Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<आपने सत्ता स्थापन करताना
<<आपने सत्ता स्थापन करताना कॉन्ग्रेसचा आधार घेतला होता ते कसे काय चालले तुम्हाला ?
तुमच्या या इल्मींच्या लॉजिकप्रमाणे पुर्ण आपच कटाप व्हायला पाहिजे होता तुमच्यासाठी>>
भ्यॅ....पुन्हा तेच
महेश,
आपने सोनिया गांधी आणि राजनाथ सिंगांना लिहिलेली पत्रं टाकली होती मी मागच्या पानांवर.
I am surprised that both BJP and Congress want to give us unconditional support? What is their motive," Arvind Kejriwal asked.
Letter to Sonia Gandhi:
Date: 14/12/2013
Smt Sonia Gandhi ji,
President, Congress Party
New Delhi
Dear Sonia Gandhi ji
The Congress has offered its unconditional support to the Aam Aadmi Party without our asking them to do so. The Aam Aadmi Party came into existence to oppose criminal, corrupt and communal politics of the Congress and BJP.
When the whole country was in pain due to corruption, the people came together and decided to form their own party and raise their voice. So how can the Aam Aadmi Party join hands with the Congress and BJP?
As your party has decided to extend its support to our party, the people want to know the intentions behind your move.
There are some burning issues related to the people of Delhi because of which they are facing huge difficulties. The 15-year rule of Congress has instead complicated these problems.
The BJP in its seven years rule has looted the municipal corporation. So if you want to support the Aam Aadmi Party then what would be your stand on these issues?
Today, the politics has become a tool of gaining power in the country. Every party wants to gain power by any means and nobody has anything to do with the people's problems. We haven't come to politics to gain power.
I hope that your party will make your stand clear on the issues I am raising with his letter. Since transparency and veracity are the fundamental principles of our party, I am putting this letter in front of the common man. Let's see what they want the Aam Aadmi Party to do.
Please clear your stand as we don't want ambiguous statements like " Congress and AAP are together in principle" or "we will clear our stand only when these issues are raised in the Delhi legislature".
It's very sad that the Congress is playing politics on the issues concerning the people of Delhi. On one hand, the BJP says its offer to support the AAP is in favour of Delhi citizens, on the other hand the party accuses us of making a secret deal with the Congress to form government.
Waiting for your early reply,
Arvind Kejriwal
वि.सू. आवडली. धन्यवाद
काँग्रेसचा पाठिंबा घेताना
काँग्रेसचा पाठिंबा घेताना त्यांना काही मंत्रीपदं दिली असती, पाठिंबा द्यावा म्हणून काही आणखी आमिषं दाखवली असती तर आप कटाप झालं असतं.
आपने स्पष्ट सांगितलं होतं की "आम्ही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पण कारवाई करणार. तुम्हाला चालणार आहे का?"
आणि कुठलंही मंत्रीपद दिलं नव्हतं.
>>अण्णा, किरण बेदी,
>>अण्णा, किरण बेदी, रामदेवबाबा, व्हीकेसिंग वगैरेंना जसं फक्त काँग्रेसमधील भ्रष्टाचारावर आक्षेप आहे, भाजपातील भ्रष्टाचार चालतोय त्यातलाच प्रकार होईल ना तो?
हा विषय अन्य ठिकाणी पण आधी खुप चर्चा करून झालेला आहे. भाजप अगदी १००% चांगला पक्ष आहे असे मलाही वाटत नाही, पण कॉन्ग्रेसपेक्षा खुप चांगला नक्कीच आहे.
तुमचा (म्हणजे आपचा) जो दावा आहे, (१००% भ्रष्टाचारमुक्त पक्ष, जनता, लोकशाही) तो प्रत्यक्षात येणे अशक्य आहे. आणि त्यासाठी सर्वसामान्य लोकांनी आधी स्वतः चांगले वागले पाहिजे.
>>रच्याकने, अण्णा सध्या कुठे आहेत कोणाला काही कल्पना? लोकांची फसवणूक करून भूमिगत? जाऊ द्या, त्यांचा राग येण्यापेक्षा वाईट जास्त वाटतं. आयुष्यभराची क्रेडिबिलिटी घालवली नको त्या लोकांच्या नादाला लागून.
तुमच्या या वाक्याचे वाईटही वाटते आणि रागही येतो आहे.
लोकांची फसवणूक करून भूमिगत?
नको त्या लोकांच्या नादाला म्हणजे नंतर ज्यांनी राजकीय पक्ष काढला तेच ना ?
अण्णांच्या विरोधात असली विधाने म्हणजे
ज्या व्यक्तीमुळे आंदोलन जास्त यशस्वी झाले, आणि नंतर सत्तेत येण्यापर्यंतचा फायदा मिळाला त्याच गुरूतुल्य व्यक्तीला नावे ठेवणे म्हणजे
लाज वाटली पाहिजे आपला असे म्हणताना.
अरे बाप्रे, महेश एवढे का
अरे बाप्रे, महेश एवढे का चिडले?
(मागच्या पानावरची वि.सू. मागे घेतील बहुतेक ते आता)
<<हा विषय अन्य ठिकाणी पण आधी खुप चर्चा करून झालेला आहे. भाजप अगदी १००% चांगला पक्ष आहे असे मलाही वाटत नाही, पण कॉन्ग्रेसपेक्षा खुप चांगला नक्कीच आहे.>>
अधिक स्पष्ट करून सांगाल का हा मुद्दा?
भाजपाने सत्तेत आल्यापासून अशी कुठली लोकांच्या हिताची पावले उचलली जी काँग्रेस नाकारत होतं?
<<तुमचा (म्हणजे आपचा) जो दावा आहे, (१००% भ्रष्टाचारमुक्त पक्ष, जनता, लोकशाही) तो प्रत्यक्षात येणे अशक्य आहे. आणि त्यासाठी सर्वसामान्य लोकांनी आधी स्वतः चांगले वागले पाहिजे.>>
१००% चा दावा कुठे ऐकलेला नाही. लिंक द्याल का?
