सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.
विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?
१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?
माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.
अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.
असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
जर सेना-भाजपा वेगळे झाले तर
जर सेना-भाजपा वेगळे झाले तर भाजपाचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा हा मुद्दादेखिल प्रचारात येऊ शकतो.
भाजप मनसे युती होईल काय?
भाजप मनसे युती होईल काय?
शक्यता वाटत नाही.
शक्यता वाटत नाही.
एका घरात रोज जेवणाकरिता दहा
एका घरात रोज जेवणाकरिता दहा चपात्या बनत. नवरा सहा खायचा आणि बायको चार. एकदा त्यांच्या घरात बाहेरून पाहुणे आले. हे पाहुणे आधी दुसर्यांच्या घरातील मिळेल ती अर्धी / चतकोर चपाती खात असत नाही तर स्वतःच्या घरात अर्धपोटी / उपाशी राहत असत, पण आता या दाम्पत्याच्या घरी आल्यावर त्यांना त्या घरातील दहा चपात्यांपैकी पाच चपात्या खाण्याची स्वप्ने पडू लागली.
यावर यूक्ती म्हणून नवराबायकोने भांडण सुरु केले. बायको म्हणाली नवर्याला, "तूच का म्हणून नेहमी जास्त चपात्या खाणार? नवरा बायको समान. दोघेही पाच पाच चपात्या घेऊ आणि आपापल्या वाट्यातील अर्धी अर्धी पाहूण्यांना देऊ. नवरा तावातावाने उत्तरला, "एकवेळ तुला चार ऐवजी पावणे चार चपात्या मिळतील पण सव्वा चार देखील मिळणार नाहीत आणि पाहुण्यांचा वाटाही तू त्यातुनच दे." नवराबायकोची मजल भांडणात घटस्फोटा पर्यंत गेली, पाहुण्यांची तर कुणी दखलच घेईना.
पाहुणे घायकुतीला आले. "आम्हाला अर्धी + अर्धी मिळून एक चपाती देखील चालेल पण तुमचे भांडण लवकर संपवा पाहू" असे काकूळतीला येऊन म्हणू लागले.
पाहुण्यांच्या तोंडून हे वाक्य निघावे हेच नवरा बायकोच्या भांडणाचे प्रयोजन होते आणि ते साध्य झाले.
युतीतील कुत्र्यामांजरीसारखी
युतीतील कुत्र्यामांजरीसारखी भांडणे बघून असे वाटते की सत्तेवर आल्यावरही यांची मी शाणा की तू शाना हे चालूच राहणार. त्यापेक्षा तुटू दे युती, लढा स्वबळावर, आणि मग सर्वांना समजेल कोण किती पाण्यात. आणि मग करत बसा युत्या आणि आपल्या ऐपतीनुसार नुसार मंत्रीपदे वाटून घ्या.
युती तुटली तर निवडणूक रंगतदार होईल हे मात्र नक्क्की.
चेसुगु, मस्त उदाहरण. फक्त फरक
चेसुगु, मस्त उदाहरण. फक्त फरक एवढाच कि नवरा बायको भांडणाचे प्रयोजन विसरताहेत आणि पाहुण्यातलच कोणतर जोदीदारापेक्षा बरं दिसतय म्हणुन घटस्फोट घेताहेत
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/shiv-sena-BJP-...
अखेर सेना-भाजप युती तुटली?
भविष्य लिहून ठेवा. सेना भाजपा
भविष्य लिहून ठेवा.
सेना भाजपा युती तुटली तर सेनेचा कचरा होणार.
भाजपा उगाच जास्त जागा मिळवणार.
स्पस्ष्टं बहुमत कुणाला मिळणार नाही.
१६व्या वर्षीपण उगाच राकॉ-कॉ च सरकार येईल.
कठिण आहे.
आणि त्याच्या पुढच्या
आणि त्याच्या पुढच्या लोकसभेलही कॉ येणार
उद्धवचे एकूण वागणे सुभेदारी
उद्धवचे एकूण वागणे सुभेदारी प्रकारातले आहे. अंगात कोणतीच गुणवत्ता व कर्तबगारी नसताना वडलाच्या पुण्याईने लाभलेला पक्ष धुळीस मिळविण्याचे काम उद्धव मोठ्या कौशल्याने पार पाडतील.
युती तुटल्यास सेना संपलीच समजा!
उद्धवा ! नाही तुझे सरकार !
उद्धवा ! नाही तुझे सरकार !
भविष्य लिहून ठेवा. सेना भाजपा
भविष्य लिहून ठेवा.
सेना भाजपा युती तुटली तर सेनेचा कचरा होणार.
भाजपा उगाच जास्त जागा मिळवणार.
