निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
आमच्याकडे फूड नेटवर्क वर
आमच्याकडे फूड नेटवर्क वर आफ्रिकन किचन म्हणून एक कार्यक्रम सादर होतो. काल सलग ५ तास त्यात राजस्थानचे पदार्थ दाखवत होते.
त्याच कार्यक्रमात आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांचे पदार्थ दाखवत असतात. काल झाम्बिया मधल्या झांबेजी नदीतल्या वॉटर लिलीचा एक पदार्थ दाखवला. सरसकट आफ्रिकन पदार्थ असतात तसाच साधासुधा.
मोठ्या भांड्यात नदीकाठच्याच वेताच्या काड्या आडव्या टाकायच्या. त्यावर वॉटर लिलीच्या कळ्यांची बाह्यदले काढून त्या रचायच्या आणि त्यावर एक मासा ठेवायचा. हे सगळे वाफवायचे. मला काय माश्यात रस असणार ?
पण त्या कळ्यांची चव आपल्याकडच्या खसखशीसारखी असते असे निवेदक म्हणाला. त्याचवेळी तो हे पण म्हणाला, सर्वच जातीच्या वॉटर लिलीच्या कळ्या खाण्याजोग्या नसतात. काही तर विषारीही असतात.
आपल्याकडच्या खाद्य नसाव्यात. आजवर कुठल्याही पुस्तकात मी त्यांच्या खाद्यपदार्थ म्हणून वापर केलेला
बघितलेला / वाचलेला नाही.
कमळाच्या बिया मखाणे म्हणून, त्याची खोडे कमलकाकडी म्हणून खातात. त्याच्या पानातही भात वगैरे वाफवतात. ( वर्षूनेच फोटो टाकला होता त्याचा ) पण आपल्याकडच्या वॉटर लिलीचा काही उपयोग नाही. आपल्याकडच्या कल्पक बायकांच्या तावडीतून हा प्रकार सुटलाच नसता !
अॅनिमल प्लॅनेटवर परवा एका
अॅनिमल प्लॅनेटवर परवा एका बिबळ्याने एका मगरीची शिकार केलेली दाखवली. खरा जिगरबाज प्राणी तो.
मगर पाण्यातल्या एका मातीच्या उंचवट्यावर उन खात पडली होती. बिबळ्याने तिला बघितले. पाण्यातून दबकत दबकत तो तिच्याजवळ गेला आणि तिची मान धरली.
ती मगर आकाराने त्याच्याएवढीच होती. बाकीच्या ( हरण वगैरे ) प्राण्यांची मान नाजूक असते तो त्याच्या जबड्याने ती सहज पकडू शकतो. मगरीची मान जाडजूड, शिवाय कातडी निबर तरी त्याची पकड घट्ट होती. तिने आपल्या अक्राळ विक्राळ जबडा वासून सुटायची धडपड केली खरी, पण त्याच्या तावडीतून सुटू शकली नाही ती.
खरं तर आकाराने वाढलेल्या मगरीला, तिच्याच भाईबंदाकडून ( आणि अर्थातच माणसाकडून ) धोका असतो. तिला नैसर्गिक शत्रू जवळजवळ नाहीच.. पण हे अजबच प्रकरण होते.
सायली, सो स्वीट!! दा...
सायली, सो स्वीट!!
दा...:हाहा: खरंय, मलाही असंच वाटू लागलंय..... की मनी ही माझी तिसरी मुग्गी आहे हे!!
तुम्ही म्हणालात ती व्हिडियो क्लिप मला ईश्वरीने तिच्या मोबा वर दाखवली होती. मलाही त्यावेळी हाच प्रश्न पडला होता; की जेव्हा त्या बिबट्याने तिला पाण्यात ओढलं तेव्हाही मगरीने काहीच जिवाच्या आकांताने प्रतिकार केला नाही... कारण पाण्यात मगरीचं/सुसरीचं बळ कल्पनेपेक्षाही पलिकडे असतं!!.... पण परत एकदा हे ही जाणवलं की आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळ्या गोष्टी निसर्गात घडू शकतात.
माझ्याकडे कुंडीतल्या झाडाला
माझ्याकडे कुंडीतल्या झाडाला आलेली लिंबं
कसली फ्रेश आहेत घरची लिंबं!!
कसली फ्रेश आहेत घरची लिंबं!! बाय द वे, रोप कुठून आणलं?? कारण मला पण चांगल्या क्वालिटीचं कागदी लिंबाचं रोप हवं आहे.
शांकलीताईला इथे बघून खूप छान
शांकलीताईला इथे बघून खूप छान वाटते.
जो_एस लिंबं सॉलिड मस्तच आहेत, कलरफुल.
कसली फ्रेश आहेत घरची लिंबं!!
कसली फ्रेश आहेत घरची लिंबं!! >>>>>अगदी अगदी
लिंबे बघून नाकशी नेऊन
लिंबे बघून नाकशी नेऊन हुंगावीशी वाटताहेत.
शांकली, तूमच्याकडे शोभेच्या संत्र्याचे झाड पण चांगले होईल. अगदी छोट्या झाडाला खुप संत्री लागतात.
नक्की आणेन संत्र्याचं
नक्की आणेन संत्र्याचं रोप.