ठळक केलेल्या वाक्याशी असहमत. ह्यावर सविस्तर लिहून झालंय आधी.
<<तुमच्या या वाक्याचे वाईटही वाटते आणि रागही येतो आहे.
लोकांची फसवणूक करून भूमिगत? राग राग राग
नको त्या लोकांच्या नादाला म्हणजे नंतर ज्यांनी राजकीय पक्ष काढला तेच ना ? डोळा मारा
अण्णांच्या विरोधात असली विधाने म्हणजे अरेरे
ज्या व्यक्तीमुळे आंदोलन जास्त यशस्वी झाले, आणि नंतर सत्तेत येण्यापर्यंतचा फायदा मिळाला त्याच गुरूतुल्य व्यक्तीला नावे ठेवणे म्हणजे अरेरे>>
आंदोलन यशस्वी झाले????? नक्की?
नेमकं कशासाठी आंदोलन होतं ? काँग्रेसची सत्ता पाडवण्यासाठी? की भ्रष्टाचारी, गुन्हेगार लोकप्रतिनिधी ह्यांच्याविरोधात पावलं उचलून लोकांचं भलं करण्यासाठी?
पहिला हेतू असेल तर आंदोलन यशस्वी झालं म्हणता येईल. पण त्याने आपल्याला, लोकांना काय फायदा झाला?? कोल्हे गेले आणि लांडगे आले ! सशांची फसवणूक चालूच....
दुसरा हेतू असेल तर आंदोलन सपशेल अयशस्वी झालंय. आणि ह्याला काहीप्रमाणात कारण वर उल्लेख केलेले महान जीव.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खासदार २००४ मध्ये २४% होते, २००९ मध्ये ३०% झाले आणि २०१४ मध्ये ३४% झालेत ! १० वर्षांत १०% वाढ....आणि तुम्ही म्हणताय आंदोलन यशस्वी झालं?
BJP is leading the chart with as many as 98 winning candidates (35%) out of total 282, are facing criminal charges.
क्रिमिनल चार्जेस कशाला म्हणायचं ह्यासाठी ADR ची वेबसाइट पाहून घ्या. कारण केजरीवालांवरही क्रिमिनल चार्जेस आहेत, पण ते १४४ कलम मोडल्याचे, आंदोलन केल्याचे असले आहेत....
हेही वाचून घ्या. Thieves, Conmen, Kidnappers, Rapists And Killers: Welcome To The Parliament Of India!
झंडा ऊंचा रहें हमारा....
<<लाज वाटली पाहिजे आपला असे म्हणताना.>>
मी म्हणजे आप नव्हे. हे आधीही अनेकदा सांगून झालंय. माझ्या आपच्या कुठल्याही अधिकारी व्यक्तीशी दुरूनही संपर्क नाही. आणि आपच्या अधिकृत लोकांनी कधीही अण्णांना नावं ठेवलेली नाहीत.
मी केजरीवाल नाही. मी विपश्यना करत नाही. अण्णा माझे गुरू नाहीत. त्यामुळे अण्णांचं चुकलं हे सांगताना मला लाज वाटायची गरज नाही. इनफॅक्ट कुणाचंही चुकलं असेल तर चुकलं म्हणताना लाज का वाटावी?
रच्याकने, शेवटच्या वाक्याची अजिबातच गरज नव्हती.
<<नको त्या लोकांच्या नादाला
<<नको त्या लोकांच्या नादाला म्हणजे नंतर ज्यांनी राजकीय पक्ष काढला तेच ना ? >>
यु सेड इट. राजकीय पक्ष काढणं हेच एक महापाप वाटतं आपल्याला. कारण राजकीय पक्ष लूटमार करण्यासाठीच असतात हे आता मुरलंय आपल्या मनात.
केजरीवालांचा राजकारणात शिरायचा उद्देश नसताना त्यांनी पक्ष का काढला ह्याच्याशी मी छान कोरिलेट करू शकते. मिर्ची नावाने लिहायला सुरूवात केली ते मोदींच्या खोट्या दाव्यांचे फुगे फोडण्यासाठी. ते राहिलं लांबच. धागाच गुडुप झाला/केला/करवला गेला. पण तिथे इतक्या वेळा केजरीवाल आणि आप यायला लागलं की ते प्रश्न अनुत्तरित राहू नयेत म्हणून हा धागा काढला.
नाहीतर वरदा म्हणाल्या होत्या तसं कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उचलायला मी एवढा कीबोर्ड बडवत बसेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं
बर ठीक आहे तुम्ही म्हणता तस
बर ठीक आहे तुम्ही म्हणता तस तर तस,
अण्णा अतिशय अयशस्वी, अयोग्य आहेत, त्यांचे आत्तापर्यंतचे कार्य काहीच उपयोगाचे नव्हते.
त्यांनी उपोषण केले ते ढोंग होते. त्यांनी सक्रिय राजकारण करू नका असे सांगितले असेल तर असला सल्ला म्हणजे अगदीच हास्यास्पद होता. त्यांना राजकारणातले काही कळत नाही, जाने कहाँ कहाँ से आते हैं ?
उलट केजरीवाल आणि आपवाले लोक म्हणजे फार हुशार, त्यांचा मार्ग हाच काय तो भारी. कोण अण्णा आणि काय ?
अण्णा आणि त्यांच्या बरोबरचे लोक फारच विचित्र विचारांचे आहेत. इ. इ. ___/\___
वि.सू. : मी एवढ्या रागाने कधी लिहित नाही खरेतर, पण अण्णा हजारे आणि आप याबाबत माझी मते टोकाची आहेत हे स्पष्ट सांगतो. अण्णांसारख्या माणसाचा निव्वळ वापर करून घेतला, आणि केवळ एवढेच नाही तर आता जर केजरीवाल आणि कंपू अण्णांच्या विरोधात असे काही बोलत असेल कुठे आहेत, अमुक तमुक तर ही म्हणजे हाईटच आहे.
असो, वैयक्तिक तुमच्याबद्दल राग नाही. शेवटचे वाक्य पक्षाला उद्देशून आहे.
अण्णांचे चुकले आहेच, खुप चुकले, त्यांना ही माणसे ओळखता आली नाहीत आधीच.