स्पस्ष्टं बहुमत कुणाला मिळणार नाही.
१६व्या वर्षीपण उगाच राकॉ-कॉ च सरकार येईल.
कठिण आहे.>>>
मज्जा हे बॉ, धरणं भरायची चिंता नाही मग महाराष्ट्राला
मुंबईची ताकद काय ? इंग्रज
मुंबईची ताकद काय ?
इंग्रज काळापासून मुंबई बेट आणि आताची मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला हे रूप द्यायला हजारो उद्यमशील लोकांचा हातभार आहे.
हि मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी म्हणून संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झालेत
हि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहावी ह्यासाठी आणि आपल दिल्लीदरबारी राजकारण अबाधित राहावं म्हणून वसंतराव नाईक , वसंतदादा पाटील ते शरद पवार सर्वांनी हस्ते परहस्ते मदत केलेली आहे
हा सगळा इतिहास झाला
आता मुंबईच भविष्य काय आहे ?
लोकांना वाटतंय कि मुंबईवर भाजपला सत्ता हवीय , पण कोणत्या भाजपला ?
फडणवीस ,तावडे, खडसेंच्या भाजपला कि मोदी शहांच्या भाजपला ?
मोदींना शहाना मुंबई मुळात नकोच आहे , त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत.
मित्र पक्ष असला तरी त्याच खच्चीकरण करून आपली ताकत वाढवण हे प्रत्येकच धोरण असतच आणि त्यालाच राजकारण म्हणतात .
कालपरवाची मोदींची पावलं त्याच दिशेने पडतात आहेत.
चीनचे प्रधानमंत्री दिल्ली मुंबई सोडून आधी अहमदाबादमध्ये येतात , सामंजस्य करार करतात तोही गुजरात सरकारबरोबर ?
चीन बरोबर गुजरातच्या प्रधानमंत्र्यांनी जे करार केलेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या योजना गुजरातमध्ये नेल्या जात आहेत ते पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे.
मुंबईत असणारे गुजराती फक्त पैशाशी बांधील आहेत त्यांना बाकी काही घेण देण नाही
मराठी अस्मिता आणि मुंबईशी असणारी भावनिक बांधिलकी ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसाच्या आहेत
गुज्जुना त्याच्याशी काही कर्तव्य नाही.
उद्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही
मुंबई शेअर बाजारचा आत्मा पैसा आहे , जर तिकड तितक्याच ताकदीचा शेअर बाजार उभा राहिला तर मग तो हि प्रश्न सुटेल
व्यापारी लोकांना काय कुठेही धंदा करायचा आहेच आणि जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठेही बसून तुम्ही जगात व्यवहार करू शकता
आणि एकदा मुंबईच आर्थिक महत्व कमी झाल कि शिवसेनेचं कंबरडे मोडलच म्हणून समजा कारण शिवसेनेच्या राजकारणच आर्थिक स्त्रोत मुंबई आहे हे उघड आहे
मग खुशाल शिवसेना मुंबई आमची म्हणून बोंब मारू देत , आर्थिकदृष्ट्या महत्व कमी झालेलं आणि पायाभूत सुविधांवर पडणारा जास्तीचा ताण सहन करताना मरायला टेकलेल हे शहर शिवसेनेच्या ताब्यात असण म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखं आहे.
एकदा आर्थिक नाड्या आवळल्या कि शिवसेना खच्ची करण अजून सोप होईल
तेव्हा मुंबई गुजरातमध्ये जाणार म्हणून आवई उठवण्यात काही अर्थ नाही आणि शहा मोदींना त्यात रसही नाही
मराठी माणसाचा विरोध पत्करून हा उद्योग करण्यापेक्षा गुजरातमध्ये प्रतीमुंबई उभी करून आर्थिक राजधानी म्हणून अहमदाबाद किंवा एखाद नाव शहर पुढे आणायला त्यांना जास्त सोप जाईल
मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे .
श्रेय- आनन्द शितोळे (फेबु वरुन साभार) एक वेगळा मुद्दा. आप आपलि मत ताडुन बघा
बावरा मन , यावर वेगळा धागा
बावरा मन ,
यावर वेगळा धागा काढलात तरी चालेल.
मोदी सरकार बाबत हि शंका माझ्यासारख्या सामान्याच्या मनातही येऊन गेलीय या आधी ..
मुद्दा पटतोय तुर्तास, इतरांची मते जाणून घेण्यात मलाही रस आहे.
ती पंचतंत्रातली गोष्ट आहे.
ती पंचतंत्रातली गोष्ट आहे. एक बेडुक इतर बेडकाना खायला साप आनतो.
साप के दिन आ गये !
मुंबईतला पैसा खरच मराठी
मुंबईतला पैसा खरच मराठी माणसाचा आहे का?
