निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
जिस्प्या, मॉरिशियसला जा तिथे
जिस्प्या, मॉरिशियसला जा तिथे भरपूर आहे पिवळा सोनटक्का.. अगदी रस्त्याच्या कडेने उगवलाय.
नाहीतर तिलारी घाटात जा.. फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री मधला पिवळा सोनटक्क्याचा फोटो, तिलारी घाटातलाच आहे.
मॉरिशियसला जा >>>>> :भोकाड
मॉरिशियसला जा >>>>>:( :भोकाड पसरणारा बाहुला:
मॉरिशियसला जा >>>>> :भोकाड
मॉरिशियसला जा >>>>> :भोकाड पसरणारा बाहुला:>>>>>
संपादित.
संपादित.
नमस्कार
नमस्कार निसर्गप्रेमींनो...
निसर्गाच्याच एका वेगळ्या आविष्कारासंदर्भाने माहिती हवी आहे. इथे बघा.
कुणाला काही माहित असल्यास प्लीज त्या बाफवर माहिती द्या.
सुप्रभात.... एसआरडी, छान
सुप्रभात....
एसआरडी, छान माहिती... अजुन ऐकायला आवडेल..
सायली, मस्त सुगंधी फोटो.
सायली, मस्त सुगंधी फोटो.
धन्यवाद दा... आता सिझन सुरु
धन्यवाद दा... आता सिझन सुरु झाला आहे ना! रात्री नुसती दरवळ असते...
नवीन धाग्याच्या तयारीला लागा.
नवीन धाग्याच्या तयारीला लागा.
१००० री अभिनंदन !
१००० री अभिनंदन !
नमस्कार ! साधारण दसर्यानंतर
नमस्कार ! साधारण दसर्यानंतर बुचाची फुले फुलायला लागतात व सडा पडू लागतो ती सकाळी गोळा करुन पाण्यात ठेवणे हा माझा बहर संपेपर्यंतचा रोजचा नियम! मस्त मंद सुगंध दरवळतोय, हे ऐकायलं मिळालं की मस्त वाटतं!
सायली, शोभा,मंजू.. सुंदर
सायली, शोभा,मंजू.. सुंदर फुलं...
धन्यवाद वर्षु दी.. मंजु ताई,
धन्यवाद वर्षु दी..
मंजु ताई, तुझ्याकडे कायम बैठक खोलीत कसली ना कसली फुलं असतातच..
मागे दोनच देव चाफ्याची फुलं होती एका छोटयाश्या काचेच्या वाटीत... काय मस्त वाटत होत..
बोलता बोलता माझ कीती वेळा तरी लक्ष वेधुन घेत होते...
केळीचं रोप लावून ६ महिने
केळीचं रोप लावून ६ महिने झाले. चांगलं ८-९ फूट उंच झालंय. अजून केळफूल धरत नाहिये !
पाणी आणि सूर्यप्रकाशाची कमतरता नाही .
मोठी मोठी १२-१४ पानं येऊन आता जरा लहान पानं यायला लागली आहेत.
झाडाच्या अगदी जवळ बाळ उगवून तेही आता ३ फूट झालय !
माझ्याकडे लग्नाआधी व नंतरही
माझ्याकडे लग्नाआधी व नंतरही कमितकमी २० कुंड्या होत्या. केशरी/मरुन/पिवळा/गुलाबी/पांढरा गुलाब, मोगरा, कुंद, गोकर्ण, मिरची, कढीपत्ता, पुदिना, आलं, शेवंती, अबोली, झिप्री, गवती चहा, कोरफड, तुळस, अनंत वगैरे आणि मक्याचा चारा लावलेल्या ३-४ कुंड्या असे. गांडूळ खत, भाज्यांची देठं वगैरे खत म्हणून घालत असे. घरात ३-४ शोभेची छोटीशी झाडं पण होती. काही वर्षांपुर्वी सोसायटीने कुंड्या ठेवायच्या नाहीत असा फतवा काढल्यावर काही कुंड्या पाणी न घालून उजाड केल्या तर काही खाली नेऊन ठेवल्या (आता त्या गायब आहेत). स्वत: जोपासलेली झाडं अशी डोळ्यादेखत गेल्यामुळे व पुन्हा जोपासणं शक्य नसल्यामुळे खूप खंत वाटत राहते. हळूच फक्त तुळस राखली आहे.
सोसायटीत मागच्या बाजूला माझ्या बेडरुमच्या समोर एक कडुनिंब लावला होता तो मात्र चांगला वाढलाय. सोसायटीतल्या एक आजी रोज त्याची पानं तोडून नेतात औषध म्हणून. जमिनीत बेल लावला होता तो रोप असतानाच २ वेळा घुशींनी उचकटला, मग नाद सोडून दिला.
संपादित.
संपादित.
सुप्रभात... हल्ली बहर हीचा पण
सुप्रभात...
हल्ली बहर हीचा पण ना!
अश्वे बिल्डींगना असे
अश्वे बिल्डींगना असे प्रॉब्लेम्स येतातच. चालायच.
जो-एस. माझ्याकडे पण आत्ताच सोनटक्याला कळ्या धरत आहेत. पावसाळ्यात आल्या नाहीत.
जिप्स्या तुला मी पुढल्या वर्षी देऊ शकते पिवळा सोनटक्का. मला मागच्या वर्षी काकांनी दिला. त्याची सध्या दोनच रोपे आहेत. अजून विस्तार झाला की देईन.