ओळखली तोपर्यंत उशीर झाला होता.
तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर
तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर "तुम्ही अण्णाप्रेमाने आंधळे झाले आहात" असं म्हणायला वाव आहे. आमेन
(मलाही लोक आप/केजरीवाल प्रेमाने आंधळी म्हणत असतील ह्याची जाणीव आहे :डोमा:)
मुद्द्यांवर बोलूया लोक्स, माणसांवर नको.
मिर्ची ताई, अण्णा हजारेंचे
मिर्ची ताई,
अण्णा हजारेंचे आंदोलन झाले नसते तर आज केजरीवाल कुठे असते?
केजरीवाल यांना सगळा देश ओळखू लागला ते अण्णांच्या आंदोलनामुळे. अन्यथा २००६ साली नोकरी सोडल्या पासून cause research faundation साठी काम करताना Magsaysay पुरस्कार मिळूनही कितीजणाना केजरीवाल माहित होते?
आम आदमी पार्टीला दिल्लीत मिळालेल्या राजकीय यशात अण्णांची पुण्याई होती. परंतु दैव देतं आणि कर्म नेतं!
>>तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर
>>तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर "तुम्ही अण्णाप्रेमाने आंधळे झाले आहात" असं म्हणायला वाव आहे. आमेन स्मित
वाव नाही वॉव. याबाबतीत तरी नक्कीच तसे आहे माझे. नो डाऊट.
अण्णांच्या प्रतिमेचा (धोतर, टोपी, इ.) तसेच त्यांच्या अविवाहीत जीवन, आधीचे कार्य आणि उपोषण या सगळ्यांचा फायदा जंतरमंतर आंदोलनाला फार म्हणजे फारच मोठ्या प्रमाणावर झाला.
आधी टोप्या आल्या होत्या, मैं अण्णा हूँ ! हे काय होते ? की ही आयडिया स्वतः अण्णांनी सांगितली होती ?
१००० मस्त... शेवटी सहस्त्र
१००० मस्त...
शेवटी सहस्त्र प्रतिसादापर्यंत पोहचला धागा
१००१ अजून धागा वाहून गेला
१००१ अजून धागा वाहून गेला नाही ह्यासाठी अॅडमिनचे आभार.
<<अण्णा हजारेंचे आंदोलन झाले नसते तर आज केजरीवाल कुठे असते?>>
कदाचित सुंदरनगरीत.
"सुंदरनगरी की गलियों में, पैसा कितना आया" असं डफावर थाप मारत त्यांचे साथीदार गात असते आणि केजरीवाल त्यांचं रेवेन्यू सर्विसमधलं ज्ञान आणि अनुभव वापरून लोकांना कागद हातात धरून समजावत असले असते की सुंदरनगरीतील रस्ते दुरुस्त करायला, खड्डे बुजवायला किती जाळ्यांचे पैसे लावलेत आणि प्रत्यक्षात किती जाळ्या बसवल्या गेल्यात.
हे असं - Arvind Kejriwal (2002) Parivartan Sundar Nagri Delhi (Swaraj)
त्यांना अजून ढीगभर पुरस्कार मिळाले असते, जीवनगौरव, समाजरत्न, अमकं-तमकं.... मोदी म्हणाले होते तसं "We must support Anna & Arvind Kejriwal in their great work" असं बाकीचे नेतेही वेळोवेळी (खास करून निवडणूकीच्या आधी) म्हणत राहिले असते.
केजरीवालांनी १२ वर्षे बाहेर राहून आवाज उठवला तेव्हा कुण्णालाच काहीच प्रॉब्लेम नव्हता, असे लोक पाहिजेच असतात ना समाजात, समाजासाठी झटणारे, त्यातच मरून जाणारे....
पण ह्यात काही अर्थ नाही, 'अब किले में ही घुसना पडेगा' असं म्हणत केजरीवाल राजकारणात आले आणि केवढा अनर्थ घडला....आकाश कोसळलं. अचानक सगळेच्या सगळे त्यांच्या विरोधात झाले, कधी काँग्रेसची बी-टीम, कधी भाजपाची बी-टीम, कधी पाकिस्तानी एजण्ट, कधी सीआयए एजण्ट
असो.
<<आम आदमी पार्टीला दिल्लीत मिळालेल्या राजकीय यशात अण्णांची पुण्याई होती. परंतु दैव देतं आणि कर्म नेतं!>>
कोणाचं काय नेलं कर्माने? आपचं? अहो, दिल्लीकरांची "मोदी फॉर पीएम आणि अरविंद फॉर सीएम" ही खेळी त्यांच्याच अंगलट आलीये.
https://pbs.twimg.com/media/BsgTOZ2CIAAsKQr.jpg
भारी चित्र आहे ते. एकदम बोलकं.
<<अण्णांच्या प्रतिमेचा (धोतर, टोपी, इ.) तसेच त्यांच्या अविवाहीत जीवन, आधीचे कार्य आणि उपोषण या सगळ्यांचा फायदा जंतरमंतर आंदोलनाला फार म्हणजे फारच मोठ्या प्रमाणावर झाला.
आधी टोप्या आल्या होत्या, मैं अण्णा हूँ ! हे काय होते ? की ही आयडिया स्वतः अण्णांनी सांगितली होती ?>>
खरंय. काँग्रेसला पाडवायचा उद्देशसाध्य करण्यात फारच फायदा झाला. पण आपल्याला शून्य.
टोप्यांवरचं अण्णांचं नाव नंतर काढून टाकलं. अण्णा अगदीच बालिशपणे वागले त्या सगळ्या टोपी, नाव प्रकारात. (महेश भडकणार पुन्हा)
>>खरंय. काँग्रेसला पाडवायचा
>>खरंय. काँग्रेसला पाडवायचा उद्देशसाध्य करण्यात फारच फायदा झाला. पण आपल्याला शून्य.
टोप्यांवरचं अण्णांचं नाव नंतर काढून टाकलं. अण्णा अगदीच बालिशपणे वागले त्या सगळ्या टोपी, नाव प्रकारात. (महेश भडकणार पुन्हा)
काय बोलताय ? तुमचे तुम्हाला तरी कळतय का ?