किती मराठी माणसं टॅक्स भरतात?
मुंबई हे जागतीक पातळीवर नावाजलेले व्यापारी शहर आहे. मला त्या मराठी व्यापारांची नावे ऐकायला आवडतील ज्यांच्यामुले मुंबईचे नाव जगात गेले. गुज्जू व्यापा-यांची नावे मात्र कोणीही सांगु शकेल.
यावरुनच स्पष्ट होते की उद्धव ठाकरे गुज्जू व्यापा-यांच्या जिवावर मर्सिडीज मधून फिरतोय!
राकॉ भाजप युती होऊ शकेल का?
राकॉ भाजप युती होऊ शकेल का?
>>साती | 19 September, 2014 -
>>साती | 19 September, 2014 - 04:49
भविष्य लिहून ठेवा.
सेना भाजपा युती तुटली तर सेनेचा कचरा होणार.
भाजपा उगाच जास्त जागा मिळवणार.
स्पस्ष्टं बहुमत कुणाला मिळणार नाही.
१६व्या वर्षीपण उगाच राकॉ-कॉ च सरकार येईल.
कठिण आहे. <<
नोटेड...
राज, नोटवा. पण मुळात युती
राज, नोटवा.
पण मुळात युती तुटणार नाही अशी आज संध्याकाळपासून खात्री व्हायला लागलीय.
तसं झाल्यास मात्रं युतीच येणार.
भाजपाला शिवसेनेहून जास्तं जागा मिळणार.
ऊठा ची गोची होणार.
नाटके आम्ही बसवतो भुलवण्या
नाटके आम्ही बसवतो भुलवण्या जनतेस ह्या
आदाब ! अन युतीला पाळतो मग
आदाब !
अन युतीला पाळतो मग रडवण्या जनतेस ह्या
निवडुनी आलो आम्ही रे राज्य
निवडुनी आलो आम्ही रे राज्य आता आमचे
लांडगे झाले उताविळ भक्षण्या जनतेस ह्या
छान आहे, फक्त 'झाले' ऐवजी
छान आहे, फक्त 'झाले' ऐवजी 'होते' असे केले तर टेक्निकली करेक्टही होईल
(शेर नव्हे, आशय! शेर करेक्ट करण्यासाठी 'आम्ही'चे 'अम्ही' करावे लागेल)
बरोबर .
बरोबर
.
यावरुनच स्पष्ट होते की उद्धव
यावरुनच स्पष्ट होते की उद्धव ठाकरे गुज्जू व्यापा-यांच्या जिवावर मर्सिडीज मधून फिरतोय!
>>>>>>>>>
कृपय एकेरी उल्लेख नको.
असो, यावर असाही एक प्रश्न विचारता येईल, उद्धव ठाकरे यांच्या जागी कोणी गुजराती माणूस का नाही? म्हणजे हे गुज्जू व्यापारी उद्धव ठाकरे यांना का मर्सिडीजमधून फिरवतात? एखाद्या गुजराती नेत्याला का नाही?
गुजराती नेत्यालाही फिरवत
गुजराती नेत्यालाही फिरवत असतील की दुसर्या मर्सिडिजमधून? त्यांना (गुजराती व्यापार्यांना) एकच मर्सिडिज परवडते असे वाटले की काय?
(No subject)
असतील की ?? नक्की ठाऊक नाही
असतील की ??
नक्की ठाऊक नाही का ??
आणि तरीही उद्धवजींना का फिरवतात हा मूळ प्रश्न राहिलाच ..
दुसरे असे की महाराष्ट्राचे
दुसरे असे की महाराष्ट्राचे विभाजन करुन विदर्भ हे राज्य निर्माण करायचे हा भाजपाचा खुला अजेंडा आहे. राज्य फोडणार्यांना मते कशासाठी द्यायची??
हो . खुला आणि सगळ्यात वरचा . आम्हाला नाही वाटत महाराष्ट्राचे तुकडे पडावेत म्हणून . अखंड महाराष्ट्रासाठी १०५ जनांनी बलिदान केलंय. ह्या एका मुद्या साठी भाजप ला मत नाही द्यावस वाटत
अखंड महाराष्ट्रासाठी १०५
अखंड महाराष्ट्रासाठी १०५ जनांनी बलिदान केलंय.>> अन त्या बलिदानाच्या नावाखाली हजारो लोकं होरपळून मेली व मरत आहेत त्याचं काय? १०५ चं गुणगाण गात नवे मुडदे पडू देत राहायचे की दोन छोट्या राज्यात विभागनी करुन मराठी जनतेचा विकास साधायचा?
युती तुटलीच पाहिजे. म्हणजे भाजपला किमान विकास तरी साधता येईल.
Pages