Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस्के तु पण शुम्पीने लिहिलेले
बस्के तु पण शुम्पीने लिहिलेले दही वापरतेस का (देवा!)श्रीखंडासाठी का अजुन दुसरे काही?
स्वाती२, पास्ता सॉस चांगलं वाटत्य. मारीनारा म्हणुन पण लजान्या(??) मधे वापरता येईल का?
शूम्पीनं लिहिलं आहे तसं
शूम्पीनं लिहिलं आहे तसं श्रीखंड मी ग्रीक दह्याचं केलं आहे. आटवलेला मँगो पल्प घातला की त्याचं आम्रखंड होतं. मी स्वत: हे दोन्ही प्रकार खात नाही फक्त खाणार्यांकडून हे श्रीखंड किंवा आम्रखंडासारखंच लागतंय असं वदवून घेतलेलं आहे
(No subject)
:p
श्रीखंड किंवा आम्रखंडासारखंच
श्रीखंड किंवा आम्रखंडासारखंच लागतंय असं वदवून घेतलेलं आहे>> थोरली फार नखरे करते. तीला हा इंस्टंट प्रकार पसंत नाही पडला. म्हणे खरं श्रीखंड करत जा
डार्क चॉकोलेटचे बार्स गिफ्ट
डार्क चॉकोलेटचे बार्स गिफ्ट मिळालेत. खाल्ल्यावर ते खूपच कडवट आहेत असं लक्षात आलं. (७०%+ cocoa). आता याचं काय करायचं? नुसते खाववत नाहीयेत फार
बिन्स एवजि चुकुन रिफ्राइड
बिन्स एवजि चुकुन रिफ्राइड बिन्स आलेत (आणलेत!)त्याच काय करता येइल..,
प्राजक्ता, तुम्ही
प्राजक्ता, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर आधी रीफ्राइड बीन्स व्हेज आहेत की नाहीत ते बघून घ्या. बरीटो, टाको, मेक्सिकन पिझ्झा, एंचिलाडा असलं काहीही करता येईल.
>>डार्क चॉकोलेटचे बार्स गिफ्ट
>>डार्क चॉकोलेटचे बार्स गिफ्ट मिळालेत. खाल्ल्यावर ते खूपच कडवट आहेत असं लक्षात आलं. (७०%+ cocoa). आता याचं काय करायचं? >> ७२-७६% रेंज असेल तर आम्ही खाऊ आवडीने.
चॉकलेट वाल्या डेझर्ट मधे वापरा.
वेदिका, मी हॉलिडेसाठी डार्क
वेदिका,
मी हॉलिडेसाठी डार्क चॉकलेट ट्रफल्स करते क्रिमचीझ आणि आयसिंग शुगर घालून. ब्राऊनी, चीजकेक, फज वगैरे करायलाही वापरता येइल.
म्रु! अहो जाहो?? कधिपासुन?
म्रु! अहो जाहो?? कधिपासुन? व्हेज आहेत बिन्स! मेक्सिकन रेसिपी गुगल करते!..
अरे देवा! तुम्ही म्हणजे
अरे देवा! तुम्ही म्हणजे तुम्ही घरचे सगळे. तिकडे 'तुम्ही' आलं म्हणून चुकून 'घ्या' पण आलं.
विपू बघ.
सुनिधी, हो.. हा बघ फोटो..
सुनिधी, हो.. हा बघ फोटो.. (मला देजावू फिलिंग आले आहे. ही चर्चा झाली आहे आधी.. )
रीफ्राइड बीन्स कॅनमधून काढून
रीफ्राइड बीन्स कॅनमधून काढून नीट मिसळून एका मायक्रोवेव्ह सेफ बोलमधे मस्त गरम करुन घ्या . त्यावर बारीक किसलेले चेडर चीझ घाला, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला शेवटी थोडा लाइम जूस .
एकदम मस्त लागतं असं खायला.
नाहीतर या बीन्स,, थोड्या होल बीन्स, मॅश्ड अव्हाकाडो , बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर असे लेयर्स लावून सर्वात शेवटी किसलेले चीझ घालून लेयर्ड डिप करता येईल.
धन्स म्रु, मेधा! म्रु! अहो
धन्स म्रु, मेधा!
म्रु! अहो कुटुबाला होत व्हय! उशिरा पेटली..विपु बघते!