कॉन्ग्रेसला पाडायचा फायदा कोणाचा होता ? अण्णांचा की आपचा ?
टोप्यांवरती आधी अण्णांचे नाव आणि नंतर आम आदमीचे कोणी काढले कोणी आणले ? अण्णांनी की आपने ?
<<काय बोलताय ? तुमचे तुम्हाला
<<काय बोलताय ? तुमचे तुम्हाला तरी कळतय का ?
कॉन्ग्रेसला पाडायचा फायदा कोणाचा होता ? अण्णांचा की आपचा ?
टोप्यांवरती आधी अण्णांचे नाव आणि नंतर आम आदमीचे कोणी काढले कोणी आणले ? अण्णांनी की आपने ?>>
भाजपा निवडून आल्यावर आप सुद्धा अण्णांसारखंच गप्प बसलं असतं तर काँग्रेसला पाडवण्यात आपचा फायदा होता असं मी म्हटलं असतं. पण ते अजून लढत आहेत...ज्या कारणासाठी आंदोलन सुरू झालं त्याच कारणासाठी.
भाजपा सत्तेत आल्यापासून अण्णा मात्र गायब आहेत. त्यामुळे काँग्रेसला पाडवून भाजपाला सत्ता मिळवून देणं हाच अण्णांचा उद्देश होता, त्यातच त्यांचा फायदा होता असं म्हणायला वाव आहे. नाहीये का?
टोप्या आधी "मैं अण्णा हूं" अशाच होत्या की. त्याच आपने वापरल्या असतील सुरूवातीला. पण अण्णांनी सांगितलं, माझं नाव, फोटो वापरायचं नाही. मग आपने सगळ्या टोप्या पेटीत बंद करून "मैं आम आदमी हूं" अशा टोप्या छापल्या असाव्यात.
>>भाजपा सत्तेत आल्यापासून
>>भाजपा सत्तेत आल्यापासून अण्णा मात्र गायब आहेत. त्यामुळे काँग्रेसला पाडवून भाजपाला सत्ता मिळवून देणं हाच अण्णांचा उद्देश होता, त्यातच त्यांचा फायदा होता असं म्हणायला वाव आहे. नाहीये का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/37939?page=1
मजेदार प्रतिक्रिया आहे
Mahesh, Any discussion here
Mahesh, Any discussion here is waste of time. I hope now you understood that.
उदयन, तुम्ही ती लिन्क जर
उदयन, तुम्ही ती लिन्क जर माझ्या प्रतिसादांकरीता दिलेली असेल तर मला पुन्हा एकदा सांगू दे,
दिल्ली निवडणुकांमधे आपला जेव्हा जास्त जागा मिळाल्या होत्या तेव्हा निर्विवाद बहुमत मिळून आपने सत्तेवर यावे असे मला वाटत होतेच.
नंतर जेव्हा सत्ता सोडून गेले, तेव्हा तसे जायला नको होते असेही वाटत होते.
आता जेव्हा पुन्हा निवडणुका होऊ घातल्या आहेत तेव्हादेखील जर आपला बहुमत मिळाले आणि ते सत्तेत आले तरी ते ठीक आहे असे मला वाटत आहे.
आधी मला खुप खात्री वाटत होती, आता कमी वाटते किंवा काही कारणांनी संशय घेण्यास जागा आहे असे वाटते.
तरीदेखील न्याय मार्गांनी निवडणुक लढवून जर ते सत्तेत येत असतील तर त्याला माझाच काय कोणाचाही विरोध किंवा राग असण्याचे कारण नाही.
विचारांना विरोध करणे आणि व्यक्तीला यामधे फरक असतो, हे ज्या दिवशी अनेकांना कळेल तो भारताचाच नव्हे तर जगाचा सुदिन असेल.
मी ती लिंक का दिली. कारण
मी ती लिंक का दिली. कारण परिस्थिती प्रमाणे प्रतिक्रिया कशा बदलतात यावर लक्ष वेधले.....
यावर इतर परिस्थिती बघितल्यावर काही महिन्यांनी काय असेल याचा अंदाज घेता येतो ...
म्हणुनच कुणाच्याही मागे तत्कालिन परिस्थिती काय आहे हे बघुन मागे जाण्यापेक्षा भविष्याचा थोडाफार अंदाज लावुन मगच किती कुणाच्या मागे जायचे आहे ते ठरवावे...
आणि हे सगळ्यांसाठीच आहे ज्यात माझा सुध्दा समावेश होतो ...
असो ..
"हम ना बदले थे नही बदलेंगे
हम तो वो है जो हवा का भी रुख बदल देते है"
मिर्ची ताई जेंव्हा केज़रीवाल
मिर्ची ताई
जेंव्हा केज़रीवाल याना लोकपाल विधेयक विधानसभेत पास करुन घ्यायचे होते आणि ते तसे करता आले नाही .या साठी बर्याच लो.कांचा असा समज आहे की राज्य घटना हाच मोठा अडसर आहे कोणताही कायदा कसाही कुठेही पास करता आला पाहीजे.
म्हणुनच इन्कीलाब या घोषणेची भीतिच वाटते आणि अराजक हा श्ब्द प्रयोग अनाठाई वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा युफोरीया झाला की तो आवरणे कठीण होवुन बसते.
लोकांमधे प्रचंड चीड आहे भ्रष्टाचारा बद्द्ल हे समजण्या सारखे आहे आणि जरी जन लोकपाल पास झाले तरी एक दिवसात तो संपणार आहे का? लोकांना वाटते एकदा का कायदा झाला की सग़ळ्या भ्रष्ट लोकांना गजा आड करता येईल आणि सगळेप्रश्नच सुटतिल.
जशी लोकांची अछ्चे दिन ची अपेक्षा आहे तशीच ही पण अपेक्षा आहे.
एकदा का लोकपाल पास झाले की एका रात्रित राम रज्य येणार आहे. लोकपाल पास झले की किमती खाली येणार आहेत , महागाई कमी होणार आहे, लोकाना रोजगार उपलब्ध होणार आहे. इ.इ. हे फ़क्त एका लोकपाल कायद्या मुळे अडलेले आहे.
