निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली - वसुबारसेची स्पेशल रंगावली अगदी भारीए ... खूपच आवडली Happy

जिप्सी - प्र चि मस्तए - पण तो फराळ जरा ठळक दिसूदेत की वेगळा Happy Wink

सर्वांना दिपावली शुभेच्छा .....

सुदुपार आणि हॅपी दिवाली टू ऑल!

हे Great eggfly female फुलपाखरु. मला उलट्या बाजूने दिसत होते. पंखांची बॉर्डर किती सुरेख आहे ना!

धन्यवाद शशांकजी..:)
वर्षा फुलपाखरु सुरेख टिपलयस! पंखांची बॉर्डर किती सुरेख आहे ना!+++ अगदी अगदी
जो साधना ला अनुमोदन..

मस्त फोटो वर्षा Happy

पण तो फराळ जरा ठळक दिसूदेत की वेगळा>>>>शशांक, तो गेल्यावर्षीचा फराळ आहे Wink यावर्षीचा अजुन तयार होतोय. Happy

सुदुपार अन दिवालीच्या हार्दिक शुभेच्छा! काय रसाल दिसताहेत लिंब! सायली रांगोली मस्त! फुलपाखरुचा रंग व किनार खूपच छान!

वाह मस्त शुभेच्छा जिप्स्या!!
सगळ्यांनाच धनत्रयोदशी च्या खूप सार्‍या शुभेच्छा..

दिनेश, इकडे माबो वर येऊन वर्चुअल दिवाळी छान साजरी होते नै?? (स्वानुभावाने!!) Happy

वर्षा, फुलपाखरू चा फोटो मस्त आर्टिस्टिक !!

जो_एस कुंडीतल्या झाडाला इतकी लिंबे??????????// किती मोठी आहे कुंडी नी झाड?? फोटो टाका ना..

हो प्लीज

कार्ण माझ्याकदॅ पण कुंडित एक झाड आहे... पण फुल फळ न्माहीत फक्त पान

हो टाकतो झाडाचा फोटो
कुंडीत असल्यामुळे जास्त उंच होउ दिलं नाही मी
साधारण चार फुट उंच असेल. पण एका वेळेला त्याला २०-२५ लिंब आली होती आता छोटी छोटी लागली आहेत अजून

May every candle that will be lit on the evening of Diwali bring joys and prosperity for everyone.

साधारण चार फुट उंच असेल. पण एका वेळेला त्याला २०-२५ लिंब आली होती आता छोटी छोटी लागली आहेत अजून>> काय लावले होते झाडासाठी ते पण लिहा ना. एकतर इथे उन्ह आग ओकतय, वर बाजारात ती निस्तेज, दम नसलेली लिंब दिसतात. ती पण महाग. ईथला रसदार लिंबांचा फोटो काय मस्त वाटला Happy

फोटोबद्दल माझाही आग्रह. कुंडीतल्या लिंबाचं झाड इतकी सुंदर लिंबं देत असेल तर किती मस्त.

मी रांगोळीचा नविन धागा काढलेला आहे... सगळ्यानी आपआपल्या रांगोळ्या, अभिप्राय आवश्य शेयर करावा! Happy

जिप्सी , काय मस्त फोटो. पणत्यातील वाती थरथरत असल्यासारख्या वाटतात.

पण एका वेळेला त्याला २०-२५ लिंब आली होती >>>> जो_एस, तुम्ही झाडाला कोणते खत घालता ,माती कधी बदलता याबाबत जरा सविस्तर लिहाल का? माझ्या एका अ‍ॅडेनियमच्या कुंडीत वड+लिंबू आले आहेत. ते वेगळे करण्याबाबत एका मायबोलीकराने उपाय सुचवला होता,पण झाडे मरतील या भितीने केला नाही .

आज पहाटे पूर्व क्षितिजावर चतुर्दशीची अति नाजुक चंद्रकोर इतकी सुरेख दिसत होती की बस्स ...

त्याचवेळेस साधारणतः आपल्या डोक्यावरच्या आकाशात मृगशीर्ष, व्याध, वृषभ रास, कृत्तिकेचा पुंजका, इ. इतके सुंदर दिसत होते ... ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर पहाणे - अजूनही काही काळ दिसतीलच हे सारे ..

झरबेरा - आकाशकंदील भारीच झालाय .. Happy

जो_एस, तुम्ही झाडाला कोणते खत घालता ,>>> मी खत म्हणून घरातला ओला कचरा टाकतो. माती अजूनतरी बदलली नाही ५ वर्षात. त्या ओल्या कचऱ्यातल्या बीयांतून उगवल्येत ही झाडं. कधीतरी नर्सरीत मिळाणारं खत टाकतो.

सुधीर, बहुतेक वेळा लिंबाचं रोप कलमीच लावतात. कारण त्याची वाढ खूप सावकाश होते आणि लिंबं यायला सुद्धा खूप वेळ लागतो. पण तुमच्याकडे आश्चर्यच झाले आहे!! कुंडीत केवळ ओल्या कचर्‍यावर पडलेल्या बियांना इतकी रसरशीत आणि पातळ सालीची भरपूर लिंबं येताहेत! भाग्यवान आहात. लिंबांच्या फुलांना पण तस्साच लेमनी सुवास असतो. बरीचशी कुंती/कामिनीच्या फुलांसारखी असतात ही फुलं.
वर्षा, ग्रेट ईगलफ्लाय... फोटो खूप सुंदर आलाय! आणि त्याची (पंखांची) बॉर्डर काय सुरेख दिसतिये!! Happy
ऐशू.. आकाशकंदील मस्त झालाय.
सर्व नि ग परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!... Happy

घराच्या शेजारीच सप्तपर्णीचे झाड आहे.हे नाव मला इथे आल्यानंतरच कळले.तोपर्यंत त्याच्या पानांची वैशिष्ट्यपूर्ण
ठेवण आवडायची.कोणाला नावही माहीत नव्हते.इतकी वर्षे फक्त पानांचा सुबकपणा होता.काल अचानक पाहिले तो झाड फिक्या पोपटी-पांढर्‍या कळ्यांच्या गुच्छांनी भरून गेलंय.

Pages