मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> केलेली (च) बर्फी करायला कष्ट पण कमीच लागतील
समजून घ्या, मी गॅसवर असते या बर्फीच्या बाबतीत. Proud

सिंडे पल्प निम्मा करायला किती वेळ लागला? >>> हे पहा संध्याकाळच्या वेळी चौफेर तलवारबाजी करत असताना आंब्याचा रस आटवायला किती वेळ लागला अशा शुल्लक गोष्टींकडे मासाहेब लक्ष देत नाहीत Proud

जोक्स अपार्ट, १० मिन. लागले असतील. निम्मा झाला की लक्षात येइलच तुझ्या.

अ श क्य सुंदर झाली... चव, टेक्शर म हा न
फोटो टाकण्यात ढ आहे म्हणून टाकले नाहीत.
रेसिपीच्या मालकिणीचे आभार... सततच्या मंद शंकांना उत्तरं देत रेसिपीच्या पार नेऊन सोडल्याबद्दल... त्यांना फोटो धाडले आहेत...

एक प्लेन मलाई बर्फी आहे आणि दुसरी खोबरं घातलेली.
मला त्या खाण्याचं भाग्य मिळालं ;).
मस्तच झाल्या होत्या :).

गणेशभक्तांसाठी धागा वर काढत आहे. Wink

रच्याकने, मागे एकदा नेहमीचा मिल्क पावडरचा डब्बा मिळाला नाही म्हणून सॅशेवालं पाकीट आणलं गेलं.त्यातल्या एका सॅशेच्या प्रमाणात यशस्वी म.ब. होते असं लक्षात आलं. म्हणजे पुर्वी आम्ही मापात पाप केलं होतं वाटतंय.

मँगो पल्प घातलेले मलई पेढे (बर्फी) !!
गणपतीच्या काळात एका मैत्रीणी कडे प्रसादा ला म्हणुन नेले होते..
जे काही कौतु क झाले त्याचे श्रेय ह्या ओरिजिनल रेसिपी ला आणि सायो ला
सायो, बघ आता मुहुर्त मिळाला .. सॉरी Happy

कन्डेन्स्ड मिल्कचा 397G कॅन (१४ ounces)
अंदाजे २ कप पेक्षा थोडीशी च जास्त मिल्क पाउडर
1/2 cup बटर
आणि मन्गो पल्प ( साधारण एक चहाचा मोठा मग होता) ला घोटवुन त्याचा एका काचेच्या बोल भर गोळा झाला होता.. (सॉरी परत अंदाजे)
४०-४५ पेढे झाले होते..
photo (2)_0.JPG

मस्त दिसताहेत मँगो पेढे.. त्या प्रत्येक पेढ्यावर एकेक केशराची काडी कसली निगुतीने लावली आहे.. मस्तच अगदी!

सायो, सिंडरेला, मंजूडी, धन्यवाद Happy
मंजूडी, अग निगुतीने वगैरे काही नाही ग.. मला तर सगळ्या पेढ्यां ना मोदका चा आकार द्यायचा होता.. पण वेळ नव्हता आणि माझा पेशंन्स संपत आला होता.... Wink

जमल्या बाई एकदाच्या!! मागच्या वेळेस ते सगळं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये उडाले होते. व भांडं तर फेकूनच द्यावे लागले.. या वेळेस मात्र अफलातून झाल्या आहेत! ती चव, ते भगराळ टेक्श्चर मस्त जमले आहे. मात्र मला वड्या कापताना गडबड झाल्यासारखे वाटले. ते मिश्रण सुरीला चिकटून नीट कापता येत नव्हते. मात्र बर्फ्या चिवट नाही झाल्या. ऑल्मोस्ट पर्फेक्ट आहेत. मी कन्डेन्स्ड मिल्क १४औंझ घेतले. पुढच्या वेळेस ८ घेऊन बघेन. बाकी मिल्कपावडर ती मृ ने वापरली आहे तीच निडोची. नेक्स्ट टाईम नॉन फॅट घेऊन बघणार आहे. वीकेंडला दिवाळीसाठी म्हणून न्यायच्या आहेत. त्याआधी एक ट्रायल मारली.

फोटो काही तितके ढीन्च्यॅक नाही आले..
या सुरीने कापल्या(?)वर अशा दिसल्या.
malaibarfi1.jpg

ते रूपडं काही आवडलं नाही म्हणून वाटीने आकार देण्याचा प्रयत्न केल्यावर अशा.. हे पण रूपडं बरोबर नाहीये. पण जानेदे. खाताना ब्रम्हानंदी टाळी! Happy
malaibarfi2.jpg

बस्कू, वड्या मस्तं दिस्तात. मला वाटतं १४ औसांनी काही फरक पडत नाही. उलट छान मऊ होतात. ८ औंस आणि नॉनफॅट मिल्कपावडर वापरून किंचित भगरा होतो. (त्याचबरोबर बटरमध्ये कंची मारली म्हणूनही असेल.)

Pages