४९ दिवसां मधे दिल्ली मधला भ्रष्टाचार संपला का? (सॉरी परत तेच ;जनलोकपाल पास करु दील नाही ना.)
लालूप्रसाद आपमध्ये येऊच शकत
लालूप्रसाद आपमध्ये येऊच शकत नाहीत कारण ते आपच्या चाळणीतून पहिल्याच फेरीत बाद होतील !>>>
मिर्ची ताई - दमानिया बाई ह्या चाळणित कशा बाद झाल्या नाहीत? आपची चाळणी पण कॉ/भाजप सारखी मोठ्या भोकांची आहे का?
आणि ते भुषण पितापुत्र कसे सुटले ह्या चाळणीतुन?
मोहल्ला सभाबद्दल अश्विनींनी
मोहल्ला सभाबद्दल अश्विनींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करते.
वि.सू. - मी एकही मोहल्ला सभा स्वतः अटेन्ड केलेली नाही. लोकांनी आणि आपने युट्यूबवर टाकलेले व्हिडिओज पाहिले आहेत. लेख वाचले आहेत. त्यामुळे ऑथेण्टिसिटीची खात्री देता येणार नाही.
मला मोहल्ला सभा हा कन्सेप्ट आवडलाय. त्याने भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल, सरकारी कर्मचार्यांवर लोकांचा अंकुश राहू शकेल आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कामं करायला लागतील असं सध्यातरी मनापासून वाटतंय. म्हणून माहिती करून घेतेय आणि इथे शेअर करतेय. आणखी कळेल तसतसं अपडेट करत जाईन.
१. मोहल्ला सभा वॉर्डवाईज असणार का? -
--प्रत्येक म्युनिसिपल वॉर्डचे १० विभाग केले जातात. प्रत्येक विभाग म्हणजे एक 'मोहल्ला'. एका वॉर्डमध्ये साधारण ४०,००० मतदार असतात. त्यामुळे एका मोहल्ल्यात सुमारे ४००० मतदार म्हणजे साधारण १५०० कुटुंबे. प्रत्येक मतदार त्याच्या विभागातील मोहल्ला सभाचा मेंबर असणार.
२. साधारण किती काळानंतर त्याच ठिकाणी परत मोहल्ला सभा होणार?
--- दर दोन महिन्यांनी मोहल्ला सभा घेतली जाणार.
३. मोहल्ला सभा कोण कंडक्ट करणार?
--- त्या त्या भागातील नगरसेवक सभेचं ठिकाण, तारीख, वेळ असे तपशील असलेलं पत्र मोहल्ला सभेच्या आधी प्रत्येक घरी पाठवतात.
नगरसेवक ह्या सभेचा अध्यक्ष असणार. बाहेरील लोक सभेला उपस्थित राहू शकतात पण केवळ दर्शक म्हणून. फक्त त्या मोहल्ल्यातील अधिकृत मतदारच सभेमध्ये थेट सहभाग घेऊ शकतात.
४. एका वॉर्डमध्ये अमिर-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित असे सर्व सामाजिक थरातील लोक असू शकतात आणि प्रत्येकाचे प्रश्न त्यांच्या त्यांच्या परीने महत्वाचे असू शकतात. प्रश्न सोडवण्यासाठी नक्की काय क्रायटेरिया असेल?
--- मोहल्ला सभेत वैयक्तिक प्रश्न नाही तर मोहल्ल्याचे प्रश्न सोडवले जाणार. उदा.- रस्ता. गरीब असो की श्रीमंत. एकच रस्ता सगळे वापरतात. तो चांगला असावा, खड्डे नसावेत हे दोघांनाही वाटणारच.
तुम्हाला स्पेसिफिक काही उदाहरण विचारायचं असेल तर लिहाल का?
५. मोहल्ला सभेतून सर्व निधी योग्य ठिकाणी वापरला जाण्याची खात्री आहे का की जो मोहल्ला सभेला हजर असेल किंवा अॅग्रेसिव्ह असेल (फक्त त्याचेच प्रश्न ठसवले गेले जाण्याची शक्यता आहे) त्याच्याचसाठी तो निधी जायची शक्यता आहे का? असे झाले तर जे अॅग्रेसिव्ह नसतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही का?
--- अनेकांच्या अनेक मागण्या असतात. त्या सगळ्यांची नोंद एक व्यक्ती घेत असते. सगळ्यांच्या सगळ्या मागण्या उपलब्ध निधीत पूर्ण होत असतील तर सगळ्या केल्या जाणार. निधी कमी पडत असेल तर ह्यातील कुठल्या मागण्या आधी पूर्ण करायच्या ह्यावर मतदान करून बहुमताचा निर्णय अमलात आणला जाणार.
६. वीज, पाणी, रस्ते, शाळा, दवाखाने ह्या गोष्टी एकदा पुरवल्या की लोकसंख्या वाढल्यासच विस्ताराव्या लागतील. मग मोहल्ला सभांमध्ये काय चर्चा केल्या जातील?
--- इन्फ्रास्ट्रक्चर पुर्ण झालं तर नंतर त्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा होऊ शकतात. उदा.- दवाखाना. तिथल्या दवाखान्यातील डोक्टर्स, नर्सेस किंवा कोणीही कर्मचारी उपस्थित नसतिल तर रहिवासी तसं सांगू शकतात. शाळांमध्ये शिक्षक उपस्थितच राहत नसतील तर ही गोष्ट सांगू शकतात. संबंधितांवर कारवाई रहिवासी करणार नाहीत. पण उपस्थित सरकारी अधिकार्यांवर तसं करण्यासाठी दबाव तर आणू शकतात.
आणि सगळेच प्रश्न मिटून आनंदीआनंद झाला तर स्नेहसंमेलन करून सभा बरखास्त करू शकतात (असे दिवस यायला किती वर्षे लागतील कोण जाणे!)