डार्क चॉकोलेटचे बार्स गिफ्ट
डार्क चॉकोलेटचे बार्स गिफ्ट मिळालेत. खाल्ल्यावर ते खूपच कडवट आहेत असं लक्षात आलं. (७०%+ cocoa). आता याचं काय करायचं? नुसते खाववत नाहीयेत फार >>>>>>>>>>>>>> मला आवडतात.. पाठवुन द्या
चॉकोलेट्स बनवायचे मोल्ड्स
चॉकोलेट्स बनवायचे मोल्ड्स आहेत का किंवा मावे सेफ स्मॉल मफिन मोल्ड्स? त्यात हे डार्क चॉकोलेट मेल्ट करून घालायचे. कॅनेपेसारखे करायचे. घट्ट झाले कि त्यात पीनट बटर घालायचे. ते सेट झाले कि वरून परत चॉकोलेट् चा लेयर द्यायचा. व पाच मिनिटे फ्रीझ करायचे. म्हणजे एक वाटी तयार करायची डार्क चॉ. ची व पीनट् बटर भरून घ्यायचे. मस्त लागते.
चॉकोलेट केक करून त्या वर ड्रिझल करता येइल. डार्क चॉकोलेट फार प्रीमीयम इन्ग्रेडिअंट अहे हो स्वैपाकातला. खूप काय काय करता येइल. चॉकोलेट सॉस पण बनवता येइल स्ट्रॉबेरीज डिप्ड इन चॉकोलेट करता येइल.
माझ्याकडे पण दोन ९०% वाले
माझ्याकडे पण दोन ९०% वाले बार्स पडून आहेत डा. चॉकलेटचे. ७०% वाले संपतात आमच्याकडे आरामात. ८५% वाला पण संपला. पण ९०% वाल्यांना कोणीच तोंड लावत नाहीये.
अल्पना, सरळ व्हाईट चॉकलेटचा
अल्पना, सरळ व्हाईट चॉकलेटचा एक बार आण, आणि मिक्स करुन चॉकलेटस करुन टाक. लगेच संपतील
अगं हो. ते काम (चॉकलेट
अगं हो. ते काम (चॉकलेट बनवायचं) बर्याच दिवसांपासून पेंडींग आहे. मला चॉकलेट बार्स कुठे मिळतात हे माहित नाहीये. शोधावं लागेल, झालंच तर त्याचे मोल्ड्स पण बघावे लागतिल. हिवाळा सुरु होतोय तर फिरायला जाणं आत्ताच बंद व्हायला लागलंय आणि तू मला चॉकलेट बनवायच्या आणि वजन वाढवायच्या आयडिया दे.
अल्पना हे पुडींग कर.
अल्पना हे पुडींग कर.
हे खूपच सोप्पंय की मंजूडी.
हे खूपच सोप्पंय की मंजूडी. १-२ दिवसात (ब्रेड आणल्यावर) करणार नक्की.
माझ्याकडे पण दोन ९०% वाले
माझ्याकडे पण दोन ९०% वाले बार्स पडून आहेत डा. चॉकलेटचे. ७०% वाले संपतात आमच्याकडे आरामात. ८५% वाला पण संपला. पण ९०% वाल्यांना कोणीच तोंड लावत नाहीये. >>>>>>>>> अल्पना मी येते तुझ्या मदतीला.
डार्क चॉकोलेट .... तोंपासु
डार्क चॉकोलेट .... तोंपासु
वर्षा.+१ दोन्ही कडू गोड
वर्षा.+१ दोन्ही कडू गोड चॉकलेट बार मिक्स करुन परफेक्ट होईल.
कडू चॉकलेट मलाही आवडतं. फक्त ते भसाभसा खाता येत नाही. चवीचवीने खायचं.
ये सुखदा. किती दिवसांपासून
ये सुखदा. किती दिवसांपासून पेंडींग आहे तुझं येणं. या निमित्तानी तरी येशिल.
अल्पना, मी पण येऊ शकते
अल्पना, मी पण येऊ शकते मदतीला... माझा 100 % वाला बार कधीच संपलाय.
रच्याकने, दुधात टाकून पी.
रच्याकने, दुधात टाकून पी. किसून घालता येईल रोज थोडे थोडे.
पास्ता बद्दल सगळ्यांना
पास्ता बद्दल सगळ्यांना धन्यवाद. सगळ्या सुचना वाचुन एक रेसपी ट्राय केली आणि चक्क ब-यापैकी चांगली झाली. सगळ्यांचे मनापासुन आभार.
दुधी हलव्याचा रंग आकर्षक
दुधी हलव्याचा रंग आकर्षक येण्यासाठी काही युक्ती आहे का ?
एक केशर- वेलची सिरप मिळते
एक केशर- वेलची सिरप मिळते घरगुती पद्धतीचे, ते घाला काही थेंब दुधी हलव्यात. केशरी रंग येईल मग.
Pages