अश्विनी, वाईट वाटलं ग, तुला
अश्विनी, वाईट वाटलं ग, तुला झाडांची आवड असुन तु जोपासु शकत नाहीये .. तरी सुदधा तुळशी व्यतीरिक्त एखादं आवडत्या फुलाच झाड असु दे, एक तर एकच सही, मन रमत, कळी / फुल आली की आनंद होतो...
Srd, तुमची कल्पना आवडली...
कुठलं आणू? खूप मोठं होऊन
कुठलं आणू? खूप मोठं होऊन लोकांना दिसणार नाही असं हवं.
मिरची जास्वंद आणु शकते,,,
मिरची जास्वंद आणु शकते,,, छोटस टुमदार झाड असत, कळ्यांनी डवरलेलं, भरपुर फुलं येतात,, गुलाबा मधे प्लोरा म्हणुन प्रकार येतो... सुवासिक नाहीये, पण गुच्छानी फुलं लागतात..बटण गुलाव पण लावु शकतेस, शेवंतीचा पण सिझन आहे,... झेंडु, शेंद्री, अबोली, गुलबाक्षी कीती तरी आहेत... विडयाचा वेल पण चालेल.जास्त उन लागत नाहीच त्याला, आत बाहेर, करायचा अधन मधन... बैठक खोलीत ठेवला तर खुप छान दिसतो...
मिरची जास्वंद बघते
मिरची जास्वंद बघते मार्केटमध्ये मिळते का. थँक्स
(No subject)
आमच्या कॉलनीत अगदी ४०
आमच्या कॉलनीत अगदी ४० वर्षांपुर्वीच भरपूर झाडे लावली होती. आता ती छान वाढलीत.
गॅलरीतल्या कुंड्यांना आजही विरोध आहेच. पण कॉलनीत एक छोटेसे देऊळ आहे तिथे फुलझाडे लावता येतात.
अशी जागा जवळपास हवी. म्हणजे आपली हौस तिथे भागवता येते. खरे तर सोसायटीपुरता भाजीपाला, किमान मिरच्या वगैरे सोसायटीच्या आवारातच लावण्यास कुणाची हरकत नसावी.
पण कॉलनीत एक छोटेसे देऊळ आहे
पण कॉलनीत एक छोटेसे देऊळ आहे तिथे फुलझाडे लावता येतात.
अशी जागा जवळपास हवी. म्हणजे आपली हौस तिथे भागवता येते. खरे तर सोसायटीपुरता भाजीपाला, किमान मिरच्या वगैरे सोसायटीच्या आवारातच लावण्यास कुणाची हरकत नसावी.>>>> नाहिये ना तशी जागा
सोसायटीच्या कोपर्यात जागा आहे तिथेच कडुनिंब कसाबसा वाढतोय माझा. फांद्या जास्त आणि पानं कमी अशी तर्हा आहे त्याची.
सायली तुला मेल केलाय प्लिज
सायली तुला मेल केलाय प्लिज चेक कर.
जिप्स्या तुला मी पुढल्या
जिप्स्या तुला मी पुढल्या वर्षी देऊ शकते पिवळा सोनटक्का. मला मागच्या वर्षी काकांनी दिला. त्याची सध्या दोनच रोपे आहेत. अजून विस्तार झाला की देईन.>>>>>ओक्के जागू
काल झी टिव्हीच्या खानाखजाना चॅनेलवर कोलकाताच्या भागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांविषयी दाखवत होते. त्यात भाजी मार्केटमध्ये केळफूल आणि केळीचा कोवळा सोपा (??) विकायला ठेवलेलं अँकरने सांगितले. केळफुलांची भाजी, इ. होते ते माहित आहे पण केळीच्या कोवळ्या सोप्याची पण भाजी करतात का?
जागु मेल चे उत्तर दिले आहे
जागु मेल चे उत्तर दिले आहे
अश्विनी, मिरच्या वगैरे झाडे
अश्विनी, मिरच्या वगैरे झाडे मिनरल वॉटरच्या बाटल्यातही चांगली येतात. या बाटल्या टांगूनही ठेवता येतात. टोमॅटो, लसूण, पुदीना वगैरेही चांगले येतात.
बाटलीत झाडे लावायची आणखी एक पद्धत आहे.
बाटलीच्या तळाशी ३/ ४ इंच थराचा गवताचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा. मग त्यावर बाटलीच्या झाकणापर्यंत येईल अशी माती भरायची. झाकणाला एक भोक पाडून झाकण लावायचे. त्या भोकातून बी पेरातचे. रोप त्या भोकातून बाहेर येईल. त्याने नीट जीव धरला कि बाटली उलटी टांगायची. तळ कापून टाकायचा. असे रोप वरच्या दिशेने पण जोमदार वाढते. त्याला पोषक द्रव्ये गुरुत्वाकर्षणाने जास्त चांगल्या प्रकारे मिळतात. ते झाकणातले भोक खोडामूळे बुजून जाते व बाटली उलटी टांगली असली तरी त्यातून पाणी ठिबकत नाही.
टॉप्सी टर्व्ही प्लांटर या नावाने नेटवर या प्रकाराची माहिती मिळेल.
केळीच्या कोवळ्या सोप्याची पण
केळीच्या कोवळ्या सोप्याची पण भाजी करतात
बहुतेक करतात. शिवाय त्याचे पाणी काढुन ते काही पदार्थांमध्ये वापरतात अशी ऐकिव माहिती आहे.
Pages