७. देशातील बर्याच ठिकाणी मोहल्ला सभांशिवाय देखिल लोकांना सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, मग तिथे मोहल्ला सभांसाठी कोणता असा पर्याय असतो?
--- सुविधा दिल्या जातात त्या १ रूपयातील चार आणे इतक्या सुद्धा नसाव्यात. नाहीतर सरकारी शाळा, दवाखाने ह्यांची दुरवस्था झाली नसती आणि भरमसाठ फिया,डोनेशन्स असूनही मोलकरणी/मजूर ह्यांनी खाजगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश घ्यायला आटापिटा केला नसता.
मोहल्ला सभेबद्दल एकत्रि
मोहल्ला सभेबद्दल एकत्रि स्वरूपात, संक्षिप्त माहिती -
हेही वाचा -
१. Detailed Guidelines on how to conduct mohalla sabhas
त्यामध्ये आत्तापर्यंतच्या (ते लिहिलंय तोपर्यंतच्या) मोहल्ला सभांच्या अनुभवांबद्दलही लिहिलेलं दिसलं. त्यात आपल्यासारख्यांच्या मनातिल बर्याच शंकांची उत्तरे दिसतात. म्हणजे विशेष अनुदानं घ्यायला लोक भांडणार नाहीत का इत्यादि.
२. Mohalla Politics and The AAP दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेवमध्ये झालेल्या एका मोहल्ला सभेत उपस्थित असलेल्या एका रहिवाशाने लिहिलेलं एक आर्टिकल वाचण्यात आलं.
तो आपचा समर्थक असेल वगैरे शक्यता गृहित धरली तरी वाचून पहायला हरकत नाही.
३. मोहल्ला सभा - द स्वराज लॉ ह्या नावाने एक फेसबुक पेज पाहण्यात आलं.
मोहल्ला सभा एकदा एस्टॅब्लिश झाल्या की तिथे कुणा एका राजकीय पक्षाचं काहीच काम नाही. रहिवासी आणि सरकारी अधिकारि ह्यांच्यामधील थेट संवाद एवढंच स्वरूप असायला हवं. पण सध्यातरी आप हा एकमेव पक्ष मोहल्ला सभा घेत असल्याने आप आणि त्यांच्या आमदारांची नावे येणं अपरिहार्य दिसतंय.
(दुसरे पक्ष मोहल्ला सभा घेत असल्याचं माझ्या वाचण्यात नाही. कुणाला माहीत असल्यास सांगा.)
४. मे २०१३ मध्ये दिल्लीतील खिचडीपूर येथे अरविंद केजरीवाल ह्यांनी घेतलेली मोहल्ला सभा - व्हिडिओ-३७ मिनिटे
http://www.aamaadmiparty.org/videos-mohalla-sabha
(बिन्नीभाऊ दिसतायेत त्याच्यात...)
५. आपचे आमदार सौरभ भारद्वाज ह्यांची मोहल्ला सभा. व्हिडिओ-३२ मिनिटे.
(हे महाशय तर बागेमध्येच मांडी ठोकून बसलेले दिसत आहेत. बाकी काही पण असो, आमदार अशा पद्धतीने लोकांसोबत बसू शकतो ह्येबी लई मोठ्ठंं काम असं वाटतं मला पांढर्याशुभ्र खादीच्या अंगरख्यातले, लांबूनच हात दाखवून निघून जाणारे आमदार पाहून वैताग यायचा.)
६. स्वराज अभियान - हिंदी ब्लॉग
७. लोकराज-आंदोलन - इंग्रजी
<<जेंव्हा केज़रीवाल याना
<<जेंव्हा केज़रीवाल याना लोकपाल विधेयक विधानसभेत पास करुन घ्यायचे होते आणि ते तसे करता आले नाही .या साठी बर्याच लो.कांचा असा समज आहे की राज्य घटना हाच मोठा अडसर आहे कोणताही कायदा कसाही कुठेही पास करता आला पाहीजे.>>
राज्यघटना हा अडसर नाहीये. केजरीवालांनी राज्यघटना आणि त्यातील बारकावे कोळून प्यालेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. अडसर राज्यकर्त्यांचा आहे. कारण सशक्त लोकपाल आलं तर त्यांची लूटमार बंद होणार आहे.
<<म्हणुनच इन्कीलाब या घोषणेची भीतिच वाटते आणि अराजक हा श्ब्द प्रयोग अनाठाई वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा युफोरीया झाला की तो आवरणे कठीण होवुन बसते.>>
मला आवडेल हे असलं अराजक
आप यायच्या आधीपासूनच मी सध्याच्या सिस्टीमबद्दल राग बाळगून आहे. पण हे नाही तर मग काय हे माहीत नव्हतं. आता माहीत आहे.
<<लोकांमधे प्रचंड चीड आहे भ्रष्टाचारा बद्द्ल हे समजण्या सारखे आहे आणि जरी जन लोकपाल पास झाले तरी एक दिवसात तो संपणार आहे का? लोकांना वाटते एकदा का कायदा झाला की सग़ळ्या भ्रष्ट लोकांना गजा आड करता येईल आणि सगळेप्रश्नच सुटतिल.
जशी लोकांची अछ्चे दिन ची अपेक्षा आहे तशीच ही पण अपेक्षा आहे.>>
एका दिवसांत काहीच बदलणार नाहीये. म्हणून काहीच नाही केलं तर पुढची पिढी भयानक अवस्थेत जाणार आहे. आणि आपलीही म्हातारपणं वाईट जाणार आहेत.
लोकांचं माहीत नाही. पण ६० दिवसांत अच्छे दिन ची अपेक्षा मी तरी केली नव्हती. पण अच्छे दिन येण्यासाठी एक तरी ठोस पाऊल उचललेलं दिसलंय का? रोडमॅप तरी दाखवा की अच्छे दिनांचा.
<<४९ दिवसां मधे दिल्ली मधला भ्रष्टाचार संपला का? (सॉरी परत तेच ;जनलोकपाल पास करु दील नाही ना.)>>
४९ दिवस हा कालावधी प्लस-मायनस कशासाठीच पुरेसा नाही. पण पावलं नक्कीच उचलली गेली होती. भ्रष्टाचार कमी झाला होता असं अनेक पेपरांमध्ये पण वाचलं, आजतक वर व्हिडिओसुद्धा आहे. पण मिडियाने विश्वासार्हता घालवली असल्याने किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं.
