मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - खाद्ययात्रा "

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:41

गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!

हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...

हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -

modak2.JPG
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्स्टंट फोटो करता टोमॅटो प्युरी पेस्ट पण चालेल.. किंवा टोमॅटो चिरुन वरती चाट मसाला.. टोमॅटो चाट...

आरती, टाकते नक्की. पण ह्या अक्षरांचे नाहीत सध्या. आता जुन्या फोटोंमधे शोधावे लागणार.

मी ड ची वाट बघतेय. Happy

जिप्सी,. ते बेळगाववाल्यांचा आलेपाक आहे. मस्त लागतो. उसाचा रस सोबत असल्याच अजूनच मस्त. Happy

परत "ल" अक्षर आणून दिल्याबद्दल आभार.

Biggrin
आता माझ्याकडाचे फोटो आहेत त्याची अक्षर यीनात. आली तर मी जागेवर नसते. घ्या चालवून .
आमच्यात लहान मुलांसाठी असेच बनवतात. Wink

प्राची, तुझ्याकडे ल वरून काही होत ना???
आता पुढे कंटिन्यु करा.
जिप्सी गोळेवाल्याकडे जाऊन लिंबू सरबाताचा फोटो काढून आण आणि आज रात्री घरी लेमन राईस बनवायला सांगा. Happy

इकडे जेवढे जण आहेत ते सगळे आपल ऑफिस आणि घर सांभाळून फोटो देत आहेत तेव्हा मध्येच फोटो टाकताना त्यांचा विचार करा.
मूड जात आहे ह्या धाग्याचा. Sad

Pages