निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे सिंगापुरात गुंजाची झाडे खूप आहेत. मी ईंडोनेशियामधे बोरोबुदुरला गेलो होतो तेंव्हा तर झाडाखाली अक्षरश: लालभडक बियांचा खच पडला होतो आणि त्यावर लख्ख उन्ह पसरले होते.

मी माझ्या नावाचे पहिले अक्षर तिथे गिरवले Happy

Yeshwant.jpg

अरे वा. मस्तच बी Happy
मी माझ्या नावाचे पहिले अक्षर तिथे गिरवले>>>>>माझ्याही नावाचे झाले कि Happy

रच्याकने मी अजुन एक फोटो People कॅटेगरीमध्ये दिला आहे. आवडला तर नक्की वोट करा. Happy
http://privilegemoments.com/myimage.aspx?image=Xl045TJywPQOXT0P+%2FTQ2g%...

फक्त हात जास्त आहे. Proud
जिप्स्या, तु लग्न झाल्यावर खरचं बिघडलास. हे नाव मी कधी सांगितल होत.(११ एप्रिल २०१२)आणि तुझ्या लक्षात नाही????????/ Sad

शोभा, धन्यवाद.

भेंडी पण ओळखीची आणि जास्वंदही ओळखिचा आहे. पण भेंडीसारखी पाने आहेत हे बरोबर आहे पण जास्वंदाशी काय संबंध जोडला असेल नावामधे? फुलांचा आकार? पाकळ्या? कळी?

हे नाव मी कधी सांगितल होत.आणि तुझ्या लक्षात नाही??>>>>>>मला भेंडीगुलाब माहित आहे पण भेंडी जास्वंद हे पहिल्यांदाच ऐकलं. (तु फोन करून मला भेंडी जास्वंद हे नाव ऐकवलं होतस का? :फिदी:)

(तु फोन करून मला भेंडी जास्वंद हे नाव ऐकवलं होतस का? फिदीफिदी)>>>>>>>>>हो. पण तेही तुझ्या आता लक्षात नसणार. Wink Light 1

जागु, काय ग हे. Sad Happy
हे तू दिलेल नाव आहे का मग?>>>>>>>>..नाही. हे झाड ज्यांच्याकडे होतं, त्यांनी हे नाव सांगितलं. Happy

हे तुच कबूल केलसं>>>>तिथं कुठ मी भेंडीजास्वंदाबद्दल बोललोय? Sad दोन वर्षापूर्वीच्या धाग्यातलं सगळंच कसं लक्षात राहणार. Uhoh Sad

>तिथं कुठ मी भेंडीजास्वंदाबद्दल बोललोय? अरेरे दोन वर्षापूर्वीच्या धाग्यातलं सगळंच कसं लक्षात राहणार. अ ओ, आता काय करायचं अरेरे>>>>>>>>>>>>>>बाळ जिप्सी, मी हे फोटो आणि त्याचं नाव तिथेच दिलयं ना? Happy

दोन वर्षापूर्वीच्या धाग्यातलं सगळंच कसं लक्षात राहणार. अ ओ, आता काय करायचं अरेरे>>>>>...अरे, सगळं नाही. फकस्त निसर्गाच्या संबंधीत. आणि तुमी गुर्जी लोकांनी असं म्हनल्यावर आमी काय म्हनाव? Uhoh Lol

भेंडी जास्वंदाचे बायनॉमिअल नेम मिळेल का? मला हे झाड घ्यायचे आहे.
आपल्या नेहमीच्या भेंडी(Portia tree) पेक्षा हे वेगंळ आहे. तिला पिवळी फुलं येतात.

गुलाबापेक्षा, ते भेंडीला जास्त जवळचे आहे. भेंडी, जास्वंद, कापूस, अंबाडी सगळे याच कूळातले. सगळ्यांची पाने, फुले सारखीच.

वॉव.. मस्त फोटोज आणी माहिती..

दिनेश ,पनामा वर लेख लिहिणारे ..लौकरच.. Happy पनामा मला चायना इतकाच प्यारा आहे..

प्रकाशचित्रांसाठी सोपा उपाय :

अ)खालील टेंप्लेटस बनवून मोबाईलच्या नोटस मध्ये साठवावे.

१)कावळा कंस img src="" alt="photo" /कावळा कंस
अथवा
२)कावळा कंस img src="" width="320" alt="photo" /कावळा कंस
अथवा
३)कावळा कंस img src="" width="640" alt="photo" /कावळा कंस
इत्यादी.

शेवटचा कावळा कंस >
सुरुवातीचा कावळा कंस <

ब)फोटोबकेट अथवा {फ्लीकर/पिकासा वगैरे}मध्ये फोटो अॅल्बममध्ये चढवून ठेवायचे.

क)हवा असलेला फोटो निवडून त्याची Direct link http पासून सुरू होते ती कॉपी करायची.

ड)ती लिंक '(अ)'मधल्या src नंतरच्या "" मध्यभागी पेस्ट करायची.तिनांपैकी एक टेंप्लेट चांगले चालेल.

इ)आता लेखात/पोस्टमध्ये हव्या त्याजागी या तयार लिंका टाकून पूर्ण लेखच नोटसमध्ये एका फोल्डरात तयार ठेवायचा.

फ)पूर्ण लेख फोटोंच्या लिंकांसह मायबोली उघडून नवीन लेखन करा मध्ये डकवला की झाले.
प्रतिसाद तपासला की फोटो दिसेल. नाही दिसला तर कुठेतरी स्पेस अथवा "ची चूक असेल.

ग)खाजगी जागा वगैरे डोकेदुखी नाही. यासाठी फोटोबकेट सर्वोत्तम. साध्या मोबाईलमध्येही वेबसाइट उघडते. लॉगइन न करताही लिँक काढता येते. अॅपस डाउनलोड भानगड नाही.
मोठे फोटो {२एमबी वगैरे}आपोआप योग्य आकारात येतात.

वर्षू, पनामाबद्दल थोडी अजून माहीती द्या ना म्हणजे काय बघावं आणि कुठे रहायची चांगली सोय आहे याबद्दल ही लिहीना म्हणजे काही प्लॅन करताना उपयोगी पडेल.

त्या मांजरी...गुंजा..वर्तुळ-इंद्रधनुष्य.......! लै लै भारी आहे.

रच्याकने मी अजुन एक फोटो People कॅटेगरीमध्ये दिला आहे. आवडला तर नक्की वोट करा. >>>> केल. खुप सुंदर आलाय फोटो, पहिल्या पेक्षाही हा जास्त आवडला Happy

माझ्या लेकीचा फोटो तुझ्याकडून काढून घ्यावा, तुझ्या कॅमेरातून ती आणखीन छान आणि वेगळी दिसेल असं पटकन मनात आलं.

बी ची बीयांनी अद्याक्षर बनवण्याची आय्ड्याची कलपना लय भारीये!
आमची जाई अगदी बहरलीये! गेटात आजूबाजूला मंद सुगंध दरवळत असतो. पण खूप उंच गेल्याने फुलं सहजी काढता येत नाहीत.

Pages