<<मिर्ची ताई - दमानिया बाई ह्या चाळणित कशा बाद झाल्या नाहीत? आपची चाळणी पण कॉ/भाजप सारखी मोठ्या भोकांची आहे का?>>
माझा असा आरोप आहे की टोचा हे विचारवंत, गानू.आजी, मी.मराठी अशा अनेक डुआयडींनी मायबोलीवर लिहितात. वेगवेगळ्या, विशेषतः राजकीय धाग्यांवर अवमानकारक, बदनामीकारक, हिणकस भाषेत लिहितात आणि धागा भरकटवतात. तरी मायबोली प्रशासनाने त्वरित कारवाई करून टोचा ह्या सदस्याचे सर्व आयडी रद्द करावेत अशी मी मागणी करते.
काय टोचाभौ, माबोप्रशासनाने काय करावं असं तुमचं मत आहे? प्रामाणिक उत्तर द्या.
<<आणि ते भुषण पितापुत्र कसे सुटले ह्या चाळणीतुन?>>
भूषण पितापुत्रांवर कुठल्या कोर्टात केस चालू आहे? कुठल्या पोलिस स्थानकात गुन्हा दाखल आहे?
मोदी पंप्र झाले तरी कसलीही कारवाई न होता 'पाकिस्तानी एजण्ट' भारतात खुलेआम कसा फिरतोय ह्या प्रश्नाच्या उत्तरातच अनेक प्रश्न सुटतील !
मिर्ची, हा प्राकर
मिर्ची, हा प्राकर दिल्लीसारख्या ठिकाणी जिथे राज्य= शहर आहे तिथे चालू शकेल. पण बाकी ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हे कसं काय करायचं?
मी मागेही या किंवा दुसर्या कोणत्यातरी धाग्यावर लिहिलं होतं, ७३वी आणि ७४वी घटनादुरस्तीनंतर हे सगळं डिसेंट्रलाझेशन मध्ये आधीच आलेलं आहे ना? हेच तर आहे ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीमध्ये.
मुळात जर वॉर्डपुरत्याच सिमित असतिल मोहल्ला सभा तर त्यात आमदार /खासदारांचा काय रोल? एका वॉर्डमध्ये १० मोहल्ले, एका शहरामध्ये ३०-४० वॉर्ड..या हिशेबानी मग एका विधानसभा मतदारसंघात किती मोहल्ले असतिल आणि खासदाराच्या अखत्यारीत किती मोहल्ले येतिल याचा विचार करा. आणि हे फक्त शहरी भागांमध्ये. ग्रामिण भागांमध्ये काय करणार? एका ग्रापं मध्ये किती मोहल्ले घ्यायचे?
मिर्ची, तुमची मोहल्ला सभेवरची
मिर्ची, तुमची मोहल्ला सभेवरची पोस्ट अक्षरशः वरवर नजर टाकून वाचली (वाचली म्हणता येणार नाही खरंतर) आहे आत्ता वेळेअभावी. तरी अॅक्नॉलेजमेंट म्हणून ही पोस्ट टाकते आहे.
तुम्हाला स्पेसिफिक काही उदाहरण विचारायचं असेल तर लिहाल का?>>> पाण्याचे कनेक्शन आणि पुरवठ्याच्या वेळा.
अल्पना, तुम्ही म्हणता तसं ७३
अल्पना,
तुम्ही म्हणता तसं ७३ आणि ७४ च्या कलमांमध्ये घटनादुरुस्ती करून डिसेन्ट्रलायझेशन आणलं असेल तरी ते प्रत्यक्षात कुठे आलंय? आलंय का? मला खरंच माहीत नाही. पण मी भारतात होते तोवर हे पाहिलेलं नाही आणि आत्ता पण भारतातील नातलग, दोस्त कोणी बोलल्याचं आठवत नाही.
अजूनही लोकांना काय हवंय ह्याचे निर्णय सरकारी अधिकारीच घेतायेत.
<<मिर्ची, हा प्राकर दिल्लीसारख्या ठिकाणी जिथे राज्य= शहर आहे तिथे चालू शकेल. पण बाकी ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हे कसं काय करायचं?>>
का? प्रभागांच्या पातळीवर हे राबवू शकतो की. आणि आमदार-खासदार त्यावर लक्ष ठेवतील.
<<मुळात जर वॉर्डपुरत्याच सिमित असतिल मोहल्ला सभा तर त्यात आमदार /खासदारांचा काय रोल?>>
आत्ताच्या व्यवस्थेत काय रोल आहे तोच राहील ना. फक्त आत्ता खालच्या स्तरात जी डायरेक्ट डेमोक्रसी नाहीये ती आणली जाईल असं वाटतंय.
<<एका वॉर्डमध्ये १० मोहल्ले, एका शहरामध्ये ३०-४० वॉर्ड..या हिशेबानी मग एका विधानसभा मतदारसंघात किती मोहल्ले असतिल आणि खासदाराच्या अखत्यारीत किती मोहल्ले येतिल याचा विचार करा. आणि हे फक्त शहरी भागांमध्ये. ग्रामिण भागांमध्ये काय करणार? एका ग्रापं मध्ये किती मोहल्ले घ्यायचे?>>
माझं नागरिकशास्त्र कच्चं आहे नंदिनीतैंना माहितीये हे
बारकावे मला नाही सांगता येणार. मी पण अजून माहिती घेत आहे. पण केजरीवालांच्या ज्ञानावर विश्वास आहे (अंधविश्वास?) त्यांनी नक्कीच विचार केलाय. पण त्यांच्यावर बाकीचाच धुरळा इतका उडतोय की ह्या महत्वाच्या गोष्टी बाजूला राहत आहेत.
इथल्या नागरिकशास्त्राच्या जाणकारांना आणि इतरही सर्व सूज्ञ, जागरूक वाचकांना विनंती आहे की सर्व राजकीय प्रिज्युडिज बाजूला ठेवून हा कन्सेप्ट समजून घेऊन चर्चा घडवून आणा.