दा, बहाव्याचं रोप आता साधारण दोन फूट उंच झालंय. त्यावर कीड पडते पण लगेच नवी पालवीपण येते.
मगरीने एकदा पाण्यात ओढले कि
मगरीने एकदा पाण्यात ओढले कि खेळ खलास. ती पाण्यात गरगर फिरू शकते. श्वास रोखून सावजाला पाण्याच्या तळाशी नेते.
ती अगदी पुरातन काळापासून तशीच राहिली आहे. ज्यावेळी पृथ्वीवर असह्य तपमान होते त्यावेळी ती पाण्यात राहिली. तिच्या शरीरात फार बदलही झाले नाहीत.
झाडांच्या बाबतीत पाने जरा कमी
झाडांच्या बाबतीत पाने जरा कमी पोषक मानतात. त्यात सेल्यूलोजही भरपूर असते. नुसती पाने खाऊन राहणार्या माकडांना, ती पचवण्यासाठी भरपूर झोप काढावी लागते.... किटकांच्या अळ्यांचे मात्र त्यावरच आणि बहुदा एकाच झाडाची पाने खाऊन किती छान पोषण होते. अगदी दिसामाजी वाढतात त्या
धन्यवाद मित्रांनो शांकली ओला
धन्यवाद मित्रांनो
शांकली ओला कचरा टाकतो त्यातुन बी पडून उअगवलं ते झाड
साधनाजि, तुम्हाला हवि आहे का
साधनाजि,
तुम्हाला हवि आहे का माण्जर माझ्याकडे आहेत ????
माझ्या कडे ३ मान्जर आहे
माझ्या कडे ३ मान्जर आहे कोनाला पाहिजे का???
१-मान्जर आनि २ बोके आहेत.
कोनितरि जन्ग्लात सोड्ले होते उपाशि मरु नये म्हुनुन घेउन आले.
माझ्या कडे आधिच ५ आहेत. पन खुपच गोड आहेत. आता १ वर्श झाले.
एक्दम ट्रेन्ड झालि आहेत. चान्ग्ल्या सवयि लाग्ल्या आहेत त्याना.
गेले १५ वर्श माझ्याकडे मानजरे आहेत.
वॉव..रसाळ लिंबं म्हंजे अगदी
वॉव..रसाळ लिंबं म्हंजे अगदी प्राणप्रिय!!!!!!!
आपल्याकडील लिंबू, कोथिंबीर यांचा जो सु>>वा>>स आहे तो इतर कोणत्याही देशातील लिंबाकोथिंबीरी ला येतच नाही...
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणांस सुख-समृद्धीची, आनंदाची, समाधानाची, शांततेची, आणि आरोग्यदायी जावो!
वर्षूताई भारतात नाही का
वर्षूताई भारतात नाही का सद्ध्या?
खरच रसाळ आहेत आणि स्वाद
खरच रसाळ आहेत आणि स्वाद मस्त
साल एकदम पात्तळ आहे
वॉव ...जो एस कुंडीतल्या
वॉव ...जो एस कुंडीतल्या झाडाला मस्तच आलीयेत लिंबं. आमच्या अंगणातल्या झाडाला यायची अशी लिंबं पण आता ते झाड नाही. आता दोन झाडं लावली आहेत पण वाढ फार हळू आहे.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.
जो_एस, खूप मस्त वाटलं असेल
जो_एस, खूप मस्त वाटलं असेल ना? कुंडीतलं झाड आहे का,तसे असेल तर ग्रेट!
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.>>.माझ्याकडूनही.
अश्वे, है ना मै यहाँ..
अश्वे, है ना मै यहाँ.. नुक्तीच आले परत
अरेरे :फिदी कोथिंबिर आणि
अरेरे :फिदी
कोथिंबिर आणि लसुनाला सुवास नसतो.
आय हेट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट कोथिंबिर आणि लसुण
रीया..............
रीया.............. अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!
कोथिंबिर आणि लसुनाला सुवास
कोथिंबिर आणि लसुनाला सुवास नसतो.>>>>>>>>>>> कोथिंबिरीचा( गावठी-एरवीचे गाजर गवत नाही ) हिरवा वास चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.
आय हेट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट कोथिंबिर आणि लसुण>>>>>>>हाय कंबख्त !
मला भरपूर कोथिम्बिर आणि लसुन
मला भरपूर कोथिम्बिर आणि लसुन ,कढीपत्ता घरात असला कि एकदम भारी वाटते ,
ऐन वेळी यातील काही गायब असले कि चव येत नाही हवी ती !
सुप्रभात.... व्वा मस्त गप्पा
सुप्रभात....
व्वा मस्त गप्पा , छान माहिती...
जो काय मस्त लिंबं आहेत आणि ती देखिल कुंडीतली.. क्या बात है! मागे खरबुज पण टाकलं होत ना!
शांकली
दिवाळीच्या सगळ्या नि.ग. करांना हार्दिक शुभेच्छा!
काल वसुबारस...
मी काढलेली रांगोळी...
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!
लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी
आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली
घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण
जिप्सी छान .शुभेच्छा आवडल्या
जिप्सी छान .शुभेच्छा आवडल्या
अरे वा, मस्त सुरवात..
अरे वा, मस्त सुरवात.. माझ्यासाठि हिच दिवाळी... इथे अंगोलात काही तसे वातावरणच नाही.
Pages