हरकत नाही अश्विनी. <<तुम्हाला
हरकत नाही अश्विनी.
<<तुम्हाला स्पेसिफिक काही उदाहरण विचारायचं असेल तर लिहाल का?>>> पाण्याचे कनेक्शन आणि पुरवठ्याच्या वेळा.>>
इथे बहुमत वापरलं जाईल असं वाटतं. आत्ता तरी कोणाच्या मनाप्रमाणे घडतं हे? संबंधित अधिकार्यांच्याच ना. एकाच मोहल्ल्यात राहणारे लोक साधारण एकाच आर्थिक स्तरातील असतात असं एक निरीक्षण. मग बहुमताने पाण्याच्या वेळा ठरवल्या तर फायदाच होईल.
मी तेच म्हणतेय. हे सगळं
मी तेच म्हणतेय. हे सगळं कागदोपत्री आहेच. केजरीवाल काही नविन मॉडेल आणत आहेत असं मला तरी वाटत नाही. (हे केजरवाल फॉलोअर्स आणि विरोधक दोघांसाठी आहे. ) काही ठिकाणी जिथले लोक जागरूक आहेत किंवा नगरसेवक जागरूक आहेत तिथे होतं हे सगळं. बाकी ठिकाणी कागदोपत्री होतं. पण मग त्यात आपली/नागरिकांचीच चुक आहे. खेड्यांमध्ये पण बर्याच ठिकाणी ज्या ग्रामसभा होतात त्या याचाच भाग आहेत की.
शहरांमध्ये ७४व्या घटना दुरुस्तीने आनि खेड्यांमध्ये ७३ व्या दुरुस्तीने लोकांचा राज्यकारभारातला सहभाग वाढवण्यासाठी खूप सोय केली आहे. आपण त्याचा फायदा घेत नाही.
आत्ताच्या व्यवस्थेत काय रोल आहे तोच राहील ना. फक्त आत्ता खालच्या स्तरात जी डायरेक्ट डेमोक्रसी नाहीये ती आणली जाईल असं वाटतं>>> केजरीवाल हे जे डायरेक्ट डेमॉक्रासी नाहीये म्हणतात त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं नेहेमी. नव्या सिस्टिमची गरज नाहीये, सिस्टिम आहेच अस्तित्वात. आणि खूप चांगली पण आहे.फक्त तीच्या वापराची गरज आहे.
७३-७४ अमेंडमेंटचा अभ्यास केलेलं कुणी आहे का?मला सध्या वेळ नाहीये नाहीतर मीच लिहिलं असतं त्याबद्दल. (खूप वर्षं झालीत अमेंडमेंट वाचून. कही लिहिण्यासाठी परत सगळं आधी वाचावं लागेल व्यवस्थित. )
<<मी तेच म्हणतेय. हे सगळं
<<मी तेच म्हणतेय. हे सगळं कागदोपत्री आहेच. केजरीवाल काही नविन मॉडेल आणत आहेत असं मला तरी वाटत नाही. (हे केजरवाल फॉलोअर्स आणि विरोधक दोघांसाठी आहे. ) काही ठिकाणी जिथले लोक जागरूक आहेत किंवा नगरसेवक जागरूक आहेत तिथे होतं हे सगळं. बाकी ठिकाणी कागदोपत्री होतं. पण मग त्यात आपली/नागरिकांचीच चुक आहे. खेड्यांमध्ये पण बर्याच ठिकाणी ज्या ग्रामसभा होतात त्या याचाच भाग आहेत की. >>
काही प्रमाणात नागरिकांची चूक आहे. पण नागरिकांनी अप्रोच केलं तरी त्यांना राज्यकर्ते दाद देतील का? अनेक ठिकाणचे आमदार-खासदार, नगरसेवक हे सभ्य, विचारी लोकांनी भेटायच्या योग्यतेचे सुद्धा नाहीयेत असं दिसतंय. नो ऑफेन्स.
<<केजरीवाल हे जे डायरेक्ट डेमॉक्रासी नाहीये म्हणतात त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं नेहेमी. नव्या सिस्टिमची गरज नाहीये, सिस्टिम आहेच अस्तित्वात. आणि खूप चांगली पण आहे.फक्त तीच्या वापराची गरज आहे. >>
केजरीवाल नवीन सिस्टीम नसतील आणत अल्पना. पण ते सिस्टीम कशी वापरायची हे तरी शिकवत आहेत ना? सामान्य लोकांना नाही माहीत ह्या गोष्टी कशा करवून घ्यायच्या असतात ते.
केजरीवाल गांधीजींची 'स्वराज' ची कल्पना पुढे नेत आहेत असं दिसतंय. जी गांधीजींच्या हत्येसोबतच विलीन झाली होती.
<<केजरीवाल हे जे डायरेक्ट
<<केजरीवाल हे जे डायरेक्ट डेमॉक्रासी नाहीये म्हणतात त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं नेहेमी.>>
का आश्चर्य वाटतं? माझ्या प्रभागात कचर्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न आहे, त्याची सोय करायला हवी असं माझ्यासहित बहुतांशी नागरिकांचं मत आहे. पण वारंवार पत्रं लिहूनही हा प्रश्न न सोडवता नगरसेवकाने एक मोठ्ठी कमान बांधण्यात पैसा वाया घालवला आहे. मग ही डायरेक्ट डेमोक्रसी कशी?
एखाद्या ठिकाणी लोकल बसेस जास्त असायला हव्यात असं बहुतांशी स्थानिक लोकांना वाटतंय. पण हे न करता लोकप्रतिनिधीने तिथे फ्री वायफाय चालु केलंय. मग ही डायरेक्ट डेमोक्रसी कशी?
झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भीषण आहे. पण तो न सोडवता तिथे बाग आणि कारंजं केलंय. उद्घाटनाच्या दिवशीसुद्धा त्या कारंज्याला पाणी नाही आलं. मग ही डायरेक्ट डेमोक्रसी कशी?
Pages